|
तर मुलिंनो स्रियांनो माझ्या प्रिय सख्यांनो आणि जे याची वाट पहातात्(लावतात्) अशा प्रेमिकांनो व्हलेन्टाइन डे आला..... खरतर हा डे मला ५-७ वर्षांपुर्वी माहीत झाला, माझ्या कॉलेज मध्ये आणि विद्यापिठात देखील मी कधी याचे नाव ऐकले नव्हते अर्थात माझे कॉलेज म्हनजे सातपुड्याच्या पायथ्याशी एका ताअलुक्याच्या गावी आणि विद्यापीठ तर नविनच होते म्हणजे माझी बायोटेक्नोलॉजीची बॅच ही पायोनीअर बॅच आनि त्यात आम्ही सगळे धुळे नि जळ्गाव बाके कोणी नाही, थोदे जे काही फ़शनेबल शायनिंग वाले असायचे ते एम. बि. ए कडे, ति मंडळी रोझ डे वगैरे साजरा करायची आम्ही त्यांच्याकडे डोळे विस्फ़ारुन बघायचोत किती धीट? आमच्या वर्गातली मुले त्यांना पुण्यामुंम्बैचे पाणी लगलेले म्हणत कोल्ह्याला द्राक्ष आंबट) ,एम.बि.ए. च्या २र्या वर्शाला एक ब्युटीक़्वीन होती जवळ्पास सगळे गुलाब तीला मिळायचे आणि तीचे नाव रोझ्क़्वीन म्हणुन डिक्लेयर केले जायचे हा सोहळा आम्ही आमच्या क्लासरुम मधुन बघायचो( तेव्हा उत्तर माहाराष्ट्रा विद्यापिठाला इमारत नवते जळ्गावच्या वेगवेगळ्या शाळाकॉलेजंमध्ये आमचे लेक्चुरस व्हायचेत आणि प्रत्येक लेक्चुर नंतर आम्ही ते ते ठिकाण गाठन्यासाठी धाव्त असायचो आता मात्र फ़ार सुंदर झालेय विद्यापीठ कदाचीत व्हॅलेन्टाइन्ही साजरा होत असेल असो तर आमच्या नशीबात कधी रोझ आला नाही. लग्नानंतर कधीतरी व्हॅ डे बद्दल ऐकले आणि माझ्या नवर्याला मी उत्साहाने त्याबद्दल सांगायला गेले पण या गोष्टींना महत्व देइल तो नवरा कसला.. अर्थातच मला कधी बी माय व्हॅ असे रोमाॅन्टिक ऐकायला मिळाले नाही आणि गिफ़्ट तर फ़ार लांबची गोष्ट, तरी मी चिकाटी न सोदता दर व्ह. डे ला कुठल्या ना कुठल्या आड्मार्गाने मी शेवटी गपा व्ह डे पर्यत नेतेच पण तो पठ्ठ्या ताकास तुर लागु देत नाही व्हॅ डे च्या आधी ५ दिवस माझ्या नवर्याचा वाढदिवस असतो तेव्हा त्याला गिफ़्ट देतांना तर मी मझे कसब पणाला लावते त्याला मी सांगत राहते मी तुमच्यासाठी गिफ़्ट आणायला गेले नातेव्हा व्हॅ डे ची खरेदी करणार्यांची ही......... मोठी गर्दी होती, नुसते टीनएजर्स नाहीतर लग्न झालेल्यांचीदेखील बरीच गर्दी होती(यावर तो तुला कसे काय कळले त्यतले बरेच लग्न झालेले होत आणि ते त्यांच्या बायकोसाठीच गिफ़्ट घेत होते असे काही म्हणत नाही हे माझे नशीब्)पण एतक्या प्रयत्नांनंतर हॅपि व्हॅ डे म्हणन्या पर्यंत त्याने प्रगती केलीये
|
Shyamli
| |
| Monday, February 13, 2006 - 12:00 pm: |
| 
|
मस्तच ग वैशाली, same here माझ्यापण नवयाचा अगदी २च्(कालच झाला) दिवस आधि ब डे असतो. अस सरळपणे celebrations करायला लागले तर नवरे कसले ग ते. ते लोक जर ईतक गोड बोलायला लागले तर.......... डायबेटिस होईल आपल्याला. हो ना! any ways, happy v. day 
|
Dineshvs
| |
| Monday, February 13, 2006 - 12:34 pm: |
| 
|
हा जो कोणी संत होता ना, म्हणजे सेंट व्हॅलेंटाईन, तो म्हणे लग्नेच्छु माणसांची लग्ने लावुन द्यायचा. या बाबाची पुण्याई कमी पडली वाटते.
|
पण नवर्याने मला वाढदिवसाला लग्नाच्यातरी काहीतरी द्यावे म्हनुन माझे प्रयत्न चालुच असतात ते सगळे प्रयत्न तो तितक्याच शांतपणे हाणुन पाडतो अपवाद एखाद वाढदिवस्) मला गिफ़्ट देणे हे अत्युच्च आनंद देउन जाते त्यासाठी मी वाढ्दिवसाची वाट बघत नाही खरतर मैत्रिण तीची मुले माऍ, पप्पा बहीन मावश्या मंडळी, शेजारी यांच्यासाठी मी रोजच्या शाऍपिंग्मध्ये काहीनाकाही घेत असते.. असो तर परदेशात तर व्हॅ. डे चे प्रस्थ तर प्रचंड आहे ख्रीसमस्ची सजावट उतरत नाही तोवर सगळ्या शोकेसेस, सुंदर सुंदर साॅटीनच्या लाल गुलाबी हार्टनी सजवलेले दिसु लागलेत तस गुलाबी रग इथे फ़ारच लोकप्रिय लहान बच्चुंचे फ़्रोक तर अहा हा परत लहान व्हावे आणि त्या फ़्राऍक मध्ये मिरवावे. काल हेलन सोबत व्हाॅ डे च्या शाऍपिगला गेले होते तीने खुप सुंदर प्रेझेंट घेतले तीने भारतातल्या व्हाॅ डे बद्दल विचारले मग मिही तीला त्यावर बरेच काही लेक्चर दिले तीला इंडीया विषयी खुप अफ़ेक्शन आणि आॅट्रक्शन आहे, तीच्यावीशयी स्वतंत्र खुप काही लीहीण्यासारखे आहे नंतर कधीतरी गप्पगप्पांमध्ये तीने सांगितले बघ मी इतके छान अन महागडे गीफ़्ट घेतले तरी माझा नवरा कौतुक ही करणार नाही आणि मला काही चांगले घेतले असेल अशी आशाच नाही,... माहीतिये मागच्यावेळी त्याने मला वेलिग्टन बुट्स घेतले होते( चिखलात घालतत ते रबरी बुट्) सो फ़नी न स्ट्रेंज सगळे नवरे सारखेच्) प्रत्येकिच्या मनात असते नवर्याने नवरेपण एक दिवस तरी टाकुन द्यावे पण अह... कमाल आहे बायकांच्या पेशसची माझा नवरा म्हनतो तुला सगळ्यांनी लहानच ठेवलय म्हनजे त्याला म्हणायचे असते तु आतातरी सुधर तीशी आलीये मुलीसरखे वागणे बरे नाही आणि एथे इग्ल्ण्ड्ला साठ वर्शाच्या आज्जीला आंटी सुद्धा म्हणु नको नाहीतर त्यांना राग येइल हे सांगायला मात्र तो विसरत नाही) परत विषयाकडे सध्या इथल्या सगळ्या वातावरणात रोमान्स भरलाय गुलाबी थंडीत गुलाबी व्हाॅ डे ची तयारी शिगेवर पोहचलीये दारातल्या चेरीच्या झाडाला गुलाबी कोंब फ़ुटलेत सगळीकडे गुलाबी गंध पसरलाय माझ्या तमाम गृहीणी पद मिरवणार्या सख्या आपापली कर्तव्ये आस्थेने पार पाडित आनदी राहतील मग कित्येक व्हलेन्टाइन येतील आणि कधीगोड कधी कडु जातील त्या सगळ्यांना माझ्याकडुन शुभेच्छा जग जवळ येतेय आणि प्रेमात काय आमचे सण तुमचे सण, ज्यांना प्रेम करायचे आहे ज्यांनी केले आहे जे जिसे हम भुलना चाहे म्हणनार आहेत त्यांना देखील हा डे प्रेमळ्पणे जाओ( गिफ़्टवरुन न भांडता). लताजींच्या या ओळी आठवताहेत...... धड्कते है दिल कितनी आजादीयोसें बहोत मिलतेजुलते है इन वादियोसे.... तर थोडासा रुमानी हो जाये......
|
टाइप होतेय का बघन्यासाठी मध्येच थांबुन थोडे पोस्ट केले बाकीचे आता देतेय
|
धन्यवाद शामली... (इग्लिश शब्द इथे कशे टाइप करायचे कळतच नाही शिवाय लिहीतांना बरोबर वाटते पण टाइप होतांना कस अणि अनुस्वार गायब होतात. असे का?)
|
Vaishali, try this ... type \dev2 Then{ type your devanaagaree text here }. Then Roman Script text. Then again type \ dev2 { .... } etc.
|
मी सुचविलेली ट्रीक मीच करून पहिली and it works, I think. बापू.
|
Jayavi
| |
| Tuesday, February 14, 2006 - 1:03 am: |
| 
|
वैशाली मस्तच गं !! english शब्द लिहितांना <.....> हा कंस वापर आणि त्या कंसात तो शब्द लिही.
|
अगदी सहीच आहे. मला वाटत जगातली सर्व मुले सारखीच असतात.
|
Champak
| |
| Tuesday, February 14, 2006 - 7:01 am: |
| 
|
Rupali, tula ase mhanayala ajun thoda time he
|
Meenu
| |
| Tuesday, February 14, 2006 - 7:36 am: |
| 
|
वैशाली अनुस्वार गायब होऊ नयेत म्हणुन आधीच्या अक्षरापुढे a लिही....... आनंद aana.nd असे लिही. बाकी लिहीलयस खरच छान तु
|
चंपक हो ते मला माहित आहे रे. पण माझ्या मैत्रिणिंच्या अनुभवावरुन मी बोलत आहे.... 
|
|
|