Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 04, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » काव्यधारा » कविता » Archive through March 04, 2006 « Previous Next »

Devdattag
Tuesday, February 28, 2006 - 11:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरू
कैवल्य याचा अर्थ खरे तर मोक्ष असा होतो
ज्ञानेश्वर गीतेचे निरुपण करतांना सांगतात

जे स्वकर्मी निष्कामता| अनुसरले गा पार्था|
ते कैवल्य परमतत्वता। पातले जगि।।

जर माणसाने स्वकर्मात निष्कामता आणली तर त्यास मोक्षप्राप्ती होते

तर रामदास मनाच्या श्लोकांत म्हणतात

बहू चांगले नाम या राघवाचे । अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ॥
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे । जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ॥

रामाचे नाव घेतल्यास मानवास ह्या जीवनातच मोक्षप्राप्ती होते.

चु. भू. द्या. घ्या.


Sanghamitra
Tuesday, February 28, 2006 - 11:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयूर, देवदत्त, जया, बापू, गिरी, चिन्नू तुम्हाला कविता आवडली हे वाचून छान वाटलं. कवीला अजून काय हवं? धन्यवाद.
बापू
स्वशोधाची इच्छा संपली. संपली म्हणजे त्यावेळी जे काहीतरी भव्यदिव्य करण्याचं स्वप्न होतं त्यातला फोलपणा आणि स्वतःची कुवत दोन्ही अनुभवाबरोबर कळत गेलं.
पण तरीही ज्या काही रक्तात टिकून राहिलेल्या जाणिवा आहेत त्या अजून संपलेल्या नाहीत आणि अधूनमधून ती ऊर्मी येत रहाते.
असं आहे साधारण.


Meenu
Wednesday, March 01, 2006 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रणरणत्या उन्हात तापलेला हा एक रस्ता
त्यावरुन अखंड वाहणारा एक प्रवाह
वाहनांचा, माणसांचा...........
मीही याच प्रवाहातला एक ठिपका
अशावेळी अचानक खूप विचार करुन ठरवलेली सारी ध्येयं
वाटु लागतात निरर्थक
कृतीही सार्‍या अर्थशुन्य............
तरीही वाहत राहण्याचा शाप आहे ह्या प्रवाहाला
अधुनमधुन ते उभे आहेत तपस्वी...
आपला हिरवा फुलोरा आणि विविध रंगी बहर तोलत
त्यांनाही कधी वाटत असेल त्यांची ही तपश्चर्या निरर्थक
वाटत असेल का त्यांनाही निश्चलता शाप....


Amrutabh
Wednesday, March 01, 2006 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्रु.....

आज काय झालय? भिकरणीला कळेना,
तिच छकुल काही केल्या रडेना...

चिमटे काढले आणि ओढले ओरखडे,
छकुल्याच्या डोळ्यातून थेंब ना गळे...

जगाची रीत तिला ठाऊक होती,
अश्रुविना भिकेला किम्मत नव्हती...

रात्रीची उपासमार डोळ्यात दिसेना,
रिकामी झोळी स्वस्थ बसू देइना...

नन्तर स्वत:च तिने हात पुढे केला,
भीक मागत फ़िरली सार्‍या स्टेशनात...

बर्‍याच वेळानन्तरही झोळी रिकामी होती,
भिकेला छकुल्याच्या रडण्याची धार नव्हती...

कन्टाळुन शेवटी वळली छकुल्याकडे,
रडण्यासाठी त्याकडे घातले साकडे...


मृत देहाला नव्हती कसलीच चाहुल,
रात्रीच्या भुकेने मिटवली जन्माची भुक...

कळताच सर्व भिकरीण हबरली,
फ़ोडता टाहो करुणाही बिथरली...

आज तिच्या वेदनेची सीमाच सरली,
अश्रु आणि पैशानी झोळी मात्र भरली...

त्याचे कोरडे डोळेही कमाई करुन गेले,
आईला मात्र आपले अश्रु देऊन गेले...




Ameyadeshpande
Wednesday, March 01, 2006 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aho Moderator tya "faalgun" la varti gheta yeil ka?

Moderator_2
Wednesday, March 01, 2006 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

DONE

Sarang23
Wednesday, March 01, 2006 - 10:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्रु!!!            

Vaishali_hinge
Thursday, March 02, 2006 - 2:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

amrutabh karun ras ! aavadala

Shyamli
Thursday, March 02, 2006 - 2:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनाचा ठाव घेणारे भाव आहेत यात
सुन्दर लिहीलयत हो


Ninavi
Thursday, March 02, 2006 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे! अमृता, चांगलं लिहीलयस गं. कसंसंच झालं वाचून.

Amrutabh
Thursday, March 02, 2006 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या समोर झालेली हि सत्य कथा आहे....मी तर दोन दिवस झोपुच शकले नाही.

Sanghamitra
Friday, March 03, 2006 - 2:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता कविता चांगली आहे. शेवटच्या दोन ओळी खूपच touching आहेत.

Prem869
Friday, March 03, 2006 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु कविता खुप सुन्दर आहे!
अम्रुता अप्रतिम कविता! अभिप्रायसाठि शब्दहि तोकडे पडतात!


Heartwork
Friday, March 03, 2006 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु, अम्रुता सुन्दर कविता....

Vaibhav_joshi
Friday, March 03, 2006 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता ... मस्त आहे कविता ... सुंदर लिहीलंयस

Jayavi
Friday, March 03, 2006 - 8:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता, काय गं....... डोळ्यात पाणी आणलंस गं ! ढवळून निघालं सगळं.... फ़ारच touching !!

मीनू, मस्त !!


Menikhil
Friday, March 03, 2006 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता खुप करुण कविता आहे!

मृत देहाला नव्हती कसलीच चाहुल,
रात्रीच्या भुकेने मिटवली जन्माची भुक...

वा!


Pama
Friday, March 03, 2006 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता.. सुरेख!!
मीनू, आवडली.


Diiptie
Friday, March 03, 2006 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संवेदनांचे अनेक रंग बदलणारी
माझी कातडी

शक्य तितकी वस्त्रात गुंडाळून
आणि चेहर्‍याला थोडंस लेपून
निर्विकार्पणाचं बाजारु तेज
अगदी सकाळीच बाहेर पडते मी
तशाच माणसात मिसळायला

तशाच कातडीची असली तरी
एख़ादी पुरुशी कातडी
हेतुत्: लगट करताना
मी माझ्यातल्या स्त्री ला मारत असते
किंवा समजावते तडफ़ड्णार्‍या
नाजूक जाणिवांना
आपल्या समजुतीतच आहे काही चुक

किंवा कधी अगदीच असहाय्पणे
वात पाहत राहते प्रवास सपण्याची
माझा त्याचा... किंवा
त्या तळमळीचा

संपायचा तिथं आणि तेव्हाच संपतो प्रवास
मग पुन्हा पर्सच्या कप्प्यांमधे
मावलेले सगळे फ़िकट रग
मी हलकेच फ़िरवते तोंडावर

लवलवणार्‍या गर्दीतून वाट काढताना
आग्रही काही मागणारे
केवीलवाणे डोळे आणि चिमणे स्पर्श
मी कधीच आठवत नाही
प्रेम आणि सौंदर्याने
लुकलुकणार्‍या डोळ्यांपुढे
'मिस' म्हणून उभं राहताना

नको असणारे नको वाटणारे
ते सगळे स्पर्श पुसता पुसता
नव्या स्पर्शासाठी, तयार होताना
.. तुझ्या जवळ येताना
शहारते माझे अंग
मात्रुत्वाच्या चिरड्लेल्या जाणिवेने
नकळत झुकते मान
अटळ स्पर्शांच्या आठवणीने

माझ्या पवित्रतेचा निर्वाळा शोधता शोधता
उभा राहतो एकच प्रष्न
स्पर्शातून मनापर्यत पोहोचणारा तू...
असतोस का माझा गर्दीत वावरताना?









Diiptie
Friday, March 03, 2006 - 11:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message






khup deevasaanee maaybolit .. chaana vaatalaa sagaLyaanaa Namaskaar!

Deepstambh
Friday, March 03, 2006 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता.. सत्यकविता मनाला चटका लाऊन गेली..

Ninavi
Friday, March 03, 2006 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू, टाकत्ये गं..

शाश्वत..

हसणार कळ्या फुलणार फुले येणार ऋतू जाणार ऋतू
सजणार इथे मधुमास जरी असणार न मी असणार न तू

उठणार सख्या वाळूवरती हलकेच पुन्हा पाऊलखुणा
संकेतस्थळी अपुल्या फिरुनी लाजून कुणी भेटेल कुणा

ती तीच पुन्हा स्वप्ने सारी रमणार नव्या डोळ्यांत जुनी
त्या तश्याच विव्हल सुरांसवे शोधीत कुणा फिरणार कुणी

ती वचने, त्या आणाभाका, ते हसणे, रुसणे, सावरणे
ते मंतरलेले क्षण सारे ते बावरणे ते मोहरणे

ते तसेच सारे पुन्हा पुन्हा घडणार आपुल्या माघारी
हे शाश्वत अपुले प्रेम सख्या ह्या अशाश्वताच्या संसारी


Vaibhav_joshi
Saturday, March 04, 2006 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह! निनावी punch सॉलिड आलाय ...... नेहेमीप्रमाणेच

Dineshvs
Saturday, March 04, 2006 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावि छानच. परत एकदा लिहितो, तुझे नाव बघुन मी ईथे यायचे धाडस करतो.

Vaibhav_joshi
Saturday, March 04, 2006 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशजी मी हे पुन्हा एकदा वाचतोय म्हणून मी ही लिहायचं धाडस करतोय ...
तुमच्या म्हणण्यानुसार बाकीचे चांगल लिहीत नाहीत का ? माझं सोडून द्या , मी स्वत्:ची पात्रता तेवढी आहे असं म्हणण्याचा प्रयत्न करीत नाहीये पण बाकीच्यांच्या एकाही कवितेला अर्थ काही अर्थच नाहीये का ?

" मला तुमच्या कविता खूप आवडतात " वगैरे नक्कीच म्हणावं , पण एक त्या व्यक्तीच्या कविता सोडून इतरांच्या अगदी भितीदायकच असल्यासारखं इथे लिहीणं आवश्यक आहे का ?
कथा कादंबरी विभागात तुमच्याच वाचायला येतो , असं आम्ही उघडपणे म्हणणं योग्य ठरेल का ? तुमच्याइतकं नाही पण चांगल लिहीणारेही आपल्याच कुटुंबातले आहेत ना ?

तुम्ही कवीचं नाव निनावी नसेल तर त्याची कविता वाचतच नाही ?
आधीच ठरतं की ती कविता चांगली नाहिये ?
माझ्यामते आपल्यासारख्या मायबोलीवरच्या जाणकारांकडून सर्वच नवीन लोकांना प्रोत्साहन मिळणं आवश्यक आहे , आणि ते शक्य नसेल तर किमानपक्षी असं नाउमेद तरी करू नये अशी अपेक्षा नक्कीच आहे ..

अर्थात मी कधीच कुठल्याच वादात पडणारा माणूस नाहिये , अतिशय विनम्रतेने
मी आपल्याला हे प्रश्न विचारतोय





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators