Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 07, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » विनोदी साहित्य » विडंबन » Archive through February 07, 2006 « Previous Next »

Prasadmokashi
Monday, January 30, 2006 - 11:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चुकले का हो ? वर आधारीत...

( लग्न केले ते ) चुकले का हो ?

मी सासूला त्रास म्हणालो, चुकले का हो ?
साल्याला बकवास म्हणालो, चुकले का हो ?

नवरोबाला जगण्यासाठी काय लागते ?
तुकड्यांना सुग्रास म्हणालो, चुकले का हो ?

गोकुळीच्या राधेसम माझी दिसते साली
" खेळूया का रास? " म्हणालो, चुकले का हो ?

श्वशूर सारे शब्द झेलती अर्धांगीचे
" ठेऊन द्या बिंधास !" म्हणालो, चुकले का हो ?

एकामागून एक मागण्या यांच्या येती
गुणगुणणारे डास म्हणालो, चुकले का हो ?

सोने मोती महाग साड्या, खिसा फाटका
पुरे आत हव्यास म्हणालो, चुकले का हो ?

घरात माझ्या सदैव असतो, यांचा डेरा
नरकाचा आभास म्हणालो, चुकले का हो ?

जन्मठेप ही, यातून आता सुटणे नाही
" देता का मज फास ?" म्हणालो, चुकले का हो ?

~ प्रसाद


Hems
Tuesday, January 31, 2006 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच रे प्रसाद ! माघाची सुरुवात इथेही दिग्गजांकडूनच की !

आणि हो -- मूळ कविता लाजवाब आहे ! link दिल्याबद्दल आभार !


Vaibhav_joshi
Tuesday, January 31, 2006 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा ... क्या बात है ...

" थोर ह्या विडंबनास म्हणालो , चुकले का हो ? "


Psg
Tuesday, January 31, 2006 - 2:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, अजिबात चुकले नाही.. :-) आज फार दिवसांनी.. अश्या चुका सारख्या करत रहा! :-)

Kmayuresh2002
Tuesday, January 31, 2006 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद,सही रे मित्रा:-)पहिलेच विडबन का रे हे?

Vaishali_hinge
Tuesday, January 31, 2006 - 4:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आतापर्यन्त कुठे होता? कळले कसे आम्हास नाही! सांगा मडळी चुकले काहो? बेस्ट!!!!!

Aj_onnet
Tuesday, January 31, 2006 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद. एकदम सही, चुकूनही चुकला नाहीस!

Bgovekar
Tuesday, January 31, 2006 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा प्रसाद! बरं झाल ही कविता न वाचण्याची चुक आमच्याकडुन झाली नाहि ते.. नेहमीप्रमाणे.. सांगणे न लगे.. सुंदर!!!

Shivam
Tuesday, January 31, 2006 - 7:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, अप्रतिम!! मस्तच रे. कुठेही चुकला नाहिस तू. :-)

Moodi
Tuesday, January 31, 2006 - 7:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय सुरेख रे ........

Pama
Tuesday, January 31, 2006 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा प्रसाद, बर्‍याच दिवसांनी.. सहीच!!

Ninavi
Tuesday, January 31, 2006 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईशप्पत प्रसाद, सहीच लिहीलंयस!!! ... ...

Badbadi
Tuesday, January 31, 2006 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद :-) मस्त च.. लग्न करतो आहेस कि काय??

Milindaa
Tuesday, January 31, 2006 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

का ? त्याने लग्न करु नये की काय ? :-)

सही आहे रे.


Paragkan
Tuesday, January 31, 2006 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tooooooooo much re

Storvi
Tuesday, January 31, 2006 - 7:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच

Milya
Wednesday, February 01, 2006 - 1:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विडंबनाला वरच्या वरचा क्लास म्हणालो, चुकले का हो?

वा एकदम सहीच... आधी वैभव मग सारंग नंतर क्षिप्रा आणि आता प्रसाद अरे सर्व कवी विडंबन करायला लागले तर आम्ही शब्द जोडणार्‍यांनी कुठे जायचे?
खबरदार परत विडंबन कराल तर... मी कविता करु लागेन मग...
~DDD

Yogi050181
Wednesday, February 01, 2006 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसादा. कायपण चुकले नाही सगळे बरोबर..

Rahulphatak
Wednesday, February 01, 2006 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम मस्त रे प्रसाद :-) !

Prasadmokashi
Wednesday, February 01, 2006 - 4:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोस्तांनो आभार ! मनापासून जाणवलेलं दिसतय दुःख ? :-)
बडे, विचार तर आहे..आणि लग्न होण्या आधीच असे काही धाडसी लिहू शकतो ना मी... /:-)
मिल्या, अरे तुझ्या कडून स्फूर्ती घेऊनच कवी लोक इकडे वळतायत.


Gajanandesai
Wednesday, February 01, 2006 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, ... ... ...

Sarya
Wednesday, February 01, 2006 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खल्लास रे प्रसादा...
मिल्या, अरे तुझ्या कडून स्फूर्ती घेऊनच कवी लोक इकडे वळतायत. हे मात्र खर हो!


Kmayuresh2002
Wednesday, February 01, 2006 - 8:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या,चालेल रे.. तू कविता कर... आणि त्यांचेच विडंबन पण कर रे:-)

Kshipra
Thursday, February 02, 2006 - 12:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मयुरेश, तस नको त्याला कविता करू दे बाकीचे विडंबन करतील :-) मिल्या, तुझ्याकडुन येऊ देत काहीतरी आता.

Rajkumar
Thursday, February 02, 2006 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच रे प्रसाद. टाकणार टाकणार म्हणता टाकलेसच शेवटी.

Manuswini
Friday, February 03, 2006 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हे काय प्रसाद

एवढा कमी confidence की प्रत्येक वेळेला विचारतोस चुकले का हो ? नविन नविन लग्न झाले वाटत म्हणुन कि काय ? बरय बरय बायकोला
just kididng
मस्त रे प्रसाद विडंबन झकास झाले चुकिने



Milya
Tuesday, February 07, 2006 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुढार्थाने हे विडंबन नाही.. हास्यकविता म्हणा हवे तर

चाल ' मनाचे श्लोक '


गड्याचे श्लोक

मना सज्जना केर वारे करावे
पहाटे भल्या रोज पाणी भरावे
धुवावी अशी घासघासून लादी
पसारा नको आवरा नीट गादी

मना सज्जना तोच चंडी उठावी
तिची त्याक्षणी जीभ वेगे सुटावी
चहा पाजुनी थंड डोके करावे
पती चांगला नाव ऐसे मिळावे

त्वरेने पुन्हा भात पोळी करावी
विळी घेउनी योग्य भाजी चिरावी
डबा रोजचा एक जैसा नसावा
शिरा न्याहरीला जरूरी असावा

प्रभाते मनी बायकोला भजावे
तरी स्वल्प पैसेच खर्चा मिळावे
पगारास हाती तिच्या सोपवावे
कमावून जास्ती तिला तोषवावे

तिचे पाय रात्री जरासे चुरावे
मका तेल ते चोळुनी जे मुरावे
निजायास गादी उशी शाल द्यावी
अशी चाकरी नित्य संपन्न व्हावी

नको रे मना बोल ते बायकोचे
असे की जणू बाण छातीत टोचे
तिच्या ह्या जिव्हा कोण घाले लगाम
अश्या शूरवीरा हजारो सलाम

अशी बायको ही कशी आवरावी
तिची भ्रष्ट बुध्दी कशी सावरावी
कुणी थोर तो काय सांगेल युक्ती
तया पावलांची शिरी लावु माती

कसा जीवघेणा अघोरीच त्रास
सुखाचा ठरे त्यापरी स्वर्गवास
मिल्या सांगतो नीट ध्यानी धरावे
मरावे परी लग्न नाही करावे


Athak
Tuesday, February 07, 2006 - 12:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद मिल्याची कविता वाचुन तरी काही चुकत नसल्याचे तुला कळले असेलच :-)

Shyamli
Tuesday, February 07, 2006 - 1:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बायकांची ऊडवायची म्हणल की खुश असतात हे लोक...
मस्तच जमलय!


Kshipra
Tuesday, February 07, 2006 - 1:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, प्रभाते मनी मस्त..... हास्यकवितेवरून तु हळूहळू कविता लिहिणार बहुतेक. आमची मानसिक तयारी करतो आहेस का?

Psg
Tuesday, February 07, 2006 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, हीहीही.. एकदम छान आहे.. टाॅपिक आवडीचा असल्यामुळे जमली आहे!

Limbutimbu
Tuesday, February 07, 2006 - 2:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> टाॅपिक आवडीचा असल्यामुळे जमली आहे!
की वस्तुस्थितीला धरुन असल्यामुळे जमली हे? DDD


Kandapohe
Tuesday, February 07, 2006 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, पसग, लिंब्या सहीच

Prasad_shir
Tuesday, February 07, 2006 - 2:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद आणि मिल्या... दोघंही अशक्य आहात...

फारच मस्त!!!


Prasad_shir
Tuesday, February 07, 2006 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमच्या या कविता वाचून माझी जुनी एक कविता आठवली!


कोण म्हणतं आमच्या घरात
माझं काही चालत नाही?
गरम पाणी मिळाल्याशिवाय
मी भांड्यांना हात लावत नाही!

तसे घरातले सगळेच निर्णय
बायको माझ्यावरच सोपवते
धुणं केंव्हा, भांडी केंव्हा
माझं मला ठरवू देते!

मीही माझ्या स्वातंत्र्याचा
पुरेपुर फायदा घेतो
आधी स्वैपाक करून घेतो
धुणं भांडी मागून करतो...

रहाता राहिली केर-फरशी
आणि आवरा आवर
तेही पटापट करून टाकतो
बाकीची कामं झाल्यावर...

आता विचाराल 'तुमची बायको
घरात काहीच काम करत नाही?'
अहो, असं काय करता
ती माझ्यापासून स्वतःला वेगळं असं धरत नाही!

तिनं केलं काय, मी केलं काय
सगळं एकच असतं
दोघांत भेद करायला जातं
तिथेच जग फसतं!!

प्रसाद...





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators