|
Jo_s
| |
| Tuesday, March 07, 2006 - 1:40 am: |
| 
|
जाणले मीही जाणले तू जे वाचून सारे काही जाण वाचल्याविणा जाणे मजला जमले नाही सारंग मस्त सगळ्यांच्याच कविता मस्त
|
प्रसाद, अप्रतिम कविता.. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी....
|
अरे ए कवि.... अरे ए कवि, माझ्यावर कविता करशिल का? माझ्यासोबत बसुन थोडि दारु पिशिल का? दारु फ़ार वाईट.... हे मलाहि कळत रे घशाखाली ति ओतताना माझहि काळिज जळत रे तरिहि मि का पितो ते जाणुन घेशिल का? अरे ए कवि.... तुला भेटले सुर्य चन्द्र नि तारे माझे दोस्त साले जुगारीच सारे तुझ्या मैत्रिचा आधार मला देशिल का? अरे ए कवि.... तुझ्या रे मनावर झालेत सन्स्कार दिला, घेतला मि नुसता तिरस्कार तु तरि मला समजुन घेशील का? अरे ए कवि.... तु कवितेत बुडतोस मि दारुत बुडतो तुला हार फुलान्चे मि रस्त्यावर पडतो दोघान्च्या नशेमध्ये फ़रक काय असतो, एकदा समजावून सागशिल का? अरे ए कवि.... अरे ए कवि.... चाललास कुठे, थाम्ब ना माझा मित्र होशिल का????
|
वा .... आज पाऊस पडला बरं वाटलं ... हार्टवर्क ... मस्त रे , पण एवढा पाय पसरून का बसला आहेस ? ती रिकामी जागा कमी कर , एडिट कर पट्कन सुमतीताई, सारंग ... अप्रतिम आहेत कविता ....
|
Prem869
| |
| Tuesday, March 07, 2006 - 4:25 am: |
| 
|
वैभव, अविकुमार, वैशाली, देवदत्ता, प्रसाद, सुमती, सारंग सुंदर कविता! हार्टवर्क कविता खुपच आवडली!
|
Ninavi
| |
| Tuesday, March 07, 2006 - 9:09 am: |
| 
|
प्रसाद, प्रकाशरेषा अप्रतीम! गिरीमहाराज, किती गावं? 
|
Giriraj
| |
| Tuesday, March 07, 2006 - 9:55 am: |
| 
|
त्याला मार द्यायचा आहे.... मला न सांगता कविता post केल्याबद्दल! वरून मला त्याच्यासाठी secretary चही काम कराव लागत... त्याच्या कविता उतरवून घेण्यासाठी माझ्या फ़ोनवरून ऐकवाव्या लागतात! याचा हिशोब तर वेगळाच आहे! पण अस काही मी करणार नाही कारण मी फ़ार दयाळू आहे! त्याला एक बंगला बक्षीस देण्याचा विचार आहे सध्या! }
|
Ninavi
| |
| Tuesday, March 07, 2006 - 10:03 am: |
| 
|
दयाळू गिरीमहाराज, एक सुचवू का? देवनागरीत ते ' फ' लिहीताना f न वापरता ph वापरावं. तिथे निष्कारण नुक्ता येतो. बंगल्याचं काय म्हणालात? वाटप चाललंय का? मी ही आहेच मग लायनीत. 
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 07, 2006 - 10:33 am: |
| 
|
वैभव, मी गेले दोन तीन दिवस घरी नव्हतो, म्हणुन उत्तर द्यायला ऊशीर झाला. मी सगळ्यांच्या कविता वाचुन समजुन घ्यायचा प्रयत्न करतो. पण समजतातच असे नाही. मला या बाबतीत जरा समज कमीच आहे. बारावी नंतर कवितेशी संबंध आलाच नाही. मुद्दाम कविता वाचल्याहि नाहीत. त्यामानाने निनावि च्या कविता मला समजतात. ती माझी गाववाली, त्यामुळी तिच्यावर दादागिरी करता येते. शिवाय माझीही कान ऊघडणी करण्याचा अधिकार तिला आहेच आणि तोहि ती बजावतेच. शिवाय मी केलेल्या एकमेव कवितेची, ती एकमेव वाचक आहे. जो विषय आपल्याला कळत नाही त्यावर टिकाटिप्पण्णी करणेहि अयोग्य, शिवाय न कळता तारिफ़ करणेहि अयोग्य. हो ना ? आणि कविता न वाचताहि मैत्री करु शकतो कि मी ? लाडक्या गिर्याला विचार. आयुष्यात बर्याच गोष्टी करायच्या राहिल्यात, आपला देश बघायचा आहे, गाणं शिकायचं आहे, पण कविता काहि तितकि अजेंडावर नाही. बघु जिंदगानी रही तो !
|
प्रसाद...प्रकाशरेषा too good!!! थेंब थेंब दुग्धरात!!! वा!!!
|
Giriraj
| |
| Tuesday, March 07, 2006 - 11:35 am: |
| 
|
निनावे, phone चा उच्चार फ़ोन असाच होतो... अर्धमिटल्या ओठांनी. (मनोगतवरची गरमागरम चर्चा वाचून आलोय,त्यामुळे फुल्ल भांडायचा मूड आहे बर माझा!) मेलला उत्तर द्यायची पद्धत नाही का तिकडे?
|
Chinnu
| |
| Tuesday, March 07, 2006 - 3:39 pm: |
| 
|
अविकुमार, पुन्हा पुन्हा तुमच्या प्रेमाच्या गावी जावेसे वाटते हो! वैशाली तुझी सकाळी सकाळी, रोज सकाळी वाचाविशी वाटते! गिरी, इतक खाडा बरा नाही. येउ द्या बरं मस्तपैकी!
|
अवि, वैशाली छानच. वा प्रसाद, प्रकाशरेषेचे प्रत्येक कडवे (किंवा काय ते गज़लेच्या परिभाषेत म्हणत असतील ते) एक स्वतंत्र कविता आहे. तुझ्या कविता पहिल्या प्रेमपत्रासारख्या असतात. परत परत वाचायला लावणार्या. सारंगा मानले रे बाबा. ज़ाण एकदम जमलीयर्थ अतिशय छान आहे. सुमती नेहमीप्रमाणेच छान. ए ए हार्टवर्क कल्पना छान आहे कवितेची.
|
दिनेशदा, आधी लिहील्याप्रमाणे हेतू अतिशय निर्मळ होता आणि आपण तो तसाच घेतल्याने बरं वाटलंय बाकी जेव्हा भेटू तेव्हा किंवा मेलवर बोलू .
|
कॅडबरी ..... " डॅडी लेट्स स्टार्ट " म्हणतो तो अन सुरू होते रोज रात्री , ती पैज पापणी लवू न देता एकटक बघण्याची ... जो हरेल त्याने एक कॅडबरी द्यायची ... नीरव शांतता पसरते आमच्या दोघांमध्ये अन तो नजरेनेच आरोप करू लागतो माझं त्याला जास्त वेळ न देऊ शकणं पेरेन्ट्स मीटिंग ला हजर नसणं त्याच्यासोबत असताना पण नसणं .... एक का दोन हजार आरोप ... पैजेच्या स्पिरिटमुळे मी पण प्रत्यारोप करत सुटतो ... त्याचा अभ्यास ... मम्माशी नीट न वागणं .. मनोमन मला जाणवत असतं आय ऍम नॉट बिईंग स्पोर्टिंग इनफ़ अतिशय निरागसतेने तो हरतो अन गळ्यात हात टाकून झोपी जातो मग मात्र , इतक्या वेळ आवरलेल्या पाण्याला वाट देण्यासाठी ..... पापणी लवते .... रोज एक कॅडबरी आणतोच मी हमखास ... रोज एक कॅडबरी जिंकतोच तो निर्विवाद ...
|
वाह वैभव ! खूपच छान
|
Giriraj
| |
| Wednesday, March 08, 2006 - 2:06 am: |
| 
|
चिन्नु म्हणते म्हणून! द्विधा रोज स्वप्नजगतातून बाहेर येतांना, तसेच राहून जातात कधी, अंगावरचे फुलांचे रंग तर कधी तसेच घेऊन येतो मी फुलपाखरांचे पंख! कधी कधी विसरुन येतो माझं मन तिच्या स्वप्नाळू डोळ्यांत. तर कधी गालांवर तसाच घेऊन येतो रंग तिच्या आरक्त ओठांचा! स्वप्न्-अस्वप्नाच्या सीमेवरची ही रोजची ताटातूट नेहेमीच सहन करत आलोय मीही. म्हणूनच तर द्विधेत असूनही पहातोय वाट आजचं पहाटस्वप्न अस्वप्न होण्याची, मी स्वप्नांत असतांनाच सीमा ' सील ' होण्याची! गिरीराज
|
खूपच जास्त छान... असं काही मला का नाही सुचलं...
|
Amrutabh
| |
| Wednesday, March 08, 2006 - 3:39 am: |
| 
|
चकवा... पायाखालची वाट ही,किती वळ्णाची नेहमी कळते ते पाठ वळल्यावरच, नजरेसमोर चालताना मात्र वाटते सरळच, अगदी बाणासारखी... साधी,सरळ नेहमीची ही पायखालची वाट नजर पोहचेल तिथपर्यन्त अशीच,सरळमार्गी. वाटेवरचे मुक्काम सारे भेटल्यासारखेच, तसे परिचयाचे तरी थोडे धुसरच... बस एक पडदा तोच काय उठायचाय, मग मी आणि माझे लक्ष्य, लख़्ख डोळ्यासमोर पण पडदा आहेच अजून थोड आश्चर्य, थोड नवल, अन थोडासा चटका दडवून. शेवटचा झिरझिरीत पडदा फारच फसवा सत्य आणि मी यातील तो एकमेव अडसळ आणि अडसराआडचा थोडासाच अन्धार, अन्धारात नकळत किती दिवास्वप्ने रन्गवलेली. त्यातच तर असतो लपून य वळणाचा चकवा! मग काय? मी पुन्हा फसतो, मागे वळुन पाहतो तर वळणान्चा आकडा एकाने वाढलेला असतो. मग उलगडते,त्यात धुसर तर काही नव्हतेच ते मी जाणलेल सत्यच असत. तरी पण ते भेटत एखाद्या अनोळखी मित्रासारख यात चुक माझीच असते, कारण अन्धरात त्या थोड्याच मी खुप स्वप्नाना दडवलेल असत. आता पुन्हा पायाखाली तीच वाट वळाणाची........... अ ह... सरळ बाणासारखी,नजर पोहचेल तिथपर्यन्त न दिसलेल्या वळणापर्यन्त...............
|
Jayavi
| |
| Wednesday, March 08, 2006 - 4:15 am: |
| 
|
वैभव, कॅडबरी एकदम सही ! मला संघमित्रासारखा सुरेख प्रतिसाद नाही देता येत रे........ पण तुझी कविता खूप खूप आवडली ! गिरी, JUST SUPERB ! दुसरं काहीच नाही ! पण खूप वाट बघायला लावतोस तू.
|
वाह गिरिभाऊ, चला आता मी तुमचा secretary......... पण कुणाकुणाला ऐकवायची ? प्रकाशरेषेच्या कौतुकाबद्दल धन्यवाद मित्रांनो. वैभव च्या एका गझलेची लय पकडूनच माझी कविता की गझल काय ते आलेली आहे. तेंव्हा वैभव तुझेही आभार
|
एक गजल: आसवांच्या साखळ्या तोडायला मी मोकळा भावनांना मोकळे सोडायला मी मोकळा स्वैर शब्दांनी मने उध्वस्त केली केवढी वादळाशी वारसा जोडायला मी मोकळा चेहर्याने झाकल्या कित्येक नाती जोडली आरशाशी बोलणे तोडायला मी मोकळा भीक मागावी कुणा जर भाग्य वेडे झोपले मोड स्वप्नांची पुन्हा मोडायला मी मोकळा माणसे गेली तरी भग्नांग दुःखे राहिली शिल्प जखमांचे नव्या कोरायला मी मोकळा गीत गाताना सुरांनी काळजाशी टाकले शद्ब सारे पोरके पोसायला मी मोकळा चाकरीला ठेवले ते सूर्य सारे पांगले आज माझी सावली ओढायला मी मोकळा रिक्त आयुष्यातळी थोडे जमेला दाटले साचलेले शून्य ते मोजायला मी मोकळा त्या तुझ्यामधुनी कधीची हरवलेली तीच 'तू' तोच 'मी' माझ्यातला शोधायला मी मोकळा गोठल्या नशिबामधे होते 'निरंजन' जागणे द्या चिता उबदार, अन् झोपायला मी मोकळा!
|
क्या बात है निरंजन...फारच सुरेख
|
giriraj,amrutambh,vaibhav.,niranjan ..... surekh.. .. .. .. ..
|
सर्वाना धन्यवाद! प्रसाद, तुझी ग़ज़ल आवडली. माॅडरेटर साहेबांना चालणार असेल तर सुरेश भटांच्या एका ओळखीच्या ग़ज़लेचा अनुवाद सादर करू इच्छितो: वीरान मेह्फ़िल मेरी आज भी है, मैन तेरे ही नग़मों को गाता रहा हूँ अब तक ये मह्सूस होता है मुझको, कि तारों की शब में नहाता रहा हूँ (सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे) ये भी न जानूँ किसे देखता हूँ, है रुख ये किस का ज़हन में न आये यूँ बारहा याद के आइने में, तेरी ही तबस्सुम सजाता रहा हूँ (कळे न मी पाहते कुणाला कळे न हा चेहरा कुणाचा पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे) ऐ दोस्त, बहती हवाओं से मेरी तरन्नुम की साँसों को पेह्चान लेना आँगन में तेरे, तरानों से महका ये खामोश गुलशन खिलाता रहा हूँ (सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे) ख्वाबों में क्यूँ मैने फैलाया दामन, सायों से क्यूँ मैने माँगी दुआएँ दामन में मेरे मोहब्बत है फिर भी, मैन अपनों से दामन चुराता रहा हूँ (उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आजर्वे तू दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे)
|
|
|