Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
पूर्तता

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » कथा कादंबरी » पूर्तता « Previous Next »

Deemdu
Thursday, February 02, 2006 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला कार्यक्रमाचा सोहळा तर निट पार पडला. एक निश्वास टाकत निरुपमा नी latch उघडत घरात पाय ठेवला. डोळे मिटुन शांतपणे ती बसुन राहीली. राधा आणि नरेन कार्यक्रमानंतर तसेच बाहेर फिरायला गेले होते, आणि ती घरी आली होती. ती दोघही बाहेरच जेउन येणार होती आणि तिच्यासाठी सकाळची पावभाजी होतिच, त्यामुळे तीला थोडा निवांत वेळ मिळाला होता.

स्वताःसाठी कॉफी करुन घेउन ती सज्जामध्ये येउन उभी राहिली. समोरचा अस्ताला जाणारा सुर्य पाहात.
" ए मला असा हा अस्ताला जाणारा सुर्य अजीबात आवडत नाही, त्यापेक्षा मला उगवतीचा सुर्य आवडतो. मावळणारा सुर्य मला उगाचच हुरहुर लावतो. " नितीश म्हणायचा. नितीश तीचा प्रियकर नवरा. त्याच्या आठ्वणीन तीच्या डोळ्यात आजही टचकन पाणी आलं. कॉलेज मध्ये असल्यापासुन अगदी हौसेन NCC मध्ये भाग घ्यायचा. सैन्या मध्ये जाउन आपल्या देशासाठी काहीतरी करायच हे एकच स्वप्न उराशी बाळगणारा. किती भारावुन गेली होती ती त्याच्या विचारांनी.
आणि एक दिवस हातात एक पत्र नाचवत आला. " निरु, मला सैन्या मध्ये सिलेक्ट केल ग. i am so glad आता बघच तु, तुला आयुष्यभर अभिमान वाटत राहील अशी कामगिरी करतो की नाहि ते.

घरी हे सगळ कळल्या नंतर आईने बाबांनी अगदी समजावणीच्या सुरात विचारल होत, तुझा अजुनही त्याच्याशीच लग्न करण्याचा विचार आहे का म्हणुन? काय अपेक्षीत होता त्यांना आजही विचार करताना तीला हसु आल त्यांच्या ह्या विचारण्याचं. पण नंतर लग्न मात्र अगदी दिमाखात लावुन दिलं होतं. आपला संसार बघुन दोन्ही घर खुष होत होती. कधीही मुलांचा विषय निघाला की ह्याच आपल टुमण सुरु
" हे बघ निरु मुलगा किंवा मुलगी काहीही झाल तरी त्याला किंवा तीला आपण आर्मी/ नेव्ही किंवा airforce ला च घालायच " ती हसुन म्हनायची सुध्धा " अरे आधी येउ तर दे त्या बिचार्‍या जीवाला, मग ठरव. "
त्या दिवशी घरी आला ते विचारातच. आपल सगळ आवरे पर्यांत वाट पाहिली. अन मग जवळ घेउन म्हणाला
" निरु, मला नवीन पोस्टींग मिळाल आहे, आजपर्यंत मी ह्या संधीची वाट बघत होतो. आज मला बॉर्डरवर पोस्टींग मिळाल आहे " लक्क झाल तीच्या हृदयामध्ये, त्यानंतर तो कितीवेळ आणि काय काय समजावत होता तीला तिच तीला सुध्धा कळाल नव्हतं. तो जायच्या आदल्याच रात्री तीन त्याच्या कुशीत शिरुन अगदी मनसोक्त रडुन घेतल होत. तो मात्र अगदी शांत होता तिच्या पाठीवरुन हात फिरवत तीला शांत करत होता. त्यांना तशीच केंव्हा झोप लागली दोघांनाही कळल नाही. सकाळी उठल्यावर मात्र त्यानं तीला स्वता:हुन कुशीत घेतल आणि तीच्या कपाळावर आपले ओठ टेकत त्यान सांगीतल होत. " निरु आता मात्र रडायच नाही हं नाहीतर माझा पायच निघणार नाही घरातुन. आणि एक.... तु मला सोडायला येणार नाहीस. " तिनी डोळे मिटुन मानेनीच त्याला हो म्हणून सांगीतल होत. त्यानंतर मात्र त्याच आवरुन देण्यात आणि bag मध्ये काय भरलय काय राहीलय हे बघण्यातच आणि राहीलेल्या गोष्टी भरुन देण्यातच तीचा वेळ गेला. " नितीश bagechyA पुढच्या कप्प्यात साबण आणी दाढीच सामान ठेवलय रे. आणि अजुन ही शाल बसवायची आहे, पण कशी बसवु, नहीतर अस करु का आणखी एक bag देउ का बरोबर? "
" वेडाबाई मी तिथे हे सगळ सांभाळायला जाणार नाहीये " तो हसुन म्हणाला होता.


Deemdu
Thursday, February 02, 2006 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याचा सुखरुप पोहोचल्याचा फोने येईपर्यंत ती पाणी ही प्यायली नव्हती. फारफार तर एक आठवडाच झाला होता नितीश ला तिकडे जाउन आणि
तिला ही बातमी त्याच्या पर्यंत कधी पोहोचवेन अस झाला होत. छोटा नितीश तीच्या उदरात अंकुरत होता. आस्मान ठेंगण झाल होत तीला आणि त्या धुंदीतच ती फोन पाशी गेली आणि नेमका फोने वाजला. अगदी ह्याच वेळेला फोन यायला हवा होता का? कुरकुरतच तीनी फोन घेतला.
" हेलो, नितीश सरपोतदारांच घर? " फोन मधुन विचारणा झाली. तिनं हो म्हणताच त्या व्यक्तीने जो निरोप दिला तो ऐकुन तीला संपुर्ण जग आपल्या भोवती फिरत असल्या सारख वाटायला लागल होत ती मटकन खाली बसली.
त्या दिवशी सकाळीच त्यांच्या टापुवर हल्ला होउन त्यात नितीश
नितीश ची आठवण म्हणून तिने तो प्रती नितीश निलेश' अगदी जीवापाड सांभाळला. बापाचा अगदी रक्ताचा कण अन कण उचलला होता पठ्ठ्याने. शिक्षणात तर पुढे होताच. नितीश च्या म्हणण्याप्रमाणे तीने त्याला मिलीटरी स्कुल मध्ये घातलं. निलेश मोठा झाला त्याच शिक्षणही पुर्ण झाला. पुण्यातलीच चांगली मुलगी बघुन त्याच लग्न ही झाल. सुखाचा संसार सुरु झाला. आणि नरेनच्या जन्मानी तर त्या सुखावर जणु चारचांद लागले. निरु नरेनल खुप जपायची, दुधावरची सायच होती ती.
निलेश आता captain झाला होता त्याची चंदीगढला बदली झाल्याची ऑर्डर तो घेउन आला. आई आपण सगळेच तिकडे जाउयात ई काही तुला एकटीला इथे राहु देणार नाही अस तो म्हणाला तेंव्हा तर काय अभिमान वाटला होता निरुला आपल्या मुलाचा.
नरेन त्यावेळी ५/६ वर्षांचा असेल, निलेश ची send off पार्टी होती त्या दिवशी, खुप मागे लागला होता आई तु पण चल तुझ्या लेकाच कौतुक बघायला, पण थोडस डोक दुखत होत म्हणुन घरीच राहीली ती. आणि नरेनलाही आपल्याजवळच ठेव म्हणुन सांगीतल निलेश ला. ऊशीराच येणार होते दोघही.

रात्री बेल वाजली म्हणून दरवाजा उघडायला उठली. नरेन आत शांत झोपला होता. दारात निलेश चे मित्र बघुन तीला आश्चर्य वाटलं. अरे पण निलेश तर पार्टीला केंव्हाच गेलाय अस म्हणेपर्यंत त्यांनी तीला सोफ्यावर बसवलं
निलेश आणि निकीता पार्टीला गेले असताना कोणीतरी त्यांच्या गाडीत बॉंब ठेवला होता. पार्टीवरुन निघाल्यानंतर काही मिनीटांच्या अंतरावर तो बॉंब फुटला आणि दोघेही
निरु सुन्न बसुन राहीली


तिच्या मनाचा आक्रंद बाहेरच पडत नव्हता. आत शांत पणे झोपलेल्या नरेन वर नजर खिळुन राहीली. दुःख तेही हे असं. आता सकाळी उठल्यावर नरेन जेंव्हा आई बाबांविषयी विचारेल तेंव्हा त्याला काय उत्तर देणार आपण. त्यापेक्षा आपणही त्यांच्या बरोबर गेलो असतो तर निदन आज रडायला तरी मागे कुणी राहील नसत. छे पुढे तर सगळा अंधारच दिसत होता तीला
ह्या कोवळ्या वयात त्या लेकराला ही सगळी कार्य करायची वेळ आली होती. तसा पैशाचा प्रश्न नव्हता पण
हे ही दुःखाचे डोंगर तीने पार केले एकट्या नरेन साठी. ट्याच्या चांगल्या भविष्या साठी.

आणि आज वडीलांच्या आणि आजोबांच्या पावलावर पाउल ठेउन तो ही सैन्यात भरती झाला आहे. नुकत्याच झालेल्या युध्धात गाजविलेल्या मर्दुमकीची निशाणी म्हणुन आज त्याला वीर पदक बहाल करण्Yअत आल होत. तोच कार्यक्रम attend करुन ती आज आली होती.

रात्री आल्यानंतर ते पदक आजोबांच्या आणि वडीलांच्या फोटो समोर ठेउन त्याने दोघांच्याही फोटोला नमस्कार केला. इकडे निरु चे डोळे भरुन भरु वाहत होते. आयुष्यभरातील सगळ दुःख आज त्या असवांबरोबर बाहेर पडत होत

आणि फोटोमधुन नितीश हसत होता.


Rupali_rahul
Friday, February 03, 2006 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीमडु, अतिशय सुंदर आणि भावनात्मक वर्णन...

Megha16
Friday, February 03, 2006 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिमडु
खुप छान आहे कथा.
खरच खुप वर्णन केल आहे,कथा वाचताना मनात एकदम धस्स होउन जात.



T_pritam
Monday, February 06, 2006 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय सुरेख आणि मस्त.........

Athak
Monday, February 06, 2006 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीम्डुबेन खुप छान लिहीलेस

Mi_anu
Tuesday, February 07, 2006 - 1:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुंदर कथा. निरुच्या कहानी मे इतके ट्विस्ट आले ते शत्रूच्याही आयुष्यात येऊ नयेत हीच प्रार्थना.

Charu_ag
Tuesday, February 07, 2006 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीमडु, निरुच्या मनस्थितीचे वर्णन छान केले आहेस.

Kmayuresh2002
Tuesday, February 07, 2006 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिमडु,छान लिहीली आहेस गं कथा:-)

Shivam
Tuesday, February 07, 2006 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीम्डू, सुंदर कथा लिहिलेस हं.
सत्य-कथा आहे का ही? तसं असेल तर माझा या सर्वांना सॅल्युट!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators