|
Swasti
| |
| Saturday, February 11, 2006 - 8:35 am: |
| 
|
प्रिय अजित लिहिण्यास कारण Valentine Day . मन पाखरु पाखरु याचा पुरेपुर प्रत्यय काल रात्री आला गेले दोन दिवस रेडियोवर सारख्या v'day निमित्त वेगवेगळ्या contests चालु आहेत या " Love is in the air " च्य वातावरणावर काहीच्या काही कविता लिहावी अस मनात आल. बराच वेळ विचार करुन काही तन्द्री लागेना. मग आठवल्या त्या माझ्या काही जुन्या प्रेम्-(काहीच्या काही)-कविता आणि त्यानंतर त्यांचा उगम आणि मग तुझ्या कविता आणि त्यामुळे तू. प्रेमावर लिहिलेल्या त्या अगदी काहिच्या काही कवितांना कारण होत्या तुझ्या कविता तुझ्या कवितांना उत्तर म्हणून कविता लिहायचा एक छंद लागला होता. तुझ्याशी स्पर्धा किंवा जुगलबन्दी करण हा हेतू त्यामागे कधीच नव्हता पण तुझ लिखाण वाचल की आपोआप लिहावस वाटे तु निमित्त असायचास. तुझी ओळख काहीच्या काही कविता एवढीच नव्हती. जगातल्या प्रत्येक विषयावर काव्य लिहिण्यात तुझा हातखंडा होता पान,फ़ुल,आकाश,ढग,पाउस, प्रेम,गरिबी,देश,राजकारण कशाकशावरही तु लिहायचास.(खरतर लिहितोस अस म्हटल पाहिजे). आपली इतके वर्षांची मैत्री पण फ़ार त्रोटक तु भेटायचास साहित्यातून, कधि शेर्यामधून कधी तु इतरांना दिलेल्या कौतुकच्या थापेतुन तर कधी खरबरीत कान उघडणीतून. जेव्हा जेव्हा तुझ्याबद्दल विचार करायचे नेहमी वाटायच कि तु स्कोलर दिसणारा, चस्मिस,उंच,बारीक बुद्धिजीवि प्राणि असावास. मी माझ्या जवळच्या लोकांना बरेचदा तुझ्याबद्दल सांगायचे.माझा एक मित्र तुझा उल्लेख " सागर " म्हणून करायचा संदर्भ साजन).त्यातला थट्टेचा भाग सोडला तर खरच, नकळत तुझ्या प्रतिमेच्या आणि प्रतिभेच्या प्रेमातच पडले होते मी म्हण ना एवढा प्रतिभावान कवि आपला दोस्त आहे य गोष्टिचा मला खुप गर्व होता. एकदा तुझी एक कविता office मध्ये फ़िरताफ़िरता माझ्या mail box मध्ये येउन थडकली.कोणितरी " too good!!!!!! " म्हणून ती पाठवली.संध्याकाळी मैत्रिणीला म्हटल " सकाळच्या त्या कवितेचा कवि,माझा मित्र आहे म्हणजे मी त्याला ओळखते " " wow " तिच्या उदगारात " मी " तुला ओळखते या पेक्षा मी " तुला " ओळखते याच कौतुक जास्त होत. तेन्व्हा माझ्या डोळ्यात अभिमान ओसन्डुन वाहत होता. आज फ़ारा दिवसानी काहीच्या काही त्रोटक लिहिण झाल आणि निमित्त परत तूच. ...बरच काही लिहायच मनात होत पण अचानक पुढे सुचेनास झालय काय लिहाव कळत नाही काल इतके दिवसानी तुझी आठवण आली आणि लक्षात आल गेले कित्येक महिने तु कुठेतरी गायब झाला आहेस. अरे दोस्ता, असा कसा अचानक भूमिगत झालास? चकित करण्यासाठी केव्हातरी ग्रन्ड एंट्री मार. तुझ्या नव्या कविता ऐकव admin साठी तू satyajit_m असशील काहींसाठी त्यांचा प्रिय सत्या' असशील तर कुणासाठी सत्या लेका असशील माझ्यासाठी मात्र ज़्याला कवितेच्या खेळात माझ्या माहितीत तरी अजून कोणी जिंकल नाही तो अजित च आहेस दोस्ता लवकरात लवकर परत ये ................. तुझी एक चाहती स्वस्ति
|
Champak
| |
| Saturday, February 11, 2006 - 3:01 pm: |
| 
|
aha.. .. .. .. ह्याला म्हणावे निर्व्याज्य प्रेम 
|
Giriraj
| |
| Sunday, February 12, 2006 - 9:54 am: |
| 
|
सत्या,जिकडे असशील तिकडून परत ये.. खरंच कुठे गायब आहेस?
|
वाह ..... क्या अन्दाज है !!!
|
Champak
| |
| Tuesday, February 14, 2006 - 4:40 am: |
| 
|
........ आपसे बी खुबसुरत आपके अंदाज है!
|
Ninavi
| |
| Tuesday, February 14, 2006 - 12:07 pm: |
| 
|
अरे, हे कोण अजित? कधी लिहीत होते इथे? यांच्या कवितांच्या लिंक्स आहेत का? मला वाचायला आवडतील.
|
Milindaa
| |
| Tuesday, February 14, 2006 - 4:23 pm: |
| 
|
निनावी, तुझे असले प्रश्न वाचून उगाच दुसर्याच कोणाचा तरी भास झाला जरा शोध ना, वरच्या लेखात नीट उल्लेख आहे कोण आहे त्याचा.
|
Ninavi
| |
| Tuesday, February 14, 2006 - 4:39 pm: |
| 
|
हो रे मिलिन्दा, पण त्याच्या पोस्ट्स कशा शोधायच्या? अशा आयडी वरून शोधता येतात का? ( मी सर्च मधे जाऊन शोधलं, पण मला एकच कविता सापडली) 
|
Bsa
| |
| Wednesday, February 15, 2006 - 9:29 am: |
| 
|
Enter "keyword" as "satyajit_m" & Select "Look in" as "Names of author"
|
Ninavi
| |
| Wednesday, February 15, 2006 - 9:33 am: |
| 
|
धन्यवाद, सिद्धू, मी तेच try करत होते. त्यांच्या पोस्ट्स बर्याच दिसल्या, कविता एकच सापडली. 
|
Maanus
| |
| Wednesday, February 15, 2006 - 6:12 pm: |
| 
|
बापरे, साजन ची आठवण झाली स्वस्ति, तुला माहीत असेलच पन तरी, एकदा satyajitsm ह्या id ला याहू तुन मेसेज पाठऊन बघ, बहुतेक हा त्याचा याहू मेसेंजर चा id आहे
|
|
|