|
Ninavi
| |
| Friday, March 10, 2006 - 10:49 am: |
| 
|
वा, इथे अभ्यासपूर्ण चर्चा सुरू झालेली पाहून खरंच बरं वाटलं. इतके दिवस आपण सगळे लिहीत होतो आणि भलीबुरी दादही देतच होतो, पण आता एकमेकांच्या मदतीने शिकू, सुधारू. कविता ( हा सर्वसमावेशक शब्द आहे. म्हणजे यात सन्मीच्या मुक्तछंदापासून सारंगच्या गज़लेपर्यंत सगळंच आलं.) सगळ्यांच्याच मस्त आहेत. सारंग, मला फक्त ' सजा घडू लागली' जरा खटकलं. आणि माझ्या माहीतीप्रमाणे ' पुरंध्री' असा शब्द आहे, रंध्री कळलं नाही.
|
Chinnu
| |
| Friday, March 10, 2006 - 11:07 am: |
| 
|
सन्मे तुला सुर्य पण बक्षिस ग! काय लिहीतेस, व्वा! सही.. पंचात्तरी, खरच खुप आतुन वाटली, निरंजन. सारंग मलाही रंध्री समजले नाही, बाकी गझल मस्त! झाड, तुम्ही थोडे थोडे करत खुप काही लिहुन जाता. मस्त! वैभव तुझे अनाघ्रात क्षितीज अत्ताच वाचली. आभाळ पांघरुन गेलास अगदी! Keep it up! मीनु, तुझी निश्चलतेचा शाप आणि रस्ता वाचली. जर अधुन्मधुन हिरवे फ़ुलोरे नसते तर रस्त्याला काय अर्थ राहणार? खुप वास्तवाशी जुळणारी वाटली कविता. दिप्ती, मझ्याकडे शब्दच नहीयेत! छान ग. निनावी तुझी शाश्वत मधुमास फ़ार्र फ़ार्र आवडली! उर्मी घाट सही चित्तरला आहेस. बी, तु इतक छान लिहित होतास. का रे लिहीत नाहीस असच. थांबु नकोसच लिहीत जा. प्रसादमोकाशी, u striked again! थोडी संथ वाटली. प्रसादशिर, तुम्ही जे प्रेमाविषयी मान्डलत सुरुवातीला ते फ़ार खरय. शेवट आशावादी केलात, बर वाटले. कर्पे, तुमच्या वास्तवाशी जुळणार्या कविता मला जास्त आवडतात. चौकटाचा राजा, अजुन अशाच धुंद आठवणी सांगत रहा आम्हालाही. शुभांगी व्यथा नक्किच मांडलिस शोध मधे. देवा, अजुन येवु द्या की! आज आरामात वाचले सर्व. म्हणुन माझ्या बालबुद्धीला पटले ते सांगितले. Cbdg!
|
अं हं निरंजन , अजूनही पटत नाहिये ... हे बघा बरं ... खाली सुरेश भटांच्या एका गझलेचे शेर देतोय मी .. मतल्यामध्ये अक्षरगणवृत्त येवूनही नंतर मात्रावृत्तात लिहीली आहे जितके जगावयाचे तितके जगून झाले फिरते उगीच जाते जगणे दळून झाले आतापर्यंत मी ही जगलो कसा कळेना असणे नसून झाले , नसणे असून झाले आता उगाळतो मी हा कोळसाच माझा आभास पेटल्याचे तेव्हा चुकून झाले इथे दुसरया आणि तिसरया शेर मध्ये " आ " दीर्घ नाही का ? सारंगच्या म्हणण्यानुसार असं चालत नाही .. जर ही सूट घ्यायची असेलच तर मतल्यामध्येच घ्यायला हवी ... मग ही गझल चूक आहे का ? मग माझ्या गझलमधल्या शब्दांच्या क्रमाचा प्रश्न कुठे येतो ? माझ्यामते जिच्या सगळ्या शेरांमध्ये मात्रा एकसारख्या असतात आणि म्हणताना कुठेही अडखळल्यासारखं होत नाही ती मात्रावृत्तातली योग्य गझल असते आणि मात्रावृत्तातल्या गझलेत शब्दांच्या क्रमाचा संबंध येत नाही .. जर अक्षरगणवृत्तात लिहायची असेल तर मात्र कुठेच तडजोड नसावी अस सारंग चं मत आहे आपलं काय म्हणणं आहे ? आणि तुम्हाला खरं सांगू का , गझल साधी सोप्पी , शक्यतो अक्षरगणवृत्तात बसणारी , नसेल तर मात्रावृत्तात गेय असणारी , पण अर्थपूर्ण असावी असंच सुरेश भटांच म्हणणं आहे
|
Peshawa
| |
| Friday, March 10, 2006 - 5:05 pm: |
| 
|
आपाप्ल्या हातातील जादु शोधत फ़िरत रहातात बोटे पेटीच्या निर्जीव पट्यावरून कुणि फ़ुले माळावीत तसे गाणे चक्काचुर पाकळ्यांचे सकाळी केलेले हिशोब माझे देणे फ़िटत नाही म्हातारा फ़ुलेवालाही आयुश्याशी गंधार भांडतो आहे विस्कटणार्या प्रतिबिंबासारखे पुन्हा पुन्हा जुळायाचे, आणी एखाद्या खोल क्श्णी डोळ्यात बुडताना तुझ्याच ओठांकडे आधार मागायचे... निर्जिव पेटिने हात भोगावेत तसे!
|
Sarang23
| |
| Friday, March 10, 2006 - 10:45 pm: |
| 
|
निनावी धन्यवाद! रंध्री म्हणजे पण पूरंध्री असं मला वाटतय, पण तरी रंध्री चूक असेल तर शेरात अशी तडजोड केली तर कसं वाटेल? उभा आठवांचा शिलेदार दारात ओठंगुनी पुन्हा एक वैधव्यशाली पुरंध्री रडू लागली... आणि " सजा घडू लागली " असा वाक्यात उपयोग केला जातो. ( हे माझं मतं, कृपया इतरांनीही आपापली मते कळवावीत ) वैभव, तू जे उदाहरण दिले आहेस, त्यात दोन लघुंचा एक गुरू केला आहे. पण माझ्या मते सुरेश भटांनी ही सूट घेतली आहे. दोन लघुंचा एक गुरू करणं हे मात्रा वृत्ताच लक्षण आहे. अक्षरगणाच नाही. अर्थात मी कोणी प्रस्थापीत कवी नसल्यामुळे हे फार उद्धटपणाचे विधान वाटेल, पण मी सुरेश भटांविषयीचा आदर ही वेगळी गोष्ट आणि चुका ही वेगळी गोष्ट मानतो. निनावीच्या म्हणण्यानूसार मी ही रंध्री या शब्दाबाबत चूक केली आहेच की! आणि ती खरच चूक असेल तर मला मान्य करावीच लागेल, पण त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे म्हणून थोडसं अभ्यासपुर्ण मत प्रदर्शीत करतो. कृपया कोणीही ते वैयक्तिक घेवू नये ही विनंती. घरातल्यांशी जसा संवाद साधला जातो तितक्याच मनमोकळेपणाने इथे पण तो साधला जातोच असं मला वाटतं.
|
Sarang23
| |
| Saturday, March 11, 2006 - 12:54 am: |
| 
|
आनंद कोणता आनंद झाला? श्वास माझा बंद झाला! ज्योत दो हातात, वारा आजही बेबंद झाला... तेवना माझ्या सभोती, का असा रे मंद झाला!? धाडले तू पत्र कोरे हाच अत्यानंद झाला! जो नको होता अबोला तोच आता छंद झाला!!! सारंग
|
Shyamli
| |
| Saturday, March 11, 2006 - 1:07 am: |
| 
|
वा छाने... पण आहात कुठे आपण?
|
वैशाली, सारंग, वैभव, धन्यवाद. वैभव, पहिल्या शेरात देवत्व आणि तत्व हे 'अ' ची अलामत आणणारे शब्द आहेत. तर इतर शेरांमध्ये इतर अलामती घेणासाठी खरे तर पहिल्या शेरात अलामत बदलणे आवश्यक असते, म्हणजे अलामत मुक्त करून घ्यायची असते. तुझ्या सुचनेबद्दल धन्यवाद.
|
Devdattag
| |
| Saturday, March 11, 2006 - 2:26 am: |
| 
|
वैभव, सारंग, निरंजन, निनावि, संघमित्रा सगळेच एकदम सुरेख... मित्रांनो गजल ह्या विषयावर अजुन उहापोह झाल्यास आमच्यासारख्यांना त्याचा खरंच लाभ होईल. हवंतर V & C वर नविन बीबी उघडा
|
Devdattag
| |
| Saturday, March 11, 2006 - 2:41 am: |
| 
|
कळेजरी पतंगाचे जळणे श्रेष्ठ होते स्वप्नातही शमेवर भाळणे सोडले मी मत्सरात तुझे मला जाळणे इष्ट होते अनलातही स्वत:ला पोळणे सोडले मी दिलातून तुला सखे गाळणे कष्ट होते जोगियात धैवताला माळणे सोडले मी वाटेवर तुझ्याविना चालणे क्लिष्ट होते फुलांनीच काट्यांसवे खेळणे सोडले मी पापण्यास पापण्यांचे जुळणे द्रष्ट होते अश्रुही मग कोरडे ढाळणे सोडले मी ओंजळीत अक्षरांना पेलणे भ्रष्ट होते शब्दांतून भावनांना तोलणे सोडले मी
|
Ninavi
| |
| Saturday, March 11, 2006 - 7:16 am: |
| 
|
सारंग, पुरंध्री म्हणजे माझ्या माहितीनुसार नागर स्त्री. ( खेडवळ बाईला तसं म्हणणार नाहीत.) रंध्रं म्हणजे त्वचेवरील छिद्रं. या दोन्हींचा काहीच संबंध नाही. त्यामुळे ते बदलायला हवं असं माझं मत. त्यातून कुणाला आणखी माहीती असल्यास जरूर सांगा. मॉड, खरंच ही चर्चा इथे योग्य वाटत नसेल तर दुसरा बीबी उघडावा का?
|
Mmkarpe
| |
| Saturday, March 11, 2006 - 10:35 am: |
| 
|
जगुया थोडे...... रडत रडत येतो रडवित रडवित जातो मधला काळ हसुया थोडे... हसता हसता जगुया थोडे... नित्याचे हेवेदावे नित्याचे गनिमी कावे विसरुनी त्यांना प्रेम वाटुया थोडे.... प्रेम करता करता जगुया थोडे... भिन्न चेहरे भिन्न रंग लाल रक्त एक रंग वैश्विक एकात्मतेचे गीत गाउया थोडे... गाता गाता जगुया थोडे... खाली हात येणे खाली हात जाणे जीवन्-मरणाच्या रहाटा वर अखंड फिरत राहणे फिरता फिरता मिळाले'मानुस' म्हणुन जगणे थोडे... .'माणुस' होउन जगुया थोडे...
|
सारंग, वैभव, चिन्नु तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! " मायबोली " वर इतके दिग्गज दिग्गज कवी आहेत कि मी त्यांपुढे काहिही नाहि. तरिहि धन्यवाद ! चौकटचा राजा
|
Jayavi
| |
| Sunday, March 12, 2006 - 3:38 am: |
| 
|
शुभांगी.........एकदम सही !! खूप दिवसांनी आलीस. संघमित्रा, अगं काय लिहितेस गं तू ! प्रतिसादाचं उत्तर पण ....... 'पौर्णिमेचा चंद्र झेपत नाही' ....क्या बात है ! नकळत मी तुझ्या लिखाणाच्या प्रेमात पडते आहे
|
Diiptie
| |
| Sunday, March 12, 2006 - 11:32 am: |
| 
|
काव्यधारा वसंतासारखी बहरली आहे सगळे केवळ अप्रतिम..
|
Sarang23
| |
| Sunday, March 12, 2006 - 10:18 pm: |
| 
|
निनावी, " भिल्ल पुरंध्री " असा शब्दप्रयोग वाचला आहे हे पक्कं ठाऊक आहे. त्यामुळे नागर स्त्री बरोबर वाटत नाही बाकी अधिक माहिती मिळाली की लगेच तुला कळवतो. वा! कर्पे, छान आहे...
|
मित्रांनो इतक्या छान प्रतिक्रियांबद्दल आभार. शुभांगी छान आहे तुमची कविता. मला आठवतंय मागे पण तुमची कविता मला आवडली होती पण प्रतिक्रिया द्यायचं राहून गेलं. सारंग काही काही ओळी अगदी दाद घेऊन जातात तुझ्या कवितेतल्या पण काही ओळी 'उगीच अट्टाहास' या प्रकारात मोडतायत असं वाटतंय. देवदत्त छान रे. वैभव तुला अनुमोदन. सहज, सोपी, सरळ (म्हणजे ओढूनताणून न लिहिलेली) आणि गेय अशी असावी ती गज़ल. शास्त्र आणि कला यांनी स्वतःच्या चौकटी सांभाळाव्यात आणि एकमेकांच्या ओलांडू नयेत. जी सुचताना आनंद होईल आणि जी रसिकाच्या मनाला भावेल असा अर्थपूर्ण आविष्कार म्हणजे कविता (माझ्या मते). लांबट गोल गोरापान चेहरा, गालावर तीळ, मोठे डोळे, सरळ नाक असल्या सगळ्या सौंदर्य निकषांमधे बसणारी स्त्रीही कधी कधी नाही सुंदर वाटत. आणि कधी एखादा वाकडा दात, बारीक डोळे, सावळा वर्ण जातोच ना भाव खाऊन (याची उदाहरणे देत नाही. तुम्ही आपोआपच ओळखाल). कलाकृती हे १०० टक्के शास्त्र नाही होऊ शकत. आणि उलट होणेही दरवेळी शक्य नाही. चु. भु. द्या. घ्या. निनावी तू दिलेली लिंक खूप छान आहे. आणि पुरंध्री म्हणजे प्रौढ आणि काही व्यक्तीमत्व (वजन) असलेली स्त्री. श्रीमती हा शब्द आहे तसे. नागरच असायला पहिजे असे नाही. जरी बहुतेकदा तो त्या संदर्भात वापरला जातो तरी.
|
चूक असो... अपघात तर झालाच आहे.... वाचण्याची शक्यताही कमीच ! आपल्या शरीरात इतकी वेदना लपून होती याची आज पहिल्यांदाच होती आहे दुखरी जाणीव... छिन्न विछिन्न करून, बेदरकारपणे निघून गेलेल्या त्या गाडीचा खरंतर काहीच नाही दोष. बहुदा मीच हरवुन बसलो होतो, माझा संयम, माझा होश. आणि अगदी असलीच तर एक चूक देवाचीच आहे, आयुष्याच्या हमरस्त्यावर, तारुण्य येण्या आधी त्याने एक फलक तरी लावायला हवा होता " अपघाती क्षेत्र पुढे आहे " म्हणून.... ~ प्रसाद
|
का? का चौकोनात मनाच्या प्रश्नांचे वादळ होते? का गोलाई डोळ्यांची मग उत्तर देता न्हाते? का ढिसाळ ढिम्म ढगांची आभाळ ओढते पोती? का मुग्ध पोरके पाणी देहात पोसते माती? का अंथरलेल्या रात्री स्वप्नांना पडती कोडी? का पहाट सावरलेली अस्तित्त्व भ्रमांचे खोडी? का तारसप्तकी तारा छेडतो विलासी चंद्र? का सूर्य उरी जळणारा तेवतो विरागी मंद्र? सांडल्या तमाचे थेंब का टिपून घेते वात? का मेघ मृगाचे चिंब होतात कुणाचे हात? का ऐसपैस शब्दांचा गर्दीत गुंतते हासू? का कोठडीत डोळ्यांच्या काळीज कोंडते आसू? का दोन गुंतल्या जीवां शोधीत हिंडते गीत? का गीत भेटते म्हणुनी हृदयांस जोडते प्रीत? का चार क्षणांची साथ लादते युगांची नाती? का वळणावर अवघडतो मग हात दिलेला हाती? का सतेज आकांक्षांचा विस्कटून जातो भांग? का विदीर्ण हृदयादारी लागते स्मृतींची रांग? का जन्म उघडतो खेळी संदिग्ध नव्या भासांची? ओसरते अर्ध्यावरती का लपाछपी श्वासांची? का कवितेमधले जन्म होतात ऋणांतुन मुक्त? का उडून जाते शाई, राहते कवीचे रक्त? या झपाटल्या प्रश्नांना का उत्तर देते कोणी? का कुणी टाळते तेही ऐकवून वेडी गाणी? - निरंजन
|
वा, प्रसाद. 'चूक' जबरी आहे!
|
Sarang23
| |
| Monday, March 13, 2006 - 1:38 am: |
| 
|
प्रसाद, निरंजन छान. सारंग काही काही ओळी अगदी दाद घेऊन जातात तुझ्या कवितेतल्या पण काही ओळी 'उगीच अट्टाहास' या प्रकारात मोडतायत असं वाटतंय. असं माझ्याच बाबतीत नाही, सगळ्याच कवींच्या बाबतीत असतं! एकाच गझलेतील काही शेर एखाद्याला नाही आवडत, पण दुसर्याला तेच शेर हृदयस्पर्शी वाटतात असा माझा अनुभव आहे. कलाकृती हे १०० टक्के शास्त्र नाही होऊ शकत. हे वाक्य नाही पटलं. जगातल्या प्रत्येक गोष्टींमागे शास्त्र असतं अस मानणारा मी असल्यामुळे असेल कदाचीत!
|
प्रसाद आवडलीच. बाकी काय? निरंजन, आत्तापर्यंत मला सगळ्यात जास्त आवडलेल्या कवितांतली ही तुमची एक. प्रत्येक ओळ पुनःपुन्हा वाचली. वा.
|
Mmkarpe
| |
| Monday, March 13, 2006 - 4:10 am: |
| 
|
सारंग धन्यवाद... स्वप्न.... तुटणारच होते... तुटले... तुटण्यासाठीच असतात काही स्वप्न... तरिही; मरत नाहीत राहतात जिवंत पालीच्या नुकत्याच तुटलेल्या शेपटिसारखे......
|
सवय आधी तूच सवय लावलीस... आभाळ कवेत घेण्याची. आता म्हणतोस... 'जमिनीवर राहण्यातच सुख मान.' कसं जमायचं...
|
Himscool
| |
| Monday, March 13, 2006 - 5:54 am: |
| 
|
संघमित्रा: थोडासा प्रकाश टाकल्या बद्दल धन्यवाद! (फक्त एक्च गोष्ट्: माझे नाव हिमांशु [संस्कृत शब्द] आहे हिमांशू नाही) प्रसाद: 'चूक' अल्टिमेट आहे.
|
|
|