Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
अस्वस्थता...एका पुस्तकाचं निमित्त ...

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » माघ » ललित » अस्वस्थता...एका पुस्तकाचं निमित्त « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 01, 200626 02-01-06  12:24 pm

Ashwini
Wednesday, February 01, 2006 - 11:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रार, अगदी खरं लिहीलं आहेस. ही अस्वस्थता आयुष्य झाकोळून टाकते; पण बंड करण्याचं सामर्थ्य तिच्यात येत नाही बघ. प्रत्यक्ष कृतिची वेळ येते तेंव्हा खूप दुबळी ठरते ती. दर वर्षी एखाद्या NGO ला पैसे दिले की आपल्यापुरता प्रश्न सुटला असं म्हणून आपण आपलं समाधान करत असतो. पण प्रश्न खरच संपतो का? नाही संपत, आपल्यालाही माहित असतं ते.
त्या पैशाचं पुढे काय होतं? ज्यांच्यासाठी दिलेत त्यांच्यापर्यत ते पोहोचतात का, का कुणा तिसर्‍याच्याच खिशात जातात, कसं कळणार?
आपल्या सुरक्षित आणि सुखी आयुष्यात मधूनच उफाळून येणारी अपराधीपणाची भावना मारून टाकण्यासाठी कुठल्यातरी संस्थेला नित्यनियमाने पैसे देणे हा मार्ग कितपत योग्य आहे? हा प्रश्न खरच माझ्या मनात खूप दिवस येतो आहे. तुझ्या लेखाने त्याला व्यक्त होण्याची संधी मिळाली. हेच, असच काहीसं खूप काळ मनात साचलं होतं, पण त्याला मार्गच दिसत नव्हता. अजूनही उत्तर नाहीचे याला. हे guilty feeling जेंव्हा असह्य होतं ना, तेंव्हा खरोखर असं वाटतं की भिरकावून द्यावं हे सुखासीन आयुष्य आणि तिथे जावं जिथे आपली खरी गरज आहे. पण तू म्हणतेस तस, ही उर्मी इतकी तात्कालीक असते ना, एखाद्या वावटळीसारखी ती घुसते आणि तिचा जोर ओसरला की परत आपल्या स्वार्थी आयुष्यासह जगायला आपल्याला सोडून देते.

सेवाभावी संस्थेला पैशाची मदत करणं अयोग्य आहे असा अर्थ कुणी यातून कृपया काढू नये. माझ्यामते that's the least thing anybody can do आणि हे करण्याची इच्छा निर्माण होणे हे नक्कीच प्रशंसनीय आहे. पण आजकाल charity हा व्यवसाय झाला आहे. विशेषतः लहान मुलांच्या नावावर संस्था उभी करून देणग्या मागणे खूप वाढले आहे. सगळ्या संस्था तश्या नसतात. प्रामाणिकपणे काम करणारे लोकही आहेत. पण हे उडदामाजी काळे गोरे ओळखायचे कसे? काय गॅरंटी आहे की आज विश्वासाने एखाद्या संस्थेला तुम्ही मदत केलीत तर आणखी काही वर्षांनी तिचा गैरकारभार उजेडात येणारच नाही? प्रश्न आपले पैसे वाया गेल्याचा नाहीये तर ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत न मिळाल्याचा आहे.

दुसरा कुठला मार्ग दिसत नसेल तर आर्थिक मदत थांबवू नये. शक्यतो सेवाभावी संस्थेची आधी माहिती आपण काढलेली असतेच. ती खरी आहे अशी आशा करून मदतीचा ओघ चालू ठेवावा. हे solution नाहीये. हा पलायनवाद आहे, मान्य आहे. पण दुसरा उपायही दिसत नाही. बसलेली घडी विस्कटून हातात झोळी घ्यायची हिंमतही नाही.
रस्त्यांवर वाढणारी, रेल्वे स्टेशनवर राहाणारी, अश्राप, बेवारस मुलं सिनेमातसुद्धा आपण पाहू शकत नाही. आपल मुल आजारी असल की वाटत अशी आईवेगळी मुल आजारी असतील तर त्यांची काळजी घ्यायलाही कुणी नसेल. रात्रीच्या रात्री आसवांच्या धारांत उशी भिजून जाते पण सकाळ झाली की पुन्हा एक नविन दिवस सुरू होतो, ज्याचा त्या रात्रीशी आणि त्या अश्रूंशी काही संबंध नसतो.

माफ कर रार, तुझ्या bb वर इतकं सगळ लिहीलं म्हणून. पण खरच मनापासून धन्यवाद, तुझ्या अस्वस्थतेच्या निमित्ताने ह्या साचलेल्या व्यथेचा निचरा तरी झाला..



Milindaa
Thursday, February 02, 2006 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सगळं, म्हणजे लेख आणि प्रतिक्रिया वाचून खालील दोन बीबींची आठवण झाली जे नव्याच्या नऊ दिवसांप्रमाणे सुरुवातीला भरुन वाहिले आणि आता कोणी तिकडे फिरकत पण नाही. :-(

हे मायबोलीची बीबी म्हणून नाही तर ते बीबी या संभाषणाशी निगडीत एक प्रतिक आहेत असं मी समजतो म्हणून...

समाजकार्य
संस्था


Bee
Thursday, February 02, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अश्विनी, छान लिहिले आहेस. बरेच काही तथ्य आहे तुझ्या पोष्टींगमधे. पण एक गोष्ट खटकते आहे, कुणाला मदत करणे ह्याचा अर्थ आपण जे मोठ्या मेहनतीने प्राप्त केले त्याचा त्याग करणे असे आहे का? आज इथले बरेच मायबोलिकर परदेशात आहेत. ते फ़क्त त्यांच्यापुरताच विचार करतात का? आज मदत करू इच्छीणार्‍या व्यक्तीला हे जग फ़सवे आहे हे सांगावे लागत नाही. त्यामुळे भलेभले पुढे येत नाही. कुठल्या संस्थेला दान करताना जर खात्री नसेल तर आपणहून असा मार्ग निवडावा तिथे आपल्याला लगेच result दिसेल आणि आपली मदत सत्कारणी लागली ह्याचे समाधान प्राप्त होईल. मदत ही खूप मोठी असायला पाहिजे असेही नाही. तहानलेलेल्या माणसाला पाणी पाजणे किंवा भुकेल्याला अन्न देणे ही देखील एक मोठी मदतच समजावी.

मिलिंदा ती चर्चा वाया गेली नाही. नव्या विचारांना वाट मिळाली आहे त्यातून.. आपली झेप, कुवत ह्याचा अंदाज आला तेही नसे थोडके.


Sashal
Friday, February 03, 2006 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतिशय सुंदर रार ..

I am sure , असे विचार बर्‍याच जणांच्या मनामध्ये येतात .. कदाचित या विचारांना चालना द्यायला, क्रांती व्हायला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे ..


Firaki
Friday, February 17, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस्वस्थ झाले.... पन परत मनाची दार बन्द करुन घेतली सर्वासारखी...... .




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators