Shyamli
| |
| Wednesday, January 25, 2006 - 5:07 am: |
| 
|
cछान आहे रे सारग! कुठे होतास ईतके दीवस ती झुळुक बंद पडलिये तीकडेही बघ जरा
|
सारंग .... कुठाय पत्ता ? आणि कविता बाउन्सर गेलिये ... उत्तर मेल वर टाकलं तरी चालेल ... ध्रुव ... आवडली मला ...
|
Zaad
| |
| Wednesday, January 25, 2006 - 5:25 am: |
| 
|
@Dhruv1 ... baharat...hi kavita chhan ahe, pan grace cha khoop prabhav ahe asa watata
|
वय वेडे .... तू रहा सांभाळुनी हे वय तसे नाजूक असते मोह आणि संयमाची सतत चुकामूक असते गर्द हिरवा देह अवघा सळसळाया लागतो रानोमाळी गंध अलगद दरवळाया लागतो फांदीशी सलगी कराया शेकडो येतात रावे कोवळा मोहोर आहे .. हे तयां ठावूक असते त्यातही असतो धटिंगण एक रावा आगळा शीळ तो घाली असा की जीव होई बावरा वाटते आता कसे हे झाड मी झाकून घ्यावे वाटते त्याने पहावे .. हे ही गे आपसूक असते ठाव घेइ काळजाचा त्याची ती मिठ्ठास वाणी बोलतो काहीतरी अन ऐकू ये हळुवार गाणी चोच मारायास केवळ अंतरी उत्सुक आणि वागणे वरतून त्याचे केवढे साजूक असते झाड हे जपणे जरूरी टाळ असली दिलजमाई यौवनाच्या सोबतीने नेहमी येतेच घाई गर्द हिरव्यावर परंतू शोभते ती हळद बाई तांबड्या कुंकवाविणा हे भान जाणे चूक असते तू रहा सांभाळूनी हे वय तसे नाजूक असते वैभव !!!
|
Sarya
| |
| Wednesday, January 25, 2006 - 6:26 am: |
| 
|
श्यामली धन्यवाद. वैभव कवितेचा अर्थ पुण्यात आल्यावर सांगतो. अरे सध्या बंगळूरला आहे गेल्या काही दिवसांपासून. वय नाजुक असतेला एक छान चाल सुचली आहे तुला आल्यावर सांगतो. श्यामली, त्या वैभवला ही सांग झुळुक वर जायला
|
Shyamli
| |
| Wednesday, January 25, 2006 - 6:32 am: |
| 
|
फांदिशी सलगी आवडल वैभव एकदम सगळे एकदम कुठे जाता रे तुम्ही? WE ला एकदम सगळ शांत होउन जात देवदत्त पण दीसत नाहिये बयाच दिवसापासुन
|
Sarya
| |
| Wednesday, January 25, 2006 - 6:38 am: |
| 
|
अरे वा!!! धृव परत आला! आश्चर्य आहे एवढ्या लवकर कसा काय रे भाऊ?
|
Chanakya
| |
| Wednesday, January 25, 2006 - 7:07 am: |
| 
|
रंग दे बसंती ब्रिटीशांविरुद्ध फ़ुंकले त्यांनी शिंग रणाचे फ़ुंकतो उकिर्डे आम्ही पश्चिमेच्या तणाचे मरणास चुम्बिले त्यांनी देश बाधवांसाठी चुमतो आम्हीच आमचे आयुष्य ' मी ' पणाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्षण अन क्षण ते जगले जाहले गुलाम आमचे जगणे क्षणाक्षणाचे दु:खे कितितरी भोगली त्यांनी हसता हसता वाहतो सुखाचे ओझे आम्ही मणामणाचे निद्रीस्त मनाची द्वारे उघडा रे युवकांनो निश्क्रीय जिणे हे तुमचे बनुदे भक्ष सरणाचे
|
Zaad
| |
| Wednesday, January 25, 2006 - 8:17 am: |
| 
|
कारणाशिवाय छळणा-या संध्यावेळा आता मला सकारण छळू लागतील, पुस्तकात ठेवलेल्या पानावरच्या हिरव्या खूणा गळू लागतील. ढळू लागेल मनामधून आठवांची पाकळी एक एक आवळू लागेल मानेवरून बंधनांची साखळी एक एक. एक एक करून विझतील किंवा विझवले जातील सारे दिवे अंगणच माझ्या घराचे लावील परतवून चांदण्यांचे थवे. हवे होते ते ते मिळाले गळाले ते तसे नकोच होते आंबट्-गोडाचा प्रश्न नाही द्राक्षांना हात लागले होते. होते ठेवले जपून परंतु पुस्तकात एक हिरवे पान... त्या पानाच्या जाळीमधे अता अडकलो मी कायमचा छान!!
|
वैभव, वय वेडे लावणीच्या बाजाने लिहेली तर अगदी हिट होईल. बापू.
|
Maanus
| |
| Wednesday, January 25, 2006 - 12:55 pm: |
| 
|
वेड्या वयावर सापडलेली आजुन एक कविता, मी केलेली नाहीय... पन वैभव चे वेडे वय च्या जोडीला शोभेल म्हनुन इथे टाकतो माझं वय वेगळंच आहे, म्हटलं तर लहान, म्हटलं तर मोठं आहे.. लोकं पण कमालच करतात, सारखं 'लग्न केव्हा करणार' विचारतात.. 'मुलं पहायला लागा' सांगितलं कि म्हणतात, 'एवढी घाई झालीए का?' आता तुम्हीच सांगा, हे बरोबर आहे का? कोणी 'बेबी' म्हटलं कि राग येतो, पण 'मॅडम' म्हटलं कि वय वाढल्यासारखं वाटतं.. रोखलेल्या नजरांची भिती वाटते, पण मनातून 'आपल्याकडे पहावं' हि सुप्त ईच्छा असते.. या वयात सर्वच नियम काटेकोरपणे पाळायचे नसतात.. कधी चालतं सोडून पळत्यामागे धावायचं असतं.. कधी घरी उशिरापण यायचं असतं .. नियम न पाळण्यात पण मजा आहे.. हे वय संपणे ही मात्र सजा आहे..
|
Pama
| |
| Wednesday, January 25, 2006 - 12:59 pm: |
| 
|
वैभव!!! ध्रुव.. छान आहेत कविता.. सारंग.. तू तुझ नाव का रे बदललस मला वाटल हा कुणीतरी वेगळा नवा आहे.. कुठे गायबला होतास इतके दिवस??
|
Champak
| |
| Wednesday, January 25, 2006 - 2:47 pm: |
| 
|
चाणक्य...... प्रजासत्ताक दिना ची ब्याक्ग्राउंड हे काय? छान हे! सारंग म्हंजी सार्या का? धृव कुठे दिसला?
|
Ninavi
| |
| Wednesday, January 25, 2006 - 3:51 pm: |
| 
|
झाड, कविता आवडली. वैभव, वय वेडे मस्त आहे. बाय द वे, कवितेला प्रतिक्रिया म्हणून स्मायली देण्याच्या कल्पनेचा कॉपीराईट माझा आहे. वापरणार्यांना प्रथम माझी लेखी परवानगी घ्यावी लागेल. अन्यथा प्रत्येक स्मायलीमागे १० USD मला पाठवावे लागतील. 
|
Pama
| |
| Wednesday, January 25, 2006 - 4:44 pm: |
| 
|
निनावे.. copyright चे मानधन बर्याचशा स्मायलीज बरोबर तुझ्याकडे रवाना केले आहे.. पोहोचले की कळव लगेच..       
|
Paragkan
| |
| Wednesday, January 25, 2006 - 10:16 pm: |
| 
|
वाह रे वैभव ... खासच! Zaad : good one!
|
सगळ्याना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेछा!
|
निनावी तू रंग कसे बदलतेस?
|
Ninavi
| |
| Thursday, January 26, 2006 - 2:49 pm: |
| 
|
अमेय, तुला पोस्टचे रंग म्हणायचंय ना? इथे बघ.
|
Hems
| |
| Thursday, January 26, 2006 - 4:23 pm: |
| 
|
ध्रुव " बहरानंतर ..." सुंदर कविता. वैभव , " वय वेडे "... आहा! लावणी बाजाबद्दलचं बापूंचं मत पटलं ! झाड, छान आहे कविता !
|
Ninavi
| |
| Thursday, January 26, 2006 - 5:04 pm: |
| 
|
पमे, नाही मिळालं मानधन अजून. स्टॅंप लावले नव्हतेस का? **** मॉड मोड ऑन **** कृपया इथे फक्त कविता आणि प्रतिक्रिया इतकेच लिहावे. पोस्ट, पोस्टेज, मानधन, कॉपीराईट इ. साठी अन्यत्र जागा आहेत. **** मॉड मोड ऑफ ****
|
Pama
| |
| Thursday, January 26, 2006 - 5:12 pm: |
| 
|
निनावे, स्टम्प ऐवजी स्मायलीज लावले होते..स्पेशल पोष्ट होत ना!!... <stamp> kasa lihaayacha?
|
Hems
| |
| Thursday, January 26, 2006 - 5:32 pm: |
| 
|
पमा मी सांगू , मी सांगू ! sT.cmp असा !
|
Hems
| |
| Thursday, January 26, 2006 - 5:34 pm: |
| 
|
पमा , मी सांगू मी सांगू ! st.cmp असा !
|
Pama
| |
| Thursday, January 26, 2006 - 5:38 pm: |
| 
|
स्टम्प sT.cmp ... चंद्र येत नाही हेम्स, दोनदा सांगूनही
|
Hems
| |
| Thursday, January 26, 2006 - 5:43 pm: |
| 
|
परत सांगू का पमा ! :-)
|
Paragkan
| |
| Thursday, January 26, 2006 - 5:45 pm: |
| 
|
छ्या ... किती अपेक्षेनी आलो होतो .. हेम्सचं नाव बघून ... Pama , हे असं लिही. \dev2{sTa.cmp} or \dev2{sTEmp}
|
Hems
| |
| Thursday, January 26, 2006 - 5:50 pm: |
| 
|
पराग !!!! ए पण मला sTa.cmp टायपावं लागत नाही ! sT.cmp पुरतं .. खरंच !
|
Pama
| |
| Thursday, January 26, 2006 - 5:56 pm: |
| 
|
स्टॅम्प..स्टॅम्प.. स्टॅम्प.. जमल रे एकदाच.. थॅक्यू, पराग निनावे, आता बोल किती स्टॅम्प हवेत!!
|
कुण्या दिशेचे वारे वार्याच्या पोटात तलवार खुपसण्याची उर्मी तुझ्यात कधीपासून होती? त्या पर्युत्सुक संध्याकाळी तूच रचलेली भावविव्हल गाणी तुलाच ऐकू येत नव्हती? कोणत्या वेदनेने व्याकुळ होऊन स्वतह्ची छाती बडवीत निघाला होतास? आसक्ती विरक्तीला आव्हान दिल्यागत? समुद्रकिनारी डोलणारे ते निस्सुख झाड तुझा आदर्श असावे कदाचित.. म्हणुनच कुत्र्या मांजरासारख्या उत्कट अलिप्त सहजतेने देहाचे भोग भोगताना अळवाच्या पद्मपात्रातुन पारा गळल्याचा भास व्हायचा काही क्षण तुझ्या या वार्याचे अधून मधून भेटतात फार परवडणार नाहीत म्हणून चार्-दोनच शिदोरीस ठेवून घेतो
|
हो हो त्याचाच ग निनावी...तुला काय वाटलं तू सरडा आहेस? आणि पमा आणि तू किती गोंधळ घालताय!
|
बाकी आदित्य danger कविता आहे!!!
|
लेका डेंजर म्हणजे चांगली का वाईट? 
|
खरं सांगायचं तर मला पूर्ण कळाली नाहीये...पण असं मनात खूप काही भरून राहिलयं हे मात्र जाणवतं आहे...
|
Zaad
| |
| Friday, January 27, 2006 - 4:36 am: |
| 
|
पेनाच्या टोकाशी एकदा दु:ख निमूटपणे येऊन बसले शाईच्या काळ्या रंगात स्वत:ला पार विसरून गेले. पेनाच्या टोकाने एकदा एक दु:ख जन्माला घातले गोंजारले, कुरवाळले, जपले आता ते झाले अगदी आतले. पेनाच्या टोकाला एकदा दु:ख सहन झाले नाही नुसतीच झरली शाई गीत उमटले नाही. पेनाच्या टोकाशी पुन्हा दु:ख येऊन बसतेच प्रत्येकच एकट्याची अशी एक जागा असतेच...!
|