एकदा तरी सखे तू स्वप्नात माझ्या पाऊल ठेव तिथेच करू मग ओंजळीने आपल्या स्वप्नांची देवघेव
|
Pendhya
| |
| Saturday, March 04, 2006 - 12:07 am: |
| 
|
वा! छान चाललय. दीप, नव्या दिमाखात आलायस. keep it up!
|
Pendhya
| |
| Saturday, March 04, 2006 - 12:18 am: |
| 
|
नवा मोहोर नवी पालवी करते आठवण तुझी ह्या गंधातून ऊजळते स्मॄती तुझ्या माझ्या बालपणीची
|
Shyamli
| |
| Saturday, March 04, 2006 - 12:49 am: |
| 
|
स्वप्नात सुधा तु वाट बघायला लावतोस कधिमात्र लवकर येऊन पायघड्या घालतोस श्यामली!!!
|
स्वप्नात वाट पाहण्याची मजा काही औरच असते भेट होते त्या क्षणाची ओढ दाटुन येत असते
|
Jo_s
| |
| Saturday, March 04, 2006 - 1:54 am: |
| 
|
नको स्वप्न आणि स्वप्नी रचलेले मनोरे उघडताच डोळे दिसती सत्त्यातले निखारे
|
असतील कधी निखारे म्हणुन स्वप्ने पहायचीच नाहीत का? आहे मृत्यू अटळ म्हणुन जीवन जगायचेच नाही का?
|
Prem869
| |
| Saturday, March 04, 2006 - 5:17 am: |
| 
|
श्यामली, मयुरेश, दीप, पेन्ध्या, हार्टवर्क, वैशाली, जास्वन्द, निलेश झुळुक आज खरच झुळझुळली!! मीनु नाही दिसत! बरसण्यासाठी
|
Prem869
| |
| Saturday, March 04, 2006 - 5:22 am: |
| 
|
अरे हो की जो-स राहीलाच. नाहीतर वैभव पुन्हा कवितान्च्या सारख़ा बरसायचा.
|
Mavla
| |
| Saturday, March 04, 2006 - 12:58 pm: |
| 
|
होय जगायच आहे आता मला पदरी निखारे घेवुन जायच आहे त्या तिरावर मस्तकी म्रुत्युचा पदर घेवुन. मावळा
|
कोणा वाटे लाल निखारे लाल गुलाब वाटे कोणा.. वाट संपेतो मार्ग क्रमावा कणखर मनाचा हाच बाणा.. पेंढ्या, प्रेम.. धन्यवाद मावळा, मयुर, सुधीर, श्यामली, पेंढ्या.. सुंदर..
|
Prem869
| |
| Monday, March 06, 2006 - 1:01 am: |
| 
|
मावळा, दिप सुन्दरच! झुळुक आज एकदमच ख़ाली (empty)?
|
Meenu
| |
| Monday, March 06, 2006 - 1:21 am: |
| 
|
सोसाट्याचा जेव्हा एकदा सुटला होता वारा जहाजही हरवलं अन हरवला किनारा... रस्ता चुकून लाटा मग गावामध्ये शिरल्या घरांच्या नंतर फक्त आठवणीच उरल्या
|
Prem869
| |
| Monday, March 06, 2006 - 1:50 am: |
| 
|
मीनु सोसाट्याचा वारा सुन्दर /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=75&post=756251#POST756251 मीनु मला अनयबद्दल कुठे वाचायला मिळेल का? कोणती पुस्तके किंवा वेब साइट प्लीज!!!!
|
मीनु सुंदर.. मला माझ्या हिंदितून लिहिलेल्या काही ओळी आठवल्या. तुफ़ानी समंदर में इक कश्ती हुई रवां चराग साहिल के जब बुझां रहि थी हवां हम सब तो सोये थे आंखे माझि की थी जवां आंख़े ख़ुली तो साहिलपे सब थे इक माझि के सिवा
|
Meenu
| |
| Monday, March 06, 2006 - 3:22 am: |
| 
|
प्रेम, देव धन्यवाद...देव तु हिंदि सुद्धा छान लिहीतोस रे.. प्रेम अनयबद्दल कुठे वाचायला मिळेल...ते मलाहि शोधवच लागेल...म्हणजे काहि ललित वाचल्याच आणि एक नाटक खुप पूर्वी पाहिल्याच आठवत त्याचे संदर्भ माझ्याकडे नाहित...मिळाले तर सांगीन...
|
Moodi
| |
| Monday, March 06, 2006 - 5:16 am: |
| 
|
अनय हा राधाचा नवरा. वास्तवीक राधा ही श्रीकृष्णाहून १० ते १५ वर्षानी मोठी होती, ती त्याच्याकडे विषय भावनेने बघत नव्हती, पण सतत अनयकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तो खुप चिडला, त्याने राधाला एकदा कोंडुन ठेवण्याचाही प्रयत्न केला. पण तो व्यर्थ ठरला. मी अगदी जुना गोपालकृष्ण नावाचा सिनेमा बघितलाय, त्यात हे संबंध छान वर्णन केलेय, पण अपुर्या अन खोडसाळ माहितीमुळे गुजराथमध्ये किंवा मथुरेत राधा अन कृष्णाचे प्रेम प्रकरण होते असा मुर्खासारखा प्रचार केला गेला, अन त्यात हिंदी सिनेमानी भर टाकुन लोकांच्या मनातील संशय अधिक पक्का केला. वेब साईटबद्दल मला माहित नाही. सापडल्यास माहिती देईन.
|
मूडी... अगदी बरोबर... अजून माहितीसाठी शिवाजी सावंतांचे " युगंधर " वाचा... अतिशय...सुंदर वर्णन... नि:स्वार्थ प्रेम कसे असावे.... नुसतेच राधा-कृष्णाच्या दृष्टिकोनातून नव्हे तर अनयाच्या ही...
|
माझ्या येऊ घातलेल्या श्रावण भुलाव्याचे' ह्या चारोळीसंग्रहातील ह्या काही कविता.... दिले, घेतले अन जपलेले काही वेडे क्षण कसे वेढती अन भुलविती हे ओले श्रावण खुळेच मन अन खुळे खुळे क्षण वरून आणखी हे हळवेपण जपायचे की भिजायचे मी कुठंवर घालावे रे कुम्पण ऋतूमागून सरती ऋतू कधी झरतील मेघधारा तुझ्या नजिक आणेल असा सुटेल सोसाट्याचा वारा
|
प्रेम.. अनयबद्दल जे थोडं फार लिहिलं गेलय ते ब्रुहत महाभारतात. मला वाटतं लोकसत्ताच्या मागच्या वर्षीच्या दिवाळीसुमारासच्या लोकमुद्रा ह्या पुरवणीत थोडीफार माहिती आहे अनयबद्दल. नाहितर कृष्णलीलामृतात माहिती मिळू शकेल.. नॉट शुअर चु. भू. द्या. घ्या.
|
Meenu
| |
| Monday, March 06, 2006 - 7:24 am: |
| 
|
तूझ्या वागण्यातला सुक्ष्मसा बदल डोळ्याबाहेर माझ्या किंचितसे काजळ जशी निरभ्र आकाशी किंचित पावसाळी छटा चेहर्यावर विखुरलेल्या माझ्या केसांच्या बटा.....
|
अरे वा सुमति जास्वन्द मीनु मूडि एकदम खासच प्रेम अनय बद्दल धन्यवाद...
|
प्रतिक्षा म्हणजे जिवघेणी हुरहुर कारण नन्तर मधे अन्तर असते पण प्रतिक्षेनन्तर जे मिळते तेच सुख निरन्तर असते
|
Sarang23
| |
| Tuesday, March 07, 2006 - 1:10 am: |
| 
|
वा हार्टवर्क!!! क्या बात है!
|
धन्यवाद सारन्गा, काल पुन्हा जाणवल बघ ऋतु बदलले पण, तु नाहि बदललीस चेहर्यावर केसान्च्या बटा आल्या तर पिन घेउन ढगान्कडे धावलिस
|