Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 09, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » काव्यधारा » कविता » Archive through March 09, 2006 « Previous Next »

Ninavi
Wednesday, March 08, 2006 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, कॅडबरी अप्रतीम.
गिरीमहाराज, द्विधा सुरेख. आणि फ़ोन मधला ' ' फाफार बरोबर आहे. सेवकाला मा करावं. ( आणि ते बंगल्याचं तेवढं...)

निरंजन, जोरदार सलामी. मजा आ गया. अजून येऊ द्यात.
एक शंका.. तेरे तबस्सुम की तेरी तबस्सुम?

Jaaaswand
Wednesday, March 08, 2006 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह निरंजन
अफ़लातून... रे

भट साहेब पण खुश झाले असतील वर :-)


Vaibhav_joshi
Wednesday, March 08, 2006 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दोस्तांनो ....

सन्मी , हे राहून गेलं होतं बोलायचं ... अप्राप्य कुणामुळे सुचली , कशी सुचली , कसं सांगू? सगळीकडे तेच तर घडतंय ...
No breathing space at all

गिरया ... मस्त रे

निरंजन ... अप्रतिम आहे गझल


Dineshvs
Wednesday, March 08, 2006 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,
अरे मैत्रीतच तर सगळं.
पण तरिही मला एक मुद्दा आवर्जुन मांडावासा वाटतोय. ईथे कुठल्याच कवितेवर सहसा टिका मी वाचली नाही. त्यामुळे नेमाड्यांच्या समीक्षेची जशी दशहत आहे, तशी मला या कवितेंची वाटते.
एखादी कविता पटली नाही तरी तसे मत मांडता येत नाही मला.
त्यामुळे, मी आता रिड ओन्ली मोडमधे जातोय.
आणि माझ्याशी संवाद साधायला काहिच हरकत नाही रे.
दार घराचे आणि मनाचेहि सदैव ऊघडेच असते.


Chinnu
Wednesday, March 08, 2006 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव कस छान छान वाटलं वाचल्यावर.. मला Cadbury? ~D
गिरी, तिचे रंगच आणतात अस्वप्नात की लिपस्टिकपण उचलुन आणली? बरी नही हो अशी सवय.. दिवा घेवुन टाका..
सीमा कोण हो? -P आता रोज रोलकाल घेतला पाहीजे. पुन्हा वाट पहवयाला लावु नका! Its nice one! thanks.
amrutabh छान.



Alakhniranjan
Thursday, March 09, 2006 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

"तेरा ही तबस्सुम!" खरं तर उर्दू वृत्त-नियमांनुसार "तिरा ही तबस्सुम" होईल. - नजरचुकीबद्दल क्षमस्व आणि लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!


Giriraj
Thursday, March 09, 2006 - 12:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निरंजन,स्वागत!

अनुवादित कवितेसाठी वेगळे सदर आहे!(कुणी link देऊ शकेल का?)

चिन्नु,'तिचं येणं' माझ्या हातात नसतंच त्यामुळे मीही वाट पहात असतो 'तिची'!

निनावी,तू जरा मेल वाच मग तुझ्या बंगल्याचं बघूत आपण!


Sumati_wankhede
Thursday, March 09, 2006 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरीही मी तुला सांगितलं होतं....

तरीही मी तुला सांगितलं होतं...
आता नको फुलू देऊस
डोळ्यांच्या शिंपल्यात
दाटून अवघडलेली स्वप्नं
वा तळहातावरची रेषा बदलण्याची
भाषाही बोलू नकोस चुकून...
रात्रीच्या मिट्ट काळोखात
अवघ्या तनामनावर उमटलेल्या खुणा
अशा दिवसाढवळ्या
दाखवायच्या नसतात कुणालाच
वा अंतर्हृदयाच्या तळ्यात उठलेले
सुखस्वप्नांचे क्षणभंगूर बुडबुडे
असे पाझरूही द्यायचे नसतात
गच्च मिटलेल्या बंद ओठांतून...
अंकुरले जाते बीज वेळी अवेळी
तेव्हापासूनच रचला जातो चक्रव्यूह
'भिंतीत पकडून चेचायचं की ठेचायचं'
हे ठरवायचं असतं
घरातल्या... इतर सर्वांनीच.
त्या खर्‍या खोट्याचा पडताळा घेण्यासाठी
हवा असतो एक रिपोर्ट फक्त
डाक्टरांच्या सहीनिशी...
तुला 'मातृत्व' बहाल करण्याचा हक्क देण्यासाठी
वा... त्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी.
म्हणूनच मी तुला सांगितलं होतं...
नको बहरू देऊस... मनाच्या बागेला
अन कळी उमलण्याच्या प्रतिक्षेत
तेवूही नकोस... सांजवातेसारखी.
कोवळी रोपं उपटणार्‍या माळ्यांची
एक नवी जात...
दर दिवसाला... नव्या नव्या रूपात...
इथे जन्माला येत आहे
ह्याचं कायम भान ठेवं.


Sanghamitra
Thursday, March 09, 2006 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॅडबरी छान आहे वैभव.
तुझ्या लौकिकाला साजेशी. वेगळीच कल्पना असलेली.
(उद्या मायबोलीवर गाववाल्याचीच कविता वाचायची असा वटहुकूम निघाला तरी मला काळजी नाही बाबा )
गिरी तू सीमा सील होण्याची वाट बघ बाकीचे तुझ्या कवितांची बघतायत. :-)
निरंजन एक गज़ल सही आहे. नाव का नाही म्हणे तिला?
आणि त्या दुसर्‍या गज़लेला अनुवाद म्हणायची गरज नाही. :-)
(और मायबोलीपे हिंदी? बोल तेरे साथ क्या सुलुख किया जाय :-) )
सुमती सुन्न होतं मन असं काही वाचलं की. पण छान लिहीलंयस.
जया :-)


Limbutimbu
Thursday, March 09, 2006 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमती, छान! सहीच विषय!

याच धाग्यावरुन पुढे एक छोटासा प्रयत्न...

तू सान्गितलस मला
मलाही ते कळल होत
उगविण्यासही....
उगविण्या आधिच,
पराधिन होते
अन्कुरलेले बीज!

ज्यान्ना जे ठरवायच होत
ठरवित होतेच काहीबाही
मी मात्र मश्गुल होते
रुजल्या अन्कुराचे,
हुन्कार ऐकीत!

होते अधिर मी
साद ऐकण्या अन्कुराची
पण सत्य उमगले मनाशी
वहिवाट इथे...
खुरपणार्‍यान्ची!

घट्ट ओठ, आवळुनी दात
कढ मी जिरविले, आतल्या आत
आतल्या आत, खुरडले बीज
अन पृथ्विही रडली, धाय धाय!

( प्रत्यक्ष अनुभव, किन्वा अनुभुती, याशिवाय मी काहीच लिहित नाही! )


Vaibhav_joshi
Thursday, March 09, 2006 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गझल चा मौसम आहेच तर गझल ...

अनोळखी ....

अनोळखी जाहलो स्वतःच्या जगात आहे
कुणी नवा पाहुणा अताशा मनात आहे

कशास मी राखतो फुलांची मने अजूनी
तुझा मोगरा अता नव्या अंगणात आहे

उजाडता सूर्य थांबतो दान दे म्हणूनी
नवे स्वप्न कोणते तुझ्या लोचनांत आहे

हजारदा चिंब मी भिजूनी जळून जातो
किती दाह आपल्या जुन्या श्रावणांत आहे

खरेच का श्वास आजही येत जात आहे ?
असे वाटते क्षणांत नाही , क्षणांत आहे

उडे कशी ही तुझ्या दिशेलाच राख माझी
असा कसा मी अजूनही माणसांत आहे


Jaaaswand
Thursday, March 09, 2006 - 3:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा...
.......................
.......................
....................... :-)


Shyamli
Thursday, March 09, 2006 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव दंडवत रे बाबा तुला....
अप्राप्य आणि अनाघ्रात साठी पण हेच...
राहिल होत लिहायच

अस लिहायला आम्हाला कधी जमेल का?

नेमक्या भावना मांडायला कसे रे शब्द सापडतात तुला...
आम्हाला चारोळी लिहायची म्हणल तर दमायला होत!


Sumati_wankhede
Thursday, March 09, 2006 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नवंकोरं

काळ्याशार पाटीवर
गिचमिड अक्षरात लिहिलेलं
सारं... सारं... पुसून
जशी पुन्हा नव्याने
लख्खं होऊन जाते पाटी
अगदी नवी कोरी होऊन....

अगदी तस्संच...
मनाच्या पाटीवर
मधल्या काळात धरलेली
वेडीवाकडी जळमटं
पुन्हा एकवार पुसून
अन नवकोरं होऊन
यावं वाटतं तुझ्या पुढ्यात.

आलेच जर तशी...
तर स्वीकारशील का;
पुन्हा एकदा नव्या रुपात...


Shyamli
Thursday, March 09, 2006 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सुमति....
खुSSSSSSSप सुन्दर


Shubhangee
Thursday, March 09, 2006 - 4:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमती, फ़ार छान जमली कविता

Heartwork
Thursday, March 09, 2006 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, सुमति नेहमीप्रमाणेच छान कविता!
निरन्जन, जोरदार सलामि!
सन्घमित्रा तुझी कौतुकाचि कविता वैभवच्या कवितेइतकिच गोड


Deepstambh
Thursday, March 09, 2006 - 7:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नातं

त्याचं माझं नातं
अवघ्या अकरा महिन्यांचं
ऋणानुबंधाला कारण
घडलं त्याच्या जन्माचं

फसवुन त्याला सोफ्यामागे
हळुच लपतो मी
कावरी बावरी त्याची नजर
हळुच बघतो मी

पप्पा कुठे गेले?
तो केविलवाणा होतो
रहावत नाही मला
मी पटकन समोर येतो

चेहर्‍यावरचा आनंद त्याच्या
दुथडी भरुन वाहू लागतो
त्याचे निरागस खळखळते हास्य
मी डोळेभरुन पाहू लागतो

चाली चाली करुन तो
रात्री थोडा दमुन जातो
पापण्या झुकू लागल्या तरी
डोळा मात्र उघडा राहतो

पप्पांसोबत त्याला
अजुन थोडं खेळायचं असतं
मी म्हणतो आता पुरे
रात्री शांत झोपायचं असतं

परी राज्यात जाण्याचा
निद्रादेवीचा संदेश येतो
पप्पांची असावी सोबत म्हणुन
तो घट्ट बिलगुन निजुन जातो




Vaishali_hinge
Thursday, March 09, 2006 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sumatee!!! navkor tar kalpana nehamee manaat rengalat hoti pan kagdavar utaralee navhatee.!!! far aavdalee.

vaibhav nehamipramaanech!!!

Moodi
Thursday, March 09, 2006 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा!! बाबाचे खरे प्रेम अगदी आतुन व्यक्त केलेस की रे. पण एकाचाच फोटो? दुसरा कुठाय?

Shyamli
Thursday, March 09, 2006 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीप मस्त रे!!!.. .. .. ..

Vaishali_hinge
Thursday, March 09, 2006 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

deepstambh chan mayalu .. .. .. .. .. ..

Alakhniranjan
Thursday, March 09, 2006 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, तुझ्या मुक्त-छंदातल्या कविता आवडल्या.

पण खरं सांगायचं तर 'अनोळखी' ग़ज़ल नाही आवडली. कारण तसं तांत्रिक आहे. पण माझ्या मते महत्त्वाचं आहे.

ग़ज़लेमधे वृत्ताचं बंधन पाळण्याचा प्रयत्न करणं अत्यावश्यक असतं. काफ़िया जमवलेल्या कुठल्याही द्विपदीला ग़ज़ल म्हणता येत नाही. चांगली ग़ज़ल लिहायला अवघड असते असं म्हणतात, कारण वृत्त पाळण्याची कसरत करून, यमकाचं भान ठेवताना दोन ओळींच्या 'कॅन्व्हास' वर कल्पना मांडायची असते. ग़ालिब, मीर, फ़ैज़, साहिर, शक़ील (आणि मराठीमधे सुरेश भट) यांसारखे मोठे-मोठे कवीही या बंधनांचं भान ठेवूनच ग़ज़ला रचीत आले आहेत.

ग़ज़लेचं थोडसं शास्त्रीय संगीतासारखं आहे! एखादा राग गायला घेतला, की त्याच्या सुरांची बंधनं पाळून कल्पनेच्या भरार्‍या माराव्या लागतात. एखादं सुगम गाणं ऐकायला गोड लागू शकतं. पण जर ते म्हणताना मी अमुक एक राग गातो आहे असं म्हणून इतर स्वर लावले, तर ते तितकसं योग्य नाही. कारण बंधनांत राहून कल्पनेचा विकास करणं हाच 'क्लासिकल' कलांचा खरा आत्मा आहे.

ग़ज़ल न म्हणता 'अनोळखी' ला गीत म्हटलं तर या सार्‍या बाबींचा विचार करणं अनावश्यक आहे. पण मला वाटतं, खरी मजा ही याच कल्पनांचं वृत्त-बद्ध ग़ज़लेत रुपांतर करण्यात आहे!

या बाबतीत सर्वांची मतं वेगवेगळी असू शकतील, याची मला कल्पना आहे. तेव्हा 'गुलमोहर' वर आल्या-आल्याच प्रांजळ मत व्यक्त केलं त्याबद्दल कृपया कोणीही वाईट मानून घेऊ नये, ही विनंती!


Chinnu
Thursday, March 09, 2006 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपस्तंभ, सहि आहे कविता आणि सानुल्यचा फ़ोटु पण!

Alakhniranjan
Thursday, March 09, 2006 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाची पंचाहत्तरी साजरी होते,
एका हातात बफेची प्लेट आणि दुसर्‍या हातात अवजड भेटवस्तू धरून अवघडलेल्या घोळक्यांच्या दमट जलश्यामधे.
आणि कुणाची पंचाहत्तरी साजरी होते,
बोटावर मोजण्याइतक्याच, पण आठवणींनी ओथंबून थरथरणार्‍या हातांच्या चिंब स्पशार्मधे.

कुणाची पंचाहत्तरी साजरी होते,
लोटलेल्या चाहत्यांच्या (आता अगदी नकोशा वाटणार्‍या) पोकळ प्रशंसेच्या कल्लोळात.
आणि कुणाची पंचाहत्तरी साजरी होते,
सरल्या कलेच्या कलेवरासमोर बसून, कधीच न मिळालेली दाद एकण्याचा प्रयत्न करताना उठलेल्या शांततेच्या गदारोळात.

कुणाची पंचाहत्तरी साजरी होते,
तुरुंगाच्या सळ्यांमधे, केलेल्या पापांच्या हलाहलाच्या गर्तेत प्रायश्चित्तांच्या विषारी घटकांचे घोट घेत.
आणि कुणाची पंचाहत्तरी साजरी होते,
इस्पितळातल्या नळ्यांमधे, मिळणार्‍या प्रायश्चित्तांमागे कुठली पापं हातून घडली, याचा निरर्थक शोध घेत.

कुणाची पंचाहत्तरी साजरी होते,
अंधार्‍या काळ्या पैशाच्या डोळे दिपवणार्‍या लख्ख उजेडाच्या जोरावर.
आणि कुणाची पंचाहत्तरी साजरी होते,
(खरं तर जगाच्या सहाणेवर उगाळून झिजून जाते) पण त्यांना गंधही नसतो त्याचा,
कारण हातगाड्या ओढताना ताशी दामावर,
पंचाहत्तर वर्षांपेक्षा साठ मिनिटांचा हिशोब जास्त महत्त्वाचा.

कुणाची पंचाहत्तरी साजरी होते,
मुलांच्या चेहर्‍यावर उमललेल्या कृतज्ञतेच्या मोगर्‍याच्या दर्वळात, नातवंडांच्या ताटव्यात बहरलेल्या सुप्रसन्न बाल्यात.
आणि कुणाची पंचाहत्तरी साजरी होते,
मातीत मिळण्याची वाट पाहत वृद्धाश्रमात उरलेल्या काही खिन्न पाकळ्यांच्या निमार्ल्यात.

कुणाची पंचाहत्तरी साजरी होतच नाही.
ते एक बरं! कारण ते तितकं न जगता एखाद्या टांगत्या फोटोमधे हार घालून आशीर्वाद द्यायला सरसावून बसतात.
पण कुणी वेडे मात्र,
आयुष्याचा प्रत्येक क्षण साजरा करत उगाचच जगण्याचा नवा अर्थ लावून बसतात,
आणि पंचाहत्तरी साजरी करण्याची जगन्मान्य गरज गमावून बसतात.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators