Devdattag
| |
| Wednesday, January 18, 2006 - 2:05 pm: |
| 
|
आमचा नियतिशी सामना जरा जास्तच लांबला होता आमचे अभिनंदन करायला मग मृत्यूही थांबला होता
|
जास्वंद , देवा , कुठे आहात ? दोस्तीचा जीव आमुचा किंमतीवर अवलंबून नसतो अंगरख्याशी जवळीक करताना अस्तनीला वचकून असतो
|
Jaaaswand
| |
| Wednesday, January 18, 2006 - 2:09 pm: |
| 
|
जेव्हा झाली ती माझ्याकडे आकृष्ट पहिल्यांदा नियतीची काढून टाकली दृष्ट जास्वन्द...
|
Ninavi
| |
| Wednesday, January 18, 2006 - 2:10 pm: |
| 
|
पमे, तुला बाळ म्हणाला... तू ऐकून घेऊ नकोस! जाणतो नियतीस ना, ना मानतो प्रारब्धही नाहि निघणे या मुखातुन याचनेचा शब्दही आमचे यश आणि अपयश आमुच्या हाती घडे क्षूद्र ते दैवास घालून बैसलेले साकडे
|
Devdattag
| |
| Wednesday, January 18, 2006 - 2:18 pm: |
| 
|
दोस्तहो.. नियति प्रारब्धाचे सर्व पाश येथे सांडले ऐकले रातिस दोघे येथेच होते भांडले
|
थांबले दिमतीस आहे आमुचे प्रारब्ध नेहेमी नियती वारा घालण्याला ठेवलेली आहे आम्ही भाळी आमुच्या आठी आणि पाहुनी ती वक्र भिवई वेळोवेळी नशीब आमुचे बदलतेच सटवाई
|
Pama
| |
| Wednesday, January 18, 2006 - 2:23 pm: |
| 
|
अग निनावी..मी त्याला कधीच आजोबा करून टाकलय, मग म्हटला तर म्हणू देत बाळ.. टवाळ तर नाही म्हणाला ना.. मग बास!! जास्वंद.. सुरेख!! दोस्ती आम्ही अशी काही दिलखुलास करतो, दोस्तांनी केले वार तरी हसत हसत झेलतो..
|
Jaaaswand
| |
| Wednesday, January 18, 2006 - 2:27 pm: |
| 
|
मित्रांनो... तुमचे चालू द्या...झक्कास एकदम.. मी आता निरोप घेतो... भीक ना नियतीस अमुची, स्वप्न होते पाहिले होती जरी ओंजळ इतुकी, मोती होते सांडले आयुष्य होते दोन क्षणांचे, मरणे होते सोडले जिंदादिलीची इन्तेहा अशी, मृत्युही हा गोंधळे जास्वन्द...
|
Ninavi
| |
| Wednesday, January 18, 2006 - 2:29 pm: |
| 
|
बाय जास्वंद.. भेटू पमे, आजोबा की दोस्त? एकदा नीट ठरव पाहू 
|
Devdattag
| |
| Wednesday, January 18, 2006 - 2:30 pm: |
| 
|
असे नव्हे आम्ही दोस्त परख़ण्यास चुकलो होतो आम्ही दोस्तांस नाही दोस्तीस मुकलो होतो
|
अरे ? मी टवाळच लिहील होतं , हे युनीकोड मुळे ना .... ते फ़ूल होवून बरसले दोस्तांनी वार जे केले खंत जाळुनी गेली की दोस्तही दुश्मन निघाले
|
Devdattag
| |
| Wednesday, January 18, 2006 - 2:42 pm: |
| 
|
कुणास का दोष द्यावा आपणच जेंव्हा असतो वेडे व्यवहारी अशा ह्या जगी भावनांचे सजते मढे
|
Kshipra
| |
| Thursday, January 19, 2006 - 1:18 am: |
| 
|
झाडाचे मनोगत मावेनाशी होती कधी फुले सार्या अंगभर आता एका कळीसाठी जीव होई अनावर
|
रातराणी फ़ुलते खुप... कळ्या कळ्यात बहरते .............आंगा अंगाने फ़ुलते बहराने झुकते की लाजते?....... मी बघते............. चांदण्या चांदण्या त्या वेचुन घेते.....
|
झाडाचे आणखी एक मनोगत माझी सावली माझी नव्हे वाटसरूंचे भाग्य होते डोईवर ऊन माझ्या जळणे मला भाग होते
|
Jaaaswand
| |
| Thursday, January 19, 2006 - 5:06 am: |
| 
|
मस्त रे....मित्रांनो.. अजून एक मनोगत..... री पुढे ओढतोय रे... माझी सावली माझ्याच कवेत पण वाटसरूंच्या देशी होती स्वत: काट्यात निजून त्यांना दिली फ़ुलांची उशी होती जास्वन्द...
|
Ninavi
| |
| Thursday, January 19, 2006 - 9:14 am: |
| 
|
जास्वंद,'री' ओढतोयस की साव'ली' ओढतोयस? जरी नाव तिचे सावली(ळी?) ती जळून काळी झाली तू दुर्लक्षिले तरीही ती मुकाट पाठी आली ए बाबांनो, सावल्या पुरे आता. दुसरा काहीतरी विषय सुरू करा पाहू. क्षिप्रा, सिक्सर!! 
|
Jaaaswand
| |
| Thursday, January 19, 2006 - 10:00 am: |
| 
|
निनावी.... मी री च ओढत होतो ग ..यह ज़िन्दगी और परछाई...खींचनेसे बढते तो और क्या था बर ठिक आहे... नवीन विषय... मेंदी बघा आवडतोय का...... भेटायच्याही आत तू नजरेत इतकी भरली आहेस तुझ्या नावाची मेंदी मनात काढण्याआधीच रंगली आहे जास्वन्द...
|
Ninavi
| |
| Thursday, January 19, 2006 - 10:24 am: |
| 
|
नो नो.. वैभवचा विषय ढापायचा नाही!! नवीन काढ. तोपर्यंत मी क्षिप्राची क'ळी' पुढे ओढते.. कसे सांगू कुणी मधुमास होते फुलविले कुणी सुखवीत दळ एकेक कळिला खुलविले अता गंधावरी ज्या भ्रमर येती धावुनी कुणी श्वासांत अत्तर जीवघेणे शिंपले
|
Dineshvs
| |
| Thursday, January 19, 2006 - 11:33 am: |
| 
|
सध्या माझ्या रोजच्या वाटेवर पावला पावलावर फ़ुले फ़ुलली आहेत. कुठल्या फ़ुलाला कुठली कविता ऐकवायची हा विचार करतोय.
|
Devdattag
| |
| Thursday, January 19, 2006 - 12:36 pm: |
| 
|
नविन विषय.. नविन विषय.. ट्युबलाइट तळघरातलि ट्युब लागता लागता अचानक बंद पडली म्हणाली काय करु या अंधाराची मला जन्मभर सोबत घडली
|
Meghdhara
| |
| Thursday, January 19, 2006 - 12:51 pm: |
| 
|
क्शिप्रा व्वा सुंदर! मेघा
|
दोन दिवसात झुळूकेचे वादळ झालेले दिसतेय. क्षिप्रा लाजवाब. देवदत्त, जास्वंदा, निनावी पमा, आणि कवितावैभव लगे रहो. सगळीच्या सगळी क्रिकेट टीम एकदम फार्मात आल्यावर होते तशी फटकेबाजी चाललीय. निनावीच्या चौकारावर माझीही एकदोन धावांची निसटती भर.... खुलवून गेला कळी तो, भ्रमर नाहीसा झाला. उलग़डले नाजुक कोडे, अन नवीन सांगून गेला. तिष्ठते दिवसा अता ती, रात्र झुरण्यात जाते. श्वासांचे होते अत्तर अन अश्रूंचे दंव होते. - संघमित्रा
|
Jaaaswand
| |
| Friday, January 20, 2006 - 5:35 am: |
| 
|
भ्रमराची आता बागेमध्ये कधीतरीच होते चक्कर सुगंधाचे असते अस्तर आठवणींचे होऊन अत्तर जास्वन्द...
|
खूप छान छान चारोळ्या. पण वैशालीची रातराणी खासच वाटली. अगदी फ्रेश. बापू.
|
सगळ्याच चारोळ्या मस्त आहेत ... ही आपली उगाच ... कुणीतरी येइलच ! गुलमोहर आहे थांबून कुणाच्यातरी बरसण्यावरच त्याचे फ़ुलणे अवलंबून
|
Shyamli
| |
| Monday, January 23, 2006 - 12:40 am: |
| 
|
कुणीतरी येणार म्हणुन वाट ती किती बघावी येणार्यानी तरी अशी दैना दुसर्याची का करावी श्यामली!!!
|
Dhruv1
| |
| Monday, January 23, 2006 - 1:22 am: |
| 
|
सुख पैलतीरावर सारे बुडुन गेली नाव श्वास असे नुरताना काठावर ऊभा का गाव?
|
Dhruv1
| |
| Monday, January 23, 2006 - 1:26 am: |
| 
|
हा ऊत्सव अन ही काया रंगांध तुझी ही माया डोळ्यांच्या क्षितिजांवरती रंगांच्या घनतम छाया?
|
Dhruv1
| |
| Monday, January 23, 2006 - 1:28 am: |
| 
|
ho Asaoca saaro smarto tva AazvaNaIMcao saÜhÜLo Ana kayaovartI }ztI ho spXa-sauKacao Xaharo
|
देवा रे देवा ऐकता वार्याचा हुन्कार पहता बिजलिचा ललकार होतो मज साक्षात्कार तुज़्या आसण्याचा अनादि तु परमेश्वर तुज़्या शक्तिने आपर खेळ मान्डीला या धरेवर मजा तु लुटशी या विश्वाचा लागेना थान्ग सम्पले शोधुन किति विद्वान जग वाटु लागे भासमान माया ती तुज़ी देवा तुज़ा कोण देव मजला सान्गुन तु ठेव गरजे साठी आसावी सोय आम्हा लेकरान्ची अजित
|
Moodi
| |
| Monday, January 23, 2006 - 5:31 am: |
| 
|
अजीत तू पुर्वी महर्षीनगरला रहायला होतास का?
|
hoy pan mi tula oalakhale nahi moodi
|
सयी(मैत्रीण्) आकाशाचा रस्ता आहे फ़ार सामसुम जसे जावे वरवर एकट्याने नाही आसपास कोणी होते घोळ्क्यात नेहमी असे रागवणे रुसणे मध्येच खी खी हसणे कधी सावरले एकमेका कधी झोडपले कधी चिडवले कधि चढ्वले हरभर्यावर कधि आपटले धापकन अशी आठ्वण सयीची माझ्या जीवाभावाच्या बयेची वरवर जाउन जेव्हा खाली बघते सारखी माझी सयी आठवते जमीनीचा लोभ सुटतो आणि बांध फ़ुटतो उडी घ्यावी आकाशातुनी यावे फ़िरुनी जमीनीवर घ्यावी गळामीठी तिची भरभरुन बोलावे, चिमण्यांच्या चिवचिवाटाने घर भरुन जावे उजळाव्या सार्या आठ्वणी पण झालेली तिची पाठवणी खाली दिसतात चिमुकली घरे दिसत नाहीत त्यांची दारे कुठे असेल माझी सयी ठिकाणा तिचा ठाउक नाही, आकाशाच्या रस्त्याला परतीची वाट नाही आकाशाच्या रस्त्याला परतीची वाट नाही...............
|
नको दुर जाउ सयी जीव तगमग होइ तुझ्या विना ग बाई मला करमत नही जरी असलीस दुर वर पडला नाहि विसर मना मधले आंतर फार नाही
|