Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
ईनकमिंग फ़्रि ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » कथा कादंबरी » ईनकमिंग फ़्रि « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 02, 200625 03-02-06  11:48 pm

Sashal
Friday, March 03, 2006 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश मलाही माफ़ करा पण मलाही गोष्टीचा शेवट पटला नाही .. अतिशय उत्क्^ऋष्ट लिहीली आहे गोष्ट .. फ़क्त शेवट खटकला .. तुमचं आर्च ला उद्देशून लिहीलेलं पोस्ट वाचल्यावरच उलगडा झाला की तो मुलगा आत्महत्या करतो .. मला आधी वाटलं की त्या मावशी थोडं lecture दिल्यासारखं बोलतात म्हणून cut करतो तो phone .. आणि मग यामुळे त्या मुलाचं character नीट clear झालं नाही असं वाटलं ..

पण तुम्ही छान लिहीली आहे गोष्ट ..


Rupali_rahul
Friday, March 03, 2006 - 1:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केवळ अप्रतिम. कदाचित हा शब्दही अपुरा पडेल...

Ankulkarni
Friday, March 03, 2006 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश

खरच खुप अप्रतिम लिहिलि आहे कथा.
पण माफ़ करा शेवट कुठेतरी खटकतो............कथा अधुरी वाटली

अस्मिता


Dineshvs
Friday, March 03, 2006 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यानी ईतका विचार केला, ते वाचुन छान वाटलं.
मी त्याच्या आत्महत्येची शक्यता दाखवली आहे. ( त्याचे त्याच्या बाबांसाठी औषधे आणणे, मावशीला झोप आलीय का ते विचारणे, चुट्पुट लागुन राहिली असती असे म्हणणे वैगरे ) पण नेमका शेवट काय असावा ते वाचकावर सोपवले आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाने शेवटाला नेणे मला पटत नाही. वाचकाचा पण सहभाग असायलाच पाहिजे.
ईथे ती कथा त्या बाईपेक्षा मुलाची जास्त आहे. या वयातली अशी मुले मी खुप बघतो. एवढ्या तेवढ्याने निराश होणारी, ऊमेद हरवुन बसलेली, स्पर्धेत मागे पडली तर सर्व संपले असे मानणारी अशी असतात ती.
या विरुद्ध मावशी, त्याच्यापेक्षाहि तीव्र धक्के पचवले आहेत तिने. त्या पिढीत सारासार विचार करण्याची क्षमता जास्त होती.
मला ईथे एका पिढीला दोषी नाही ठरवायचे. दोष असला तर तो परिस्थितीचा आहे. आजकालचे ताणतणाव खरेच असह्य झालेत.
या पिढीतली मुले, आधार शोधायचे कष्टहि घेत नाहीत. अशी शक्यताच त्यांच्या लक्षात येत नाही. खरे तर आज अशी मदत मिळु शकते. सहज मिळत नसली तरी मिळु शकते हे मह्त्वाचे. पुर्वी एकत्र कुटुंबात अशी मदत मिळत असते, आता ती बाहेरुन मिळवावी लागते.
आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या एका मित्राच्या आत्महत्येला, एक वर्ष झाल्याचे निमित्त होतेच.


Anilbhai
Friday, March 03, 2006 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला जरा वेगळा वाटला शेवट.
त्या मुलीशी जोपर्यंत संबंध होते तोपर्यन्त तो तिच्या आईशी संबन्ध ठेवुन होता. तिचा संबंध तुटला. मग आता काय गरज म्हणुन त्याने तिच्या आईशीशी सम्बंध तोडुन टाकला. त्या आईच्या दृष्टीने तोही शेवटी स्वार्थी निघाला. आत्महत्या वगैरे काही नाही वाटल. मला ही कथा त्याच्या पेक्शा त्या आईची जास्त वाटली. सर्व काही हरवुन बसलेली. कुठेतरी आधार शोधणारी.
' तुम बेसहारा हो तो
किसीका सहारा बनो '
हे गाण सहज म्हणुन आठवल


Dineshvs
Friday, March 03, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई, असे वाटतेय का ?
पण पहिला फ़ोन करण्यापुर्वीच त्या मुलीशी संबंध तुटले होते.
त्याला मावशीच्या प्रेमाची खात्री वाटली नसेल किंवा परत कुणावर विश्वास ठेवावासा त्याला वाटले नसेल, असे माझ्या मनात होते.
पण मी वर लिहिल्याप्रमाणे, सगळ्याना काय वाटले, तेहि तितकेच महत्वाचे आहे.
माझ्यासारख्या मधल्या वयाच्या माणसाना, या पिढिला समजुन घेणे खुप कठिण वाटतेय, हे मात्र खरे.


Moodi
Friday, March 03, 2006 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिलभाई पटल हे वाक्य. माझ्या माहेरी ज्यानी मला लहानपणापासुन वाढवल त्या काकु आज ८० वर्षाच्या आहेत. त्यांचा ब्लॉक तळमजल्याला अन आमचा पहिल्या मजल्यावर. त्या नेहेमी घराचे दार उघडेच ठेवतात अन येणारे जाणारे पण क्षणभर टेकतात. त्याना मुल होवुन गेली, बहिणीच्या मुलाना सांभाळले, आता तीच बहिण त्यांच्याबरोबर रहाते, त्यांचे पण यजमान गेलेत. माझी आई अन शेजारी तर सतत असतात जाऊन येऊन.
नाते हे रक्ताचे नसले तरी काय झाले मनाचे तर असावे सहारा द्यायला.


Moodi
Friday, March 03, 2006 - 11:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश आजकाल नवीन पिढीशी नाही जमवता येत हे खरे आहे. त्यातल्या त्यात पण बी, लिंब्या, चंपक, फ, दीप अन माणुस सारखी मुले पाहिल्यावर वाटते की कुठेतरी आशेचा किरण आहे.

Ninavi
Friday, March 03, 2006 - 11:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आत्महत्येची शक्यता काही माझ्या ध्यानात आली नाही. आणि फसवणूकीचाही ' जीन' असू शकेल हे पटायला अवघड वाटलं. बाकी सरसकट असं कुठल्याच पिढीविषयी मतप्रदर्शन करणं मला योग्य वाटत नाही. ' देवदास' किती साली लिहीली शरत्चंद्रांनी? मग आजचीच तरूण पिढी लगेच निराश होते असं कसं म्हणता येईल? हा वयाचा आणि मग वैयक्तिक जडणघडणीचा भाग असतो असं मला वाटतं.

Rachana_barve
Friday, March 03, 2006 - 11:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण तेच वाटल की आजींच्या बोलण्यात किशोरीचा उल्लेख झाल्यावर त्यानी त्यांच्याबरोबर संबंध तोडून टाकले. आत्महत्या करतो हे आर्चच्या पोस्टनंतरच कळले.

Sashal
Friday, March 03, 2006 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी चं म्हणणं पटलं .. इथे v & c होइल आता कदाचित पण वय आणि वैयक्तिक जडणघडणीबरोबरच कोण कुठल्या परिस्थितीतून जातो यावरही अवलंबून असावं ..

Dineshvs
Friday, March 03, 2006 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशा आहे मूडि, म्हणुनच त्याना जपायचे, सावरायचे. आणि ते काम आपण करायचे. पण यांची संख्या मोजकि आहे. निनावि,देवदासला आम्ही तेंव्हाहि हसलो होतो. दिलिपकुमारचा देवदास तर कधी एकदा संपतोय असे वाटत होते.
पण नंतर बर्‍याच काळात काहि आशावादी झाले नाही. खास करुन आणीबाणी नंतर आणि जनता पक्षाच्या र्‍हासानंतर तर सगळ्या समाजालाच मरगळ आल्यासारखे वाटतेय. सगळ्यांचे मनोबल खचल्यासारखे वाटतेय. वयस्कर माणसे काहि सांगु बघतात, तर त्यांचे कोणी ऐकत नाही.

रचना,
किशोरीचा उल्लेख त्याने स्वत : हुन केलाय. शिवाय त्याचे खरे नावहि त्याने सांगितलेले नाही. किशोर हे किशोरीबरोबर जुळण्यासाठी फ़क्त.

आणि करु या कि चर्चा यावर. फ़क्त मी दोन तीन दिवस ईथे नाही, आता.


Lalu
Friday, March 03, 2006 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर ' महोब्बतें ' मधे SRK येतो बच्चन साठी परत तसं वाटलं होतं. DJ ने गोष्ट वाचली नाही का? :-) ते आत्महत्येचं मलाही कळलं नव्हतं.

Milindaa
Friday, March 03, 2006 - 12:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि अशा रितीने कथा रसग्रहणाचा नवीन बीबी उघडावा लागणार असे दिसते आहे.. It's their mobile anyway.. when it comes to free call :-)

ही प्रथा चालू करण्याचा मान श्रध्दाकडे जतो आहे :-)


Yog
Friday, March 03, 2006 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नविन bb काहीही काय...?हुसैनचा हैदोस bb कशासाठी आहे?
नविन bb काढलास तर नाव ठेव " कथा रसवन्ती गृह " with small font: चोथा ताजा मिळेल!
दिनेश, माफ़ कर! शेवट पुन्हा एकदा वाचतो, बघतो काही चर्चात्मक सुचतय का.. :-)
~d

Avdhut
Friday, March 03, 2006 - 9:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहमी प्रमाने अप्रतिम. आजच्या पिढीवर जेवढा sucessful होन्याचा दबाब आहे व sucess ची रेखा जितकी उंचावली आहे ती या आधी कधीच नव्हती.

Milindaa
Monday, March 06, 2006 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एवढं सगळं चर्वण करण्यापेक्षा त्या " नैना " ना बोलावलं असतं तर सगळं नीट कळलं असतं... काय ? :-)

Moodi
Monday, March 06, 2006 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या नैना बाई कोण बरे?

Chafa
Monday, March 06, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी प्रतिक्रिया काहीशी निनावीसारखीच आहे. हे सगळं एखाद्या ' पीढी'कडे बोट दाखवून म्हणता येणार नाही. हा भाग त्या व्यक्तीच्या वैयक्तिक (individual ) जडणघडणीवर आणि भावविश्वावर अवलंबून असतो. आत्महत्या करणे हे ( त्या व्यक्तिच्या ) मानसिक दुर्बळपणाचे द्योतक आहे असे मला वाटते. दिनेश, तुमच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण मला जे वाटते ते स्पष्ट लिहील्याबद्दल माफ करा.

Dineshvs
Tuesday, March 07, 2006 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा, या कथेला विशालच्या आत्महत्येचा सल आहे हे खरं पण तु मत मांडल्याने काहि तो सल वाढणार नाही रे.
तसा आत्महत्या पण या कथेचा थेट विषय नाही. ती फ़क्त एक शक्यता होती ईतकच. तुमच्यापैकी कुणाला ते जाणवली नाही, हे तर माझ्यासाठी सुखनिधान आहे. पण नैराश्य आलेल्या व्यक्तीमधे आत्महत्या करण्यापुर्वी काहि बदल वा लक्षणे दिसुन येतात, दुर्दैवाने आसपासच्या व्यक्तीना त्याचे गांभीर्य लक्षात येत नाही आणि मग " खरेच तो असा करेल असे वाटले नव्हते " अशी हळहळ करण्या व्यतिरिक्त हातात काहि ऊरत नाही.
आज ही गंभीर समस्या आहे. जगात दर तासाला ८० व वर्षाला ७,००,००० आत्महत्या होतात. अमेरिकेत मृत्युच्या कारणांत आत्महत्येचा क्रमांक ११ वा होता. ( २००२ साली )
एखाध्या पिढीवर सरसकट आरोप नाही करत मी, पण मला, म्हणजेच सध्या चाळीशी पार असलेल्या माणसाला जी लक्षणे आढळतात ती अशी.
१. देश म्हणुन कुठलीच भावना नाही.
२. देशाचे म्हणुन कुठलेहि धेय नाही.
३. सारासार विचार करण्याची क्षमता नाही.
४.केवळ आपल्यापुरता विचार.
५. संयम अजिबात नाही, कुठल्याच गोष्टीसाठी रुढ मार्गापेक्षा, शॉर्ट कट शोधण्याकडे कल.
६.कुटुंब व्यवस्था ढासळल्यामुळे, पहिल्या वहिल्या प्रेमातच सगळे शोधण्याची प्रवृत्ती. आणि खर्‍या प्रेमाची पारख नसणे.
७.आपल्यावर जाहिरातीतुन, टिव्ही चॅनेल्समधुन कुठला मारा होतोय, तो ओळखण्याची आणि तो नाकारण्याची क्षमता नसणे.

असे बरेच मुद्दे आहेत. प्रत्येक मुद्द्यावर विस्ताराने लिहिता येईल.




Upas
Tuesday, March 07, 2006 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश कथा आवडली आणि हो पटली सुद्धा.. अस होऊ शकत..

Manuswini
Tuesday, March 07, 2006 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

genes बद्दल हे मी मान्य करते
साधारण विश्वास ठेवा किंवा नका मी हे बघितलेय आणी scientific दृष्ट्या वाचलेय
काही मुलांमधे आईची मानसिक चढण किंवा बाबांचा influence असतो

मी स्वताहा एका घरात वडिलांनी दोन लग्ने केली, ३ मुलाने २-२ लग्ने केली. आई साधे सुधी एकटिने ह्या तीन मुलांना वाढवले..
जवळपास कारणे सारखीच होती ह्या तिन्ही मुलांच्या लग्न break होयची like their father
father left for other women, kids were small, braught up by mom
anyways , so I guess genes influence must be true, the way been braught up also make a point

उर्मट ,insensitive मोठी माणसे असतिल तर मुलेही generally उर्मट पणे बोलणारी असतात


Bhagya
Tuesday, March 07, 2006 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, कथा आवडली, पटली आणि नंतरचे सगळे तुझे मुद्दे पण.
हो, असे genes असतात. आइ-वडिलांना जि गोष्ट योग्य वाटते तीच मुलांना पण योग्य वाटते. संस्कार हे पण एक कारण असेल.
आजकालच्या पीढीवर खुप ताणतणाव असतात, खर्‍या प्रेमाची पारख नसते आणि मदत मिळेल हे त्यांच्या गावी पण येत नाही.


Jayavi
Wednesday, March 08, 2006 - 9:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, फक्त संवादातून उभं केलेलं दोन पिढ्यांमधलं अतिशय सुरेख चित्रण !!

Charu_ag
Tuesday, March 14, 2006 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, गोष्ट पुन्हा एकदा वाचुन काढली. शेवट वाचकावर का सोपवला ते दुसर्‍या वाचनात समजले. शिर्षका सह कथा (की संवाद चित्र ) सुरेख आहे.

Lopamudraa
Wednesday, March 15, 2006 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, गोष्ट परत परत वाचली, अप्रतीम कुठेही क्रुत्रीम, खोटी वाटत नाही पण तीचा शेवट ठरवता येत नाही ये आणि आत्म्हत्या नक्कीच नसावा,

आता तुम्हीच पुढचा भाग लिहा आणि आमची चांगलं वाचण्याची इच्छा पुर्न करा...





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators