|  
     दरवाजा वाजला म्हणून कुणीतरी दार उघडलं.    मी सहजच माझ्या खोलीच्या खिडकितून पाहिलं तर....    तर...दरवाजात साक्षात  "ती " दिसली. पहिल्यांदा वाटलं भास आहे. पण खरोखरच तीच होती.    ती आत येत असतांनाच लख्खपणे तिच्या गळ्यातले मंगळ्सुत्र मला दिसले. कितीही नाहि म्हटले तरी कुठेतरी एक बारिकशी सुक्ष्म कळ येऊन गेली.    मी उठून जाणारच होतो बाहेर. पण मग झरझर माझ्या चेहर्यवरचे भाव बदलत गेले. आधी तिच्या येण्याने आनदलेलो मी लगेच दुखावलो गेलो.    पण त्याच वेळी ती आली ह्याचं समाधानही वाटलं.    ती सरळ माझ्या खोलीकडेच आली. मी उगीचच आजुबाजूला पाहिलं.    आज विशेष म्हणजे सकाळपासुनच दादा आणि बाबा माझ्याच खोलीत बसलेले होते. त्यांच्या चर्येवर काहितरी चिंता स्पष्ट दिसत होती. पण मी त्यांना छेडले नाही.    तिने सावकाश माझ्या खोलीत पाय ठेवला. उंबरा ओलांडताना तिची पावले जरा अडखळली. पण ती अखेर आत आली.    ती आत आल्याचे बघताच दादा आणि बाबा एक अवाक्षरही न बोलता लगेच ऊठून बाहेर गेले. आता तेथे फक्त मी आणि ती असे दोघेच होतो.    किती किती वर्षांपासुन मी ह्या क्षणाची वाट पाहत होतो. किती किती अन काय काय सांगायचं होतं तिला! किती किती प्रश्नांची ऊत्तरे हवी होती मला तिच्याकडुन! किती किती बोलायचं होत तिच्याशी    पण आता ह्या क्षणी मात्र मी गप्पच राहिलो. ती एव्हाना आत येऊन उभी राहिली होती आणि सरळ माझ्याकडेच बघत होती. पण अंतर्यामी दुखावला गेलेल्या मी जाणुनबुजून तिच्याकडे दुर्लक्ष केलं.    ती माझ्या पलंगाजवळ येऊन उभी रहिली. पण मी साधे पायही ओढून घेतले नाही. क्षणभर वाट पाहून ती तिथेच पलंगाच्या कोपर्यावर अवघडून बसली. मी सरळ सरळ मझी नजर दुसरीकडे वळविली.     असेच काहि नि:शब्द क्षण गेले.    तिने हळुच तिचा हात माझ्या पायावर ठेवला. मी निर्विकारच होतो. मग ती हलकेच पाय थोपटायला लागली. मी तिक्ष्णपणे माझी नजर तिच्या नजरेला भिडविली.     माझ्या नजरेत काय नव्हतं. तीव्र संताप, अपार प्रेम, टोकाची असुया, लाथाडलो गेल्याचा अपमान, तिच्याबद्दल वाटणारी कळकळ....    पण माझी ती विखारी नजर पाहूनही ती शांतच होती. उलट तिच्या डोळ्यांत मला कशी अपराधीपणाचि भावना जाणवली.    आणि माझा अहंकार थोडा सुखावला. पण मी तरीही माझा अडेलपणा सोडला नाही. मी तिला नजरेनेच जाळत राहिलो.    तिच्या डोळ्यांत आसवांचे टपोरे मोती गोळा झाले. अगदी तिने गळ्यातल्या गळ्यात दाबलेला हुंदकाहि मला स्पष्टपणे ऐकू आला.    मग मात्र मला राहवलं नाहि.    मी त्वेषाने तिला विचारलं,  "का, का केलस गं तु अस? माझा नेमका दोष तरी काय होता?     तुझ्यावर मनापासून प्रेम केलं हा कि तुझ्यासोबत भावी जीवनाची स्वप्नं पाहिली हा? "    तिच्याकडुन ऊत्तर आले नाही. फक्त तिच्या डोळ्यांतले अश्रू गालांवरून ओघळून माझ्या पायावर पडले.     "अग आता कितीही रडून काय उपयोग होणारय. गेलेली वेळ आता परत येणार नाहीये. "मी.    तिच्या अशा शांत असण्याने माझा मात्र संताप वाढतच होता. माझ्या छोट्या-छोट्या गोष्टिंवर चिडणारी ती हिच का असं मला वाटून गेलं. लग्न झाल्यावर माणूस एवढा बदलत असेल!    ती अजूनही माझ्या पायावर हात फिरवतच होती. मी तिरीमिरीतच माझा पाय खस्सकन मागे ओढला. तरीहि ही शांतच.    मी आता मात्र स्वता:वर संयम राखू शकलो नाही. जरा जोरातच मी तिला म्हणालो,  "अगं, असा अबोलाच धरायचा होता तर आता तरी कशाला आलीस. तू आतापर्यंत दिला तेवढा मनस्ताप पुरे आहे. तु दिलेल्या जखमा माझं आयुष्य संपलं तरी पुरतील....    ... आणि नाहिच पुरल्या तर पुन्हा तु आहेसच कि.  ... नवे घाव घालायला.    अगं, तु लग्नाला होकार देतांना एकदाहि माझा विचार केला नाहिस? कसं होईल ह्याचं. तुझ्यावाचून. "    माझा आवाज आता बराच चढला होता.    मला तीव्र संतापाने पुढे बोलवेना. इतकी वर्ष दबून राहिलेल्या मनातील जखमा भळाभळा वाहू लागल्या.    खिडकीत कुणीतरी डोकावून गेलं. आई होती.    माझा आवाज जरा जरी वरच्या पट्टीत गेला कि बिचारी घाबरायची. म्हणायची   ३४;तू बाबा शीघ्रकोपी. तूझ्या रागावण्याची भीतीच वाटते मला. "    आताही ती त्यामुळेच डोकावुन गेली असेल. काही झाले तरी एक आई आहे ती. एक स्त्री.    एक माझी आई.  आणि एक हि.  दोघीही स्त्रियाच. पण दोन टोकाच्या.    मी अजूनही पुर्ण शांत झालो नव्हतो, होणारही नव्हतो. मी जळजळीत नजरेने तिच्याकडे बघायला लागलो. तिची मान खाली झुकली होती. हळुहळू तिने मान वर केली...    ...तिच्या डोळ्यांतून झरझर आसवं गळत होती.    मलाही उमाळा दाटून आल्यासारखे वाटले.     ओल्या डोळ्यांनीच माझ्याकडे बघत ती म्हणाली,  "बोल ना रे काही तरी बोल ना! एवढा गप्प का तू? "    मी इकडे अवाक. मी हा केव्हाचा जीव थोडा थोडा करतोय. आणि हि आता म्हणते कि तू गप्प का?    आता मात्र हद्द झाली. मी रागाने थरथरू लागलो होतो.    इतक्यात तीच म्हणाली,  "कायम बोलून बोलून मला भंडावून सोडणारा तूच का रे तो!    माझ्यासाठी जीव ओवाळून टाकणारा तूच का रे तो!    माझ्या सान्निध्यात फुलून येणारा तूच ना!    मग बोल ना आता माझ्याशी!    केवळ तुझ्यासाठीच तर मी आज आलेय ना.......... "    आणि ती ओक्साबोक्शी रडू लागली.        कदाचित आमच्या भांडणाने दादा, बाबा, आई आणि आमचे काही जवळचे नातलग लगबगीने आत आले.     तिला उमाळ्यंवर उमाळे येतच होते. आईने तिच्या पाठीवर हात ठेवताच तिचा बांध फुटला.    तिला भावनांचा आवेग आवरणं अशक्य झालं तेव्हा ती उठली आणि दाराकडे पळाली.    हाच एक क्षण होता.    फक्त एक क्षण....    तिला थांबवण्याचा.    मी जीवाच्या आकांताने ओरडलो....    ...... "थांब ना.....  माझ्यासाठी........... प्लीज... "    मला एकदम मोकळं मोकळं, हलकं हलकं वाटू लागलं.    आणि अचानक आईने टाहो फोडला. तिही परत फिरली.    अरे, पण हे काय.....    मी कुठे वर वर चाललोय. आणि ते काय.......    आई माझ्या पलंगावर कुणाला कवटालून रडतेय.    अरे तो तर मीच आहे.    म्हणजे......म्हणजे.......मी जेही काही बोललो होतो ते तिच्यापर्यंत पोचलेच नाही कि काय......तरीच........    .......    ओह येस! मला गेल्याच महिन्यात भीषण अपघात झाला होता....  तिच्याच लग्नाच्या दिवशी....  त्याचवेळी आलेल्या पक्षाघाताच्या झटक्यात माझी वाचा आणि स्नायुंवरचे नियंत्रण गेले होते...   आणि मी काही दिवसांचाच सोबती उरलो होतो, नाही का!    ओह नो! म्हणजे ती.....ती फक्त मला मुक्त करण्यासाठिच आली होती    वेडी, केव्हातरी एकदा तिला गमतीत मी म्हणालो होतो कि तिला पाहिल्यानंतरच मी हे जग सोडीन.....  म्हणून ती आली होती का...?    आणि मी मात्र.......    खरअच प्रिये, तू नेहमीच मला म्हणायची की तुला मुळी मी कळलीच नाहि......    खरच प्रिये......तू खरच मला कळली नाहिस गं........   
 
  |  
Shyamli
 
 |  |  
 |  | Wednesday, February 08, 2006 - 3:58 am:    |  
 
 
 |   
  |   
 डोळे पाणावले वाचताना  रे/ग कोण आहेस तु त्याला तिला...... 
 
  |  
 सही, अवर्णनीय अगदी डोळ्यात पाणि आले... 
 
  |  
Champak
 
 |  |  
 |  | Wednesday, February 08, 2006 - 9:28 am:    |  
 
 
 |   
  |   
 fine .. .. ..
 
  |  
Ankulkarni
 
 |  |  
 |  | Wednesday, February 08, 2006 - 10:16 am:    |  
 
 
 |   
  |   
 चौकटचा राजा  अप्रतिम लिहिल आहे  अस्मिता  
 
  |  
Athak
 
 |  |  
 |  | Wednesday, February 08, 2006 - 10:34 am:    |  
 
 
 |   
  |   
 चौकटच्या राज्या  ,  निशब्द केलस प्रतिक्रियेला  
 
  |  
 श्यामली, रुपाली-राहुल, चपक, अस्मिता, अथक    प्रतिसादाबद्दल, खास करुन अनुकुल प्रतिसादाबद्दल धन्यवाद!    हि माझी पहिलीच कथा. त्यामुळे मनातून भिती वाटत होती. इतरांना आवडते की नाही म्हणून. पण तुम्हा सर्वांनीच कथा आवडल्याचे सांगितल्याने फार फार बरे वाटले.    धन्यवाद  
 
  |  
 चौकटचा राजा,पहिली कथा असली तरी खुप छान आणि आटोपशीर लिहिली आहेस...  
 
  |  
 धन्यवाद मयुरेश  !     असाच प्रतिसाद देत रहा.    लवकरच एक विनोदी लेखांची मालिका सुरू करायचा विचार करतो आहे. बघू कितपत जमतंय ते.    सर्वांचे पुन्हा एकदा आभार  !    
 
  |  
 Chaukatcha_raja तू याहू मेसेन्जरवर पण याच आयडीन अस्तो का ग/रे भो   
 
  |  
 नाही लिंबुटिंबु.    मी  " याहू मेसेंजर "  वर नसते.     
 
  |  
Megha16
 
 |  |  
 |  | Saturday, February 18, 2006 - 11:49 am:    |  
 
 
 |   
  |   
 चोकट राजा  खुप च छान कथा आहे.  वाचताना अस वाटत नाही की तुझी पहीली कथा आहे.  मेघा  
 
  |  
 
 | 
 
 
 |