Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
फ़रगेट इट

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » ललित » फ़रगेट इट « Previous Next »

Rga
Monday, March 06, 2006 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़रगेट इट
oraganisation करण मला फ़ार आवडत. माझ घर नेहमीच नीट्नेटक आवरलेल असत. सार छान रचायच,त्याच grouping करायच, जुन्या वस्तु वेळच्या वेळी फ़ेकुण द्यायच्या,निरुपयोगी वस्तुचा जास्त मोह न करता त्यांची अडगळ वाढु द्यायची नाही हे तर मी नेहमीच करीत असते. शेल्फ़वर सुरेख रचलेली पुस्तक, pantry मध्ये ओळीन
मांडलेल्या बरण्या बघायला मला फ़ार आवडत .

यासाठी माझा आटोकाट प्रयत्न चालु असतो.हव्या त्या वस्तु हव्या तेव्हा पटकन मिळव्यात हा त्या मागचा हेतु. पण माझ्या विसराळु पणामुळ यातल्या कशाचाच उपयोग होत नाही.
म्हणजे मला हव्या तेव्हा घराच्या किल्ल्या कधीच सापडत नाहीत. आठवणीन इस्त्री करुन ठेवलेले कपडे ऐनवेळी मी कुठल्या कप्प्यात ठेवलेत ते विसरते.लोकांची नाव विसरते,तारखांचे तर नेहमीच घोळ होत असतात.या सर्वाहुन कमी म्हणुण कि काय अलिकडे मी माझा घरचा फ़ोन नंबर ही विसरते.

babies R us चा counter. माझा नंबर येतो. salesgirl नेहमीप्रमाणे फ़ोन नंबर विचारते. मी स्म्रुतीला ताण देवुन तो आठवायचा प्रयत्न करत असते. मला माहित असत याचा काही उपयोग होणार नाही पण तरिही लाजेखातर मला हे नाटक करावच लागत. शेवटी नाईलाजस्तव ओशाळवाणं हसत मी तीला नंबर लक्षात नाही अस सांगुन टाकते. ती , मी खोट बोलती आहे अस वाटुन, रागा रागानच मग बिलाचे पुढचे सोपस्कार वैगरे करते. सगळ आटोपुन मी पुढ येते तोवर ती परत मला बोलावुन माझ credit card माझ्या हातात देते. आता रागाची जागा माझ्याविषयीच्या दयेन आणि प्रश्नार्थक(why don't u see the dr?) चेहऱ्यान घेतलेली असते.

हे आता नेहमीचच झालय. अलिकडे सतत मी काहीतरी विसरत असते. आणि लोक मला असे काही look देत असतात कि आजकाल मग मी सरळ शरणागती पत्करुन आपण बावळट असल्याच मान्य करुन टाकते. पण ते तीतकच काही पुरेस नसत. सहानुभुतीसाठी मला त्याच बरोबर अत्यंत हुशार पण abscent minded ,बावळट, विसराळु प्रोफ़ेसर सारख ही वागाव लागत.फ़क्त या प्रोफ़ेसर ला कुठ् शिकवायच नसत एवढचं.
हा विसराळु पणा सुधारण्यासाठी पुस्तक वाचली.योगा करुन पाहील. अगदी शंखपुष्पी ही घेवुन झाल.पण कशाचाच उपयोग होत नाही.

मग जरा वेगळ्या प्रकारे म्हणजे list तयार करण. मोठ्या अक्षरात fridge वर लिहिण. छोट्या stick notes लावणं,diary मध्ये नोंद करण.इत्यादी करुन पाहिल.पण "i forgot" ही अक्षर मला अगदी fevicol न चिकटल्यासारखी चिकटली आहेत.stove वर ठेवलेला चहा,dr च्या appoitntmets ,फ़ोन numbers, password,billing च्या last dates ,पुस्तक परत करण्याच्या तारखा अगदी सगळ माझ्या लक्षातुन जात. मग fine भरताना स्वतावरच हताशपणे वैतागायच हे तर नेहमीचच.

"savings" करण्यासाठी grocery ला जाण्यापुर्वी list करावी" मी नुकतच मी वाचलेले असत.bank balance फ़ारच कमी दीसत असतो त्यामुळ मी हे implement करायच ठरवते. पण हाय रे कर्मा! बरेच दिवस मी ती list करायला विसरते.केल्यावर ती list न्यायला विसरते आणि मग नंतर जर समजा ती list नेलीच तर पहायला विसरते. या सगळ्यातुन भरपुर शिल्लक असलेल्या मैद्यात आणखी भर पडते आणि मला हव असलेलं तांदळाच पीठ दुकानातच रहात.मग परत store मध्ये जाण आलचं. पण दोन तीन दिवसानी pantry मधल्या सगळ्यात वरच्या कप्प्यात तांदळाच्या पीठाचे दोन pack मिळतात. मी मग फ़क्त थयथयाट करायच तेव्हढच राहीलेल असतं.

बरेचवेळा form भरताना घराचा पत्ता ,रस्त्याचा number,pin code यातल काहीतरी मी विसरत असतेच.माझा ssn तर अजुनही मला पाठ नाही.नशिब एवढच कि मी अजुन लोकाचे चेहरे विसरले नाहीत. नाहीतर थोडे दीवसाने "मै कहां हुं?" असे प्रश्न विचारावे लागणार.पण तो दिवसही दुर नाही.फ़ोन करुन ओळखलस का? अस विचारनाऱ्या लोकामुळ तर माझी फ़ारच पंचायत होते.
कधीकधी तर चेहरा ओळखीचा वाटत असतो पण नाव आठवत नाही आणि समोरची व्यक्ती तर जन्मोजन्मीच नात असल्यासारख माझ्याशी बोलत असते. अशावेळी तर मला फ़ार हुशारीन वागाव लागतं.सासरी असले तर फ़ारच.नाहीतर हमखास मी जावेच्या बहिणीच्या नवऱ्याला तीचा भाऊ केलेल असतं.
महत्वाच्या वस्तु तर मी अशा "safe" ठिकानी ठेवलेल्या असतात कि त्या फ़क्त मलाच सापडु शकतात. पण बरेचवेळा त्या मिळेपर्यंत वेळ निघुन गेलेली असते.सापडुन त्याचा उपयोगही नसतो.

रस्ते विसरायचे हे तर अगदी रोजचच झालेल असत. दवाखान्याची appointment असते. लक्षात नसतच. नवरा अगदी ऐनवेळी आठवण करुन देतो. पण भगवंता! नेहमी प्रमाणे मी रस्ता विसरते."इथेच तर होत त्यावेळी. इथुन left घ्यायचा, मग right मग दोन blocks झाले की यायलाच हवी ती building." पण ती building कधिच येत नाही कारण त्यावेळी खर तर मी त्या building च्या विरुद्ध दिशेला १० blocks असते.

ह्या सगळ्याचा मला इतकाच उपयोग होतो कि माणसावर माझा अतिशय विश्वास बसलाय. मला कुणी लुबाडणार नाही, सगळी लोक प्रामाणीक आहेत अस आपल मला वाटत.वाईटातुन चांगल ते अस निघतं. कारण शंभरदा मी विसरलेल्या वस्तु मला लोकानी परत केल्या आहेत.
एकदा carpet बघायला गेलेले; तेव्हा एकावर एकावर carpet टाकता टाकता माझी purse त्या ढिगाच्या आतच राहीली. दुकानापासुन साधारण २५ miles आल्यवर अर्थातच त्या purse ची आठवण आली. ती तशीच्या तशी मिळाली हे सांगायलाच नको.भारतात रिक्षात विसरलेली bag,tailor कड शिवायला टाकलेला dress(जो १० दा फ़ेऱ्या मारल्यानंतर माझ्या स्मरणातुन जातो) ,दुकानदाराकडुन परत घ्यायचे पैसे अस बरच काही मला अनोळखी दयाळु लोकानी आणुन दिलेल आहे.

गंम्मत म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टी मी विसरते पण मी माझ्या मुलीची कुठलीच गोष्ट कधीच विसरत नाही. तारखेच्या बाबतीत इतके घोळ घालनाऱ्या मला ,ती पहिल्यादा कधी पालथी पडलेली, तीन पहिल smile कधी केल, तीचा पहिला शब्द कुठला होता, तीन पहिल्यान्दा मम्मा अस कधी म्हटलेल हे सगळ चांगलच लक्षात आहे. आणि ते कधी मी विसरीन असही मला वाटत नाही.

तीला कधी काय लागत असत ते ही माझ्या बरोबर लक्षात असत.तीला माझ्या hugs आणि kisses ची भुक आहे कि cereal ची हे मला बरोबर कळत अगदी.मुलीचीच नव्हे तर माझ्या इतर जवळच्या माणसांच्या आवडीनीवडी, गरजा मला नेहमीच लक्षात रहातात.त्यासाठी मला reminder टाकायची गरज पडत नाही.त्याना हव तेव्हा हव तस सगळ माझ्या लक्षात असतं.
बहुदा, वरुन जरी मी organised असले तरी आतुन जरा अव्यवस्थितच आहे.त्यात कामाच्या इतक्या गर्दीतुन काही लक्षात ठेवाव तर वेळ तरी कुठं असतो ? मन अगदी नीटनेटक आवाराव,त्यातल्या विचारांना नीट संगतवार रचुन ठेवाव अस मला जमतच नाही.जुन्या आठवणींचा,विचारांचा त्याग करायचा,नको असलेले, उपयोगी नसलेले विचार फ़ेकुन द्यायचे हे नेहमीच अशक्य वाटलय मला.मग सार कुठतरी असेच भरकटत जात. मला आवरताही येवु नये एवढा पसारा होतो. एवढ्या सगळ्या विचारांच्या पसाऱ्यातुन नेमक काय हव ते शोधुन काढण जरा कठीणच जात. आणि मग मी असच विसरत रहाते.

पण मग आवरायचा कंटाळाच करते मी. माझ्या माणसांच्या पुरत या सगळ्या पसाऱ्यात संगतवार लावलेल अगदी oraganised शेल्फ़ आहे. मला लगेच त्यांना हव असेलेल सापडत तीथ . मग बाकीच सार विसरल तर बिघडल कुठ?

(अरे देवा ! पण आता हे पोस्ट कस करु? कुठल्या नावान? माझा Uid काय होता?आणि password?)

Rga
Monday, March 06, 2006 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वीट थर्टी वाचल्याबद्दल सार्‍यांचे आभार. लेख वाचुन मला विसरु नका म्हणजे झाल .

Manuswini
Monday, March 06, 2006 - 2:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rga
अग काय dr जावून ये(दिनवाणा चेहरा एथे)

kidding ग

मस्त वाटले वाचताना
BTW अगदी अगदी ती list बनवणे friday ला आणि शनिवारी नेमकी विसरणे आणि मैदा एवजी तांदूळ पिठ आणणे झालय हा असे कधी कधी

एकदा kitchen साफ़ करताना मला अर्धा अर्धा किलोची तीन राजमा पाकिटे, पोह्याची पाकिटे, साबुदाणा दोन पाकिटे असे मिळालेत


Ankushsjoshi
Monday, March 06, 2006 - 3:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा छान लेख़ हो... पण आपल नाव काय होत... विसरलोच बघा....
:-)


Chinnu
Monday, March 06, 2006 - 8:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

... RGA, Ditto ग अगदी! :-)

Maanus
Monday, March 06, 2006 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

RGA... 50 First Dates पाहीलास का? हा लेख वाचुन त्यातल्या drew barrymore ची आठवण झाली...

Lalu
Monday, March 06, 2006 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमीप्रमाणे छान. नियमीत लिहायला आणि इथे टाकायला मात्र विसरु नको.

पुढच्या लेखाचं शीर्षक तेवढं मराठी ठेवता येईल का? ~D :-)


Milindaa
Monday, March 06, 2006 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शीर्षक तेवढं मराठी <<<
तिने पण शोभा डे ची मुलाखत वाचलेली दिसते आहे :-)

Chafa
Monday, March 06, 2006 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बात कुछ जमी नही. अगदीच विस्कळीत आणि ओढलेला वाटला लेख. :-(

Rga
Monday, March 06, 2006 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच फ़ारच वाईट झालय ना हे लिखाण ... मला पण जरा तसच वाटत होत . ( म्हणजे तस मला ते प्रत्येकच लिखाणामागे वाटत कि हे कुणी वाचण्याच्या लायकीच आहे का ? . ) म्हणुण अगदी भीत भीतच टाकलेला मी हा लेख . आता आल लक्षात . पुढच्या वेळी नक्की सुधारणा करीन . निदान प्रयत्न तरी करीन .

Chinnu
Monday, March 06, 2006 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही RGA . चांगले लिहीलत. मीदेखील अत्यंत विसराळु आहे. मला यातील बरेच अनुभव आलेले आहेत!
लिहीत रहा.


Sayonara
Monday, March 06, 2006 - 8:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rga , खूपच natural झालाय लेख. आवडला. पण वाचून वाटल की एक चक्कर डॉक्टरकडे टाकायला काय हरकत आहे? बघ पटल तर!!!!

Prem869
Tuesday, March 07, 2006 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rga, लेख वाचताना सारखा तुमचा विसराळुपणा जाणवला.

पण कशा काय तुम्ही न विसरता सगळ्या विसरणार्या गोष्टी लिहील्या.



Chinnu
Tuesday, March 07, 2006 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या अनुभवावरुन सांगते RGA, nothing is wrong in this. This is very natural tendency. अगदी Doc. वगेरेची गरज नाही. कधीकधी आपला कामाचा व्याप फ़ार वाढतो. एक धरले तर दुसरे सुटते कि काय अशी पाळी आपल्यावर येते. मग त्या गोष्टी व्यवस्थीत पार पडायचे जे दडपण असते, ते ह्या विसराळुपणाला कारणीभुत ठरते.
जर तुम्हाला ही समस्याच असली तर you should learn to relax and enjoy ur life. हे माझ्या अनुभवावरुन सांगतेय, बाकी CBDG :-)


Sanghamitra
Friday, March 17, 2006 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

RGA आपनेको आवड्या
यात काहीही डॉक्टरकडे जायसारखं नाहीये.
कितीतरी लोक असा विसराळूपणा करतात.
खूप गोड छान लिहीलंय.
misorganization वर्चा इतका organized लेख मी तरी कुठं वाचला नव्हता. :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators