Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
SmRuteega.ndh

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » ललित » SmRuteega.ndh « Previous Next »

Supermom
Tuesday, February 14, 2006 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बालपणीच्या आठवणी म्हणजे जणू पुस्तकात ठेवलेलं मोरपीसच. केव्हाही उघडलं की सारे आठवणींचे गंध कसे दरवळत येतात बाहेर. अन वेड लावतात आपल्या सुगंधानं.
लहानपणच्या स्मृती या विशेषकरून व्यक्तींच्या आठवणी असतात. आपलं आजोळ,काकांच घर या सार्‍यांना वेढून असलेल्या.

माझ्या काकांच घर अकोल्याला.उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आम्हा बहिणींना महाराष्ट्र एक्स्प्रेस मधे बसायचे अगदी वेध लागत. आम्हाला सोबत काही कामासाठी नागपूरला आलेल्या काकांचीच असायची बहुधा. तेव्हा आतासारखे आधी आरक्षण केले जात नसे. मग घाई घाईत तयारी करून गाडीत बसायचे. आम्हाला बसायची सोय अगदी नीट करून देऊन मग बिचारे काका मिळेल त्या जागी बसून डुलक्या काढत. वाटेत मग दाणे,फ़ळे,शेगावची कचोरी जे जे म्हणून मिळेल त्याला पोटात उदार आश्रय मिळत असे. शिवाय आईने दिलेल्या पुर्‍या,भाजी नि चिवडा असायचाच.

अकोल्याला घरी पोचलं की केवढं स्वागत व्हायचं. दोघी चुलत बहिणी नि भाऊ वाटच बघत असत.काकूने काहीतरी गरमागरम नाश्ता तयारच ठेवला असायचा. खाणे,आंघोळी नि मग काय विचारता? नुसते खेळणे.

दुपार झाली की भलीमोठ्ठी पिशवी घेऊन काका निघत बाहेर.त्यांना आंब्यांचे फ़ार वेड. नि पारखही तेवढीच. रोज वेगवेगळ्या जातींचे उत्तम नि रुचकर आंबे आणण्यात त्यांचा हात कोणी धरत नसे.
आमरस पोळी तर रोज असेच.सोबत काकू रोज नवा बेत करायची.पीठ लावलेली घोळीची भाजी,कच्च्या टोमॉटोची तीळ घालून चटणी,भरली वांगी,भजी, एक ना दोन. अन सर्वात मस्त म्हणजे केक्स ती फ़ार सुरेख करत असे.
तट्ट भरलेल्या पोटाने मग वाळ्याचे पडदे लावलेल्या खोलीत अशी झोप लागायची कि बस.
अन सकाळी जड जेवण झाले म्हणून रात्री साधे असायचे म्हणता की काय? छे. नाव नको. अजून रुचकर मेनू असायचा रात्री.
रात्री गच्चीवर झोपणं असे.त्या थंड चादरींवर काय छान गुंगी यायची.विदर्भातल्या उन्हाळ्याचा त्रास मुळीच जाणवत नसे.
दर रविवारी चंदन,कपूरकाचरी घालून काकू शिकेकाई उकळत असे. तो वास अजूनही आठवतो.
मनसोक्त मज्जा करून महिन्याभराने जायला निघायचो.काकूने स्वत शिवलेला ड्रेस पिशवीत भरल्या जात असे.सोबत भरपूर खाऊ,वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या असत.मोठ्ठ्या डब्यात खास केक असे.
निघताना काकू पोटाशी धरत असे. रिक्शात आम्ही बसलो की हात हलवणारी,मोठ्ठं कुंकू लावलेली तिची मूर्ती अजून आठवते.
गेले ते दिवस. आता सारीच चुलत भावंड नोकरीनिमित्ताने,लग्न होऊन दूरदूर गेलीत.फ़ोनवर काय तो संबंध.कधीमधीच भेटी.


पण काका गेल्यावर मागच्या वर्षी भारतात गेले होते,तेव्हा काकू भेटली अन तिच्याकडे पाहून भडभडून आलं. तिनं पोटाशी धरलं अन सारे गेलेले दिवस कसे अंगावर धावून आले.



Supermom
Tuesday, February 14, 2006 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mod,shabdaatalya shevatachya aksharavaracha anuswar kahi kelya yet nahiy ho.

Kalandar77
Tuesday, February 14, 2006 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असं लिही..

\dev2{bhaDabhaDun aala.n}

भडभडुन आलं

Supermom
Tuesday, February 14, 2006 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद कलंदर. मी मोठा एम लिहीत होते. आता करून बघते.

Supermom
Tuesday, February 14, 2006 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही जमत. काय चुकतय बर?

Kalandar77
Tuesday, February 14, 2006 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तो ' र' पूर्ण कर..

\dev2{bar.n} बर

\dev2{bara.n} बरं

Supermom
Tuesday, February 14, 2006 - 6:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुश्श. जमला एकदाचा अनुस्वार. धन्यवाद कलंदर.

Nalini
Wednesday, February 15, 2006 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोठा एम लिहिला तरी चालतो... काय चुकतय बरं! baraM!
एमच्या आधी a लिहायला विसरली असणार.

थोडक्यात पण खुपच छान मांडल्यास आठवणी.


Shyamli
Wednesday, February 15, 2006 - 6:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान लिहितियेस ग!
येऊ देत अजुन


Milindaa
Wednesday, February 15, 2006 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोठून अकोल्याला जायचात तुम्ही ? नागपूरहून ?

Moodi
Thursday, February 16, 2006 - 10:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sm भाग्या सारखच अगदी मस्त लिहीतेस.
बाकी उन्हाळ्यातील खानदेश अन विदर्भ अनुभवुन पहावा. जळगावला आम्ही जायचो तेव्हा मात्र हिवाळ्यात मेहेरुणची बोरे अन भरताची वांगी अहा! मजा येते अजुनही.
अन महाराष्ट्र एक्सप्रेसने प्रवासात जी मजा येते ना ती दादर - नागपूरने कधीच नाही आली.
जळगाव सोडले की पुढे नागपूरकडे जाताना खरी मजा अन पुण्याहून कोल्हापूरला जाताना मज्जाच.
लिहीत जा ग अशा आठवणी.


Supermom
Friday, February 17, 2006 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहानपणीच्या आठवणींमधे आजोळच्या आठवणी म्हणजे विसरू म्हटले तरी न विसरता येणार्‍या.
माझे आजोळ गावातच होते.त्यामुले मनात आले की जाता यायचे.
रिक्षातून उतरले की समोरच्या व्हरांड्यात आमची आजी काहीतरी विणत असलेली दिसे.विणकामात ती फ़ार हुशार होती.तिच्या हातचे क्रोशाचे रुमाल ती जाऊन इतकी वर्षे झाली तरी आम्हा बहिणींच्या घराची शोभा वाढवतात.
आमची आजी वर्णाने सावळी,उंचीने एकदम कमी होती.तर आजोबा भरपूर उंच,वर्णाने गोरेपान,देखणे. शिक्षणाचे सांगायचे तर आजोबा डॉक्टर अन ती शाळाही पूर्ण न केलेली.पण त्यांच्या इतका आदर्श संसार क्वचितच आढळेल. याचे मूळ आजीच्या सोशिकपणात, आत्यंतिक सुगरणपणात अन आजोबांच्या कुटुंबवत्सल स्वभावात असावे.

आजी अतिशयच सुगरण होती. नातवंडे आली की काय विचारता? उकडीचे मोदक,खरवसाच्या वड्या,आप्पे,दडपे पोहे,तीळ घातलेल्या भाकरी,भाजणीची थालीपिठे नि घरचे ताजे लोणी---किती म्हणून पदार्थ करावे तिने? लेकींबरोबर आलेल्या जावयांची रसना अगदी तृप्त करून सोडीत असे ती. अन तिच्या सारख्या खास नागपुरी पुडाच्या वड्या तर मी कोणाच्याच हातच्या खाल्ल्या नाहीत.पहिली वडी तेलात सोडण्याचा चुर्र आवाज आला की सारेजण तिच्याभोवती गोळा होत असू.

आजोबांना रोज बराच वेळ दवाखाना असे.पण रविवारी ते आवर्जून बाहेर घेऊन जात. अन खेळणी,खाऊ घेऊन देत.बाहेरून येताना त्यांच्या हातात खव्याच्या जिलब्यांचा भला मोठा पुडा असे.



Pendhya
Monday, February 20, 2006 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

SM , छान माहिती आहे. माझ्या ही आठवणी ताज्या झाल्या. आम्ही ऊन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याहून नागपूरला जात असु. अर्थात महाराष्ट्र एक्सप्रेसनी. ऊन्हामुळे, गाडी भयानक तापायची. शेगावच्या कचोर्‍या, भुसावळचा दोसा, ई, ई. त्यावेळी लोकांचा नागपूर प्रवास व्हायचा तो holdalls घेऊनच. तसेच, आमच्या बरोबर, प्रवासात पाण्याची सुरई पण असायची, सुरईच्या stand ला लावलेली.
नागपूर प्रवासातील एक लांबलचक नावाचं स्टेशन माझ्या लहानपणी माझ्या लक्षात राहिलेलं म्हणजे, श्री क्षेत्र नागझरी.
गाडीला कोळशाचं एंजिन असायचं. खिडकीच्या गजाबाहेर बघायचा प्रयत्न केला की डोळ्यात कोळसा जायचा.
तसेच नागपूरी पुडाच्या वड्या आणी कोथिंबीरीच्या वड्या, खव्याच्या जिलब्या, अप्रतीम!
आम्ही ऊन्हाळ्यात अंगणात झोपायचो. सकाळी जाग यायची ती कोकिळेच्या आवाजाने. रम्य सकाळ ती हीच.


Pama
Tuesday, February 21, 2006 - 12:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sं किती छान लिहिलयस!! माझ्या पण सगळ्या नागपूरच्या आजोळच्या आठवणी जाग्या झाल्या.
पेंढ्या, अगदी असाच प्रवास असायचा आमचापण. महाराष्ट्र एक्सप्रेस ने प्रवासाला सुरवात करायच्या आधी आम्ही अहमदाबदहून यायचो.. तेव्हा आमचा डबा भुसावळ स्टेशनला रात्रभर सायडींगला पडायचा आणि दुसर्‍या दिवशी दुसर्‍या गाडीला जोडल्या जायचा.
गाड्यांचा उशीर नेहमीचाच होता. तेव्हा ५-६ तास स्टेशनवर holdall पसरून रात्री झोपलेललही आठवतय. पण अएकदा का नागपूर आल, की २ महिने नुसता धुडगुस चालायचा. विडियो भाड्याने आणून पिक्चर बघणे हा तर ४-५ दिवसाचा ठरलेला कार्यक्रम. त्या वेळे दिवसाला ५-५ पिकचर बघितलेले आठवतायत! किती तो सोस पिक्चर बघायचा! दुपारच्या रणरणत्या उन्हात या मामाकडून त्या मामाकडे, या मावशी कडून त्या मावशीकडे फेर्‍या चालायच्या आणि प्रत्येक ठिकाणी पन्ह मिळायच त्याची चव पुन्हा कधीच कुठे मिळाली नाही.
आणि मग संध्याकाळी बर्डीवर फेरफटका.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators