|
Meghdhara
| |
| Tuesday, January 31, 2006 - 5:53 am: |
| 
|
प्रिय आकाश आज पुन्हा मला एक कोडं सापडलं. नुकत्याच तारुण्यात प्रवेश केलेल्या कायेप्रमाणे, मनातल्या सार्या संवेदना मोहरुन आल्या. पुन्हा खुप दिवसांनी गच्चीवर जाऊन पुर्ण तुला डोळ्यात घेऊन झोपायची इच्छा झाली. तुझ्या इतक्या हाका मी न ऐकता परतवल्याचं दुःखही झालं. पुन्हा ढगांना, चंद्राला विश्वासात घेऊन चांदणं दाखवायचा हट्ट करावासा वाटला. सुक्ष्मात मन परत शोधू लागलं. नवशोधाची जाणीव नवतरूण करून गेली. स्पर्ष, गंध, द्रुष्टीची सारी परिचीत अपरिचीत रंध्र वाहून रिकामी होण्यासाठी आणि भरून घेण्यासाठी उत्कट झाली. बर्याच दिवसांनी रत्रीचा गंध भरभरुन आत घेतला. याच गंधात विहरत असलेली अनेक अस्तीत्वं माझ्या प्रत्येक श्व्व्सागणीक आत व्यक्त होऊ पहात होती. स्म्रुती विस्मऊतीच्या सीमारेषेवरील नवे झुने हुंकार नादावू लागले. निर्गुण निराकार निष्ब्द अनुभव जाणीवेला व्यापू लागला. कळीचं फुल होणार्या क्षणाची चाहूल मनासकट गात्रांनाही झाली. अव्यक्ततेची गोडी, व्यक्त होण्याची हुरहुर पुन्हा मोहात पाडू लागली. पुन्हा जग़णं समृद्ध तितकच व्याकूळ वाटू लागलं. अथांग, अमर्याद, अमुर्त जाणीवेला पकडायचा आणि तीने निसटायचा अविरत खेळ पुन्हा सुरू झाअला. नी दोन्ही हात उंचावून आवेगाने तुला जवळ घेण्यासाठी मी सरसर सरसर जीना चढून वरती आले. मला सापडलेलं कोडं मला तुला द्यायचं होतं. पण तुझ्या अंगभर चिवचिवणार्या पाखरांच्या लगबगीने स्वःताच्या शांततेत फरक न पाडू देणार्या संयमी तुला पाहुन मी स्वःताला आवरलं. तुझी समाधी भंगण्याचं धैर्य मला झालं नाही आणि पुन्हा माझं तुला भेटणं कल्पनेतच राहून गेलं. माझं सुटलेलं कोडं मुठीत घेऊन मी पुन्हा माझ्या खिडकीत येऊन तुझी नाना रुपं बघत बसले. आकाशाला भेटण्याइतकं मोठेपण आपल्यात कधी येईल याची वाट बघत राहिले. --------------------------------------------- आज तुझ्यावर मळभ आलेलं असतं. कुणा अनामिकाच्या डोळ्यातले ढग घेऊन तू त्याला इद्रधनुष्य देऊन आलेला असतोस. रात्री चंदणं फुलेल या आशेवर पुर्ण संधाकाळ अशा रडवेल्या तूला मी डोळुआत साठवत रहाते. पण त्या वेड्या अनामिकाचे भाव त्या मळभातून चंदण्याही झाकतात. तुझ्यात हरवलेली मी आणि कुणा अनामिकात हरवलेला तू असे आपण दोघे रात्र जागवतो. मला तुझा व्यवहारच कळत नाही. रोज कुणाच्या नी कुणाच्या दुःखाचा काळोख पिऊन त्याला उगवणार्या दिवसासाठी आश्वस्थ करतोस तर दररोज सुर्याच्या तेजाने स्वःताला ताप देऊन सत्य लख्ख करायचा कडवटपणा घेतोस. मी आपली माझे इवले इवले अनंद, समुद्रावर मिळालेल्या शिपल्यात मावलेली दुःख घेऊन गछ्छीवर रोज येते. आशेनं ठाण उघडून बघते तुझाकडे. व्यवहाराSआठी तरी तु येशील असं वाटतं. 'काय बरं देशील माझी ओंजळभर सुखदुःख घेऊन?' या विचारांनीच हुरळून जाते. या व्यवहाराच्या निमित्तने माझी तुझी भेट होणार असते. माझं इतकं छोटं अस्तीत्व तुला जाणवएल का याची हुरहुर, तुझ्यात व्यक्त होऊ पहाणारी माझी स्वप्नं, पेलणारे न पेलणारे माझ्या ईच्च्छा आकांक्शांचे पंख मला आणखीन अधीर करतात. नी आपल्या उत्कट भेटीची साक्श देणार्या माझ्या क्शितीजाच्या कक्षा सतत वढत जातत माझ्यापासुन दूर जात रहातत. तू.. तसाच असणार असतोस, मनस्वी. मी खट्टू होऊन पुन्हा पायर्या उतरू लागते. तेवढ्यात कानात तू कुजबुजतोस, ' अगं वेडे मी तुझ्यातच आहे. पण आकाशाला अस्तीत्व नसतं, आकाशाचं व्रत असतं!' तु माझ्यातच आहेस? आकाशचं व्रत..? तुझ्या त्या चाहुलीनेही मी नखहशिखांत भारून जाते. पुन्हा पायर्या उतरून खाली येते. खिडकीतून मला दिSअणार्या तुला पहात बसते. आकाशाला अस्तीत्वं नसतं? मग मी कोणाजवळ ओढली जात आहे? एका निराकारतेजवळ? रोज थोडं थोडं करीत ज्याला मी साठवून घेत आहे ते अस्तीतवातच नाही? मग जे नाही ते कधी कधी निसटल्याचं दुःख का व्हावं? आकाशा, तू म्हणतोस तुझं व्रत असतं. अरे पण या ब्रम्हांडात कोण व्रतस्थ नाहीये? पावसाला भिजवण्याचं, म्रुत्तीकेला सहायचं, वार्याला वहायचं, पर्वताला तट्स्स्थ रहायच, नदीला वळणं घ्यायचं, जीवाल म्रुत्यूपर्यंत जगायचं नी फुलाला फुलायचं व्रत असतच ना? आणि त्यांचा तो निसर्गधर्मच त्यांचं अस्तीत्व असतं ना? मग तुला अस्तीत्व नाही असं कसं म्हणू? माझ्यासाठी तुझं रुप, तुझा अथांगपणा, सारं काही सामावून घेण्याची ताकद,माझा तुझ्याबद्दलचा अभेद्य विश्वास आणि माझ्या हाका तुझ्यात अल्हाद विरघळून जाण्याची तुझी आरपारता हेच तुझं अस्तीत्व. मी अशीच येत राहीन. मला जाणवलेल्या तुझ्या अस्तीत्वाला आव्हान देत राहीन. तुझ्यात सामावून जात राहीन.. तुझ्या व्रताला बांधील असलेली तुझी व्रतस्थ. मेघा
|
Dhruv1
| |
| Tuesday, January 31, 2006 - 6:11 am: |
| 
|
सुंदर लिहील आहेस मेघा
|
Deemdu
| |
| Tuesday, January 31, 2006 - 7:15 am: |
| 
|
खुप दिवसांनी मेघधारा बरसली
|
Moodi
| |
| Tuesday, January 31, 2006 - 7:30 am: |
| 
|
रेखीव लिहुन चिंब भिजवलस. 
|
Champak
| |
| Tuesday, January 31, 2006 - 8:49 am: |
| 
|
..... another fantastic Idea! Nice 
|
Zaad
| |
| Tuesday, January 31, 2006 - 8:54 am: |
| 
|
mast lihilay! abhalatun pruthwikade zepawnarya meghdhareshiway aakashala yapeksha changala kon samaju shakata?
|
Pama
| |
| Tuesday, January 31, 2006 - 10:55 am: |
| 
|
मेघा, सुरेख लिहिल आहेस.
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 31, 2006 - 10:59 am: |
| 
|
सुंदर लिखाण, मेघाने आकाशावर लिहावे, हे ऊचितच.
|
Meghdhara
| |
| Wednesday, February 01, 2006 - 5:33 am: |
| 
|
विस्कळीत, अशुद्ध लिखाण असुनही तुम्ही सगळ्यांनी आत पोचवलत याबद्दल धन्यवाद. मेघा
|
सुरेखच लिहितेस मेघधारा. keep it up
|
Charu_ag
| |
| Tuesday, February 07, 2006 - 3:34 am: |
| 
|
मेघा, सुरेख लिहिलयस. अशीच बरसत रहा.
|
|
|