Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
स्नॅक्स कॉर्नर : मॉडर्न ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » ललित » स्नॅक्स कॉर्नर : मॉडर्न « Previous Next »

Yog
Monday, February 06, 2006 - 5:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्नॅक्स कॉर्नर्: modern

तस पाहिल तर modern ही सुध्धा relative term च आहे असे म्हणावे लागेल. कारण जुन रद्दीत जात नविन बाजारात येत हे साध अर्थकारण आहे. जर्जर झाल्यावर जुनी कातडी फ़ेकून नव युवतीगत नितळ स्वच्छकान्ती ओढून घेण्यात मात्र अजूनही सर्पयोनी आपल्यापेक्षा एक पाऊल पुढेच आहे, म्हणजे त्या बाबतीत साप आपल्यापेक्षा modern
तशी सोय आपल्याकडे असती तर, या नुसत्या कल्पनेनेच कातडीवर शहारे आले. वारंवार आपली कातडी बदलून मग आम्ही या महाकाय cosmetic industry ला झोपवले असते अगदी चारी मुन्ड्या चीत. याला म्हणतात अनुल्लेखाने मारणे. पण कातडी बचाव कडून कातडी बदल धोरणाकडे गेलो म्हणून आतील कावेबाज मनुष्य बदलणार आहे का..?
पुन्हा गम्मत अशी वाटते की जे जून म्हणून फ़ेकून द्यायच तेच मग modern fashion म्हणून पुन्हा चालू करायच. कस की, मेणबत्त्त्या, पणत्या, लामणदिवे जावून एडिसन बाबाची वीज आली तर आता candle light dinner अधिक romantic वाटतोय. घरच्या टेबल वरील काटे चमचे या कवायतीपेक्षा कुठेतरी झाडाखाली किव्वा एखाद्या गडावरील farm house वर चक्क चुलीवर थापलेल्या भाकर्‍या हाताने तोडण आवडू लागत. आता याला modern दृष्टीकोन म्हणायचा की recycling संस्कृती..?
काही का असेना आम्ही modern आहोत इतके की कुठलाही दृष्टीकोन या आमच्या modern पणाच्या आड येवू शकत नाही. आमचा एक मित्र सकाळी कामावर जाताना लोकल ट्रेन मधे बरोबर दारातच उभे रहायचा. एक सुसाट वार सोडल तर नाईलाजाव्यतिरीक्त इतर कुठल कारण असाव की रिकाम्या डब्यात देखिल त्याला दारात उभे रहाणे खूप पसन्त होते?
काय रे एव्हडे काय सुन्दर आहे बाहेर? तर उत्तर अस होत की अरे रोज सकाळी एक modern निसर्ग रुळान्च्या पलिकडे ओळीत बसलेला असतो, तुम्हाला काय कळणार बाबा त्यातल कलात्मक सौन्दर्य?
खरय, आम्हाला नाही बा कळल, परन्तू त्याच्या डोळ्यात मात्र दिव्यत्वाची येथ प्रचिती वगैरे कलात्मक भाव असत हे मात्र खर. त्या बैठ्या निसर्गाच प्रदर्शन चित्र किव्वा फोटो स्वरूपात कुणि भरवल तर मला आश्चर्य वाटू नये. छे हे काय प्रदर्शन असे मि चुकून्(नको तिथे सत्त्य पचकायची कोकणस्थी सवय काही जात नाही)म्हटलो तर त्या मित्राचे उत्तर तयार असेल्:
पहिल्यान्दा मी रुळापलिकडे पाहिले तेव्हा म्हटले शी हे काय!
दुसर्‍या वेळी पाहिले तेव्हा म्हटले, हूं,असे का बर असावे?
मग तिसर्यांदा पाहिले तेव्हा म्हटले wow, its wonderful!
आताशा मि अलिकडेच रुळापलिकडे बसायला सुरुवात केली आहे तेव्हा मला या modern निसर्गातील रन्ग थोडेफ़ार उमगू लागले आहेत...
तू या विषयावरची पुस्तके वाच, लोकान्शी चर्चा कर मग तुलाही कळेल.

मला प्रश्ण पडला इतकाच की नक्की पुस्तके कशावरची वाचू? आणि चर्चा कशावर करू? का चहा अन वर्तमानपत्र घेण्याची ऐपत नसलेल्यांनी सकाळी गरजेपोटी ही अशी pressure tactics वापरली आहेत?
पाहिलत मि असा सर्वसामान्य अन कलात्मक्(मॉडर्न तर त्याहून नाही) दृष्टीकोन असणारा मनुष्य आहे. मला चिन्ता निसर्गाचीच. पण " नैसर्गिक " बाबतीत माझ्या व उपरोल्लेखित मित्राच्या विचारान्मधे खूप फ़रक आहे.

रामदेव बाबान्च्या नन्तर स्वताच्या पन्चेद्रीयान्चा साक्षात्कार झालेला माझ्या माहितीत आमच्या उपरोल्लेखित मित्राखेरीज दुसरा कुणी नाही. एखादी यमकी कविताच पण नग्न कविसम्मेलनात कुणी वाचून दाखवली तर त्याच कवितेत त्याला wow factor दिसणार हे निश्चीत. नग्न कविसम्मेलन हे modern theater मधिल एक प्रकार आहे हे वेगळे सान्गायला नकोच. किव्वा सुमार गायन करताना कान्गारू गत उड्या घेणारी एखादी सुन्दर्(चेहेर्‍याने) गायीका पाहिली तर तो म्हणेल वा किती गोड गळा आहे हीचा ही नक्की आयडोल्(का "eye Doll" )होणार. जमलच तर हेलियम च्या फ़ुग्यावर ध्यानाला बसून हवेत तरन्गण्याची योगमाया आत्मसात करणे यातील modern प्रयोगशिलता त्याला appealing वाटेल. हिन्दी इन्ग्रजी अन कधी मराठी अशा तीन भाषा एकाच गाण्यात वापरून गायलेली remix मध्ये, ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोन्डून वदवून घेतलेल्या वेदाइतकीच modern निर्मितीमूल्य आहेत असे तो पटवून देईल. आजच्या modern स्त्रीशक्तीच्या केन्द्रस्थानी निव्वळ सिलिकॉन चे अणू रेणू असल्याचे modern periodic table तो पुराव्यानिशी मान्डून दाखवेल.

modern होण म्हणजे नेमक काय? गोलन्दाज म्हणून भारतीय सन्घात प्रवेश मिळवून फ़लन्दाजीत धावा कुटण? का भ्रष्टाचार अती झाला म्हणून त्याला सम्पवण्यासाठी रन्ग दे बसन्ती चा नारा देण? का अमेरीकेच्या अण्विक जत्रेत आता इराणचा बोकड कापण?, का शुभन्करोती आणि पर्वचा न म्हणता बेड टाईम प्रेयर म्हणण? का भारतात धर्म कमी आहेत म्हणून नविन शिवधर्म वगैरे स्थापण?एखाद्या जादूगाराच्या रुमालातून कबुतरे निघावीत तशी, गोन्धळ आणि सम्भ्रम यातून modern art शोधून काढणार्‍यांकडे याची हमखास उत्तरे असतीलच तेव्हा त्याची चिन्ता आपल्याला नको.

आपण बरे आणि आपले घर बरे, तेव्हा पर्वा अगदी घराजवळच्या नविन complex मधे चक्कर मारताना दोन पावले मागे येवून थाम्बलो, अडखळलो म्हटले तरी चालेल. आता इथल्या स्वच्छ सुबक रस्त्यावर उगाच कारणाशिवाय कुणी थाम्बला तर अडखळला म्हणुया. पण निमित्त होत मॅनहोल वरील लोखन्डी झाकणाच. अन आश्चर्य कशाच तर झाकणावरील "Made In India" या ठळक अक्षरांच. गेल्या वर्षी मुम्बईतील त्या महाभिषण पुरात उघड्या मॅनहोल मधे पडून अनेक जीव गेले असे ऐकले(खर तर प्रिती झिन्टा, ह्रुतीक रोशन, बच्चन इत्यादी मन्डळीन्ना उघडी मॅनहोल चुकवत पायपीट कशी करावी लागली हे जास्त ऐकले),तेव्हा " हे काय नेहेमीचच " असे म्हणून त्याकडे दुर्लक्षही केले, पण इथे मात्र " अरेच्चा " असे शब्द तोन्डून निघाले. देशापासून दूर सातासमुद्रापार मॅनहोल च्या झाकणाकडे थाम्बून पहाण्याचा हा modern दृष्टीकोन मला इथे लाभला हे काय कमी आहे? पण प्रत्त्येक दुर्बाध गोष्टीत मॉडर्न कला शोधणार्‍या माझ्या मित्राला अजूनही देशातील उघड्या गटार वा manholes च झाकलेल modern स्वरूप पहायची दीव्यदृष्टी प्राप्त होईल का..? स्वदेश चित्रपटात त्या पाण्याच्या अवाढव्य टाकीत गुन्तवळागत अडकलेला कचरा पाहण्याची जी दीव्यदृष्टी दिग्दर्शकाने दाखवली होती निदान तशीतरी?

modern असण म्हणजे मायबोलीवर हिन्दी, इन्ग्रजी लिहीण असेलही कदाचित पण उगाच साहित्त्य अन कलेच्या नावाखाली असंस्कृत गटारे उघडणार्‍या सर्व ठकसेनांना हेच सान्गावे वाटते की ही modern उर्मी आवरा. रुळापलिकडील बसलेला निसर्ग रेखाटताना विष्ठेच्या जागी बॉम्बगोळे नकोत, बूड तुमचेच पेटेल!


Moodi
Monday, February 06, 2006 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योग बर्‍याच दिवसात तुझे खमंग सदर नव्हते, ते केव्हा येईल याची उत्सुकता होती.
व्वा!! एकदम सुरेख. कहर केलास.
ये हुई ना असली बात.


Maitreyee
Monday, February 06, 2006 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sorry पण मला फ़ारसे apeal झाले नाही! पहिले १-२ परिच्छेद खरं चांगले वाटत होते पण नन्तर ... .. मलाही modern art वगैरे कळत नाही, पण त्याची खिल्ली उडवण्यासाठी ते विष्ठा, रूळ वगैरे धड विनोदी वाटले नाही किन्वा उपरोधिक पण नाही .. cbdg

Bhagya
Monday, February 06, 2006 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच दिवसांनी लिहिलं आहेस योग, नेहमीसारखेच सुंदर.

Limbutimbu
Monday, February 06, 2006 - 10:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अफलातून! योग खरच अफलातून लिहिल हेस
येवढ्यान्ना येवढे ठोसे, चिमटे, बोचकारे, ओरखाडे पण जखमेची खूण म्हणुन नाही उरणार!
या महिन्याचा मायबोलीभूषण पुरस्कार तुलाच बहाऽऽल व्हावा!
मुडी, बर झाल तू मला ही लिन्क दिलिस! :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators