Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
snacks corner: मराठी पाऊल पडते पुढे...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » ललित » snacks corner: मराठी पाऊल पडते पुढे « Previous Next »

Yog
Thursday, February 09, 2006 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी मनुष्य अजूनही मागेच आहे.. हे खर आहे, पण भित्यापाठी ब्रह्मराक्षस वगैरे या अर्थाने असे मि म्हणेन. म्हणजे अस की मराठी कार्यक्रमात वा मन्डळातून हमखास जीवाची चरफ़ड करवून घ्यायची असेल तर त्याच कारण मराठी मनुष्यच असतो असे अनुभव आले अन हे अनुभव देखिल प्रातिनिधीकच आहेत अस मिशिगन, क्लीवलॅन्ड, सॅन डियेगो, पासून थेट LA पर्यन्त हाच प्रकार आहे असे म्हणावे लागेल. जर्सी अन शिकागो याबाबतीत दोन पावले पुढेच असतील असे धरून चालू. दिन्डी खेळल्यागत NJ चे GTG मगे पुढे होतात किव्वा ठरतात मोडतात. चालायचच, इतकी टाळकी एकत्र यायची म्हणजे कुणीतरी कुणाच्या तरी तालावर नाचावच लागत.
तर मुद्दा असा की नुकतेच Los Angeles मराठी मन्डळाच्या सन्क्रान्तीच्या कार्यक्रमाला अन्ताक्शरी चा कार्यक्रम किव्वा स्पर्धा म्हणा हव तर घ्यायला गेलो होतो. San Diego हून आम्ही चार जण गेलो होतो अन बरोबर कुणी female co host मिळाली नसल्याने गरज पडली तर यमुनाजळी खेळु खेळ कन्हैया अशी मादक स्त्रीसुलभ गाणी जरा मीच practice करून ठेवली होती. लग्नापूर्वी एक बरे होते co host निवडण्याच स्वातन्त्र्य होत, लग्नानन्तर मात्र अशा बर्‍याचश्या eye dolls आमच्या सौच्या चाळणितून गळून पडतात्(गाणारीचा गळा पहायचा नसतो हे तीला अजून कळत नाही) तेव्हा आताशा एकला चलो रे म्हणत कार्यक्रम होतात अर्थात सौ च बारीक लक्ष असत हे माहित असल्याने बर्‍याच गोष्टी आकरसल्यागत आवरत्या घ्याव्या लागतात.

तर अर्थात ज्या आयोजक मित्रानी खास बोलावले त्यानी LA चे श्रोते अती थोर किव्वा हीच ती मराठी गायकांची मक्का अस काहितरी कानात भरवल्यामूळे अपार अपेक्षान्च ओझ(आमच्या रन्गमन्चावरील पेटी,तबला, key board , या तत्सम सर्व उपकरणांपेक्षा ते अधिक वाटत होत) घेवून आम्ही दोन अधिक दोन असे दाखल झालो. आता नाटकाच्या प्रयोगासाठी सुसज्ज असे audi अन दिमतीला तिथलेच दोन sound techs असल्यावर चिन्ता कशाला..? पण अन्ताक्शरीला सुरुवात करण्याआधी लक्षात आल की on stage monitor दिले गेले नव्ह्ते. थोडक्यात प्रेक्षागृहातील प्रेक्षकांना ज्यातून ऐकू येत ते speakers पण मन्चावरील स्पर्धक वा गायकांना आपसात ऐकू येण्यासाठी लागतात ते monitors . हा एक विचित्र अनुभव असतो monitor शिवाय गायच म्हणजे अर्धमूकबधिर म्हटल तरी चालेल. आपण गातो बोलतो ते लोकाना ऐकू येत आपल्याला नाही(भल्या भल्या गायकान्चा कार्यक्रम पाडायचा असेल तर ही एक महान क्लुप्ती आहे. यासारख्या इतर अनेक तान्त्रीक तृटीन्मूळे अनेक open air shows मधे आघाडीचे नामान्कीत गायक कधी कधी चक्क बेसूर वगैरे गाताना ऐकले आहे) आता अन्ताक्शरी म्हटली म्हणजे सर्वाना नियम सान्गण, मधेच थट्टा मस्करी करण हेही आल.

अन्ताक्शरी सुरू करून देण्यासाठी पहिली माझी दोन गाणी म्हणत असतानाच मलाच music ऐकू आले नव्हते तेव्हा पुढे LA मन्डळाने पानात आग्रहाने काय गम्मत वाढून ठेवली आहे हे लक्षात आलच होत. सुदैवाने म्हणा असा अर्धमूकबधीर प्रत्त्यय पूर्वीही उपरोल्लेखीत इतर मन्डळातूनही आला असल्याने नेमक काय कराव, कान कुठे लावावा(पार्श्वसन्गीत किव्वा वाद्यव्रुन्दाने वाजवलेले कसे ऐकावे या अर्थी)हे ठावूक होत, म्हणजे वेळ मारून नेता येत होती पण मन्चावरील बिचार्‍या स्पर्धक आणी वादकान्च काय? त्यातही काही स्पर्धक मन्चावर येताना प्रेक्षागृहातून स्टेज वर जणू आशा, लता, गेला बाजार सुनिधी चौहान वगैरे आल्यागत टाळ्या पडल्याच होत्या त्या ऐकून आमचे वादक चमू मात्र भलतेच खुष झाले होते की मैफ़ील छान रन्गणार. पण एकन्दरीत त्या अर्धमूकबधीर पणामूळे मगाशी फ़ुरफ़ुरलेले तबलेवाल्याचे बाहू एकदम खुरडल्यागत दिसत होते. (तरी key board वाल्याला म्हटले होते, लेका तुझ्या key board च्या self-speakers पुढे इथला माइक ठेव, म्हणजे तुलाही ऐकायला येईल. पण direct audi speakers ला output दिल्याने त्याचा सूर त्यालाच ऐकू येईना..)
त्यातूनही स्वताच्या गाण्याच्या वेळी जरा प्रेक्षकाना टाळ्या वाजवायला(ताल धरायला) मी प्रव्रुत्त केले तर त्या दिडशेच्या समुदायाने एकदम बुद्धिबळाच्या घोड्यागत अडिचकीच्या पटीत टाळ्या वाजवून माला चारी मुन्ड्या चीत केले म्हणजे जे थोडे फ़ार background music ऐकू येत होते त्यावर आप्ल्या अडीच टाळ्यान्ची कुरघोडी करून लोकानी माझी ताल अन सुराची बोलतीच बन्द केली, थोडक्यात ते गाणे कसे बसे आवरते घेवून अन्ताक्शरीला सुरुवात झाली. (सुरुवातीलाच असा पायावर धोन्डा मारून घेतल्यावर पुढे फ़ूक फ़ूक के कदम ठेवायचे हे लक्षात आलेच होते)
मला काही प्रश्ण पडले आहेत ज्याची उत्तरे माझ्याकडे नाहीत :
हातातील माईक तोन्डापासून चार फ़ूट लाम्ब लक्षुमण रेषा असल्यागत, किव्वा आपल्या कारट्याला हृदयाशी कवटाळल्यागत धरून लोक का गातात? पुन्हा पुन्हा विनन्ती करूनही माईक तोन्डा जवळ न घेण्यामागे काय भिती असते? नको बाई उगाच आपला आवाज कसा येईल वगैरे अशी भीड असते का? नाही म्हणजे मन्चावर गायच तर आवाज लोकाना ऐकायलाच यायला हवा ना?
अन्ताक्शरी खर तर सर्वानी धम्माल मजा करत खेळायची असते मग शेजारच्या जोशी काकूना गाणे येत असले म्हणून बाजूच्या जाधवान्नी सुतक असल्यागत चेहेरा का बरे करावा..?
आता हिन्दि बरोबरच मराठी गाणी ठेवायची(त्यातूनही जी लोकाना माहीत आहेत तशी) तर ऐरणीच्या देवा तुला पासून शुक्र तारा शिवाय आपल्याकडे काही नविन मटेरियल आहे का हो..? तेच तेच दळण दळावच लागत. पुन्हा समईच्या शुभ्र कळ्या किव्वा केव्हातरी पहाटे अशी गाणे म्हणून आपले गुणदर्शन करण्यास अन्ताक्शरी नसते हे मी सान्गायला हवे का..?
गोमू सन्गतीन माझ्या तू येशील काय सारखी गाणी लागतात त्यातही ही पहिली ओळ मि म्हटल्यावर मन्चावर येवून " आर सन्गतीन तुझ्या मि येणार न्हाय " ची female line ठसक्यात म्हणण्याऐवेजी पुन्हा माझीच ओळ गावून मला भयचकीत करण्याचे सौजन्य एका बाईन्नी दाखवले ते वेगळेच. (अर्थात मन्चावर येवून तेच काय पण एक ओळ म्हणणे ही अवघड असते अणि त्याबदल त्यान्चे कौतूक. प्रेक्षकात बसून टिका करणे खूप सोपे पण गाण म्हण म्हटल की दन्तवैद्याच्या खुर्चित भितीने बसल्यागत अशा लोकान्ची दातखिळी बसते.).
ज्यान्ना सन्गीतातले कळते त्यानी प्रेक्षकात राहून स्पर्धकाना पुणेरी टोमणे मारण्यापेक्षा मन्चावर येवून गळा उघडला तर आभाळ कोसळेल काय...?

असो. हे प्रश्ण कालातीत आहेत. ओळ चुकीची म्हटली आहे असे म्हटल्यावर तर चक्क एक दोन महिला स्पर्धकानी मेरी झाशी नही दून्गी थाटात, नाही माझे गाणे बरोबर आहे म्हणून मलाच सम्भ्रमीत केले. तरिही पुन्हा म्हणते म्हणून एका काकूनी तीच चुकीची ओळ मात्र मला वेगवेगळ्या रागात सुरेलपणे गावून दाखवली तेव्हा त्यान्चही कौतूक. खर तर तो क्शण मी सर्वात जास्त enjoy केला.
उपरोल्लेखित अर्धमूकबधिर पणामूळे मि काय बोलतो हे मन्चावर स्पर्धकाना व्यवस्थित ऐकू येत नव्हते, ते काय गातात हे वाद्यव्रून्दास ऐकू येत नव्हते अन तिकडे प्रेक्षक मात्र मस्तपैकी आरोळ्या देतच होते. अर्थात या सर्वाची अगदी पूर्वापारपासून सवय असल्याने(म्हणजे college मधे गाणे म्हणताना मुलगी मधेच थाम्बली किव्वा अडखळली की, " तन्दुरुस्ती की रक्षा करता है लाईफ़बॉय " ची जाहीरात मोठ्याने म्हणणारे टवाळ प्रेक्षक पासून ते इकडे काही कार्यक्रमात भक्तीसन्गीत म्हणत असतान मधेच बाबूजीन्ची गाणि म्हणा असे चक्क पुढील रान्गेत बसून ओरडणारे सदगृहस्त(पुणेरीच असतात बरेच वेळा)इथपर्यन्त) खर तर मन्चावरून हा गोन्धळ enjoy करत होतो. अर्थातच कार्यक्रमालाही त्यामूळे आपसूकच एक comedy/cool factor प्राप्त झालाच होता.
पण नन्तरच्या अभिप्रायावरून एकन्दरीत सादरीकरण अन कार्यक्रम सर्वाना खूप आवडला असे लोकानी येवून सान्गितले तेव्हा मात्र मि बुचकळ्यात पडलो होतो. माझ्या दृष्टीने आजपर्यन्त केलेल्या कार्यक्रमातील हा सर्वात वाईट अणि पडलेला अन्ताक्शरीचा कार्यक्रम आम्हा गायक व वादकान्च्या दृष्टीने होता.
पण एकदा मन्चावर गेलो की आपल किव्वा कलाकाराच काम फ़क्त प्रेक्षकान्ची करमणूक करण(चान्गल्या अर्थाने) हे तत्व गेले कित्त्येक वर्षे डोक्यात पक्क बसवलेल असल्याने शेवटी प्रेक्षकाना आवडला तर चान्गला झाला असेल कार्यक्रम म्हणून मीच माझी समजू घातली.

अन एकन्दरीत करमणुकीला अनुसरूनच शेवटचे गाणे झाले. असे की प्रेक्षकातील एका बाईने येवून शूर आम्ही सरदार आम्हाला हे गीत म्हणायची फ़र्माईश एका स्पर्धक जोडीला केली. अन त्या वेळी आधीच भूकेने व्याकुळ प्रेक्षक चक्क प्रेक्षागृह सोडून जात असलेले पाहून धाय मोकलून रडल्यागत त्या स्पर्धक जोडीने त्या गीताच्या दोन ओळी म्हटल्या. याही वेळी इतर स्पर्धक त्याच्याशी आमचे काहीही देणे घेणे नाही या थाटात माईकला टेबलावर आडवा झोपवून बाहेर जेवायला जाणार्‍या गर्दीकडे हताशपणे पहात होते. शूर आम्ही सरदार आम्हालाच अस अन्गाई गीत बनवलेल मी याची देही याची डोळा तिथे अनुभवताना कणि मोडलेल्या पतन्गागत एकदम कापला गेलो. पतन्ग बदवणे अन कापणे यातला फ़रक कळल्यागत सभागृहाचे दिवे लागले. (अन्ताक्शरीला बझर राऊन्ड सारखीच फ़ेरी असल्याने तिथे आम्ही बझर च्या जागी रन्गीत दिवे वापरले होते. तेव्हा नियम सान्गताना " दिवे लावा " असे चेष्टेने म्हटले तर मन्डळीन्नी खरच दिवे लावले की. एक दोन अपवाद सोडता स्पर्धक चान्गले गायक आहेत यावर अजूनही विश्वास बसत नाही.)

हा मात्र एक खरे आहे सौ बरोबर असण्याचा एक भलताच फ़ायदा झाला. असे की अनवधानाने म्हणा तिला मि प्रेक्षकातील एक म्हणून बसवले होते(यात कुठलेही sting operation करण्याचा उद्देश नव्हता) ती अन तीची मैत्रीण्(जीचा नवरा keyboard वादक होता) अशा प्रेक्षकात असल्याने सर्व भल्या बुर्या comments ऐकल्या अन प्रसन्गी त्या keyboard वाल्याच्या बयकोने तीची भवानी तलवार अर्धी बाहेर काढली होती असे मला कळले.(त्याची बायको सान्गली कोल्हापूरकडची आहे हे खास नमूद करतो)थोडक्यात मन्चावरील कलाकारानी किती श्रम घेतले असतील किव्वा स्पर्धकाना उत्तेजन देण्याचे भान न ठेवता उलट नुसतेच comments करणे यात एक कम्पू तरबेज होता. अर्थातच तेही मराठीच लोक. गम्मत म्हणजे इतका वेळ प्रेक्षागृहात बसून माझ्यावर छान तोन्डसुख घेणारी एक मायबोलीकरीण नन्तर सौ शी मि ओळख करून दिली तेव्हा ओशाळल्यागत वाटली. कारण तीच्या बाजूला माझी सौ बसली आहे हे बहुदा त्याना आधी ठावुक नव्हते. मग दुर्दैवाने असे सत्त्य अचानक समोर येताच " आम्ही तुला मस्त वाईट वाईट बोललो " अशी तिने एक लाडीक कबुली दिली. मस्त शब्द टाकून मि फ़सेन असे बहुदा तिला वाटले असावे. अर्थात त्यामूळे मी काही रागावलो नाही अन मिही ते खेळकरपणे स्विकारले आहे पण पुढे मागे त्या मायबोली भगिनी भेटल्याच तर त्याना फ़क्त आमच्या सौ ला मेहूण म्हणून दोघान्च्या वाटच डबल जेवण घालाव लागेल तरच त्यान्ची पापं धुतली जाण्याची मला शक्यता वाटते आहे.

इतके अथक परिश्रम केल्यावर audi बाहेर रान्गेत, पापड झालेल्या थन्ड पुर्‍या, तेही उभे राहून तोडताना आणि चतकोरीत दुमडलेली थन्ड तपकिरी पोळी(जी गूळपोळी म्हणून दिली जात होती) ती घशात ढकलताना मला माझ्या मागे(आधाराला का रान्गेत?)किती मराठी माणसे उभी आहेत हे पाहून कृतकृत्त्य वाटले. फ़ूल ना फ़ुलाची पाकळी म्हणून मन्डळाने दिलेले ते फ़ुकटचे जेवण जेवल्यावर भूक भागवण्यासाठी चक्क artesia (थोडक्यात LA मधली देशी खाऊ गल्ली) किती लाम्ब आहे असे मी माझ्या संयोजक मित्रालाच विचारले तेव्हा बहुतेक माझ्या प्रश्णातील काकुळती लक्षात न आल्याने त्यानेही प्रान्जळपणे अरे artesia आता बन्द झाले सान्गून मला गहिवरून सोडले.

असो. या कार्यक्रमाच्या एक आठवडाच आधी san diego मधे सव्वीस जानेवारीच्या समारभात मस्त दोन तास मि रन्गवलेली मैफ़ील ऐकताना अतीशय शिस्तीत बसलेले, कौतूक करणारे, दाद देणारे, अगदी मनापासून किशोरदान्च्या गाण्याची फ़र्माईश करणारे बहुतांशी अमराठी लोक अनुभवले असल्याने त्या पार्शभूमीवर LA च्या आपल्याच मन्डळीनी मात्र स्नक्रान्तीच वाण लुटण्या ऐवेजी बोलावून आमचा आवाज अन भूक लुटली अशी तीव्र नाराजी सौकडे व्यक्त करून घरी आल्यावर तीच्या कुशीत मस्तपैकी ताणून दिली.

एक मात्र लक्षात आल की गेल्या सहा वर्शात कुठल्याही मराठी मन्डळाशी निगडीत काही गोष्टी बदलत नाहीत :
लोकान्चे कटाक्शाने कार्यक्रमाला वेळेवर न येणे.
जेवणाच्या आसपास कार्यक्रमात हजर होणे.
कुठलाही कार्यक्रम असो प्रेक्षकात बसून टवाळक्या जमलच तर बडबड करणे. (स्पर्धकातील काहीन्ची मूले मात्र गीतावर, तालावर डोलत होती हे विशेष नमूद करावेसे वाटते.)
अन सर्वात महत्वाचे म्हणजे नको तिथे काटकसर करणे, म्हणजे पाचशे रुपयाचे सभागृह घेवून दहा रुपयाच्या monitor साठी हात मागे घेणे(हे म्हणजे दिवाळीत पोराला मस्त रोषणाईचे महागडे फ़टाके आणून द्यायचे अन मग " आता एका लवन्गी माळेचा हट्ट करशील तर याद राख " असे दरडावायचे)
स्पर्धेत मोठे लोक बरेच वेळा आपले वय विसरून लहान असल्यागत वागतात अन निदान अमेरिकेत तरी मराठी कार्यक्रम हे एक्मेकानी मिळून एकत्र मजा लुटत पार पाडायचे असतात हे विसरतात.
प्रवेशद्वारावरील सोळाशृन्गारात जडलेल्या युवतीनी नमस्कार! तीळगूळ घ्या गोड बोला! किवा जमलच तर एक गोड हसू देवून कुठून आलात, नाव काय इतके विचारले तरी मराठी मनुष्य इमान राखून flat होतो. सौन्दर्य साखरेच्या पाकात वाढल की सामान्य मराठी माणसाला मधुमेह होतोच होतो. तेव्हा दोन गोड शब्द बोलायला हरकत नाही.
पन्जाबी खोटा नखरा, नाचणे अन चार चौघात उधळणे हे मराठी माणसाच्या रक्तात नसते पण म्हणून दादा कोन्डके अन उशा चव्हाण च गाण किव्वा तडक फ़डक लावणी चालू झाल्यावर निदान उत्साहाने टाळ्या वाजवण इतपत मराठी सन्गिताशी जवळीक आपण दाखवू शकतो, पण त्याहीसाठी दुसरा किवा बाजूचा टाळी वाजवत नाही तोवर आपण हलायचे नाही असा अलिखीत करार असतो.
आभारप्रदर्शन कटाक्शाने टाळायचे असते. (कार्यक्रम सम्पला आता घरी जा इतके चार शब्दही बोलायची सय्योजकाना गरज नसते कारण तोपर्यन्त सभागृहातील प्रेक्षक बाहेर जेवणाच्या रान्गेत नाहिसे झालेले असतात्)

अन काही जमेच्या बाजू :
sorry we didn't give you sound(monitor) on stage. we knew it would be big problem for you guys, but the people here told us that we don't need monitors इती ध्वनीव्याव्सथा हाताळणारे दोन गोरे(अमेरिकन).
सन्गीत क्षेत्रातील काही खर्‍या रसीक अन professional artists शी झालेली ओळख अन मैत्री.(अहो तो तबला, keyboard अन स्पर्धकान्च गाण सर्व वेगवेगळ्या पट्टीत वाजत होत अस खास मन्चावर येवून सान्गणारे एक ज्येष्ट व्यक्तीमत्व!)
सर्व काम, व्याप, जबाबदार्‍या सम्भाळून आपल्या परीने मराठी समाजासाठी असे कार्यक्रम आयोजीत करणारे मन्डळाचे कार्यकर्ते.

तरी एकदा आमाच्या san diego च्या कार्यक्रमाना याच अस खास आग्रहाच अन हक्काच आमन्त्रण!

(कोण म्हणतो मराठी मनुष्य अजूनही मागेच आहे? गुलाबाचे टाटू(ताटवे म्हणायच आहे) मनामनात फ़ुलत आहेत ते काय कमी आहे? मराठी स्त्री san diego तील तर नक्कीच एक पाऊल पुढे आहे. आमच्या अन्ताक्शरी कार्यक्रमात एका सौने नवर्‍याला बजावल होत, तुम्ही फ़क्त दिवा लावा( buzzer round ) मी गाते, उगाच तोन्ड उघडलत तर बघाच. तो निमूट शेवटपर्यन्त दिव्यावर हात ठेवून होता, अन अर्थातच तीच स्पर्धक जोडी जिन्कली हे वेगळे सान्गायला नकोच.):-)


Limbutimbu
Thursday, February 09, 2006 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> पुन्हा पुन्हा विनन्ती करूनही माईक तोन्डा जवळ न घेण्यामागे काय भिती असते?
आरे माईक तोन्डाम्होर धरला तर समोरच्याला आपल तोन्ड कस दिसणार? म्हणुन तसा धरत न्हाईत
अन ती " मस्त वाईट बोलणारी " मायबोलीकरीण कोण रे भो? सान्गुनच टाक बर नाव!


Asami
Friday, February 10, 2006 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tI maayabaÜlaIkrINa yao]na Aata AlaIkDcaI - other side of the story ilahIla baGa ro.

yaÜga evhZa frustrate Jaalaasa Æ


Bee
Friday, February 10, 2006 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामि, शब्दांचा अर्थ ह्या बीबीवर मी तुझ्या नावाचा अर्थ विचारला आहे. तुला वेळ मिळाल्यास बघ जरा

Vaatsaru
Friday, February 10, 2006 - 8:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

yaÜga Aro ho tr kahIca naahIÊ [qao Boston cyaa marazI maMDLat Aalaasa tr tulaa laoKmaalaa ilahavaI laagaola :-)

Mumbhai
Saturday, February 11, 2006 - 3:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो अशी टिका करु नका ... अनंत अडचणी असतात. पैसे तर नेहमीच कमी असतात. आपण स्वतः कार्यक्रम आयोजित करणे वेगळे आणि कामाचा व्याप सांभाळत असे कार्यक्रम घडवुन आणणे वेगळे. अनेक लोकांना सांभाळत हे सर्व करावे लागते. अनुभव घ्यायचा तर एखाद्या वर्षी कार्यकर्ता म्हणुन काम करुन बघा.

Yog
Saturday, February 11, 2006 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mumbhai,
इतरांचे माहित नाही पण michgan, cleveland आणि आता san diego च्या मन्डळातून सक्रीय काम करतानाही मला आलेले अनुभव सारखेच आहेत. त्यात टीकेचा तितकासा हेतू नसला तरी अनेक गोष्टीत अजूनही शिथीलता किव्वा अल्पसमाधानी प्रवृत्ती जाणवते अन मग त्यातून असे बरेच गमतीशीर प्रकार घडतात!
(आता कुणी म्हणेल मला या लेखात विनोद वा उपरोध काहीच जाणवला नाही तो भाग वेगळा):-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators