|
Supermom
| |
| Thursday, March 02, 2006 - 3:29 pm: |
| 
|
खिडकीबाहेर रिमझिमणार्या पावसाकडे बघत वैजू अगदी शांत बसली होती. टेबलावर वेटरने आणून ठेवलेला कप तसाच होता. तिच्या चेहेर्यावर एक गोड समाधान होतं. मोठ्यामोठ्या डोळ्यात ती बाहेरचे पावसाचे कण नि हिरवागार निसर्ग साठवून घेत होती. तिच्या नकळत महेश तिचं निरीक्षण करत होता.लग्नाला दहा वर्षं झाली तरी अजून तशीच दिसते ही. त्याला वाटून गेलं. दोन मुलं झाल्यानंतर पूर्वीचा सडपातळपणा राहिला नव्हता. पण चेहेर्यावरचा गोडवा नि तेज तसंच होतं.उलट लग्नानंतर काही वर्षातच बदललेल्या सांपत्तिक स्थितीने तिच्या मूळच्या सौंदर्याला एक झळाळी चढली होती. अंगावरची फ़िकट गुलाबी साडी नि केसातला मोगर्याचा गजरा या सार्यात विलक्षण लोभस दिसत होती ती. तिला या हॉटेलमधे आणल्याबद्दल महेशला खूप बरं वाटलं. तिचं हिरव्यागार वनराईचं वेड त्याला माहीत होतं. अन कितीतरी दिवसांनी दोघांना असा मोकळेपणा मिळाला होता.मुलं शाळेत अन त्यालाही विशेष काम नव्हतं.खूप गप्पा झाल्या होत्या आज. तो आपल्याकडेच पहातोय हे लक्षात येऊन ती हलकेच हसली. अन अचानक त्याला काल ऑफ़िसमधे आलेल्या फ़ोनची आठवण झाली. मनातल्या मनात तो थोडा खट्टू झाला.तिचा इतका छान मूड घालवायच्या कल्पनेनं त्याला अपराधी वाटू लागलं. पण घरी गेल्यावर मुलांच्या गडबडीत सांगितलं तर तिची समजूत घालायला वेळ मिळायचा नाही हे तो जाणून होता. आत्ताच सांगायला हवं होतं. 'वैजू, अप्पा येणार आहेत उद्या.महिन्याभरासाठी.' तिच्या चेहेर्यावरचे झरझर बदलणारे भाव पाहून त्याला अधिकच अपराधी वाटू लागलं. पण क्षणभरातच तिनं स्वतला सावरलं. ही तिची आणखी एक खासियत होती.मनातली वादळं मनातच ठेवायची. 'फ़ोन आला होता का?बोलला नाहीस.' त्यानं उत्तर दिलं नाही. त्याच्या डोळ्यातले अपराधी भाव अधिकच गडद झाले.ते पाहून तिलाही त्याची कीव आली. 'बायको नि वडील यांच्या मधे बिचार्याची चांगलीच कात्रीत सापडल्यासारखी अवस्था होते.' तिला वाटून गेलं. कॉफ़ी घेऊन दोघं बाहेर पडले खरे, पण तिचं विचारविश्व अगदी ढवळून निघालं होतं. का येताहेत अप्पा इतक्या वर्षांनी?तेही नावडत्या सुनेकडे? महेश अन वैजूचा काही प्रेमविवाह नव्हता. अगदी रीतसर पाहून,ठरवून झालेलं लग्न. देखण्या रूपाची,शिकलीसवरलेली वैजू महेशला पहिल्या नजरेतच भावून गेली होती.पण तिच्या माहेरची साधारण परिस्थिती अप्पांच्या हिशोबी नजरेतून सुटली नव्हती. बोलणी करायला आलेल्या वैजूच्या वडिलांना त्यांनी केलेल्या मागण्या परवडणार्या नव्हत्या. अन अप्पा अडून बसले होते. कधीही त्यांच्या समोर ब्र न उच्चारणार्या महेशने मात्र लग्न करीन तर हिच्याशीच असा पवित्रा घेतला,अन नाईलाजानेच त्यांनी सून म्हणून वैजूला घरात घेतलं. पण वैजू सतत त्यांची नावडतीच सून राहिली.ती बिचारी धावून धावून त्यांचं सगळं करीत असे,पण त्यांचं मन ती कधीच जिंकू शकली नाही. तसे अप्पा अतिशय धूर्त नि धोरणी होते. आपल्या मनातली नावड त्यांनी महेशला कधी दिसू दिली नाही, अन वैजूच्या समोर मात्र तिला आपली नाराजी दाखवून द्यायची एकही संधी त्यांनी कधी सोडली नाही.
|
Prajaktad
| |
| Thursday, March 02, 2006 - 4:00 pm: |
| 
|
कथा रंगणार तर! supermom लिहि आता पट्पट...
|
Supermom
| |
| Thursday, March 02, 2006 - 6:56 pm: |
| 
|
भूतकाळातल्या एकेक घटना तिला आठवू लागल्या नि मनात प्रचंड आक्रोश भरून आला. लग्नानंतर काही दिवसातलीच गोष्ट. महेश ऑफ़िसमधून यायचाच होता.बेल वाजली म्हणून तिने दार उघडले.दारात माळी उभा होता.दिवाणखान्यात बसलेल्या अप्पांना त्याने सलाम केला. वैजयन्ती, माझ्या कपाटात समोर ठेवलेलं पुडकं आण जरा.' अप्पांनी सांगितलं. लगबगीने जाऊन ती घेऊन आली. 'ही घे लग्नाची बक्षिसी भिवा.' वैजयन्ती अप्पांनी पुडक्यातून काढलेल्या कपड्याकडे बघतच राहिली.तिच्या माहेरून त्यांना आलेलं कापड होतं ते. भिवा ते घेऊन निघूनही गेला तरी ती भानावर आलीच नव्हती. डोळ्यातलं पाणी पुसत ती आत जायला वळली. अप्पा मात्र निर्विकारपणे टी व्ही बघत होते. रात्री महेशनं तिला तिच्या गप्प राहण्याचं कारण विचारलं,अन तिला रडूच कोसळलं.त्याच्या कुशीत शिरून ती हमसून हमसून रडली.पण कारण कळल्यावर महेशनं उलट तिचीच समजूत घातली. 'वैजू,अग,अप्पांना नसेल लक्षात आलं ते तुमच्याकडचं कापड असल्याचं.' वैजूला त्याचा खुलासा काही केल्या पटला नव्हता. लग्न झाल्यावर दुसर्याच दिवशी तिनं अप्पांना सार्या अहेर अन कापडचोपडाची यादी करताना पाहिलं होतं. त्या सार्या कापडातून नेमका हाच कपडा कसा दिल्या गेला भिवाला?तिच्या मनात आलं. त्यानंतर अनेकदा असे प्रसंग घडले.वैजूला तिच्या घरातल्या स्थानाची जाणीव करून देणारे. पण महेशला काहीही सांगितलं की तो तिची समजूत घालत असे.एकदा तर कातर होऊन त्यानं तिला सांगितलं होतं, 'वैजू, आई गेली तेव्हा मी फ़ार लहान होतो. तिच्या माघारी लाडाकोडात वाढवलं त्यांनी मला. आईची उणीव नाही भासू दिली ग कधी. त्यांना दुखवण नाही जमायचं मला.' नंतर नंतर वैजूनं तक्रार करणंही सोडून दिलं. अन तसं म्हटलं तर तिच्या तक्रारीवर तिच्या माहेरच्यांनी सुद्धा विश्वास नसता ठेवला.एकदा तिनं आईजवळ माहेरी हा विषय काढूनही पाहिला होता. पण आईनं तिचीच समजूत घातली होती. 'वैजूबेटा, तुला काय कमी आहे? घर,दार प्रेमळ नवरा,दारात गाडी,नोकरचाकर. अग,हळूहळू जिंकशील त्यांचं मन तू. जुनं हाड आहे बेटा ते. एक लक्षात ठेव,जुनी खोडं नसतात वाकत.लहानग्या रोपट्यानंच वाकायचं असतं बरं बाळ.'
|
Supermom
| |
| Thursday, March 02, 2006 - 7:08 pm: |
| 
|
मॉड,मला शीर्षक मराठीत कसं द्यायचं ते सांगाल का प्लीज?
|
Seema_
| |
| Thursday, March 02, 2006 - 7:25 pm: |
| 
|
supermom अग नेहमीप्रमाने शीर्षकही dev2 मध्येच टाक ना .
|
एथे पण तेच रोज रोज taasaalaa check करते मी.. तरी कमाल आहे supermom तुझी एवढा वेळ कसा काढते ग?
|
Supermom
| |
| Saturday, March 04, 2006 - 11:49 am: |
| 
|
रात्र बरीच झाली होती.विचारांच्या आवर्तनात भिरभिरणार्या वैजूचा रुसलेल्या झोपेला पकडून ठेवायचा प्रयत्न चालला होता. लग्नाला दोन तीन वर्षं उलटून गेल्यावर महेशच्याही लक्षात अप्पांचं वागणं हळूहळू येऊ लागलं. पण तो नेहेमी वैजूचीच समजूत घालत असे. मोठ्यांचा अपमान करायचा वैजूचा स्वभाव नव्ह्ताच.मनातला क्षोभ मनातच ठेवून तिनं आदर्श पत्नी,सून,माता सार्याच भूमिका मनापासून पार पाडण्यात स्वतःला गुंतवून घेतलं.महेशबद्दल तिची काही तक्रार नव्हतीच.तो अगदी फ़ुलासारखा तिला जपत असे.जय आणि ईशाच्या जन्मानंतर तर ती आजूबाजूचं सारंकाही जणू विसरूनच गेली. अप्पांच्या स्वभावातला ताठा मात्र तसाच राहिला. अन संघर्षाची ठिणगी टाकणारा तो प्रसंग एक दिवस घडला. महेशला दुसया शहरात उत्तम नोकरीची संधी आली होती.पगार,पद सारंच खूपच छान होतं. आनन्दाने पेढे घेऊनच तो घरी आला. पण अप्पांचा चेहरा मात्र गंभीर होता. 'दुसरीकडे जायची काय गरज आहे महेश? इथे बंगला गाडी सारंच आहे आपलं. ते सोडून तू भाड्याच्या घरात कशासाठी रहायचा विचार करतो आहेस?' 'अप्पा,पण गाडी तेही देणार आहेत आपल्याला. खूप मोठी संधी आहे माझ्या करियरच्या दृष्टीने. अन आपण सारेच जाऊया.घर बंद ठेवता येईल.तुम्हालाही बदल होईल थोडासा.' 'मला बदलाची काहीही गरज नाही महेश. ज्यांना आहे त्यांनी जावं.' वैजूकडे अप्पांनी एक जळजळीत कटाक्ष टाकला. वैजू चमकली. आपण महेशला वेगळं काढतोय हे अप्पांच मत झालय हे तिला समजून चुकलं. काय बोलावे हे न कळल्यामुळे ती गप्पच राहिली. 'अप्पा,'महेश शांत सुरात म्हणाला. 'आजवर मी कधी तुमचं म्हणणं टाळलं नाही. पण माझ्या लेखी ही फ़ार मोठी संधी आहे. हे होईपर्यंत मी वैजूला सुद्धा बोललो नव्हतो.मला मनापासून वाटतय इथे जावसं. तुम्हीही या.सारेच बरोबर राहू.' वैजूला खूप बरं वाटलं. अप्रत्यक्षपणे का होईना महेशने तिची बाजू घेतली होती. यात तिचा काहीही दोष नाही हेही त्यानं बोलून दाखवलं होतं. 'निर्णय तू घेतलाच आहेस तर तुम्ही सारे जायला मोकळे आहात.मी इथेच राहाणार. हा विषय माझ्या दृष्टीनं संपला आहे.' अप्पा उठून गेले.वैजूच्या डोळ्यात पाणी साचतय हे बघून महेशनं हलकेच तिच्या पाठीवर थोपटलं. सामान बांधून सारे निघाले तसं वैजू महेश अप्पांच्या पायाशी वाकले.कोरड्या सुरात त्यांनी आशिर्वाद दिला. नातवंडांकडे एकदा बघून ते आत निघून गेले. गाडीतही वैजू अस्वस्थच होती. नव्या जागी सारे लवकरच रुळले. अप्पांनी मात्र या नंतर वैजूशी बोलणंच टाकलं.फ़ोनवर ते महेशशी बोलत. पण नव्या घरी ते आलेच नाहीत.दिवाळीला वैजू महेश जाणार होते तर सध्या येऊ नका.मी इथे नाही अस कळवून अप्पा मोकळे झाले. इतक्या वर्षांचा वैजूचाही संयम सुटला.ती देखील गावी जाईनाशी झाली.महेश एकदा जाऊन आला. पण सुनेनं मुलाला वेगळं काढलं ही अप्पांच्या मनातली गाठ घट्टच राहिली. अन आज इतक्या दिवसांनी का येताहेत अप्पा?' विचार करून वैजूचं डोकं शिणून गेलं. बर्याच उशिरा तिला झोप लागली.
|
पर आपा मानुस काई वाईट वाटत न्हाही... पुर्वीची मान्स आशीच की. एकाद्दुसर नातवंड जाहाल की येत्याल नरम. कस म्हंता? त्यवड तुमी सांगावा धाडा तेना.
|
Abhijat
| |
| Tuesday, March 07, 2006 - 4:15 am: |
| 
|
धोन्डोपंत, तुम्ही कहाणी नीट वाचत नाही अस दिसत. सासरेबुवा नातवंडाकडे बघून आत गेले होते सूनबाई जेन्व्हा परगावी गेल्या नव-या बरोबर तेन्व्हा!
|
अरे हो... शिंच होत अस आताशा.
|
Jayavi
| |
| Wednesday, March 08, 2006 - 9:15 am: |
| 
|
वॉव ! मस्त वेग घेतलाय कथेनं, लवकर लिही ना गं पुढचं
|
Meenu
| |
| Friday, March 10, 2006 - 2:43 am: |
| 
|
supermom पुढचं कधी लिहीणार...वाट बघतेय...
|
Moodi
| |
| Friday, March 10, 2006 - 7:02 am: |
| 
|
अग sm त्या वैजुला उठव की आता झोपेतुन. जणु लेडी कुंभकर्ण!! आठवडा पुर्ण व्हायला आला तिला झोपुन आता.. 
|
झोपेच्या गोळ्या घेतल्या असतील वैजुने Moodi तो आप्पांचा विचार नको म्हणून
|
Moodi
| |
| Monday, March 13, 2006 - 8:00 am: |
| 
|
अग sm मनु म्हणतीय ते खरे का?की अप्पांना रीझर्व्हेशन नाही मिळाले गाडीचे? तिकीट कन्फर्म कर एकदा लवकर त्यांचे. 
|
Amrutabh
| |
| Tuesday, March 14, 2006 - 5:10 am: |
| 
|
ही supermom अजुन कशी उठली नाही.... अग लिही ना भराभर...
|
Megha16
| |
| Wednesday, March 15, 2006 - 11:53 am: |
| 
|
अग sm कुठे गेलीस ग?
|
Supermom
| |
| Wednesday, March 15, 2006 - 2:52 pm: |
| 
|
मंडळी,माझी तब्येत सध्या बरी नाही. त्यामुळे सध्या मायबोलीवर येणे होत नाही.बरे वाटले की नक्कीच कथा संपवीन.
|
Megha16
| |
| Wednesday, March 15, 2006 - 4:05 pm: |
| 
|
sp काळ्जी घे बरी झाली की मह पुढची कथा. इथे सगळ्याना वाटल की तु कथा विसरुन च गेली. बर वाटल की मग लिही.
|
Moodi
| |
| Wednesday, March 15, 2006 - 5:35 pm: |
| 
|
SM काळजी घे अन मग बरी झालीस की निवांतपणे लिही ग. लिहीतेस अगदी सुरेख त्यामुळे सगळे मागे लागतात लवकर लिही म्हणुन. 
|
Charu_ag
| |
| Thursday, March 23, 2006 - 7:31 am: |
| 
|
SM , कथेची सुरुवात छान आहे ग. खुप उत्सुकता वाटते आहे. बरी झालीस की आधी कथा पुरी कर. काळजी घे.
|
|
|