|
बाय द वे, वरील कवितेचं नाव आहे 'पंचाहत्तरी'. मुक्त-छंद करणं मला फारसं जमत नाही ('आतून येत नाही' ), पण तरीही एक अशक्त प्रयत्न करून पाहिला आहे...
|
Ninavi
| |
| Thursday, March 09, 2006 - 10:26 am: |
| 
|
निरंजन, मान गये!!! हा प्रयत्न जर ' अशक्त' असेल तर...(बराच वेळ विचार केला, पण काही सशक्त बोलायला सुचत नाहीये!) लिहीत रहा. ' इस्पितळाच्या नळ्यांमधे.. मिळणारी प्रायश्चित्तं', साठ मिनिटांचा हिशोब..!! उगाळून झिजून जाते.. पण त्यांना गंधही नसतो त्याचा.. व्वा! हे आतून आलेलं नसेल तर ते आतून आलेलं कसं असेल ते वाचायची उत्सुकता लागली आहे आता. सुमतीताई, सुंदर. लिंब्या, तू पद्य एवढं छान लिहीतोस माहीत नव्हतं. ( तुझ्या व्याप्तीचा नीटसा अंदाज आलेला नाही अजून असा त्याचा अर्थ!) वैभव, अनोळखी नेहेमीप्रमाणेच सुंदर. मला कवितेचं तंत्र फारसं ( म्हणजे अजिबातच) कळत नाही, काही मनाला भिडतात, काही नाहीत, इतकंच कळतं. आणि तुझ्या सहसा भिडतात. तरीही, निरंजनकडून याबद्दल आणखी विस्ताराने शिकायला नक्कीच आवडेल.
|
Moodi
| |
| Thursday, March 09, 2006 - 10:26 am: |
| 
|
अतिशय वास्तववादी पंच्याहात्तरी सादर केलीत हो. खरच डोळ्यात पाणी आणलत. मागे पुण्यात एक वयस्कर अशक्त माणुस जेव्हा प्रचंड ओझ्याची हातगाडी ओढत होता ना ते पाहून खुप कालवाकालव झाली हृदयात.
|
Ninavi
| |
| Thursday, March 09, 2006 - 10:56 am: |
| 
|
सन्मी आणि इतर अभ्यासूंसाठी.. गज़ल या काव्यप्रकाराबाबत इथे चांगली माहीती आहे.
|
वाह ! निरंजन , पंचाहत्तरी अप्रतिम ... गझलचंच म्हणाल तर माझं ज्ञान त्या बाबतीत यथातथा आहे पण अनोळखी ही एक मात्रावृत्तातली गझल आहे असं मला वाटतंय . मला ह्यावर आणखी चर्चा करायला आवडेल. माझा मेल आयडी आहे प्रोफ़ाईल मध्ये .
|
निरंजन...खूप सुंदर आहे पंचाहत्तरी! लिंबू तो कसला रे लिंबूटिंबू तू तर एकदम पुढे धावणारा आहेस सगळीकडे!
|
सगळ्या प्रेमकथांची अखेर सगळ्या प्रेमकथांची सुरुवात गोड बोलण्यानंच होते सगळ्या प्रेमकथांची अखेर मटार सोलण्यानंच होते! प्रेमात दोघं असतात तेंव्हा सगळं गुलाबी वाटत असतं एकमेकांना प्रेमानं दिलेलं पाणीही शराबी वाटत असतं प्रेमकथांची सुरुवात अशीच पाण्यानंही झिंगून जाण्यानं होते प्रेमकथांची अखेर मात्र (तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते! प्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा 'हात' एकमेकांसाठी धरले असतात दोघंजणं एकमेकांसाठी राजा-राणी बनले असतात प्रेमकथांची सुरुवात अशीच एकमेकांसाठी 'हात' धरण्यानं होते प्रेमकथांची अखेर मात्र एकमेकांना झब्बू देण्यानं होते! प्रेमामधे एकमेकांबद्दल जे जे काही कळलं असतं संसारात त्याच गोष्टींवरून एकमेकांना छळलं जातं प्रेमकथांची सुरुवात अशीच कळूनही न कळण्यानं होते प्रेमकथांची अखेर मात्र छळून छळून छळण्यानं होते! एकमेकांच्या वागण्यामधे आपल्याला फक्त चुका दिसतात एकमेकांच्या शब्दांमधे चाबूक आणि बंदुका दिसतात जे जे होणार नाही वाटतं ते ते सारं घडत जातं प्रेमकथेच्या शेवटी शेवटी सारं सारं बिघडत जातं! (हे असलं तरी आपण काय करुया) असंच जरी होत असलं असं आता होणार नाही तुझ्या माझ्या कथेला राणी शेवट अता असणार नाही तुझ्या माझ्या श्वासांमधे रोज मोगरा गंध भरेल मावळणाऱ्या दिवसासोबत हृदयामध्ये चंद्र उरेल रोजचा सूर्य आपल्यासाठी नवी कथा घेऊन येईल तुझी माझी प्रेमकथा रोज नव्यानं सुरू होईल तुझी माझी प्रेमकथा रोज नव्यानं सुरू होईल - प्रसाद शिरगांवकर 'मटारा'ची प्रेरणाः दै. सकाळ मधील ब्रिटिश नंदी यांचा एक जुना लेख कॉपी-पेस्ट व्यावसायिकांना विनंती... ही कविता स्वतःच्या कष्टानी ईमेलद्वारे इतरांना पाठवण्यास माझी काहीही हरकत नाही... मात्र असं करताना मूळ कवीचं नाव (म्हणजे माझं) आणि प्रेरणास्रोत (म्हणजे ब्रिटिश नंदी यांचा उल्लेख) दिल्यास मी आपला आजन्म उपकृत राहीन!
|
Mavla
| |
| Thursday, March 09, 2006 - 10:48 pm: |
| 
|
प्रसद जि खरच सुरेख कवित आहे, थोडा विनोदाचा भाग सोदला तर बहुतेक वेळा असच द्रुश्य पहायला भेटतं. एकमेकांच्या वागण्यामधे आपल्याला फक्त चुका दिसतात एकमेकांच्या शब्दांमधे चाबूक आणि बंदुका दिसतात देव(वस्तुथिति चेडनारि, सुरेख कल्पना)
|
निनावी, अमेय आणि सर्व वाचक, आभारी हे! अग निनावे, व्याप्तीच काय सान्गू? आख्ख्या आयुष्याचच एक ना धड, भाराभर चिन्ध्या अस झाल हे तुझ्याकड ल्हान मूल हे का? असल तर त्याच्या फुड केतकराचा लोकसत्ता टाक! अन बघ ते मूल त्या पेपराला कस टरकावुन टरकावुन चिन्ध्या धिन्च्या करत! अगदी तस्सच, ब्रह्मदेवातल दडलेल ल्हान मूल जाग होऊन त्यान आमच्या नशिबाच्या चिन्धड्या चिन्धड्या करुन त्याच चिन्ध्यान्च बोचक आमच्या मानगुटीवर ठेवुन जीवनाची ही हमाली करायला लावली हे! जीवा शिवाची बैल जोडीऽऽऽ जाई बीगीन आपली फुडं.......! अमेय, होल मायबोली इज अवर! समद्या बीबीन्वर जाऊन यायच! खर सान्गू का? मला कवितेतल फारस काही कळत नाही, त्यामुळे वाचल्या तरी प्रतिक्रियाच देता येत नाही!
|
Shyamli
| |
| Friday, March 10, 2006 - 12:21 am: |
| 
|
क्या बात है प्रसाद... .. .. ..
|
क्या बात है प्रसाद ... मस्त ... निरंजन ... गझल वर चर्चा चालूच आहे तर मलाही विचारायचं होतं आपल्या " मी मोकळा " गझल च्या मतल्यामध्ये तोडायला अन सोडायला आल्यानंतर बाकीच्या काही शेरांमध्ये पोसायला , कोरायला , शोधायला , वगैरे चालतं का ? मला ह्यावर बाकीच्या जाणकारांची पण मतं जाणून घ्यायला आवडेल , म्हणजे मी लिहायला मोकळा हा हा हा , राग मानू नये , मी विचारलेला प्रश्न खरंच गंभीरपणे विचारला आहे
|
Meenu
| |
| Friday, March 10, 2006 - 1:21 am: |
| 
|
प्रसाद कविता सुंदर... वैभव तुझ्याही मुक्त छंदतल्या कविता छान... निरंजन कविता सुंदर...मुक्त छंदामधे लिहीणं मलाही फार अवघड वाटतं.. आतुन येत नाही असच वाटत अगदी... Most important thing right now is what prasad said about mentioning the name of the original writer and giving right credits. Last week I had been to one of my friends place and I saw printout of 'kunitari athavan kadhataya - by vaibhav joshi' printed. Obviously name of the poet etc. was not written on it. My friend told that he received it one of the mails. I think maayboli also can think of putting a watermark as maayboli or something so atleast that cannot be removed etc.
|
वा प्रसाद, कविता सुंदर आहे.. आणि तुझि सुचना तर योग्यच.. पण इथे कोपि करणारे नग भरपुर सापडतिल.. मिनुला अनुमोदन..
|
Sarang23
| |
| Friday, March 10, 2006 - 3:31 am: |
| 
|
प्रसादराव छान! निरंजनराव... आपल्या गझलेतल्या काही चुका. कृपया गैरसमज करून घेऊ नका. १. मतल्यात काफिया जर तोडायला, सोडायला असेल तर मग पुढे कोरायला, पोसायला सारखे काफिये येणं चूक आहे. २. पहिला शेर (मतला) जर अक्षरगण वृत्तात असेल तर मग पुढे गझल अक्षरगण वृत्तातच हवी. जर मात्रा वृत्तात हवी असेल तर तसा बदल पहिल्या शेरात करणे आवश्यक आहे. आपल्या पहिल्या शेरातील गण खालीलप्रमाणे आहेत. आसवांच्या साखळ्या तोडायला मी मोकळा गालगा गागाल गागागा लगागा गालगा भावनांना मोकळे सोडायला मी मोकळा गालगा गागाल गागागा लगागा गालगा इथे अक्षर सारखी (म्हणजे १५ १५) आहेत आणि गणही (ज़े मी पाडून दाखवलेले आहेत)सारखे आहेत. मग पुढे गझलकाराला मात्रांची सुट घेता येत नाही. जी आपण इथे घेतली आहे. शिल्प जखमांचे नव्या कोरायला मी मोकळा ... इथे पहा. १६ अक्षर आहेत. मग तांत्रिक चुक लक्षात येईल. आणि इथे द्या चिता उबदार, अन् झोपायला मी मोकळा!... सतरा आहेत! ३. बर्याच ओळींमध्ये मात्राही चुकल्या आहेत. ४. एकदा " तोडायला " वापरल्यावर परत त्याच गझलेत तोच काफिया वापरू नये. नाहीतर कितीही चांगले असले तरी ते भरतीचे शेर वाटतात. राहता राहिलं वैभवच्या गझलेचं तर तुमच्याकडूनही असां खुलासा येऊ द्या. कृपया गैरसमज करू नका. तुम्ही वैभवच्या गझलेला चूक म्हणाला म्हणून हे लिहीलं आहे. नाहीतर नसतं लिहीलं!
|
पहिले प्रेम.. आठवते अजुनी मजला ते पहिले प्रेम ते पहिले वेडावणे, ते पहिले धुंदावणे ते पहिले हरखणे, ते पहिले स्वप्नावणे आठवते अजुनी मजला ते आपणा दोघांचेही पहिलेच हरणे आणि हरुनही जिंकणे. आठवते अजुनी मजला ते पहिलेच चोरटे कटाक्ष टाकणे वरवर रागावणे, आतून मात्र आपलेही कुणी आहे ह्या भावनेने सुखावणे मग हळुच चोरुनच ते पहिलेच smile देणे आणि घेणे. आणि आठवते अजुनी मजला ते आपले पहिलेच बोलणे.... काहिहि कारण नसतांना ते बोलणे उगाचच एकमेकांची journals मागणे मग दुसर्याचे नसलेले problems Solve करणे आठवते अजुनी मजला ते अपुले पहिलेच चोरुन भेटणे नुसतेच एकमेकांकडे पाहणे.. आणि मधुनच हसणे.... काहि न बोलताच तसेच परत फिरणे आठवते अजुनी मजला ते अपुले पहिलेच picture ला जाणे आपल्याच स्वप्नांत हरवून DDLJ पाहणे आठवते अजुनी मजला ते अपुले पहिलेच भांडणे तुझे ते लटक्या रगाने रुसणे आणि माझे तुला प्रेमाने मनवणे आठवते अजुनी मजला ते माझे पहिल्यांदाच तुझ्या घरी येणे तुझ्या घरच्यांशी बोलतांना अडखळणे आणि तूच मला सांभाळणे आणि आठवते अजुनी मजला काय....काय....बरेच काही किती किती सांगू अनं काय काय सांगू शब्दावाचुनि कळेल तुला सारे आपण का आहोत आता निराळे चौकटचा राजा
|
शोध दगडात या कशाला देवत्व शोधतो मी? जगतात दांभिकांच्या का तत्व शोधतो मी? भुषवून मंच नेते जातात राजमार्गी जनतेमध्येच आता नेतृत्व शोधतो मी बलदंड वासना त्या गर्भास जन्म देती वृत्तीत त्या वृथा का दायित्व शोधतो मी? ज्यांचे महाल भरले त्यांचीच भूक मोठी त्यांच्यामध्ये कशाला दातृत्व शोधतो मी? भिष्मास वेधण्याला हे बैसले शिखंडी षंढात या अशा का कर्तृत्व शोधतो मी समरांगणात ज्यांचे बलिदान सार्थ झाले आत्म्यात थोर त्यांच्या अमरत्व शोधतो मी सर्वस्व धेत गेलो, संपूर्ण रिक्त झालो माझेच आज आता का स्वत्व शोधतो मी? अवकाश भेदण्याचे साकार स्वप्न करण्या जगतात सव्यसाची अस्तित्व शोधतो मी }
|
आपापली पश्चिम विस्कटलेल्या चादरींच्या घड्यांबरोबरच रात्रभराचा धुंद पाऊस तिनं गुंडाळून ठेवला. आणि गजराच्या घड्याळातून मोबाईलमधे नुकताच शिफ्ट झालेला तिचा अर्धवट झोपेतला सूर्य तिने उचलून घेतला. तिच्या लयबद्ध हालचाली पहाण्याचं सोडून तो पुन्हा किचनमधल्या फ्रिजवर बसून पेंगू लागला. बर्याच वेळानं जाग आली आणि तो किचनच्या खिडकीत पसरला तेंव्हा ती सगळं आवरून धावू लागली होती. तिच्या स्वतःच्या पश्चिमक्षितीजाकडे.. तिच्यानंतर उठूनही तिच्यामागोमाग निघालेला तिचा सूर्य तिच्यासोबतीनंच निघाला होता त्याच्या पश्चिमेकडे.. तिची धावपळ पहात, गालात हसत. तिला मागे टाकून तो पोचलाही केंव्हाच. अन् तिने धापा टाकत गाठली तिची पश्चिम.. तेन्व्हा त्याची एक तृतियांश झोप सरून तो झोपेत बोलत होता.. आधी उठतेस, इतकी पळतेस आणि माझ्यानंतर कितीतरी वेळ पळतच रहातेस. तरी.. मीच रोज जिंकतो. तुझा वेग कमी आहे की तुझी पश्चिमच लांब आहे? यावर उत्तर देण्याचं त्राण नसलेली ती त्याला परत मोबाईलमधे कोंबते. आणि स्निग्ध चंद्र निघतो तिला अलगद उचलून पुन्हा एका नव्या पूर्वेकडे. - संघमित्रा
|
सन्घ्मित्रा आणि शुभान्गी मस्त आपल्या कल्पनेला सलाम!!!
|
Himscool
| |
| Friday, March 10, 2006 - 6:24 am: |
| 
|
कोणीतरी "आपापली पश्चिम" ह्या कवितेचे रसग्रहण करेल कय?
|
Sarang23
| |
| Friday, March 10, 2006 - 6:57 am: |
| 
|
चौकटचा राजा छान! शुभांगी मस्त! संघमित्रा सहीच!
|
Giriraj
| |
| Friday, March 10, 2006 - 7:02 am: |
| 
|
आळशी नवरा आणि त्याची चटपटी बायको यांची कहाणि आहे,हिमांशू! मित्रा,प्रतिमांचा वापर मस्त केलाहेस! गजराच्या घड्याळातून मोबाईलमधे गेलेला सूर्य........ मस्तच! तुला एक चंद्र बक्षीस!
|
Sarang23
| |
| Friday, March 10, 2006 - 7:18 am: |
| 
|
सजा वसंतातली पालवीही अताशा झडू लागली, तशी चंदना वाळवीही अताशा पडू लागली! उभा आठवांचा शिलेदार दारात ओठंगुनी पुन्हा एक वैधव्यशालीन रंध्री रडू लागली... कशाला दिला हा नकोसा दिलासा, पुरे जाहले मला बावळीला जुनी वेदना आवडू लागली! कटू आठवांच्यात विश्वास लोपून गेला सखे सुखाच्या तळाला नवी खिन्नता सापडू लागली जरासा अवेळी तुझा तोल गेला, मला काळजी... न केल्या गुन्ह्याची सजाही अताशा घडू लागली!!! सारंग
|
वैशाली, सारंग, गिरी धन्यवाद. हिमांशू रसग्रहण वगैरे करण्याइतकी कविता great नाहीये रे. पण अर्थ सांगते थोडक्यात. (गिरी थोडासा बदल. ) सूर्य म्हणजे नवर्याचं नाही, तिच्या दिवसाच्या टाईमटेबलचं, तिला तालावर नाचवणार्या काळाचं प्रतीक आहे. ती वेळाशी झगडत कसा दिवस उरकते ते लिहीलंय. खरंतर स्त्रीच नाही एखादा खूप व्यस्त माणूस टाकला तिथं तरी चालेल. काही संदर्भ बदलावे लागतील फक्त. गिरी चंद्र दिलास तो अष्टमीचा हवा बरं का. काय आहे, अमावस्येचा दिसत नाही आणि पौर्णिमेचा झेपत नाही.
|
सन्मी ... मस्त कविता ... गावाची मान ताठ झालिय आता अष्टमीच्या चंद्राला अगदी रस " ग्रहण " पण नकोय ... सारंगा .... मस्त रे .... उभा आठवांचा शिलेदार ... खास , आणखी टाक गझला ... शुभांगी ... सगळेच शेर मस्त आहेत पण मला वाटतं " अ " ची अलामत पाळली गेली नाहिये का ? कुणी सांगेल का ? चौकट्चा राजा .. छान
|
सारंग्-१२३, आपल्या पत्राबद्दल धन्यवाद. मी बहुधा अर्धवट माहितीच्या आधारावर जगत आहे, असं दिसतं (जे मला कधीचच माहिती आहे!). त्याबद्दल सर्वांची क्षमा मागू इच्छितो! मात्रांचा हिशोब करताना काही ठिकाणी माझी गल्लत झाली आहे हे खरं, पण आपण उद्धृत केलेल्या ओळींमधे मला अजूनही आशा वाटते. 'शिल्प' मधील 'शिल' ची एक अधिक अर्धी मात्रा घेऊन मी त्याला दीर्घ मानले आहे ('गा'). मग 'प जख' याला 'लगा' मानले आहे. 'द्या चिता' पण मला वृत्तात अजूनही बरोबर वाटते आहे. मला मार्गदर्शन करणार्या काहींच्या मते हे शेर बरोबर आहेत. किंबहुना, माझ्या ओळखीच्या 'जाणकार' लोकांमधे या विषयाबद्दल मतभेद आहेत. त्यामुळे त्या बाबतीमधे माझे 'फंडे' थोडे धूसर आहेत. आपला क्रमांक दोन चा मुद्दा डावलून चालतं अशीही माझी समजूत होती. पण ती चुकीची असावी असं वाटतं. काफ़िये परत वापरणं जरी फारसं अभिमानास्पद नाही, तरी मी ते मोठमोठ्या उर्दू शायरांच्या ग़ज़लांमधे पाहिले आहेत (उदा. जिगर). अशा उदाहरणांमुळे संभ्रमात पडायला होतं. वैभव च्या ग़ज़लेबद्दल्: माझी प्रतिक्रिया कदाचित जरा लवकरच व्यक्त झाली! मला वाटल्या तेवढ्या वृत्ताच्या चुका नव्ह्त्या, हे वृत्ताकडे नीट बघितल्यानंतर लक्षात आलं. किंबहुना वृत्त जरा वेगळं असूनही त्याचे बरेचसे शेर वृत्तात आहेत असं दिसतं. तेव्हा माफ़ करा, वैभव्-भाऊ! पण तरी, 'लगालगा गालगा लगागा लगालगागा' ही या ग़ज़लेची 'ज़मीन' आहे असं मानलं, तर काही ओळी यात बसत नाहीत. तीही फक्त पहिली चार अक्षरं. उदा. 'तुझा मोगरा अता नव्या अंगणात आहे' ही ओळ 'तुझा अता मोगरा नव्या अंगणात आहे' अशी असायला हवी होती (कदाचित). 'असे वाटते क्षणांत नाही, क्षणांत आहे' चे कदाचित 'असा कसा हा क्षणांत नाही, क्षणांत आहे' वगैरे होऊ शकेल. 'किती दाह' मधे 'दाह' ऐवजी 'लगा' मधे बसणारी अक्षरं हवी होती. खरं तर वैभव च्या ग़ज़लेला चूक म्हणालो हे चांगलंच झालं की. नाहीतर तुम्ही हे सगळं म्हणाला नसता आणि आम्हा दोघांनाही हे मुद्दे कळले नसते! यावर सर्वात सोपा (आणि कोडगा) तोडगा म्हणजे माझ्या 'एका ग़ज़लेला' मी 'एक ग़ज़लेच्छुक गीत' अस नाव देणं!
|
|
|