Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 24, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » विनोदी साहित्य » विडंबन » Archive through February 24, 2006 « Previous Next »

Pama
Tuesday, February 21, 2006 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रांनो!:-)

फ, सहीच!!


Sampada_oke
Tuesday, February 21, 2006 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फाफाभट्ट, या प्रांतात सुद्धा उंच काम केलेत की. एकदम मस्त विडंबन.:-)

Ninavi
Tuesday, February 21, 2006 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ, सहीच! ... ... ...

Pendhya
Tuesday, February 21, 2006 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़, मस्त रे! ..

Yog
Tuesday, February 21, 2006 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महान रे.. .. !!

Rajkumar
Tuesday, February 21, 2006 - 11:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच रे... शेवटी निरीक्षण कामाला आलं म्हणायचं..

Milya
Wednesday, February 22, 2006 - 12:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा : खासच गं

फ :
एकदम सही. अरे काय हे प्रसाद पाठोपाठ तूही. लग्नाआधीच ही अवस्था तर नंतर?....


Devdattag
Wednesday, February 22, 2006 - 11:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मूळ गाणं ऐरणिच्या देवा तुला..


लग्नाचीही देवा मला बोलावणी येऊ दे
पंगतीचे जेवण मला रोज रोज खाऊ दे

खावं ख़ाणं पंगतीचं, पूरी अन श्रीखंडाचं
जीरे नको आमटीत, धणे मातूर माझ्या देवा थोडेतरी राहू दे

वाढप्याच्या हातातला डाव होईल वर खाली
अळू थोडा देईल, आणि कढी थोडी ताटतल्या भातासंगं खाऊ दे

काकदी थोडी, कांदा थोडा, मस्त ह्या कोशिंबिरी
होईल जेवण पोटभरी, जिलबी मठ्ठा खावयाला, थोडी जागा राहू दे


Athak
Thursday, February 23, 2006 - 1:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा , बापरे चांगलाच हिसका दावणार :-)
फ , Thanks रे , अगदी माझीया मनीची व्यथा तु शब्दात मांडलीस :-)
देवदत्त , पोटाचा नगारा होईल हो :-)


Shyamli
Thursday, February 23, 2006 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए!!
दुसयाच्या लग्नात जेवण पुरे झाले आता.....
आम्हालाही,आता तुझ्या लग्नाच बोलवण येऊ दे!!!!

बाकी मस्तच जमलय!!!


Geeta1
Thursday, February 23, 2006 - 5:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dovad<aÊ ÔÊ

ekdma mast jamalaI Aahot ivaDMbanaM.


Rupali_rahul
Thursday, February 23, 2006 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


दाराच कुलुप काढ
कोपर्‍यात चपला काढ
दिवे लाव, बघ माझी आठवण येते का??

फ़्रिजमधुन बाटली घे
ग्लासात थंड पाणी घेउन पी
थोडा वेळ शांत बस, बघ माझी आठवण येते का??

औषधांचा डबा उघड
त्यातुन अमृतांजन काढ
ते तुझ्या टेंगुळांवर चोळ, बघ माझी आठवण येते का??

औषध लावताना टेंगुळ दुखेल
दोन चारवेळा आई SS गं मेलो म्हणशील
टेंगुळावरुन हात फ़िरविताना, बघ माझी आठवण येते का??

तुझीच आणी फ़क्त तुझीच,
सॅंडल


Neel_ved
Thursday, February 23, 2006 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा ही एक प्रयत्न......

टेंगुळ जरा मोठंच आहे दर फटक्यानंतर वाटत
भर उन्हात सॅंडल खाउन थोबाडपण फाटत
तरी चाळे चालु राहतात मन भरत नाही
कळांशिवाय शरीरात काहीच उरत नाही
तितक्यात कुठुन एक सॅंडल लाटण्यासोबत येते
टेंगळाबाजुचा उरला भाग सॅंडलखाली घेते
मी थेट इंद्रासारखा सैरावैरा पळत रहातो
गल्ल्या रस्ते झाडांवरती, गच्चीवरती लपुन राहातो
सॅंडलबरोबर लाटण्यांचा सुरु होतो पुन्हा खेळ
लाथा आणि बुक्क्यांचाही जमतो मग चांगला मेळ
चक्क उघड्या डोळ्यांनी मी तारे पाहु लागतो
खरच मला कळत नाही मी असा का वागतो


Ankushsjoshi
Thursday, February 23, 2006 - 8:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान नील आनि रुपालि अगदि छान
:-)


Neelu_n
Thursday, February 23, 2006 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नील आणि रुपाली सॅंडल, लाटण आणि टेंगुळ यातले अतुट आशयगर्भ नात तुम्ही मस्त रेखाटलय

Zakki
Thursday, February 23, 2006 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नील, बरेचदा स्वानुभव घेऊन तुम्ही जे लिहिलेत ते छानच आहे. तेंव्हा कविता करणार्‍यांनी हा धडा शिकावा तुमच्याकडून!


Milya
Friday, February 24, 2006 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव, रुपाली, नील सर्वांचीच विडंबने छान आहेत.
इथे परत एकदा बहर आला आहे

चाल :
तुला पाहते रे तुला पाहते

सर्व बोकोबांना नवरोबांना त्यांच्या बायका हेच म्हणत असतील

तुला साहते रे तुला साहते
अशी खंत माझ्या उरी राहते
जरी स्वामिनी मी तुला साहते||

तुझ्या आळसाचा जिवा त्रास लागे
तुझ्या लोळण्याने मनी राग जागे
तुझे वागणे हे मला जाचते||

तुला साहते रे तुला साहते

सदा पाहशी टिव्ही सोफ़्यावरूनी
वृथा खर्चशी वेळ क्रिकेट बघूनी
मुलांच्याकडे ध्यान ना राहते||

तुला साहते रे तुला साहते

चकाट्या पिटाया सदा तू तयार
जरा काम सांगा कि सबबी हजार
तुझे मित्र सारेच बेकार ते||

तुला साहते रे तुला साहते


किती काम मी रोज केले तरीही
तुला जाण त्याची ना तसूभरीही
तळे लोचनांचे पुन्हा वाहते||

तुला साहते रे तुला साहते

दिसे मुंगी का मोकळी बैसलेली
दिसे का नदी ती कुठे थांबलेली
तिच्यासारखी मी सदा वाहते||

तुला साहते रे तुला साहते
जरी स्वामिनी मी तुला साहते||




Psg
Friday, February 24, 2006 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, क्या बात है! सही!!
शाब्बास दूसरीही बाजू मांडल्याबद्दल :-)


Kandapohe
Friday, February 24, 2006 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या खासच!! या वेळी आमचेही मागणे मांड असा स्त्रीपार्टीने दम भरलेला दिसतोय. :-)

Gandhar
Friday, February 24, 2006 - 2:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या झक्कास रे भो!!

Pha
Friday, February 24, 2006 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिसादाबद्दल धन्यवाद मंडळी!
पमा, देवदत्त, रुपाली, नील(तुलाही टेंगूळ?! :D ), मिल्या : सही चाललंय!
केप्या.. :-O


Rajkumar
Friday, February 24, 2006 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही चाल्लय.. सगळेच सही लिहीतायत..

Deepstambh
Friday, February 24, 2006 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>शाब्बास दूसरीही बाजू मांडल्याबद्दल
मिल्या सही.. दूसरी बाजू मंडली आता पहिलीही मांड.. * हा पुरुष पार्टीचा दम समज.. *

Moodi
Friday, February 24, 2006 - 3:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या ग्रेट!! बायकोने आतापर्यंतच्या बायकांच्या विडंबनावर बराच दम भरलेला दिसतोय, म्हणुन तयार केले का?

रुपाली, नील अन इंद्रा अरे का रे त्या राकुच्या मागे लागता असे? बिचार्‍याचे जॉगिंग थांबले ना त्यामुळे, राकू ~DDD


Moodi
Friday, February 24, 2006 - 3:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्ता आता तुझेच निमंत्रण येऊ दे बर!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators