Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
रंग दे बसंती

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » फाल्गुन » ललित » रंग दे बसंती « Previous Next »

Chanakya
Tuesday, February 28, 2006 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रंग दे बसंती आणि नवी पिढी

Shyamli
Tuesday, February 28, 2006 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/46/103342.html?1140974173
क्रुपया ईथे बघा.. ..


Chanakya
Tuesday, February 28, 2006 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रंग दे बसंती पाहुन मी बाहेर पडलो तरी मन मात्र अजुन चित्रपटगृहातच होते. फार थोडे commertial movies असे असतात जे संपल्यानंतरही मनावर रेंगाळत रहातात आणि विचार करायला पण प्रवॄत्त करतात. रंग दे चा अनुभवही असाच मनात विचारांचे अनेक हल्लकल्लोळ माजवुन गेला. आजच्या तरूण पिढीचे प्रतिनिधित्व करणारी दिल्ली university च्या ५-६ मुलांची एक गॅन्ग. पाश्चात्यांचे अंधानुकरण करत मौजमस्ती करणारी, दारु पिउन रात्री बेरात्री भटकणारी, आई-बापाचे पैसेच नाहीत तर त्यांची चिंता, काळजी, प्रेम सर्वकाही वाऱ्यावर उधळणारी, teen age संपले पण तरिही परिपक्वता न आलेली, आयुष्यात काहीच ध्येय नसलेली अशी ती सर्व पोरे...... एक ब्रिटीश युवती येते, त्यांना भगतसिंगांवरच्या documentary वर काम करायला लावते. सुरुवातीला सर्वच बळजबरीने आल्यासारखे येतात, sue (ब्रिटीश युवती)ची चेष्टा पण करतात पण हळुहळू ते पण त्या documentary मध्ये गुंतत जातात, त्यांच्या व्यक्तीमत्वावर पण ते साकारत असलेल्या ऐतिहासिक पात्रांचा प्रभाव पडत जातो आणि ते बदलत जातात. त्यातच त्यांच्या मित्राच्या अपघाती निधनाचे तात्कालिक कारण घडते आणि मग ते आपल्यापरीने system विरुद्ध कसे उभे रहातात आणि अन्यायाविरुद्ध कसे लढतात हे सांगणारा चित्रपट म्हणजे रंग दे बसंती. ह्यातील युवकांचा लढा काहीसा वास्तववादी नसला किंवा अतार्किक असला आणि व्यावसायिक गणिते नजरेसमोर ठेवुन मूळ विषय खूप depth मध्ये हाताळला नसला तरी चित्रपटाचा जो संदेश आहे तो सुजाण प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहचतो आणि चित्रपट विचार करायला भाग पाडतो.

पण त्याहुनही मला विचारात पाडले ते माझ्या शेजारी ज्या महविद्यालयीन युवती बसल्या होत्या त्यांच्या आपापसातील संभाषणाने. संपूर्ण चित्रपटभर भगतसिंगांच्या अयुष्यातल्या ठळक घटना documentary स्वरुपात सारख्या आपल्या समोर येत रहातात. क्रांतिकारकांचे जगणे आणि त्या तरुणांच्या आत्ताचे जगणे ह्यातील anology draw करण्यासाठी ह्या दृश्यांचा चांगला वापर करुन घेतला आहे. पण जेव्हा चित्रपट त्या स्वातंत्र्यपूर्व काळात जाई, तेव्हा तेव्हा त्या तरुणींची प्रतिक्रिया असे की काय उगाच documentary दाखवुन आम्हाला bore करत आहेत मध्ये मध्ये...

खरेच हा त्यांचा स्वत:चा असा वैयक्तीक विचार होता का त्या जणु आत्ताच्या तरुणाईचे प्रातिनिधीत्व करीत होत्या? खरेच इतकी बोथट आणि संवेदनाशून्य झालीय आजची तरुण पिढी? स्वातंत्र मिळविणाऱ्यांची त्यांच्या लेखी काहीच किंमत नाही की सर्व काही न मागता मिळत आहे ह्याची मस्ती त्यांना चढलेली आहे?

आपल्या आईवडीलांच्या (६० च्या दशकातील) तरुणपिढीवर पण नेहमीच आरोप झाला की फ़ुकटात मिळालेल्या स्वातंत्र्याची त्यांना किंमत नाही. पण त्यांच्यावर असा आरोप होण्याचे मुख्य कारण जनरेशन गॅप होते. आत्तापर्यंतची कुठलीच पिढी एवढी बेजबाबदार नव्हती, की कुठल्याही दोन पिढींमध्ये विचारा-आचरांमध्ये एवढे अंतर नव्हते. आता माझ्यापेक्षा जेमतेम १० वर्षांनी लहान असलेली ही पिढी... ह्यांच्यात आणि आमच्यात एवढी गॅप? विचारात, आचारात, बोलण्यात वागण्यात.. सगळ्यातच जमिन अस्मानाचा फ़रक. निती अनितीच्या परिभाषा ही संपूर्ण वेगळ्या.... प्रत्येक दोन पिढींमध्ये प्रत्येक बाबतीत अंतर हे असणारच, दर पिढीमागे सामजिक धारणाही बदलणारच पण हा एवढा बदल?... खरेच माझ्या तरी पचनी पडत नाही. का जागतिकीकरणाचे जसे फ़ायदे झाले तसे तोटेही झाले. त्यातलाच हा एक तोटा?.... का हा तोटा नाहीच ... हे जे काही चालले आहे तेच बरोबर आहे कारण ते काळाबरोबर आहेत आणि आम्ही मात्र बुरसटलेल्या विचारांचे... भूतकाळातील आठवणी, चालीरिती, सामाजिक परिभाषा उराशी कवटाळुन बसलेलो?... मन नुसते भंजाळुन जाते ह्या विचारांनी.

निती अनिती च्या कल्पना खरेच १० वर्षात एवढ्या बदलल्या की आज जो दारु पित नाही तो बुळचट आणि नेभळट ठरतो. जो आई वडीलांचे ऐकतो तो डरपोक? ज्या मुलीला अकरावीत जाउनही एकही boy friend नाही ती college ला जायच्या लायकीचीच नाही... किंवा २-३ girl friends जर फ़िरवल्या नसतील तर तो मुलगा एकदमच चम्या... उपवास करणारे किंवा देवाला वगैरे जाणारे अत्यंत मागासलेले... ई..ई.. कुलदेवतेची पूजा how old fashioned? त्यापेक्षा नेट वर भेटलेल्या चिकण्या पोराशी चॅट करीन मी त्यावेळात.. किंवा शनिवारी मारुतीला जातोस तू? yuk त्यापेक्षा saturday evening आहे मस्त पेकी पब मध्ये जाउ, खाउ, पिऊ, रात्रभर पोरी फ़िरवु आणि ऐश करु. रस्त्याने जोरजोरात बाईक्स चालवु मग त्यामुळॆ रस्त्यावरचे लोक जीव मुठीत धरुन का चालेनात? आणि आलाच समजा एखादा लहान मुलगा आमच्या गाडीखाली तर आहेतच आमचे आई-बाप आम्हाला वाचवायला... पैसे फ़ेकले की सगळे होते इंडीयात. This country sucks big time. पहिली संधी मिळाली की मी तर बाबा states ला जाणार आहे. काय आहे काय ह्या भिक्कार देशात....नुसता भ्रष्टाचार.

ईक... आईवडीलांच्या पसंतीने लग्न शी..... मी तर सरळ - live in करणार? कोण एवढी रिस्क घेणार? तडजोड???... ती कशाशी खातात? आणि ती मी का करावी आणि कुणासाठी? मी फ़क्त माझ्यासाठी आणि माझ्याचसाठी जगते/जगतो मग माझ्या - mom and pop चा तरी प्रश्ण कुठे येतो मध्ये? आजी आजोबा तर ह्यांच्या खिजगणतीतही नसतात. कारण त्यांचे अनुभवाचे बोल अजुनच बुरसटलेले. त्यांच्या संसकारांची लक्तरे भिंतीवर टांगली आणि लोकलज्जेखातर एक दोन लक्तरे अंगावर टाकली की झाले हे बागडायला तयार. आजी -आजोबा जाउंदे ते खरेच जुन्या विचारांचे असतील पण तेंडुलकरला तुम्ही तुमचा आदर्श मानता ना मग नुसता त्याचा उदो उदो करण्यापेक्षा काहितरी शिका की त्याच्याकडून. एवढ्या कमी वयात एवढी प्रसिद्धी आणि पैसा कमावुन सुद्धा त्याचे पाय जमिनीवर आहेत कारण त्याच्यावर घरुन झालेले संस्कार. आज तो दुनियेतील सर्व ऐहिक सुख भोगतो आहे. त्याच्या कमाईला साजेशी त्याची रहाणी पण आहे पण त्याचबरोबर तो आपले संस्कार विसरला नाहीये. आजही तो गुप्तपणे भरपूर मदत गरीब मुलांच्या शिक्षणाला देत असतो. जरा निदान त्याच्याकडून तरी काही शिका.. पैसा आणि प्रसिद्धीची मस्ती चढली तर तुमचा पण विनोद कांबळी व्हायला वेळ लागणार नाही हे विसरु नका.

नाही हा शब्दच ह्या पिढीला माहीत नाही. जे मनात येईल ते आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे.. मला मिळणार नाही तर कुणालाच नाही असा प्रकार... मग त्यातुनच एकतर्फ़ी प्रेमामधुन घडणारे गुन्हे घडतात.

हे सर्व बघितल्र आजुबाजुला की खरेच मन बधीर होते.. ह्यांना वाढविण्यात ह्यांच्या आइबापांनी काय चुक केली की हे असे बेताल वागतात? अरे आलीय ना तुम्हाला आर्थिक सुबत्तता मग आपल्या अजुबाजुच्या समाजाचाही काही विचार करा.. उधळा ना तुमचे तारुण्य मनसोक्त, करा जिवाची चैन पण त्यातला निदान १ टक्का तरी सामजिक कार्याला द्या, अजुन १ टक्का जरा दानधर्म करा की.. तिथे का तुमचे हात आखडतात?. अरे दिवस अन दिवस सिनेमे पाहणे, गप्प मारणे आणि चॅट करणे ह्यात घालवता ना मग ५ मिनटे एखद्या सामजिक कामासाठी द्यायला काय हरकत आहे? मित्रांबरोबर जाताच ना पिकनिक्स ना, हुंडारायला बाहेर मग निदान ५ मिनिटे घरातल्या देवाच्या पूजेसाठी घालवा, निदान ५ मिनिटे आपल्या आईवडीलांबरोबर घालवा त्यांना तुमची काही मदत हवी आहे क बघा? असा काय फ़रक पडेल तुमच्या रोजच्या कर्यक्रमात त्या पाच मिनटांनी? जरा सांगा...

ही तरुण पिढीच नाही तर आमच्या पिढीतले काही आईवडील पण असेच वागणारे आहेत की... मुलांना गणपती स्तोत्र , रामरक्षा शिकवुन काय उपयोग आहे का? उग्गाच वेळ फ़ुकट? आम्ही नाही बाई फ़ालतु चालीरिती पाळत.. मुंज वगैरे सगळे जुनाट संस्कार झाले. काय गरज आहे त्यांची अधुनिक जगात? आम्ही नाही देवाला वगैरे जात.. देव थोडाच देवळात असतो तो तर सगळीकडे असतो.. कदाचित बरोबर असेलही तुमचे... पण हे सर्व टाळुन जो वेळ वाचवताय तो तुम्ही कश्याच्या कामी लावताय? कुणाला मदत करायला, नविन काहितरी शिकायला? किंवा कुठल्या सामाजिक उपक्रमात सहभाग घ्यायला? हा वेळ तुम्ही टि.व्ही. समोरच किंवा टाईमपास करण्यात घालवणार ना!!! जुन्या चालिरीती तुम्ही पाळत नाही कारण तुम्हाला पटत नाही का तुमची त्यासाठी कष्ट घ्यायची इच्छा नाही? तुम्ही सुधारकतेच्या पांघरुणाखाली तर लपत नाही आहात ना?

जुने ते सर्वच चांगले आणि सर्वच गोंजारत बसले पाहिजे असा काही आग्रह नाही पण केवळ तुमचा आळशीपणा आड येतोय म्हणुन सुधारकतेचा बुरखा पांघरणे बरे नव्हे... कारण एकदा ती सवय लागली की ती लागतच जाते आणि वाढतच जाते आणि तीच आपल्या मुलांतही उतरते मग आज आपला मौजीबंधनावर विश्वास नाही उद्या आपल्या मुलांचा लग्नसंस्थेवरचा विश्वास उडेल... सुधारकतेचा आव आणुन आपण काय आदर्श मुलांसमोर ठेवतो? नविन काही चांगल्या गोष्टी आपण अंगी बाळगतो का? तुम्ही आहात ना अधुनिक मग किती जण आपले मुलांचे वाढदिवस पाश्चात्यांप्रमाणे केक कापुन आणि मॅकमध्ये जाउन साजरे करण्यापेक्षा एखाद्या अनाथाश्रमात जाउन साजरे करतात? आहात तुम्ही आधुनिक मग किती जण मूल दत्तक घ्यायचे धाडस दाखवितात जी आपली मागची पिढी नाही दाखवु शकली? आपण आपल्या मुलांना 'अहं' सोडुन पण जगायला शिकवतो का? की २१व्या शतकातील म्हणुन त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याची मुभा त्यांना देतो? संस्कार संस्कार म्हणून जे आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिले ते जुनाट ठरवुन... चंगळवादी, भोगवादी संस्क्रृतीच आपण का अंगिकारली आहे? पाश्चात्यांची चंगळवादी वृत्ती तेवढी आपण घेतली पण त्यांची शिस्त, सामजिक नियम पाळणे, दुसऱ्याला त्रास होईल असे सामजिक वर्तन टाळणे हे सर्व सोयिस्कर विसरलो. का? कारण त्यासाठी प्रयत्नपूर्वक कष्ट घ्यावे लागतील ना!!!असे जर असेल तर आपले पुरोगामी विचार खरेच पुरोगामी आहेत का आपण एक ढॊंग करत आहोत आणि जगालाच नाही तर स्वत:च्या मनालाही फ़सवत आहोत. ह्या सर्वांचा विचार आमच्या पिढीतील प्रत्येकाने करावा अशी आजची गरज बनली आहे... नाहीतर आपली मुले आपल्या हाताबाहेर कधी गेली हे कळणार पण नाही किंवा कळेल तेव्हा फार वेळ गेलेली असेल...

जागतिकीकरणामुळे अचानक समाजातल्या काही ठराविक लोकांचे उत्पन्न प्रचंड वाढले आणि बघता बघता त्यांच्या शेजाऱ्यांप्रमाणे गरीब मधमवर्गीय उच्चभ्रू गटात गेले. समाजातली आर्थिक दरी कधी नव्हे एवढी रुंदावत आहे.. मग ह्या आर्थिक द्रुष्ट्या खालच्या वर्गाने काय पाप केलेय म्हणून तुम्ही असे वारेमाप पैसा उधळताय आणि त्यांना सर्व सुखे नजरेसमोर दिसत आहेत पन उपभोगता येत नाहीयेत? का कारण ते तुमच्यापेक्षा कमी किंवा थोड्या वेगळ्या field मध्ये आहेत म्हणून? एक घडलेला किस्स सांगतो.. एकदा रिक्शाने ऑफ़िसला जात होतो. तेवढ्यात मोबाईलवर कॉल आला आणि बोलायला लागलो तर रिक्शावाला भडकला तो म्हणला साहेब फोनवर बोलायचे असेल तर खाली उतरा मला चालवायला disturb होते. मी अवाक झालो आणि उखडलोही म्हनले संबंध काय मी फोनवर बोलण्याचा आणि तूझ्या चालविण्याचा.. तो हि लगेच वरमला आणि म्हणाला की साहेब माफ़ करा कधी कधी टालकेच सरकते बघा.. मि तुमच्याच वयाचा तुम्ही काहितरी engineer झाला असणार आणि मी B.Com झालो बघा. तुमच्या आइ-वडीलांकडे पैसे होते म्हणून त्याम्नी तुम्हाला शिकवले... माझ्या आईवडीलांकडे पैसे नाहीत आणि म्कदचित मला तुमच्यापेक्षा थोडी कमी बुद्धी आहे ह्यात माझा काय दोष आहे सांगा. दोन्ही गोष्टी देवाने दिल्या आहेत ना!!! मग तरी तुमच्या राहणीत आणि माझ्या राहणीत किती फ़रक आहे बघा.. तुमचा पॉश मोबाईल पाहिला आणि टाळके थोडे सरकले बघा माफ़ करा... त्याचे असे विचार करणे पूर्णपणे बरोबर नसेलही पण बकवास नक्कीच नव्हते. तो एवढा विचार करणारा होता म्हणून लगेच त्याने माफ़ीही मागितली? पण सर्वच जण त्याच्या सारखे थोडेच असणार? अश्यानेच शहरांमधला क्राईम रेट वाढत चालला आहे...

तुम्ही म्हणाल की ठीक आहे पण ह्यात माझा काय दोष. का जस्ती पैसे कमाविणे हा गुन्हा आहे? जास्ती पैसे कमाविणे हा गुन्झा नक्कीच नाही पण आलेले पैश्यातुन समाजासाठी काहीही न करणे हा नक्कीच गुन्हा आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे, विशेषत: IT आणि BPO मधल्या लोकांनी, की ते काही आभाळातून पडलेले नाहीयेत की त्यांना एवढे पैसे मिळतात किंवा ते बुद्धीने सुद्धा जास्त नाहीयेत बाकीच्यांपेक्षा की त्यांना एकदम एवढे जास्त पगार मिळावेत. ते त्यांचे भाग्य आहे आणि त्याबद्दल त्यांनी देवाचे आभारच मानले पाहिजेत आणि इतरांपेक्षा जास्त दानधर्म करणे ही एक देवाचे आभार मानायची पद्धत होऊ शकते.

पटतयं का बघा. पटत नसेल तर सोडुन द्या. लोक बोलतच असतात कुठे लक्ष द्यायचे? रंग दे च्या जागीच आता 'टॅक्सी' धावू लागली आहे. जॉनवर मरणाऱ्या पोरींची चंगळ आहे आणि समिरा रेड्डी (रेड्याची बहीण ती रेड्डी) असल्याने पोरांचीही आईश आहे. मग काय? चला टाकुनच येउया....... पिक्चर





Chanakya
Tuesday, February 28, 2006 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली धन्यवाद पण मला स्वत:ला काय वाटते ते मांडायचे होते. V &C च्या वादात पडायचे नव्हते म्हणून इथे टाकले.

कुणी मला नविन परिच्छेद सुरु करताना tab कसा द्यायचा हे सांगेल काय? बरेच प्रयत्न करुनही जमले नाही....


Moodi
Tuesday, February 28, 2006 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाणक्य तुम्ही V&C च्या फंदात नाही पडले ही अतिशय चांगली गोष्ट केलीत. यावर चर्चा न होणेच योग्य.

दिनेश यांनी निवडलेला विषय जरा वेगळा पण बराचसा सामाजीक जाणिवेकडे झुकणाराच आहे. पण त्यांच्यासारख्या चांगल्या अन मान्यवर व्यक्तीची सुद्धा इथे दिवे देऊन यथेच्छ टिंगल होते मग आमच्या सारख्या सामान्यांचे काय?

नेमके माझ्या मनातीलच बोललात, ग्रेट!!!


Dineshvs
Tuesday, February 28, 2006 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाणक्य, मूडि, दोन चार जणानी विचार केला हेच माझ्यासाठी अप्रुपाचे.
बाकिच्यानी " आम्हा काय त्याचे " म्हणुन तोंड फ़िरवावे. पण ज्या दिशेला तोंड आहे, तिथे काहि वेगळे घडतेय का ?
का मग डोळेच मिटुन घ्यायचे ?


Ninavi
Tuesday, February 28, 2006 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाणक्य, फार तळमळीने लिहीलंय तुम्ही. विचारात पाडलंत.

Champak
Tuesday, February 28, 2006 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chanakya!

Good! Though It was my Id once, I couldnt use it in so proper way !:-)

Seema_
Tuesday, February 28, 2006 - 1:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाणक्य खरच विचार करायलाच हवा अस लिहिलय !

Yog
Tuesday, February 28, 2006 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chanakya,
छान ललित लिहीलय.. विचार प्रामाणिक वाटतात. generation gap च निरीक्षण अगदी अचूक आहे.

Ameyadeshpande
Tuesday, February 28, 2006 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाणक्य, तुमचे विचार बरोबर आहेत बर्‍याच प्रमाणात पण पिढीतली सगळीच मुलं मुली अशी नाहियेत...खूप जण असेही आहेत की ज्यान्ना स्वत:च्या संस्क्रुतीबद्दल खूप आत्मियता आहे... वडीलधार्‍यांच्या मताला मान देतात आणि स्वत:ची ओळख पाश्चिमात्य संस्क्रुती च्या प्रभावाखाली झाकोळून देत नाहीत...


Maanus
Tuesday, February 28, 2006 - 8:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरेख! चाणक्य. वरच्या काही गोष्टी पटल्या नाही, पन चांगले लिहीले आहेस. Tom has written nice book on globalization...
here is begining chapter from ' The World is Flat'. If you get time try to read it.

Shyamli
Tuesday, February 28, 2006 - 10:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाणक्य बर झाले ईथेच लिहीलेत ते
खरच छान लिहीलय तुम्ही


Psg
Wednesday, March 01, 2006 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाणक्य, वैचारिक लेख. अगदी तळमळीने लिहिले आहे.

Vaishali_hinge
Thursday, March 02, 2006 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chan mandaley!
khup mothi pratikriyaa dyaavishi vatatey , nantar savdeene! thanks! vishayaalaa haat ghatalyabaddal

Arch
Thursday, March 02, 2006 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाणक्य छान विचार मांडले आहेत. पण मला जाणवल आहे की हल्लीची पिढी स्वतःच्या मर्जिने volunteer work मध्ये उतरलेली दिसते.

१. जस, college मधले मित्र मैत्रिणी जमून मुळशी धरणाच्या जवळपासचा भाग weekend ला जाऊन स्वच्छ करणं
२. govt. hospitals मध्ये मदतीला जाणं
३. हल्लिची पिढी मुलं adopt करण्यातपण पुढे दिसते.

हे काळानुसार झालेले +ve बदलपण appreciate करायला हवेत.

आणि शेवटच म्हणजे, तुमच्या लिखाणात थोड्या typo असतील, ती spellings नीट करता का?


Chanakya
Tuesday, March 07, 2006 - 1:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाचल्याबद्दल सर्वांचे आभार

चंपक तुमचा id कधी होता चाणक्य? माझा हा id २००० पासुनचा आहे. फ़क्त माझ्या posts फ़ार नाहीयेत एवढेच

अमेयदेशपांडे आणि आर्च तुमचे बरोबर आहे सर्वच तरुण पिढी अशी नाही पन दुर्दैवाने अशी उदाहरणे अपवादाने आढळतात आणि हे अपवाद नियम सिद्ध करतात....
अर्थात हे माझे माझ्या आजुबाजुच्या लोकांवरुन झालेले मत. चुकीचेही असेल किंवा कधीकधी असे होते की आपण एखाद्याच्या बाह्यवर्तनावरुन अंदाज बांधतो तो कसा असेल असा पण तो अंदाज पूर्ण चुकीच देखील असु शकतो नाही का?

अर्थात हे मात्र खरे की मराठी माणसाची सामजिक जाणीव इतरांपेक्षा नक्कीच बरी आहे. north indian लोकांमध्ये तर मला पूर्ण अभाव आढळतो ह्याबाबतीत...

आर्च आता typo दुरुस्त करणेतर शक्य नाही पुढच्या वेळी काळजी घेईन


Champak
Tuesday, March 07, 2006 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नव्हता रे भो!

काय बी आठवत नाही बघ:-)

मिलिंदा, मला एकदा माझ्या सगळ्या आय डी अन पासवर्ड पाठुण दे रे भो!


Vaishali_hinge
Wednesday, March 08, 2006 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

khar aahe bharatachyaa north kade jasjase jaau tase hyaachaa anubhav lagech yeto, maharashtrach sagalyaat balance vaatate.

Coldfire
Thursday, March 16, 2006 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चानक्य खरच खुप छान लेख लिहिलात... तुमचे विचार आणि विचारतली खोलि आणि तलमळ खरच प्रशन्सनिय आहे. लिहीत रहा असच.. गन्ज चढलेल्या या तरुन पिढिच्या डोक्यला थोडसा का होइना ब्रेनवाश भेटेल.

Sanghamitra
Friday, March 17, 2006 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाणक्य खूप सुरेख आणि तळमळीनं लिहीलंय तुम्ही.
पण आर्च म्हणते तसे अजूनही आशेचे किरण आहेत. मी जेंव्हा हा चित्रपट पहायला गेले होते तेंव्हा शनिवारची संध्याकाळ असल्यानं बराच कॉलेज क्राऊड होता. पण तरिही कुठेही कमेंट्स नव्हत्या. राष्ट्रगीत सुरू झाल्यावर सगळे थीएटर उठून उभे राहिले होते. आणि अतुलची 'सरफरोशी की तमन्ना' संपल्यावर आणि शेवटच्या सीनला ज्या टाळ्या पडल्या त्या सोडल्या तर पूर्ण चित्रपट संपेपर्यंत टाचणीचा आवाज होईल अशी शांतता होती. आणि हेही मुंबईतल्या मल्टीप्लेक्समधे.
आजच्या पोरांना अक्कल शिकवायला आमीर खान लागतो एवढेच. :-)


Adityaranade
Tuesday, March 21, 2006 - 12:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते तुम्ही सर्व लोक overreact करत आहात
तरूण पिढीची संस्क्रुती निराळी आहे, ती तुम्ही लोक समजू शकत नाही, समजून घेऊ इच्छित नाही, म्हणून उठ सूट त्यांच्यावर नितीमत्ता घसरल्याचे आरोप? अरे तुम्हा लोकांची स्वताची नितीअमत्त किती टणक आहे? कधी स्वताला प्रामाणिकपणे विचरलय?
स्वत कमवलेल्या पैशाने पब मध्ये दारू पीत असेल जर कोणी आणि पोरी फ़िरवत असेल, तर त्यात काय चूक आहे?
त्याच विनाकारण राष्ट्रभक्तीशी संबध जोडून स्वताच्या कोत्या मनोव्रुत्तीचे दर्शन घडवू नका
मलादेखिल या २००० च्या दशकातील नव्या पिढीच्या काही गोश्टी उथळ वाटतात, परंतु तशाच प्रकारचा उथळपणा तर प्रत्येक पिढीत होता, आम्च्या पिढीतसुद्धा होत, हे मी प्रांजळपणे कबूल करतो
थोडा मोकळ्या मनाने विचार करा
मायबोली दुर्दैवाने अशाच कोत्या मनोव्रुत्तीच्या लोकांचा अड्डा बनत चाललाय दिवसेंदिवस
काहितरी
constructive suggestions असतील तर करा ना उगीच सदोदित
negative commentary!

Adityaranade
Tuesday, March 21, 2006 - 12:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

BTW माझ्या मते रंग दे बसंती हा एक सुमार गल्लभरू पिच्चर आहे
त्यात संदेश वगैरे आहे तो गाणी बजावणी आणि
comedy तत्सम प्रकारात पार हरवून जातो
आजच्या पिढीची
hypocrisy ही आहे, की त्यांना (आणि काही मध्यम वयीन लोकांना पण) हा सिनेमा संदेश वगैरे देणारा वाटला

Polis
Tuesday, March 21, 2006 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसला सन्देश डोम्बल! अक्कल गहाण पडली न्हाव्याकडे की म्हातार्‍याच्या पादण्यात बी मन्त्र ऐकू येतोया त्यातलाच ह्यो प्रकार...
बारक्या, रानडेन्ची फ़ाईल आन, कोनच्या पिढीचे बघुयात...


Ameyadeshpande
Tuesday, March 21, 2006 - 5:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

RDB गल्लाभरू आहे तो फ़क्त आमीर खान मुळे... पटकथा फ़ारच dramatic आहे त्यातून संदेश वगैरे घेण्यात अर्थच नाहिये... फ़क्त वेगळा विषय आहे इतकच... शांत बसलेल्या लोकांवर लाठी चार्ज पासून तो वास्तवाशी तुटतो. तिथून जे सुरू होतं ते पाहिलं नाही तरी चालेल इतकं अतीव dramatization घेतलयं. एक सिनेमा म्हणून वेगळा आहे bollywood साठी जो आमीर च्या अलिकडच्या प्रत्येक सिनेमात एक प्रयत्न असतो इतकंच.
संस्कृती साठी पिढी ला दोष देण्यात तितकासा अर्थ नाही. आता ४ नव्या गोष्टिन्ना exposure मिळतय ह्या पिढीला म्हणुन मग त्याचे चांगले वाईट अनुभव यायचेच.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators