Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
ChakravaDhvyaj

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » ललित » ChakravaDhvyaj « Previous Next »

Vaishali_hinge
Tuesday, February 21, 2006 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखादी सकाळ नकोशी होते एखादी सायंकळ उगाचच अस्वस्थ करते, माझी मी स्वताशी बोलु लागते आयुष्यातले काही हिशोब का चुकले?........ हेअसंच का झालं? ते तसं का झाल नाही? इ....इ
इथे स्वताआशी बोलायला भरपुर संधी कारण बोलायला माणंसंच नाही शिवाय कुठले Problem नाहीत, मग नको ते विचार टाळण्यासाठी नेहमीच मी निसर्गाचा आधार घेत आलेय अशा संध्याकाळी Stamford the finest yellow stone town of England च्या रस्त्यावरुन मी चालु लागते winter मुळे झाडांना पालवी नाही, शांत रस्ता आणि एखाद्या सुंदर तरुणीने जुनापाना चुरगळलेला ड्रेस घातला तरी तिचे सौंदर्य लपत नाही तसेच आहे STAMFORD. चे निष्पर्ण वृक्ष सुमसाम रस्ते, बरीसशी शम्भर वर्ष जुनी घरे सुकलेल्या बागा तरीही ह्या शहराच्या सौंदर्यात कुठेही कमी वाटत नाही..... समोरचा हा स्वर्ग पाहुनही मी मात्र प्रसन्न होत नाही.

आतल्या कोपर्‍यात कुठेतरी वाटत राहते हे माझं नाही माझं सगळं फ़ार लांब राहीलेय तो खड्ड्यांचा रस्ता, ओबड धोबड घरे....... माझी मोडकी खुर्ची आणि बरच काही.... मग मी लाल पिवळ्या S T ने परत माझ्या office च्या आवारत त्या गर्दीत जाउन पोहचते...........

एक एक प्रसंग मनावर एकेक मळभ आणतो मी देणं लागते सारखं आठवत राहतं माझ्यवर कर्ज आहे एकेका प्रसंगाचे.....

प्रसंग १ एप्रिलची दुपार,वर पंखा गरगरतोय सोमवार्ची गर्दी, सतत सह्या, वाजणारा फ़ोन,त्यात एक आजीबाई येउन हळु आवाजत काहीतरी बोलु लागल्या मल अजिबात तीचे बोलणे समजेना आणि ती जोरातही बोलेना हा प्रकार ४-५ वेळा झाल्यावर मी शेखबाई ला हाक मारली तिने ऐकले आणि आजीला सरळ बाहेरचा रस्ता दाखवु लागली " ही कचेरी आहे भीक मागायची जागा नाही " " मॅडम ती म्हणतेय तुमच्या जुन्या चप्पल अस्त्याल ना लयी ताप्तय पाय फ़ार पोळतात! "

प्रसंग २: " ९९% , वय १९ २ तास झालेत " constable भामरे सांगु लागला, मी M A G clark ला हाक मारली D D चा form घेतला आणि मी त्याला सोबत घेउन निघाले hospital मध्ये पोहचले private trust असल्याने doctor सही करायला त्रास देउ लागले त्यांच्याशी वाद घालुन सही घेउन रुम मधे पोहचले सगळ्या सासर माहेरच्या माणसांना बाहेर काढले statement पुर्ण झाल्यावर पायाच्या अंगठ्याचा ठसा घेतला,बाहेर आले कोणी काहीच बोलत नव्हते हे होणार जणु सगळ्यांनाच माहीत होते. सुनीता वय १९, लग्नाला २ वर्ष झालेली १ वर्षाचे मुल ९९% भाजलेली २ तासापुर्वी admit केलेले, २तासानंतर हे जग सोडुन गेली, माझा dying declaration report सिलबंद झाल जर केस झाली तर तो फ़क्त न्यायधिशांसमोर उघडनार होता अन्यथा........... .....

प्रसंग ३: शनीवर office मध्ये फ़ारशी हालचाल नाही अचानक एक बाई ओरडत समोर येउन उभी राहते " मॅडम तुमच्यासमोर मी खर सांगते मी तयार आहे त्याला घटस्फ़ोट द्यायला असं काहीसं शुद्ध मराठीतुन बोलत राहते माझा शिपाई येउन लगेच तीला गोड बोलुन बाहेर नेउन बसवतो, तीच्या कडेवरचे मुल निर्वीकारपणे कसलातरी तुकडा चघळ्तं राहतं एकजणं म्हणतो " आमच्या गावचीये नवर्‍याने टाकली डोक्यावर परीणाम झालाय " त्यानंतर हा प्रसंग महीन्या-१५ दिवसातुन एकदा तरी घडतो..........

प्रसंग ४ एका स्रीचा कळ्वळुन ओरडण्याचा आवाज माझा clark येउन सांगतो " मघाची ती १०९ ची केस, आपण आत ठेवायला सांगीतली ती custody त शिरायला तयारच नाहीये गजाऽन्ना धरुन दंगा करतीये " , constable ही वैतागली तीला मग व्हरांड्यात थोडावेळ मी बसवुन ठेवले पण तीचा जामीन द्यायला कुणीही आले नाही रात्रं झाली मग आमचा ईलाजच नव्हता तीचे मुलही होते तिच्याबरोबर.........

प्रसंग ५,................. प्रसंग ६....७......८.. अगणित

ह्यांचा कुणाचाच शेवट किंवा न्याय माझ्या हातात नव्हता पण त्या न्यायापर्यंत त्यांना पोहचवणार्‍या दुव्यातील मी एक कडी होते, त्या system चा एक भाग होते, माझ्या देशाचे रुण मी फ़ेडायचा प्रयत्न करीत होते पण आता ह्या सगळ्या स्रीयांची मी कर्ज कसे फ़ेडु माझ्या मनाला हा ताण सहन होत नाही अणि त्यावर उपायही सापडत नाही एकीकडे माझी माणसं
खरतर माझे मलाच आश्चर्य वाटते माझी नाळ माझ्या मातीशी इतकी जुळलेली असेल ह्याची मलाच कल्पना नव्हती आणि ह्या चकचकीत रस्त्यावरुन चालतांना माझ्या मातीच्या कर्जाचे चक्रवाढ व्याज रोज वाढतेच आहे
त्या ओझ्याने माझ्या मातीत मी अजुन खोल खोल रुतत जाते रुतत जाते



Shyamli
Tuesday, February 21, 2006 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरय ग वैषाली!
अस होत कधि कधि,
जुन्या गोष्टि पाठ नाही सोडत,
अस म्हणण्यापेक्षा आपण सोडु शकत नाही त्यांना
अस म्हणता येईलका?


Vaishali_hinge
Tuesday, February 21, 2006 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली हो खरय कदाचीत मी लक्ष्मण यांच्या " सामान्य माणसाजवळ जास्त वावरलीये " म्हणुन " तो " भारत अस्वस्थ करतो!जर मी एखाद्या मोटया शहरात आणि हाय्फ़ाय फ़र्म मध्ये असते तर काही वाटले नसते कदाचीत..........

Shyamli
Tuesday, February 21, 2006 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाली......
माझ्या
ह्या वाक्यानी
!!अस म्हणण्यापेक्षा आपण सोडु शकत नाही त्यांना
अस म्हणता येईलका?!!

तु दुखावली गेलि असशिल तर I MUST SAY SORRY TO U
माझ हे वाक्य personal घेऊ नकोस please


Moodi
Tuesday, February 21, 2006 - 8:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाली खरय तुझे. तू नोकरी करताना असे अनुभव घेतलेस अन मी सामान्य जीवन जगताना घेतलेत. तरीही आपल्या परीने या असहाय लोकांना जमेल तशी मदत करणे हेच आपल्या हातात असते, जेव्हा आपणच दुर्बल बनतो तेव्हा खुप मानसीक त्रास होतो अन तो मी भोगलाय. ग्रामिण भागातील जीवन किती पोळवते ते मला चांगलेच माहित आहे, पण तरीही मी प्रयत्न सोडत नाही अन तू पण सोडु नकोस.
सध्या इथे आहेस तर नोकरी बघत असशील तर इथल्या स्वयंसेवी संस्थांमध्ये पण काम कर २ तास आठवड्याला म्हणजे ही बोच कमी होवु शकेल. तुझी इच्छा असेल तर मी वेब address देईन तुला या संस्थांचा.


Vaishali_hinge
Tuesday, February 21, 2006 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली मी personal नाही घेत आणि मला, तुझा राग बीग ही मुळिच आला नाहीये तुझ्या प्रतीक्रीया छान आसतात मी लगेच reply दीला एव्हढेच!

मूडी... मी एथे पहील्या दिवसापासुन red cross, and british heart foundation मध्ये विनामुल्य मदतीला सुरवात केलिये पण तुही पत्ते दे.


Moodi
Tuesday, February 21, 2006 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाली तुला मी उद्या पाठवते लिंक. ब्रिटिश हार्ट मध्ये मी पण काम केले, पण मध्ये भारतात गेल्याने ते काम बंद पडले आता थंडी कमी झाल्याने परत चालू करेन. तुझे सध्याचे उपक्रम चांगले आहेतच. मी उद्या तुला मेल करते.

Vaishali_hinge
Tuesday, February 21, 2006 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग!श्यामली माझा भाउ आणि इतर बरेच नातेवाइक इकडे सेटल झालेत माझे घरचे आणि माझ्या मैत्रिणी माझे विचार ऐकुन मला हसतात ती प्रतीक्रीया त्यांच्यासाठी होती. पहाटे किंवा रात्री घराच्या खिड्कित उभी राहुन माझी कुरकुर सुरु होते इथे तर कुठुन भुंकण्याचा आवाज सुद्धा नाही येत, भारतात कसे कुठुनतरी मंदीराच्या घंटीचा आवाज येतो, कुठल्यातरी पानटपरीवरची गाणी ऐकु येतात दुरवरच्या अनोळखी खेड्यावरचा भजन किर्तनाच्या कार्यक्रमाचा सुर कानावर पडतो माझी ही तक्रार ऐकुन घरच्यांच्या कपाळावर आठ्या चढत जातात आणि मैत्रीणि तर म्हणतात enjoy करायचे सोडुन काहीतरी विचार करतेस
and special thanks to moodi.


Moodi
Tuesday, February 21, 2006 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशाली तु मला हसशील माझे ऐकलेस तर. मी रस्त्याने मांजर दिसले की फिस फिस असा आवाज करुन त्याला बोलवते अन माझा नवरा खुप हसतो. एकदा एक अबोली मांजर खरच माझ्याकडे पळत आले अन मी त्याला अर्धा मिनिट घेतले. ते सर्वांकडे जात बोलावल की.
मला ही असेच वाटत ही इथली शांतता बघुन.


Vaishali_hinge
Tuesday, February 21, 2006 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

same happened आमच्याही दारात एकदा कुठुनतरी मांजर आले मी त्याल सवयीप्रमाणे दुध दीले पण त्याने तोंडही लावले नाहे त्याला catfood ची सवय असेल? हि हि हि....

Dhondopant
Tuesday, February 21, 2006 - 7:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैशालीताई तुमी काय पोलिसात आसता का डागडर हायसा?... पर काय का आसाना..

तुमच्यासारख्या " कर्जदार " लोकांचे हे मनोगत ऐकुन बरे वाटले. अनेकांच्या श्रमातुन आपले सुख उभे राहात असते याची जाणीव प्रत्येकाला " व्हायला " त्याचे त्याचे नशीबच लागते.

असो. काय लिहीणार?... शेवटी कर्ता करविता तोच आहे.

आपण कर्माचे धनी!!!


Vaishali_hinge
Wednesday, February 22, 2006 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धोंडोपंत....., धन्यवाद मी पोलिसात नाही की doctor पण नाही revenue ,through MPSC अम्हाला तालुका दंडाधिकारी म्हणुन तसेच तालुका तहेसिलदार म्हणुन बर्‍याच बाबीत लक्ष घालावे लागते, आणि असे अनुभव ध्यावे लागतात. असो

धन्यवाद!


Pama
Wednesday, February 22, 2006 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे सगळ आहे, पण समाधान नाही. आता तर अस वाटत' न घरके ना घाटके' राहिलो कि काय?
खरच' सूख टोचतय' का? आपल्या पिढीपुढे हे फार मोठ आव्हान आहे अस वाटत कधीकधी. जगण्याच्या स्पर्धेत इतके पुढे निघून जाऊ नये कि आपले मागचे सारे पाश तुटून जावे.
वैशाली, खरच गं.. हे चक्रवाढ व्याज कधी फिटेल अस वाटत नाही, आणि फिटूही नये.
खर सांगू, हे व्याज आहे तो पर्यतच जगण्यात अर्थ आहे. हे व्याज ज्या दिवशी उतरल अस वाटेल, त्यादिवशी आपल' माणूसपण'ही संपेल.


Vaishali_hinge
Wednesday, February 22, 2006 - 11:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी खरय,तुझे म्हणने १००% पटले पमा!

Bhagya
Wednesday, February 22, 2006 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पमा, वैशाली खरच ग! अगदी बरोबर बोललात.

Sarivina
Friday, February 24, 2006 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaOXaalaIÊ pmaaÊ maUDIÊ tumhI mhNaalaat to KrM Aaho. AaplaI naaL Aaplyaa doXaaXaIÊ samaajaaXaI AXaI jaÜDlaI Asato ik ha saara cakcakaT duÉna Cana vaaTtÜ pNa tIqao gaolyaavar %yaacaa naÝiXayaa yaotÜ. Baartatca rhayacaM Asaa inaNa-ya Gaotanaa AamhI haca ivacaar kolaa

Vaishali_hinge
Tuesday, February 28, 2006 - 4:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

great तुमच्या अभिप्रायाला आणि तुमच्या निर्णयाला दाद द्याविशी वाटते.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators