|
मित्रहो मी देव' पुन्हा सुरू करत आहे. कामानिमित्त बाहेर असल्यामुळे मला ती पौषात पूर्ण करता आली नाही. आपल्या प्रतिक्रिया आज वाचायाला मिळाल्या. विश्वास ठेवा कुणाच्याही धर्मिक भावना दुखवण्याकरिता ही कथा नाही. या कथेवर यथायोग्य प्रतिक्रिया ती पूर्ण झाल्यावरच व्यक्त करता येतील. तोवर धीराने ही कथा वाचत रहा. मावळा तुझ्या धर्मिक भावना दुखावल्या असल्यास क्शमस्व. मीसुद्धा एक हिन्दू आहे व ही दैवतं मलाही तित्कीच प्रिय आहेत. तेव्हा त्यांचा अपमान करण्याचे धाडस मीही करताना धजावेन.तेव्हा क्रुपा करून ही कथा पूर्ण झाल्यावर तिच्यावर प्रतिक्रिया व्यक्त कर. देव' देव राम आणि हनुमानाने गुत्त्याच्या चिंचोळ्या दारातून आत प्रवेश केला. त्यांचे अवतार पाहताच गल्ल्यावर बसलेला मालक मोठ्याने ओरडला 'बघा रे.... आज देव इलेहत दार्वे खाऊक!'आणि ढग गडगडावे तसा मोठ्याने हसू लागला. गुत्त्यावर उपस्थीत असलेला प्रत्येक उद्ध,बेSउद्ध आणि अर्धवट शुद्धावस्थेत्ल्या व्यक्तिने त्या दोघांकडे तत्काळ वळून पाहिलं आणि हास्याचा एक लोट गुत्त्याच्या मळक्या भिंतींमध्ये उसळला. दोघेही जागीच ओशाळले.एखादं पाऊल पुढे किंवा मागे टाकायाला त्यांचं मन धजावत नव्हतं.ते जागेवर तसेच उभे राहिले. इतक्यातच मालक पुढे बोललला 'अरे हसतास काय?....देवांका बसाक जागा देवा' हसणार्यातले काही लोक पुढे उठून आले आणि त्यांनी हात धरून त्या दोघांना आपल्या रिकामी जागांवर नेऊन बसवलं.दोघही अंग आक्सून त्या जागांवर बसले. 'देवांनू तिर्थ धाडू?'मालक पुढे म्हणाला रे कांबळ्या...देवांका तिर्थ दी रे' त्याने एका नोकराला आज्ञा दिली. नोकराने त्यांच्या समोर एक बाटली आणि दोन ग्लासं आणून ठेवली. 'देवांनू....तिर्थ असाच घेतलास कि आधी आरती कराया तुमची?'नोकराने आगाऊपणे विचारलं. 'देवांका आरती कराया काय म्हनून इचर्तास काय?.....कराच त्येंची आरती.'गर्दीतला एक हनुमानाची शेपूट ओढत म्हणाला आणि त्याची ही सूचना उच्लून धरत सगळ्यांनी त्यांच्या आर्तीला सुरुवात केलि. आरतीदर्म्यान कुणी हनुमानची शेपूट ओढू लागलं, कुणी हातात गदा घेउन सगळ्यांच्या डोक्यावर मारू लागलं,कुणी रामाचा मुकुट स्वतह्च्या डोक्यावर बांधून नाचू लागलं, तर कुणी त्याचे बाण हातात घीऊन इतरांच्या अंगाला टोचू लागलं. आरतीला संगीताची साथ देण्याकरिता एकाने रामाचा धनुष्य उचलून तो तुणतुण्यासारखा वाजविण्यास सुरुवात केली. दोघांनाही घडत असलेल प्रकार असह्य होत होत. एक आग दोघांच्या अंगातून पसरत होती. हनुमानाला मुठी घट्ट आवळून दात चावावेसे वाटत होते. पण का कोण जाणे, तेवढ करणंही त्याला कठीण जात होतं. आप्ल्या असह्यतेतून बाहेर पडण्यात तो निष्प्रभ ठरत होता. अखेर स्वतच्या असमर्थतेवर वैतागत रामाने समोरची बाटली उचलून ती त्वेषाने उघडली आणि आतलं द्रव ग्लासात ओतून ते एक घोटात आपल्या घश्याखाली उतरवलं. ते जळजळत त्याच्या गळ्यातून खली उतरलं. रामाला पहून हनुमानालाही हुरूप आला. त्यानेही स्वतःच्या आत आकार घेत असलेला कहूर त्यात्या द्रवात विसर्जीत केला. त्यांच्या या क्रुत्यावर लोकांनी आरतीचा ठेका सोडून टाळ्यांचा मोठा कडकडात केला.
|
या टाळ्यान्चे अन्तरात उठणारे पडसाद दडपण्याकरिता त्या दोघांनी दोन दोन पेले अधिक आप्ल्या घशात ओतले.त्यांच्या आत पेटत असलेली आग त्या द्रवाने शमू लागली.एरव्ही ज्वाळांचे लोट उसळवणारं ते द्रव ही आग मात्र शमवत होतं. किंबहून अशा अग्नी शमविण्याकरितच त्याची निर्मिती झाली होती.ती शमविण्याकरिताच आरती करणार्यातला प्रत्येक माणूस तिथे आला होता.आणि नुसत तिथेच नव्हे तर अशा असंख्य ठिकाणी,अशीच असंख्य माणसं ती शमविण्याचा प्रयत्न करत होति. गावात, शहरात,खेड्यात,व्यापार्पेअथात,बंदरात...ऽश अ असंख्य ठिकाणी ती आग शमविण्याच प्रयत्न केला जात होता.आणि तिच शमवलं जाणंही तित्कच महत्त्वाच होतंंआहितर एक दिवस ती आग हे संपूर्ण विश्व आप्ल्या ज्वाळात भस्मसात करणार होति. आरती संपली आणि घलीन लोटांगण सुरू झालं.एकाने त्याप्रमाणे त्या दोघांसमोर लोटंगणही घातलं.इत्क्यात गर्दीतला एक पुढे आला आणि त्याने हनुमानाच्या गळ्यातल्या माळेला हात घातला.एकाएकी,त्याच्या नकळत एक गोद्द त्याच्या पोटात येऊन आदळला आणि त्याच्या आघाताने तो चार पावालं मागे सरकला.काही क्शण नुसतं पोट धरून उभं राहिल्यावर तो खाली कोसळला आणि पुन्हा उठून उभ राहाण्याच्य प्रयत्नात तो जागीच भडभडून ओकलात्याला पहून पुन्हा गर्दीतून हास्याचा एक लोट उसळला. 'जा जाऊन बस थकडी माय्झयां',हनुमान त्याच्या अंगावर खेकसला.गुद्द मारताना त्याने वळलेली मूठ अद्याफी तशीच होती. तो मानूस लट्पटत त्याच्या जागेपाशी जऊन कोलमडला. हनुमानाच्या चढलेल्या आवाजाच्या पट्टीने गुत्त्यावर एकाएकी शांततापसरली. 'आनि रांडेचे तुमी काय बघताहास..जावा आपापल्या जागांनी.ॅहला,चालू पडा.'राम उरलेल्यांवर खेकसला. जमलेले लोक हळूहळू आपाप्ल्या जागांच्या दिशांनी पांगलेर्आमा हनुमानाची संपत्ती ज्या कुणा कुणाकडे होती, त्यातील काहिंनी ती पुन्हा त्यांच्या सुपुर्द केली तर काही ती असतील तिथे तशीच टाकून आपाप्ल्या जागांवर गेले. स्वतःच्या या मूठ्भर्श्या कर्तब्गारीवर खुश होऊन दोघांनी एक एक प्याला अधीक ठोकत बाटली रिकामी केली. 'कांबळ्याआआ...'राम रुबाबात मागे वळून ओरडला.'आनी येक बाट्ली हाडून ठेव हकडे.' 'तांब रे!!',मालक गल्ल्यावरून ओरडला. हातात बाटली घेऊन चाललेल्या कांबळ्याची पावलं जागीच थबकली. 'देवांनू....पैसे आसत ना?नायतर तिर्थप्रसाद सम्जान फ़ुकटात खाऊन बसशात',मालक रामाला म्हणाला. 'असत रे माय्झयां...ऽजून फ़ुकटात दारू खाऊची पाळी इली नाय आम्च्यावर',राम उत्तरला. 'पन दारू खातास ते पैसे फ़ुक्टाचेच असत ना?...दारादारांनी फ़िरून येक्ठय केल्लले...ंअव्रात्र्येच्या नऊ दिवसांची मिजास माय्झयांची...जा रे कांबळ्या...दे ती बाट्ली त्यांका...देवांची सोंगा घेऊन फ़िर्तहत रांडेचे..लायकी असा काय?'
|
आता आप्ल्या प्रतिक्रिया कलवा. please
|
Meggi
| |
| Monday, February 13, 2006 - 1:07 am: |
| 
|
सलिल, तुझी कथा मांडण्याची पध्दत, भाषाशैली आवडली. पण हि कथा वाचल्या वर काहि प्रश्न पडले.. 'देव' ह्य इतका sensitive विषय तू असा का हाताळलास? या कथेच नक्कि प्रयोजन काय होतं. तुला काय सांगायच आहे? कथेचा शेवट मी guess करु शकले होते.. त्यामुळे फ़ार वेगळा शेवट झाल असं नाही वाटलं.
|
कथ अजून पूर्ण झालेली नाहिये.मला फ़क्त ती पूर्ण करायला वेळ मिळत नाहिये.तो मिळताच मी ती लवकरच पूर्न करेन.
|
|
|