Jo_s
| |
| Tuesday, March 07, 2006 - 1:55 am: |
| 
|
ती कधीतरी बदलेल कशाला लावतोस आस? अस काही होत नसतं सारे आपल्याच मनाचे भास
|
अनय बद्दल वाचुन अनुकम्पा वाटलि. पण मिरेबद्दल मला नेहमिच करुणा आणि कौतुक वाटत आलय म्हणुनच मला वाटते.. कृष्णाच्या बासरीची चाल एकदा चुकावी.... राधेच्या जागी त्याला मिरा ऊभि दीसावी
|
आस अशी नाहि रे पण भास जेन्व्हा श्वास होतात, खरच सान्गतो मित्रा.... कविता झक्कास होतात
|
शब्द्फ़ुलान्च्या पायघड्या आहेत तु हळुवार पावलानि ये शब्दान्च्या सुन्दर कळ्या निजलेल्या स्वप्नाला दे
|
heartwork,................work jorat,mast. aahe... .. .. .. ..
|
तु कशी येतेस, उन्हाच्या तिरीपीने, वार्याच्या झुळकीने, कळ्यांच्या सोबतीने अन उमटतेस काळजाच्या ठोक्यातुन, आठवणींच्या झोक्यातुन!!!
|
Aavli
| |
| Tuesday, March 07, 2006 - 4:05 am: |
| 
|
Vaishalibai aajun thod kavya vaadhva ki
|
Prem869
| |
| Tuesday, March 07, 2006 - 4:10 am: |
| 
|
मीनु, मूडी, जास्वंद, हार्टवर्क, देवदत्ता अनयच्या माहितीबद्द्ल सर्वांचे मनापासुन आभार! हार्टवर्क, मीनु, सुमति, जो-स, वैशाली फ़क्त सुंदर आणि सुं...द..र्अच...!
|
पुन्हा तुझी आठवण पुन्हा फक्त भास पुन्हा तीच भलावण पुन्हा रिक्त श्वास
|
Ssk
| |
| Tuesday, March 07, 2006 - 4:59 am: |
| 
|
तुम्ही सगळे खुप मस्त लिहित
|
Ssk
| |
| Tuesday, March 07, 2006 - 5:10 am: |
| 
|
तुझ्या पाठी तुझ्या साठी कोणि तरि झुरत आहे गच्च निळ्या मेघा मधे एक आभाळ झरत आहे माझी नाहिये मी कोठे तरि वाचली आहे
|
माहीतीये मला तुला राग आलाये, समोर येउनही, तु बोलणार नाहीये, पुढे गेल्यावर मात्र गालावरुन सरीता ओघळ्णारेय.......
|
तुझा स्पर्श आठवला नि अवेळी हा श्रावण बरसला तुला फ़ुललेलं बघण्यास सुर्यही डोकावला, काय सांगु आश्चर्य मग रंगवण्या तुझे प्रतीबिंब इंद्रधनुही झाले ओले चिंब!!!
|
Ssk
| |
| Tuesday, March 07, 2006 - 5:54 am: |
| 
|
तुला सगळ कळत पण वळत काहीच नाहि मल चिडवल्या शिवाय तुल करमत नाहि
|
तुझ्या आठवणींचे क्षण सारे गोळा केले अन ओंजळीतले दान तुझे तुलाच दिले कातरवेळी साद कुणाची अधरांना हे कोण बिलगले ओढ जरी ही अंतर्हुदयी अडखळती का सोनपावले
|
वाह !!! आवडल्या खूपच
|
चारचौघीतील तूही एक तूही नव्हतीस माझी कधी सोडवत गुन्ता एक एक तुला आठवू तरी कधी?
|
मस्त मस्त मस्त... सुमती, ssk , वैशाली, वैभव, Heartwork लिहावे का तुझ्यावर हृदयाच्या भाषेवर सकाळच्या धुक्यावर आठवणींच्या नशेवर... लिंब टिंब सही...
|
dhanyawad mandali.. .. .. .. ..
|
मस्त रे मित्रांनो.. लई झ्याक चाल्लय... येऊ द्या म्होरं अज्जून... तुझ्या लब्ध-स्पर्शाचा खेळला सुगंधी वारा तुझ्या उष्ण श्वासांच्या टिपल्या अदृश्य गारा जास्वन्द...
|
काय ह्या भेटीची दैना भेटता तिला येत भरून मला हसवता-हसवता मग तिचं काजळ जातं भिजून जास्वन्द...
|
Mavla
| |
| Tuesday, March 07, 2006 - 12:38 pm: |
| 
|
येता येता ती येवुन जाते मुक शांत अन बावरुन जाते.... मी येतो नेहमिच उचंबळुन, ती मजला सावरुन जाते..... मावळा
|
Chinnu
| |
| Tuesday, March 07, 2006 - 3:29 pm: |
| 
|
वैशाली, मावळा मस्त अगदी! जास्वंदा तुझा लब्ध स्पर्श छानच..
|
Mess_age
| |
| Wednesday, March 08, 2006 - 12:07 am: |
| 
|
कधीतरी... कधीतरी माझ्या चेहर्याचा एक नट प्रसिद्ध पावेल आणि लोक माझेच फॅन होतील कधीतरी माझ्या चेहर्याचा एक गुरु लोकांमध्ये मिसळेल आणि लोक माझेच शिष्य बनतील कधीतरी माझ्या चेहर्याचा एक नेता निवडुन येईल आणि लोक माझाच जयजयकार करतील कधीतरी माझ्या चेहर्याचा एक ईश्वर उगवुन येईल आणि लोक माझ्याच नावाने उपास करतील पण कधीतरी... माझा चेहरा एक खरी भाषा बोलेल आणि रस्त्यावरुन जाताना लोक म्हणतील "अरे तो बघा नट! ते बघा स्वामी /बापु /शास्त्री! तो पहा ईश्वराचा अवतार! अरेरे! सोन्ग वठवताना किती केवीलवाणा दिसतो तो! "
|
Devdattag
| |
| Wednesday, March 08, 2006 - 7:23 am: |
| 
|
रूसणे रुसतेस माझे माझेच हसणे हसतेस तू लपूनी तू जाशील कैसी ह्रुदयात माझ्या वसतेस तू
|