Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
चि. नलिनीस पत्रं ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » ललित » चि. नलिनीस पत्रं « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 20, 200625 03-20-06  11:54 pm

Chafa
Tuesday, March 21, 2006 - 12:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण तुझ्या गावाचे आणि तिथल्या माणसांचे कौतुक जाहिररित्या करावेसे वाटले म्हणुन हा खटाटोप.

>>> अच्छा, आता कळले हे काय आहे. इतका वेळ कळतच नव्हते नक्की काय चाललेय ते! पहिल्या दोन तीन पत्रात तर उगाचच वेगवेगळे विषय ओढूनताणून आणल्यासारखे येत होते, असे आपले मला वाटले. :-(

टीपः हे माझे त्रयस्थ मत आहे. पत्रांशी व त्यातल्या संदर्भांशी संबंधित लोकांना हे लेखन आवडलेले आहेच पण मी केवळ लेखनशैलीबद्दल लिहीले आहे.

नलिनी, तुझे पत्र आवडले. नेटके पण तरीही आपुलकीपूर्वक लिहील्याचे जाणवते.


Seema_
Tuesday, March 21, 2006 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश खणा नारळाची ओटी अस नाव असलेल खुप जुन पुस्तक ( माझ्या आईकडे होत ते . आता हरवल गेलय ते तीच्याकडुनही ) तुम्ही वाचल आहे का?संपुर्ण पुस्तकातील कथानक केवळ पत्रातुन उलगडत . मुलीच लग्न झाल्यावर , आईन मुलीला आणि मुलीन आईला लिहिलेली अतिशय उत्कट,भावनानी ओथंबलेली पत्र त्यात लिहिली आहेत . बघा तुम्हाला मिळाल तर .
तुम्ही लिहिलेली ही पत्राची idea बघुन आठवल .
सगळ लिहुन झाल कि प्रतिक्रिया लिहिन .



Ana_biswas
Tuesday, March 21, 2006 - 1:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वाचुन 'मला गावच नाही' ही खंत पुन्हा पुन्हा वाटली. असो,अशी सफ़र घडते, हे ही नसे थोडके..खरच, किती छान लिहिता तुम्ही,दिनेश.सुगरणीच्या घरट्याचा फोटो मस्तच आहे

Samixak
Tuesday, March 21, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



अरे हे पत्र आहे की टिनपाटचा पत्रा ?
तुमचे personal relations जे काय असतिल ते असो, त्याची असी चव्हाट्यावर जाहिरात कशाला ? ललित मूल्य अजिबात मह्नजे अजिबात शून्य.

(Message edited by Moderator)

Moderator_5
Tuesday, March 21, 2006 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समीक्षक,
तुमची समीक्षा चालू द्या, पण वैयक्तिक आरोप, अनुचित भाषा, निष्कारण वाद हे कृपया टाळा.


Savani
Tuesday, March 21, 2006 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, नलिनी ताई, अतिशय सुरेख पत्रलेखन. दिनेश फ़ार छान प्रवास वर्णन केले आहे आपण. अगदी चित्र डोळ्यापुढे उभे राहिले.
नलिनी, फ़ार छान उत्तर लिहिले आहेस. अगदी मोकळी ढाकळी घरगुती भाषा आणि सुरेख पत्रलेखन शैली.
वेगळा प्रकार वाचायला मिळत आहे.
मेघा, तू पण लिहि. छान लिहित आहेस.


Prajaktad
Tuesday, March 21, 2006 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,नलु,मेघा!सुंदर पत्र-प्रवासवर्णन....
गावाकडचे अगत्य हा वेगळाच सुखद अनुभव असतो.माझे हि आजोळ चे गाव नगर जिल्ह्यातलेच आहे.


Polis
Tuesday, March 21, 2006 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पत्र व्यवहार लयी बेश..
बारक्या, हे येड चाफ़ा कोन आहे बघ, 112 (अ)खाली आत घे, ओढाताण मोकळी करु त्याची..


Chafa
Tuesday, March 21, 2006 - 10:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, अशी काहीशी प्रतिक्रिया मला अपेक्षित होतीच. त्या निमित्ताने मला माझी भूमिका थोडी अधिक विस्ताराने मांडता येईल.

कुठलीही नकारात्मक छटा असलेली प्रतिक्रिया देताना प्रत्येक वेळेस मनात विचार येतोच की हे लिहायची खरंच गरज आहे का? कुठलेही लेखन करताना त्या लेखकाचे कौशल्य पणाला लागत असते. प्रत्येक शब्द शोधताना, वाक्यरचना जमवताना, आशय पोचवताना, लिखाणातले साहित्यिक सौंदर्य जपतांना आणि हे सर्व करतानाच वाचकाचा त्यातला interest कायम ठेवणं हे मोठ्या शर्थाचं काम आहे याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे 'टीका करणं सोपं आहे, तितकं छान लिहून दाखवा' हा आरोप होण्याची भीती तर असतेच असते. यावर मागे 'मायबोलीवर काय लिहावे अन् काय लिहू नये' असा मोठा विषय होऊन गेला आहे.

पण मग एवढा सगळा विचार करुनही ती प्रतिक्रिया द्यावीशी वाटते. का? त्याबद्दल थोडेसे... दिनेश यांच्या लेखनाचा मी फार मोठा चाहता आहे (इथे कोण नाही म्हणा?). त्यांचं लिखाण प्रथितयश लेखकांच्या तोडीचं असतं, ते वाचतांना नेहमीच उत्सुकता असते. मायबोलीवर मी नवीन असताना सर्वप्रथम त्यांच्या नावाने search करुन त्यांचे archive मधले त्यांचे सगळे लेख वाचून काढल्याचे आठवते. आवडल्याची पोच दिली जातेच. आणि कधीतरी मग त्यांनी लिहीलेले तितकेसे आवडले नाही तर त्याबद्दलही लिहावेसे वाटते. गुलमोहरची कल्पना अस्तित्वात येण्याअगोदरपासून इथे केलेल्या लिखाणाला प्रतिक्रिया देण्याची पद्धत (किंवा सोय?) केलेली आहे. सकारात्मक प्रतिक्रिया आणि नकारात्मक प्रतिक्रिया दोन्हीही नेहमी दिल्या गेल्या आहेत. एखादी नकारात्मक प्रतिक्रिया वाचून लेखकाला कुठेतरी त्रास होतच असणार पण तरीही ती देतांना त्यामागे मला एक वाचक म्हणून जे वाटलं ते लेखकापर्यंत पोचावं असा खरोखर मनापासून विचार असतो. हे email द्वारे नाही कळवता येणार का? नक्की येईल. पण पुष्कळ वेळा वैयक्तिक प्राधान्यामुळे ( personal preference ) त्यांना असे लिहीण्यापेक्षा ते इथे मांडणे मला अधिक संयुक्तिक वाटते.

खुद्द लेखकाने जर आपल्या साहीत्यानंतर स्पष्ट लिहीले की कुठल्याही प्रतिक्रीया अपेक्षित नाहीत किंवा केवळ सकारात्मक प्रतिक्रिया लिहाव्या तर मी नक्कीच असे लिहायचे धाडस करणार नाही. हे सर्व म्हणत असतांनाच जर कोणी मर्यादा ओलांडून वैयक्तीक मानहानी करणारी 'समीक्षणं' लिहीली तर त्याचाही वेळीच तसे लिहून मी विरोध आणि निषेधही केलेला आहे.

सरतेशेवटी, मला खात्री आहे की दिनेशनी लिहीलेल्यापेक्षाही कितीतरी अधिक पटींनी त्यांनी वर्णन केलेली माणसं व त्या जागा चांगल्या आहेत, जिव्हाळ्याच्या आणि आपुलकीच्या आहेत. मी केवळ 'साहीत्य' या संदर्भातून माझे मत मांडले (तसे मी आधी स्पष्ट लिहीलेही होते). कदाचित हे गुलमोहर मधे न लिहीता मायबोलीवर इतर दुसरीकडे हवे होते? पत्रे छान आहेत, पण दिनेश यांच्या नेहमीच्या साहित्याच्या दर्जाची वाटली नाहीत हे लिहील्यामुळे किंवा मी कुठे मर्यादा ओलांडून टीका केल्यामुळे वगैरे, दिनेश तुम्हाला राग आला असेल तर जरुर सांगा. त्याप्रमाणे मी माॅडरेटर्सना विनंती करुन माझी वरची प्रतिक्रिया उडवायला सांगेन. शिवाय मी लिहीलेल्यापैकी काहीही माॅडरेटर्सना पटत नसेल तर तसेही सांगावे म्हणजे यापुढे नकारात्मक प्रतिक्रिया देणे बंद करेन.

इथे हे सर्व लिहावे लागणे दुर्दैवी आहे; पण म्हणतात ना 'आ बैल मुझे मार...'! नकारात्मक प्रतिक्रिया देण्यामागचा धोका. ती देतानाच तो पत्करला होता. :-)


Seema_
Tuesday, March 21, 2006 - 11:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा अगदी योग्य आणि विचारपुर्वक लिहिल आहेस . पटल आणि आवडलही .


Bee
Tuesday, March 21, 2006 - 11:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय समिक्षक, गुलमोहरवरच्या ललित मध्ये हा साहित्यप्रकार वेगळा आहे. इथे आजवर कुणी असे साहित्य लिहिले नाही. दिनेशनी ते प्रथमच लिहिले आहे. पण आपल्या मराठी साहित्यात बरीच पुस्तके आहेत पत्रांवर. उदारणार्थ सुनिताबाई देशपांडेंनी जी ऐ कुलकर्णींनाची लिहिलेली पत्रे आणि त्यांची त्यावरची उत्तरे असे दोन वेगळे पुस्तक आहेत. ह्याचा अर्थ असा होत नाही तुम्ही तुमचे संबंध चव्हाट्यावर आणता. असे जर असेल तर आत्मचरित्र काय असते मग. तुम्ही त्याला पण चव्याट्यावर आणणेच म्हणाल का?

दिनेश, नलिनी खरच छान लिहिलत. वाचकांनी ही पत्रे समजावून घेतली ह्याचे फ़ार कौतूक वाटते. नाहीतर गैरसमज व्हायला काहीच वेळ लागत नाही. एकानी काहीबाही लिहिले की दुसराही तसाच विचार करतो. पण आपले इथले वाचक खरच सुज्ञ आहेत.


Megha16
Wednesday, March 22, 2006 - 12:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा,
तुम्ही जे काही लिहल आहे ते तुमच्या मते योग्य असेल.
आणी तुम्ही म्हटल्या प्रमाणे प्रतिक्रिया काय द्याची हे वाचकावर अवलंबुन असते.मग ती सकारात्मक असो की नकारात्मक.
पण इथे दिनेश दा नी हे पत्र एखाद्या व्यक्तीला उदेशुन जरी लिहल असेल तरी यात त्यांनी त्याच्या प्रवासाच,त्यात त्यांना आलेले अनुभव, त्यांना भेटलेल्या व्यक्ती यांच वर्णन केल आहे. मला तरी अस वाटत की त्यांचे हे पत्र ललित या विभागात च योग्य आहे.


Giriraj
Wednesday, March 22, 2006 - 12:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोब्बर चाफ़ा!
मलाही critisize केलेलं आवडतं पण ती constructive critisizm आसायला हवी. केवळ टिका करायची म्हणून केली असा प्रकार नको. अशी टिका किंवा समीक्षा करतांना काय असणं अधिक वाचनीय ठरलं असतं हे सांगतांनाच काय नसल्याने फ़रक पडला नसता किंवा असं काय नको की ज्यामुळे लेख,कविता,कथा अधिक बहारदार झाली असति; हे कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय मांडणं अपेक्षित आहे constructive critisizm मध्ये!

या पद्धतिने समिक्षा करणार्‍यांचं मी तरी स्वागतच करेन.कारण यातूनच काहिनाकही शिकायला मिळतं. हे लक्षात घ्यावे की इथे लिहिणारे कुणी व्यावसायिक लेखक नाहीत.त्यांची आवड,मराठीवरचं किंवा एकूणच साहित्यावरचं प्रेमच त्यांना लिहायला प्रवृत्त करत असतं. आणि जर चांगल्या समीक्षेतून काही शिकायला मिळालं तर ते त्यांना नकीच हवं असतं.

श्रियुत समिक्षक महोदय,आपण जर अशी(एककली नव्हे तर सर्वसमवेशक) समिक्षा करायला सुरवात कराल तर सर्वप्रथम मी आपले स्वागत करतो.





Dineshvs
Wednesday, March 22, 2006 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा, मला अजिबात राग आलेला नाही. राग येण्यासारखे काय आहे त्यात ? तुझा स्नेह मला अपरिचीत आहे का ?
पहिली काहि पत्रे जरा बुचकळ्यात टाकणारी होती हे कबुल. आणि मला तेच अपेक्षित होते.
शिवाय अशी अनौपचारिक पत्रं लिहिताना विषयाचे बंधन नसते.
त्या परिसरातुन फिरुन आल्यानंतर डॉ. डहाणुकरानी लिहिलेले पत्रं आठवले. मी मायबोलिकराना ते ऊपलब्ध करुन दिलेच होते. याहु वर अजुन ते असावे Bee ने टाकले होते. म्हणुन हा फ़ॉर्म निवडला.
आजकालच्या ईमेलच्या जमान्यात पत्रलेखन विस्मरणात चालले आहे. हि पत्रे तशी खाजगी नाहीत. चि. नलिनीला मी अजुन भेटलोहि नाही. पण अशी नाती मी अनेकजणांशी जोडली आहेतच, आणि तेच माझे वैभव आहे.


Ekanath
Wednesday, March 22, 2006 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा,

आपण आपला अमूल्य वेळ वाया घालवलात असे वाटते.

तुम्ही अतिशय सभ्य शब्दात सांगितलेले शहाणपण कळण्यासाठी आवश्यक असलेली किमान बुद्धीमत्ताही या व्यक्तीकडे नाही.

मुद्दाम आक्रस्ताळेपणा करून सनसनाटी निर्माण करणे इतकेच यांचे काम आहे. त्यामुळे त्याकडे सगळ्यांने दुर्लक्ष करावे असे वाटते.

या व्यक्तीला काय चूक काय बरोबर, हे सविस्तर सांगता येत नाही. केवळ कडक शब्द वापरून अनावश्यक टिका करणे इतकेच जमते, यावरूनच या व्यक्तीची लायकी आणि पातळी समजते.

बाकी हे संकेतस्थळ ज्यांच्या मालकीचे आहे, ते ठरवतील अशा प्रवृत्तींना इथे स्थान द्यायचे की नाही.


Chafa
Wednesday, March 22, 2006 - 2:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सगळ्यांना आणि विशेषकरुन दिनेशना, मला काय म्हणायचे आहे ते समजून घेतल्याबद्दल. मूडी तुझे पोस्ट का उडवलेस? मला तरी ते योग्यच वाटले होते. गावातल्या माणसांना शहरातल्यांपेक्षा जास्त माया असते हे तर निर्विवाद आहे! दोन्ही जीवनप्रवृत्तीच वेगळ्या आहेत.

Maitreyee
Wednesday, March 22, 2006 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्या हे काहीतरीच हां तुझे!तू generalise का करतोयस? गावातले सगळेच लोक काय सिनेमातल्यासारखे भोले भाले दूध के धुले आणि शहरातले सगळेच लोक ड्यांबिस असतात काय रे :-)

Deepanjali
Wednesday, March 22, 2006 - 3:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गावातल्या माणसांना शहरातल्यांपेक्षा जास्त माया असते हे तर निर्विवाद आहे! दोन्ही जीवनप्रवृत्तीच वेगळ्या आहेत.


<<< V &C करायचा नाहीये , But I strongly object ... :-)

Seema_
Wednesday, March 22, 2006 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yeap mt,dj अगदी , अगदी बरोबर आहे . चाफ़्या माझा साफ़ विरोध आहे तुझ्या वरच्या वाक्याला . ~D
तुला एकदा सांगली,कोल्हापुर जिल्ह्यातल्या बेरकी गावांकडे फ़िरवुन आणते थांब .
काय रे मनिष तुझ काय मत आहे ?


Chafa
Wednesday, March 22, 2006 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL मंडळी मी पुढे हेही वाक्य लिहीले होते की याचा अर्थ शहरात माया नसतेच असा नव्हे. पण म्हटलं यावर परत PJ नको म्हणून ते काढून टाकले होते. :-O

पण तुमच्या भावना पोचल्या. आणि मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे, त्यामुळे विरोधाचा प्रश्न नाही. :-) माझेच वाक्य चुकले हे कबूल करतो.


Manish2703
Wednesday, March 22, 2006 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीमा ... अगदी अगदी... गावाकडची माणसे जेवढी मायाळु.. तेवढीच बेरकी पण असतात..

Yog
Wednesday, March 22, 2006 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, नलिनी, मेघा... छान पत्र-कथा आहे. खर आहे, email च्या जमान्यात, आजकाल अशी पत्र लिहीणे वा वाचायला मिळणे दुर्मिळ झालय!

Moodi
Thursday, March 23, 2006 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश मला तुम्ही परवा सांगीतलेली म्हण आठवली, ती किती पर्फेक्ट आहे बघा इथे. पण मला गंमत वाटते की एवढ्या मोठ्या समुहाला ती एकाच वेळी कशी सुट झाली असावी? पण आहे बॉ मज्जा!!

तुम्ही बोलु नका किंवा बोलणारही नाहीत, तुमचा स्वभाव माहितीय मला, पण काय आहे ना मलाच ती म्हण काल रात्री आठवली जेव्हा तुमच्या या ललितमध्ये तुम्हाला दाद द्यायला गर्दी जमा झाली. मला हसुही आवरेना. विज्ञान पुढे गेले तरी मानवी मन तसेच्च?
पण एखादा योग फार दुर्मीळ असतो.

पुढच्या कथा नलिनी किंवा तुमच्याकडुन येतील अशी अपेक्षा आहे, ती पुर्ण व्हावीच. अन कूलचे नाव सुभाष आहे, हे मी विसरलेच, सारखी आठवत बसले हा सुभाष कोण म्हणुन, मग एकदम लक्षात आले.

आता या कथेवरील साद प्रतीसाद जाऊ द्या उडत. आधी लिहा बघु पुढचे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators