Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 07, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » काव्यधारा » कविता » Archive through March 07, 2006 « Previous Next »

Vaibhav_joshi
Monday, March 06, 2006 - 6:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दोस्तस ...

झाड ... अनाघ्रात शब्दाचा अर्थ माझ्यामते ज्याच्यावर एकही आघात्/ घ्रात झालेला नाही , (virgin?) इथे मला जे म्हणायचं आहे की कलाकाराच्या आयुष्यात असं बरेचदा होतं की तो एक क्षितिज गाठून संतुष्ट होतो पण खरंतर त्याच्या आजूबाजूच्या हितचिंतकांना वाटत असतं की हा आणखी काही करू शकेल .. अर्थातच मांडणी ज्या पध्दतीने झालिय त्यावरून ह्या कवितेचे बरेच अर्थ निघतात आणि बरयाच अंशी रोजच्या जीवनात ते अर्थही लागू होतात असं माझं मत आहे ...


Devdattag
Monday, March 06, 2006 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कर्पे, झाड, वैभव सुंदर कविता..
झाड.. अनाघ्रातचा व्यापक अर्थ निर्मळ, शुद्ध किंवा अन्टच्ड असा होऊ शकतो.
सहसा आपण देवाला अनाघ्रात फुले वाहतो.
परत एकदा
चु. भू. द्या. घ्या.


Vaishali_hinge
Monday, March 06, 2006 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jhaad, vaibhav sundar , mast....

anaaghraataachaa arth untouched ... asa vachnyaat aalay.

Vaibhav_joshi
Monday, March 06, 2006 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्राप्य ....

आता राहू दे दुरावा
काही काळ सोबतीला
आता ओळख स्वतःची
शोधू दे रे एकटीला

गुंतताना तुझ्यामध्ये
स्वत्व हरवले माझे
गेले बदलून अशी
विश्व बदलले माझे

ऋतू नेहमी सभोती
फक्त तुझेच राहिले
वेचताना तुझी फुले
माझे फुलणे राहिले

ग्रीष्म लादून घेतला
वसंताला शोधावया
पाहते रे तुझ्याविना
येतसे का मोहराया

फांदी जुनी आहे तरी
हवा मोहर तिलाही
श्वास तुला द्यावयाला
श्वास हवा ना मलाही ?

भासू दे रे तुला माझी
थोडी उणीव नव्याने
आपलेसे आहे कुणी
ह्याची जाणीव नव्याने

थोडे दूर राहूनिया
आणू नजिक मनाला
जे जे अप्राप्य तयाचे
वाटे अप्रूप मनाला


Vaishali_hinge
Monday, March 06, 2006 - 8:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, मस्त
ह्याच meaning ची मी एक कविता केली होती, पण शब्द कुठेतरी चुकल्यासारखे वाटायचे म्हणुन इथे दिली नाही,
तुझी कविता वाचुन तो अर्थ आणि ते शब्द सापडले.


Zaad
Monday, March 06, 2006 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी आभार.
वैभव, अप्राप्य ला सलाम!!


Giriraj
Monday, March 06, 2006 - 8:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है वैभव!
आता कसला धीर होणार मला कविता टाकण्याचा?


Pkarandikar50
Monday, March 06, 2006 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vaibhav,
अप्राप्य अगदी तुझ्या स्टॅन्डर्डनेही लाजवाब आहे. मी मनोहर सप्रे यान्च जे भाष्य उद्ध्रुत केलय पहावे हितगुज-भाषा आणि साहित्य-पद्य-मनोहर सप्रे), त्यामध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे, चान्गल्या कवितेचा शेवटचा शब्द वाचून झाला तरी कविता सम्पू नये. विशेषत: तुझ्या शेवटच्या दोन ओळींनन्तर विचारांचा एक ट्रेल सुरु होतो. ही सर्वात मोठी जमेची बाजू.त्याच्या तुलनेने इतर गुण-दोष कमी महत्वाचे आहेत. उदा.: ग्रीष्म लादून घेतला, वसन्ताला शोधावया ही प्रतिमा मला तेवढीशी पटली नाही पण तो मुद्दाच गौण.
बापू.


Mavla
Monday, March 06, 2006 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव जी,
गुरु मानसांचे बोलच तुमच्या कवितेच्या स्तुति साठी अपुरे पडताहेत. तिथे आम्हि अजुन काय दुजोर द्यावा?तरि पन सांगितल्या वचुन रहवेना. सुन्दर कविता.


Pkarandikar50
Monday, March 06, 2006 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ninavi
४ मार्चच्या तुझ्या कवितेचे सविस्तर रसग्रहण करावे इतकी ती महत्वाची आणि सुन्दर आहे. ते सोडून वैभव भलत्याच वादात घुसला. पण त्याचा मुद्दा योग्य आहे. बरेच लोक गाणे ऐकतानाही असेच वागतात.गाणे कसे आहे याकडे त्यान्चे लक्ष कमी, कोण गातय यावरच त्यान्ची मते ठरतात बर्‍याचदा. पण्डित जसराज किम्वा किशोरीबाइ सुद्धा एखादेवेळी कणसूर होऊ शकतात. मोठे गायकसुद्धा काहीवेळा नुसत्या पाट्या टाकतात. त्यान्चा परफ़ॉर्मन्स गुण-अवगुणावर जोखला जावा. नावावर नव्हे. एखादेवेळी चुकून-माकून नितिन मुकेशसुद्धा एखादी जागा छान घेउन जातोच की.पण तो नितिन मुकेश म्हणून त्याच्या गाण्याची दखलच घेऊ नये, असे नाही. अर्थात मला निनावीला नितिन मुकेशच्या पन्क्तीत बसवायचे नाही, हे वेगळे सान्गायला हवे का?
Diptie, तुझ्याही कवितेत विषयान्चे वेगळेपण आणि आविष्काराची धिटाइ येतेय. छान.
बापू


Ninavi
Monday, March 06, 2006 - 10:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! सगळेच काय छान लिहीतायत!
दीप्ती, सुंदर.
झाड, ' थोडे हसता डोळ्यांत पाणी, थोडे नसता व्याकुळ केवळ..' ... सुरेख!!

वैभव, ' तेव्हा पुढचं क्षितीज दूर नसतं.. एका इच्छेहून..' वा! वा!
' पूर्ततेमुळेच रिक्त..' व्वा!!
' अप्राप्य'पण अप्रतीम!
गिरी म्हणतो ते बरोबर आहे. असं वाचल्यावर आम्ही लिहायचं धाडस कसं करायचं?

बी, कर्पे, उर्मिला, सहीच.
बी, नेहेमी का लिहीत नाही?

बाकी कौतुकासाठी सगळ्याच दोस्तांना धन्यवाद!
( बापू, तुम्ही म्हणाल तसं! नितीन मुकेश तर नितीन मुकेश!)


Diiptie
Monday, March 06, 2006 - 10:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव अप्राप्य खरोखर छान रे
बापू धन्यवाद


Diiptie
Monday, March 06, 2006 - 11:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्रकविता काहितरी नव... नक्की पहा...

Avikumar
Monday, March 06, 2006 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रेमाचा गाव

मी येताच तुझं
माझ्यावरती रागावणं
आणि तोंड फिरवुन
आकाशाकडे एकटक बघत रहाणं...

'असं काय करतेस राणी
एकदा सांग तरी, काय केले आम्ही?'
मिश्किल हसत विचारतो तुला मी जेव्हा
आरडा ओरडा करत तुझं मारायला धावणं...

'हे काय रे.. नेहमीच उशीरा येतोस
आणी वर मलाच चिडवत बसतोस'
लटक्या रागानं मला सुनावताना
माझ्याच ख़ांद्यावर डोकं ठेवणं...

'खरं सांगू तुला राणी?
मी ना.. तुझ्या आधीच येत असतो
तो मोहरलेला गुलमोहोर दिसतोय ना?
त्याच्यामागुन, तुलाच येताना बघत असतो...
अस्ताला जाणार्‍या सुर्यासमोरुन
माझा हा चंद्र उगवताना पहात असतो
आणि त्या गुलमोहरासारखाच
मी पण मोहरुन जात असतो...

हे ऐकुन तु खुदकन हसतेस
पायाच्या अंगठ्याकडे पहात
फार सुंदर लाजतेस
'माझं यडू रे यडू' म्हणत,
पुन्हा ख़ांद्यावर डोकं ठेवतेस
आणि मोहोरलेल्या या गुलमोहराला
हळूच आपल्या कुशीत घेतेस...

हेच का ते आकाशाचं धरेशी
क्षितिजापाशी मिलन होणं?
हेच का ते खळाळत्या नदीचं
शांत सागरात विलीन होणं?
बंधन सारे तोडुन जगाचे...प्रेमाच्या त्या गावा जाणं...
बंधन सारे तोडुन जगाचे... प्रेमाच्या त्या गावा जाणं...

अविनाश


Sanghamitra
Monday, March 06, 2006 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी शब्द छान आहेत कवितेतले.
झाडा तुझ्या कविता नेहमीच interesting असतात.
वैभव अनाघ्रात क्षितिज सुरेख.
आणि अप्राप्य केवळ लाजवाब. एक सांग, हे असं होतं हे तुला कसं कळलं? आणि तू ते अगदी जसं च्या तसं शब्दांत कसं मांडू शकलास?
तुला एकविस कवितांचीच सलामी द्यायला हवी. :-)


Vaishali_hinge
Tuesday, March 07, 2006 - 12:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सकाळी सकाळी

अवखळ हवेने फ़ुलाला टिचकी मारली,
फ़ुल फ़ांदिवरुन पानावर घरंगळले
या पानावरुन त्या पानावर करत....
गवताने अलगद झेलले....
हरळीने खुणावले!...... नी
पाकळीचा ओठ मुडपत ते गालातच हसले!
हलकेच नखरा करत ते दवबिंदुनी भिजले
सोनेरी किरणांनी न्हातेधुते झाले,
इंद्रधनुषी मणीमुकुट मिरवु लागले,

सकाळी सकाळी आयुष्याचे सुन्दर स्वप्न

रंगवु लागले.........


Devdattag
Tuesday, March 07, 2006 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव.. अप्राप्य.. अप्राप्य

ठाव

आज माझ्या मनाला
काहीच कसे ना दाहे
माझ्या विचारांचे पात्र
आता तळातून वाहे

घर बांधले कधीना
सजवली कोठीच आहे
माझिच माझियांसाठी
प्रीती ना उरली आहे

बदल माझ्या मनाचा
जाहला पत्थरात आहे
तो नाही माझ्या देही
ना अंतरातही राहे

मी जाणिवांच्या उशेला
शोधला मांदार आहे
मलाच लपविण्यासाठी
पोसला अंधार आहे



Prasadmokashi
Tuesday, March 07, 2006 - 12:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रकाशरेष

कोण तेल कोण वात, ना कुणा कळायचे
होउनी प्रकाशरेष, संथसे जळायचे

सांज दाटता उरात, घे मिटून पाकळ्या
आसवासवे चुकून, स्वप्न ओघळायचे

तप्त दग्ध जीवनात, हासतेस लाघवी
मृगजळाकडे फिरून, पाय हे वळायचे

थेंब थेंब दुग्धरात, सांडता सभोवती
साखरेपरी दुधात, देह विरघळायचे

रोज घाव काळजात, रोज रक्त आहुती
रोज सूर्य पेटताच,शस्त्र पाजळायचे

एक बंदिवान आत, बंद दार ठोठवे
कैद देउनी कुडीत, का तया छळायचे ?

~ प्रसाद


Vaibhav_joshi
Tuesday, March 07, 2006 - 12:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह ! प्रसाद, मस्त जमलीय


धन्यवाद दोस्त्स ....

देवदत्त , वैशाली , मस्त !!!

दीप्ती ... खूपच छान ... राहून गेली होती वाचायची



Devdattag
Tuesday, March 07, 2006 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद क्या बात है!!!

Sumati_wankhede
Tuesday, March 07, 2006 - 12:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरूवात

'पटलंच जर एकमेकांना एकमेकांचं महत्व
तरच पुन्हा एकत्र येऊ आपण'
किती शांतपणे केलंस तू निरोपाचं बोलणं
अन तोडून टाकल्यास सगळ्याच निरगाठी
....बंध....... अनुबंध.............
तुझ्यासारखं असं संयमी वागणं
मला मात्र जमत नाही.
दिवसें दिवस मी फक्त विचार
अन विचारच करत जाते;
दुःखाच्या खोल गर्तेत
अधिकाधिक शिरत जाते.
तू मात्र नव्यानं आयुष्याला
सुरूवात केली असणार
सोनेरी भविष्यात
काळा भुतकाळ विरून गेला असणार
इथे.. निःशब्द हुंदके, दाटलेले कढ
डोळ्यांतचं जिरलेलं पाणी
कुणालाही न कळलेली
मुकी... अगतिक.. व्याकुळ कहाणी.
मुक्या दुव्यांची... नाहीच गणती
कोपर्‍यात उदास....... एक पणती.




Sarang23
Tuesday, March 07, 2006 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, मृगजळाकडे फिरून... वृत्तात बसत नाहीये...:-(
लघू गूरू छान...!
कोण तेल कोण वात, ना कुणा कळायचे
गाल गाल गाल गाल गा लगा लगा लगा...
पहाटबावरी ची आठवण झाली:-)


Sarang23
Tuesday, March 07, 2006 - 1:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

            जाण

जो जाणेना अन जाणेना की जाणेना काही...
तो मूर्ख तयाला जाण कशाची कधीच आली नाही!

जो जाणे पण ना जाणे की तो जाणे काही...
जागवा तयाला जाण करून द्या पकडून दोनी बाही!

जो जाणेना पण जाणे की तो जाणेना काही..
तो मनुष्य आहे शुद्ध, त्यामध्ये सखा जवळचा पाही!

जो जाणे अन हे जाणे की तो जाणे सगळे काही...
मानले गुरू मी त्याला, माझा देव त्यामध्ये राही!!!

सारंग


Heartwork
Tuesday, March 07, 2006 - 1:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमति वैशालि, सन्घमित्रा, प्रसाद, वैभव
सुन्दर कविता....




Heartwork
Tuesday, March 07, 2006 - 1:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद,
जाण छानच आहे





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators