|
Rga
| |
| Wednesday, February 08, 2006 - 1:32 am: |
| 
|
स्वीट थर्टी ..............आता असं समोरच्या खिडकीतुन दिसणाया तळ्याकड मी पहात बसले आहे.बदकाचा कळप लुटूलुटु चालला आहे.मी त्यात मन रमवण्याचा उगाचच प्रयत्न करत बसली आहे. माझ्या हातात नुकतच नवऱ्यान anniversary निम्मित अतिशय प्रेमान(?) शक्य तीतक्या नीरागसतेचा आव आणत दिलेला anti aging face cream चा "खास ३० वया नंतर साठी" अस label असलेला डबा आहे.गेली अनेक दिवस माझी तिशी हाकेच्या अंतरावर आली आहे ह्याची जाणिव करुन देण्यात येत आहे. या जाणिवांचा हा डबा म्हणजे एक प्रतीक आहे. ही जाणिव करुन देणाऱ्यात अगदी आईपासुन सारेच सामिल आहेत. ..............आता ३० गाठण मलाही ही फ़ार मोठ task वाटायला लागल आहे. इतर २९ वाढदीवसाचं स्वागत जाणत्या अजाणत्या वयात ज्या आनंदान केल होत तेच माझ मन ३० व्या वाढदीवसाच स्वागत करायला नाखुषच आहे.अगदी friends मधल्या रचेल सारख. ...............हा कलर चांगला दिसणार नाही तिशी नन्तर. ही style 30 नंतर चांगली दिसते. हे, हे शोभत नाही आता. आता heart ची काळजी घेतली पाहिजे.खाण्यात बदल घडवले पाहिजेत.चांगल व्याज मिळणारी गुंतवणुक,IRS वैगरे.असंख्य सल्ले,विचार नुस्ते येवुन थडकत आहेत माझ्यावर. ................मला कळत नाही वयाप्रमाणे वागायच म्हणजे नेमक आता कस? १६ व्या वर्षी गाढव ही सुंदर दिसत म्हणतात.मग तेव्हा तरी निदान मी दिसत होते का सुंदर? कि तो केवळ मला त्यावेळी वाटणारा भास होता? १८ वयाच्या आधी मी अज्ञानी होते का? १८ व्या वर्षी मी लग्ना योग्य पण झाले म्हणजे नेमक काय झाल? (बहुदा मुद्दा सोडुन भांडता यायला लागल)आणि २१ व्या वर्षी लगेचच मी माझी राजकीय मत बनवली का?बदल सहजासहजी स्विकारता येत नाहीत.पण तिशी गाठल्याने अस एवढ काय बदलणार आहे? .............आज या वळणावर उभ असताना मला माहिती आहे कि मी बरच काही achieve केलय आणि बरच काही राहुनही गेलय .पण तरीही काहितरी न मिळाल्याची हुरहुर लागावी आणि त्यातच आपण गुरफ़टुन जाव अस माझ झालय.पुढ काय होईल याची उगाचच काळजी लागुन राहिली आहे. ..............खर आहे कि, आतापर्यतच आयुष्य एक विशिष्ट तालात, लयीत घडत आलेल आहे. म्हणजे शिक्षण, नोकरी, लग्न मुल .....पण मग पुढ काय?मला हव ते सार मिळालय का? जिथ मी असायला हवे होते तिथे मी आहे का? ...........आता मला गरज आहे "३० त कस वागाव?" "३० मधल्या यशाचा महामंत्र" अशा पुस्तकाची. पण गरज असताना एकही पुस्तक सापडत नाही. ...............अलिप्त होवुन मागे वळुन बघीतल कि आपण घेतलेले निर्णय योग्य कि अयोग्य होते यांचा मनामध्ये debate सुरु होतो.चांगल काही हातुन घडलच नाही अस वाटत.भरलेल तळ्ही रित झाल्याचा भास होतो.उगाचच आईच कधितरी मन दुखावल्याच आठवत रहात. अपराधी भावनेन मन ग्रासत!! .........कित्येक चुका,घेतलेले चुकीचे निर्णय सभोवतली फ़ेर धरुन नाचायला लागतात. आणि वाटत पण खरच, आपण काही वेगळ केल असत त्यावेळी?यापेक्षा वेगळ्या वाटाची निवड केली असती का?पण त्याच उत्तर 'नाही' असच येत रहात. त्या त्या वयाला अनुसरुनच आपण वागत असतो. वेगवेगळ्या अनुभवातुन थोड शहाणपण येत जात, आणि मग मत आणि बरेचदा तत्व ही अशीच बदलत जातात.priorities change होत रहातात. ..............भोवतालच्या बदलत्या समिकरणाबरोबर जुळवुन घेताना आपल्या पीढीची खरतर थोडी दमछाकच होत आहे.compitionमध्ये टिकण्यासाठी चांगल शिक्षण,नंतर नोकरी,परदेशवारी,मग pramotions,लग्न,घर,उत्तम कार,मुल आणि हे सगळ ३० च्या आत जमवण, अस सरळ सरळ आपल्या पिढीन ग्रुहित धरलय.आणि येवढ सगळ करुनही कशाचीच शाश्वती नाही. .............आपल्याकडे थांबायला वेळ नाही.पुर्वीच्या लोकांसाठी जी स्वप्न होती ती आता आपल्यासाठी आवश्यक गोष्ट बनली आहे.जी गाडी घेण्यासाठी माझ्या वडिलाना त्यांच्या ५२ वयापर्यंत थांबाव लागलेल ती आताचा मला अगदी सहजपणे घेता येते.पण मग त्यात गम्मत वाटत नाही. म्हणुन मग हे अस वयाच बंधन घालुन घ्यायच.३० वय म्हणुणच मग अस important ठरत. स्वता कडुन स्वताच्याच अपेक्षाच ओझ बाळगणार. ........... त्या त्या वयापर्यंत काय मिळवल पाहिजे याचे जणु नियमच तयार केलेत आपण . यशस्वी, अयशस्वी, हुशार, great श्रीमंत इ.इ. असे निरनिराळे शिक्के आपण मिरवीत रहातो.माझे आइवडिल ३०च्या आत सगळ न मिळवुनही सुखी होते.त्यांना कुणीच अपयशाच लेबल चिकटवल नव्हत.खर बघायाला गेल तर कुणीच याचा हिशोब मांडत नव्हत. ........आपल्यासमोर मात्र खूप choices आहेत. बदलत्या economy मुळ अंगावर येणारी, न पेलणारी जडशीळ अशी challenges आहेत.आणि वयाची बंधनही. .........आयुष्य मग फ़ार complicated प्रश्नांच जाळच वाटायला लागत मला.इतके दिवस मला या विचाराची लाज वाटायची.मन खंतावायच.वाढत्या वयाची इतकी भिती मला का वाटते. माझ्या या दुबळेपणाचा राग ही यायचा.पण मग ते तेवढ्या पुरतच असत. ..........all appears to change when we change हे कुठतरी वाचलेल मला स्मरत.सगळयाच प्रश्नाची नाहीतरी कुठ उत्तर असतात?. आणि सगळच हव तस घडतही नसत. गुढ अज्ञाताच्या दिशेन जायच आणि ती उत्तर शोधण्याचा जमेल तसा प्रयत्न करायच मी ठरवते. मग मी माझ्या तिशीला ला जिथ असायला पाहिजे ,तिथ नसले म्हणुण काय झाल? आणि कदाचित भविष्यकाळात येणाया त्या त्या वयाच्या टप्प्यावर मी नसेनही रुढार्थान यशस्वी. पण म्हणुन काही फ़ारस बिघडणार नाही.सगळ्याचेच plans change होत रहातात.नियम मोडतात,बदलतात.शिक्के फ़िकट होत जातात. शेवटी प्रवास कसा केला हे मह्त्वाच. ...........आता नाही वाटत तितकी भीती भविष्याची. आणि तिशी ची ही . जगण्याची अनिवार उर्मी दाटुन येते. असंख्य करायच्या गोष्टीची यादी समोर तयार होते. नविन गोल्स सेट होतात. नविन challenges माझ्या भोवती रुंजी घालतात. मी थोड तळ्याकाठी विसावते आणि मग पुन्हा आनंदान चालतच रहाते.जमेल तस गुणासकट, दोषासह जगायला सुरुवात करते.विस्कटलेली लय परत पुर्वी सारखी साधत जाते. ..........शेवटी आयुष्य काही नेहमीच सुरेख रंगीबेरंगी वेष्टणात गुंडाळलेल,नीटनेटक birth day present असणार नाही. होय ना?
|
Rga
| |
| Wednesday, February 08, 2006 - 1:37 am: |
| 
|
प्रथमतहा मेमरीस्टिक वाचल्याबद्दल तुम्हा सगळ्याचे आभार. पमा ,चिन्नु फ़ोटॊ लवकरच पाठवीन.
|
Chinnu
| |
| Wednesday, February 08, 2006 - 9:15 am: |
| 
|
फ़ार छान लिहिता हो तुम्ही! फ़ोटो नक्कि पाठवा!
|
Lalu
| |
| Wednesday, February 08, 2006 - 9:42 am: |
| 
|
वाह, सुरेख! अजून तिशीच गाठली आहे तरी एवढी समज आली हीच मोठी achievement!
|
Chafa
| |
| Wednesday, February 08, 2006 - 9:43 am: |
| 
|
चांगलं लिहीलंय पण थोडं त्रोटक वाटलं.
|
Hawa_hawai
| |
| Wednesday, February 08, 2006 - 11:03 am: |
| 
|
मला नाही त्रोटक वाटलं. उगीच पाल्हाळ नाही त्यामुळे उलट छान वाटलं वाचायला. मस्त Rga
|
Maitreyee
| |
| Wednesday, February 08, 2006 - 11:22 am: |
| 
|
मस्त लिहिलय! मला लालू सारखेच वाटले. मी एवढा विचार वय ४० च्या जवळ आल्यावर करेन बहुधा 
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 08, 2006 - 12:23 pm: |
| 
|
छान आहे. आजकाल प्रौढपण लवकरच येतं, आज तीशीत ऊद्या विशीतही येईल.
|
Bee
| |
| Wednesday, February 08, 2006 - 12:24 pm: |
| 
|
RGA- लिहिल छान आहे, पण एकाएकी आलेली अशी मरगळ अगदी एका झटक्यात दूर होत नाही. कदाचित तू हे खूप काळ अनुभवल असेल पण इथे सांगताना हे पर्व लगेच संपल्यासारखे जाणवले. me going through same phase really... more difficult to express! but I think everyone goes thro it only thing he/she might not realize it.
|
Hems
| |
| Wednesday, February 08, 2006 - 12:38 pm: |
| 
|
असा विचार मांडायचा मोकळेपणा ही पण तिशीचीच देन बरं का !! छान लिहिलयस rga!
|
Paragkan
| |
| Wednesday, February 08, 2006 - 2:02 pm: |
| 
|
वाह .... छानच लिहिलं आहेस.
|
Kalandar77
| |
| Wednesday, February 08, 2006 - 2:55 pm: |
| 
|
Rga, छान!
|
Mvrushali
| |
| Wednesday, February 08, 2006 - 7:29 pm: |
| 
|
आवडलं आणि अगदी पटलंही
|
Yog
| |
| Wednesday, February 08, 2006 - 10:12 pm: |
| 
|
Rga, " शेवटी प्रवास कसा केला हे महत्वाच " ... छान लिहीलय
|
Charu_ag
| |
| Thursday, February 09, 2006 - 2:22 am: |
| 
|
Rga , वाह, खुप सुंदर लिहीलयस.
|
Champak
| |
| Thursday, February 09, 2006 - 3:24 am: |
| 
|
fine .. .. ..
|
Moodi
| |
| Thursday, February 09, 2006 - 4:45 am: |
| 
|
अगदी सहज बोलता बोलता हे लिहीलय असे वाटतय. खुपच छान लिहीलस ग. अजुन येऊ दे. शेवटच्या लाईनी तर फारच मस्त. उपमा छान देतेस. 
|
आरजीए, मुद्द्याच लिहिल हेस ग! ) तुझ वाचुन आता मला पण लिहावस वाटू लागल हे! काय लिहू ग मुडी? विशी लिहू? की गद्धेपन्चविशी चालेल? तिशी तर हिनच लिहिली हे, मी चाळीशीचा विचार करु का? की पन्चेचाळिस? पन्नाशी नको बाबा! झेपायची नाही! अन साठीला तर शान्तच उरकुन टाकावी लागणार TP बद्दल साॅरी पण सहज सुचल म्हणुन! 
|
पन्नाशीच लिंबुटिंबु अस लिवा की दाजी
|
|
|