|
Mavla
| |
| Wednesday, January 18, 2006 - 1:59 pm: |
| 
|
अर्थ, शब्द, स्पर्श, भावना, या पलिकडेही एक परिभाषा असते.... फ़ेसाळत लाटांबरोबर येणार्या, रुपेरी शिंपल्या सारखी... रातराणीच्या गंधात, पहाटेच्या दवात, सोनेरी किरणांत, उमलणार्या कळी सारखी... जिवंत जागती, मुक्त उधळती, नवतारुण्याने ओथंबणार्या विचारां सारखीच... सहवासची... असेच काही क्षण, आपल्या सर्वांच्या सहवासात!
|
Pama
| |
| Wednesday, January 18, 2006 - 2:10 pm: |
| 
|
अरे! बरच miss केल इतके दिवसात.. सगळ्यांच्या कविता अप्रतीम... मजा आली एकदम इतक्या सगळ्या वाचायला.
|
Pama
| |
| Wednesday, January 18, 2006 - 2:31 pm: |
| 
|
सार्या चराचराला, दोनात भागतो मी, सरलेल्या निश्वासांची, बेरीज मागतो मी. उष्टावले उसासे द्या, असतील तर कुणाचे, घालेल भीक म्हणुनी, कष्टात जागतो मी. विश्वास ठेवतो मी, माझ्यावरी न आता, सावलीस माझ्या, पाण्यात पाहतो मी. धाकात राहिले ना, लाडावले रिपुही, खुरट्या जगण्याची, वहिवाट भोगतो मी. शून्यात अर्थ सारे, पण शून्यात व्यर्थ सारे, लाचार या मनाचे, धिक्कार मोजतो मी.
|
Devdattag
| |
| Wednesday, January 18, 2006 - 2:35 pm: |
| 
|
सुंदर पमा.. सिम्पलि ग्रेट
|
Moodi
| |
| Wednesday, January 18, 2006 - 3:04 pm: |
| 
|
मावळा फारच छान सुरुवात केलीत! गुलमोहरावरचा गुलमोहर आता थंडीतही फूलु द्या. पमा अतिशय सुंदर ग. गझल आहे का ही, मला तरी तसेच वाटतय.
|
पमा सुरेख! पाडगावकरांची एक कविता आठवली... "कोलाहलात सार्या माणूस शोधतो मी ... गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी " कुणाकडे पूर्ण असली तर मला पोस्ट करा प्लीज.
|
Milya
| |
| Thursday, January 19, 2006 - 12:29 am: |
| 
|
पमा अतिशय सुंदर. तू ही गझल म्हणून लिहिली आहेस की नाही माहित नाही. पण कुठे कुठे गझलेच्या नियमात बसत नाहीये असे वाटते.. चु. भु. दे. घे.
|
मेंदी ... बहुधा एखाद्या मेंदी काढणारया मुलीसारखा बसत असावा देव ... जन्मणारया प्रत्येक हातावर मेंदी रेखत प्राक्तनाची दोनच रेषा महत्त्वाच्या ... एक आयुष्याची एक पैशाची .... आजूबाजूला सुखाचे दोनचार ठिपके आवर्जून हात अगदीच ओकाबोका वाटू नये म्हणून ... दटावून सांगत असेल रोज शिंपडायच पाणी , आसवांचं " उद्या " रंगणार ह्या आशेनेच रोज रात्री झोपायचं पुर्वेला उजळताना नवल करीत असेल किती हातांचा रंग इतका केशरी असेल ? माझा हात हातात येइपर्यंत तो कंटाळला असावा हात तरी हलला असावा किंवा तो पेंगुळला असावा कारण इतर हातांसारखा ... हा हात रेखलेला नाहिये म्हणावा तसा प्राक्तनाला रंग चढलेला नाहिये वैभव !!!
|
वैभव.... classic! .... अजून एक साक्षात्कार..
|
Devdattag
| |
| Thursday, January 19, 2006 - 3:46 am: |
| 
|
वैभव आप महान हो
|
Seemad
| |
| Thursday, January 19, 2006 - 5:34 am: |
| 
|
कविता करण्यचि एवढी सुन्दर रेखा हातावर रेखली आहे की
|
Ninavi
| |
| Thursday, January 19, 2006 - 9:05 am: |
| 
|
वैभव...!!! (मी यापुढे एवढीच प्रतिक्रिया देणार आहे तुला. नाही, शब्द सुचत नाहीत ना! आणि क्लिप आर्ट वरून चान्गली की बरी ते कळेल... वाईट नसतातच तुझ्या!!) 
|
Supermom
| |
| Thursday, January 19, 2006 - 10:07 am: |
| 
|
वैभव तू पुस्तक का नाही प्रकाशित करत रे?लोकांच्या उड्या पडतील.
|
Seemad
| |
| Thursday, January 19, 2006 - 11:29 am: |
| 
|
अगदि मनातल बोललीस बघ सुपरमौम
|
Paragkan
| |
| Thursday, January 19, 2006 - 11:32 am: |
| 
|
वाह रे वैभव! शेवटची २ कडवी नसती तरी चाललं असतं ... असं आपलं माझं मत. 
|
Giriraj
| |
| Thursday, January 19, 2006 - 11:39 am: |
| 
|
पराग,माझ्याही हेच मनात आल! वैभवा!
|
Meghdhara
| |
| Thursday, January 19, 2006 - 12:42 pm: |
| 
|
गिरिराज अगदी हेच वाटलं.. वैभव अप्रतिम कल्पना पण उगाच शेवटी मार्ग बदलल्यासारखी.. वैभव बाकी अशा कवितेनंतर कुठल्याही श्ब्दात प्रतिक्रिया लिहिली तरी जे म्हणायचे आहे ते व्यक्तच होत नाही. त्यामुळे वैभव!!! मेघा
|
Mavla
| |
| Thursday, January 19, 2006 - 12:49 pm: |
| 
|
काहिही, असो.. पन वैभवजी कवितेनी भावना सहिच टिपल्या आहेत. अप्रतिम कल्पनेला, सुंदर साकरलं गेलय.
|
Maanus
| |
| Thursday, January 19, 2006 - 12:59 pm: |
| 
|
अप्रतिम.... कुनीतरी इथे एक copyright ची नोट टाका रे...
|
Pama
| |
| Thursday, January 19, 2006 - 1:49 pm: |
| 
|
देवदत्त, मूडी, अमेय, मिल्या... धन्यवाद. मी ती गझल म्हणून नव्हती लिहिली.. पण थोडीफार वाटतेय तशी. वैभव!!! ( मी पण वरील सगळ्यांप्रमाणे इतकच लिहिणार, तू समजून घे प्रतिक्रीया) अरे हो, एक सांगायचय तुला. तुझ्या' हनुमान' नी सगळ्या महाराष्ट्रभर तहलका केलाय. आंतरजालावर फिरतफिरत ती चौथ्यांदा मला मेलातून आलीय. शाबास!!
|
पमा, लाचार या मनाचे धिक्कार मोजतो मी.....सिम्पली ग्रेट.... वैभव वैभवशाली कवितांचे पुस्तक येउ दे.....बाकी काही सांगण्यासाठी शब्दच नाही......
|
माझे गाव...खान्देश आज हजार मैलावरुन मी मीस करतेय त्याची आठवण तुमच्याशी शेअर कर्तेय.... येथे शेतकरी शेतामध्ये इवलेसे दाणे पेरती बघ थेंबामधुनी जीवन येतसे वरती.. कणसाचा तुरा त्याला लपेटती पाती बरसलाय वरुण झाडे झाली तरुण.. झिपरी बाभुळ आडवा वड.. उभा पिंपळ बसकी चिंच कपाशीचे बोंड केळीचे फ़ुल.. झेंडुचा गेंद झाडाखाली चुलाणे ठसका लागे तिच्या धुराने ज्वारीची दाटी तोट्याची काठी बारकी बाजरी उलला मुग.. मक्याला तुरा गायीचा चारा.. वासरांची दांडगाई हिरवीगार आमराई बाळाची झोळी भिल्लीणीची मोळी.. बकर्यांची हुल्लड, कोंबड्याची बांग तापीचा काठ टरबुजाच्या माळा सातपुड्यातील वाट कोपर्यातील शाळा सागाला फ़ुले उंडारणारी मुले, बाकावर वही हाताला शाई.. अभ्यास मात्र काही नाही, क्षणांची झुंबड उडते सारी.... अन आठवते मज काहीबाही........
|
आठवणींची ठेवण छान आहे..
|
Diiptie
| |
| Friday, January 20, 2006 - 8:16 am: |
| 
|
बापू घर आवडल. वैभव कवितेची मेन्दी रन्गली आहे पमा खूप छान -------------- अधीर सन्ध्याकाळ.. हलक उमलत चान्दण आतुरली रात्र.. कूठे आहे चन्द्र.... उदास तरीही फुलतो प्राजक्त जरी शुद्ध प्रतिपदेची पहाट... --------
|
मावळा, सहवासाची परिभाषा अगदी फ्रेश कल्पना आहे पण आणखी स्पष्ट व्हायला हवी होती असे नाही तुला वाटत? विषेशत: उमलती कळी, पहाटेचे दव, रूपेरी शिम्पले वगैरे नित्य नेमाच्या प्रतिमा वापरल्या असल्याने, ही वेगळी परिभाषा कशी असते, कशी जाणवते हे तितकेसे स्पष्ट झले नाही. निदान मला तरी. कदचित दोष माझाच असेल. पण सुन्दर कविता. सुपरमॉम, निनावि, पमा, धन्यवाद. निनावी, खरे आहे तुझे म्हणणे[घर माझे च्या सन्दर्भातले]. त्या कवितेतला नोस्टाल्जिया आणि परात्मभाव परदेशात स्थाइक न होतासुद्धा लहान गावातून मोठ्या शहरात मायग्रेट होणार्यान्नाहि जणवू शकतो. एक कालखण्ड आणि एक लाईफ्-स्टाईल कायामची अन्तरल्यामुळे येणारी खिन्नता आणि हळहळ परदेशात न जाताहि टोचू शकते. मी तो अनुभव घेतलय. बापू.
|
दिप्ती, आगे बढो. बापू.
|
Vaisanty
| |
| Saturday, January 21, 2006 - 3:09 am: |
| 
|
उरी नान्दते रे मुके रान आता जरि गर्द हिरवे..... गुणी पाखरान्चे थवे दूर जाता उभी श्वापदे......... दिसेना निळाई कुठे अन झळाळी काळ्या जळाशी तमाचीच जाळी....... उभे गर्द आता असे रान ह्रदयी तुवा पेटवावे........
|
काळानुरूप आपल्यात दाटलेल्या षंडपणावर.आणि त्यातून आपणात उपजणारया पोक्त हळहळीवर एक भाष्य गुलमोहराला... एकदा बहरल्यावर तू बरसवली होतीस फुले माझ्यावर हळुवार मंद सरीसारख़ी त्या तुझ्या बहराचा मी त्रुणी राहेन सदैव घरी जाताना रोज माझ्या रणरणत्या वाटेवर तूच धरलं होतस आपल्या हिरवळीचं छप्पर माझ्या डोक्यावर तू दिलेल्या त्या सावलीचा मी त्रुणी राहेन सदैव केव्हातरी तुझ्या खोडाला टेकून स्वप्नं पहिली होती माझ्या हळव्या डोळ्यांनी पूर्ती प्राप्त करण्या न करण्यासाठी तु दिलेल्या त्या स्वप्नांचा मी त्रुणी राहेन सदैव एकदा पावसाची एक सर गुंतवून ठेवली होतीस माझ्यासाठी आपल्या पानांत वारयाच्या झुळूकेसरशी माझ्यावर कोसळायाला माझ्यासाठी तु राख़ून ठेवलेल्या त्या सरीचा मी त्रुणी राहेन सदैव तुझ्यावर कर्वतींचे घाव घालत होते ते तु कोसळल्यावर तुला ते ओढत नेत असताना मी तिथेच उभा होतो निःशब्द निर्वीकार तुझ्या त्या वेदनांचा ......... मी अपराधी राहेन सदैव
|
Diiptie
| |
| Saturday, January 21, 2006 - 8:39 am: |
| 
|
please excuse me if i have choose wrong place for this .....
|
Diiptie
| |
| Saturday, January 21, 2006 - 9:05 am: |
| 
|
३४;आई म्हणाली घेऊन या तिला अशिक्शित तुमचे आई-वडिल खेडवळ शाळा, अडाणी राहील, मागे पडेल एकट राहण्याच काय एवढ? ठेवुया पाळणा घरात अजून तर आहे कोवळेपण नन्तरच जड जाईल नाहीतर३४; ३४;आई बापून्चि माया आहे निराळी नात त्यान्ची ती आहे एकुलती खेडवळ कुठली? मीहि त्याच ना शाळेतला? मुलीतली स्त्री आणि मुलातला पुरुष घडवणारी...माझी शाळा गुणान्च्या आकडेवारीत अडकला नाही शिक्शक तिथला आणि एकमेकान्च्याघरी कधीहि, कितीहि, कशासाठीही जाणारे भाबडे मित्र सखे सोबती.. शाळेतले.. गल्लीतले सगळी मुल आपल्या मुलासारखीच वाढवणारे आमचे आणि त्यान्चे आई वडिल हो मधल्या सुट्टित घरी जाउन जेऊन यायचे सागवानी झोपाळा.. मन्द लयीत झुलताना..कुरकुरणारा आणि आईसोबत वाट पहाणारा भूकेला वार्याचा वेग आणि मायेन वाढणारी आई मी जेवल्याशिवाय कधीच जेवली नाही ती.... खेडवळ आहे काय या सगळ्यात?३४; ३४;हेच तर चुकत ना तुमच? जग चालले आहे पुढे तुम्ही मात्र मागे सन्स्कारान्च काय एवढ सन्स्कार वर्गात जाईल ना अधेमधे! माझिही नाहि का ती मुलगी एकुलती? वासरात लन्गडी गाय शहाणी, तशी नको व्हायला गत तिची... खेडवळ नाही तरी, लहान नाही का शाळा तुमची? म्हणून मला वाटते...घेऊन यावे तिला पुन्हा तिला पाठवायचेच आहे ना दुसर्या घरी? आतापासून नको वाटायला परकी कळी माझी ती... उमलताना पाहीन मी! आता मागचे कशाला काढता उकरून नकोच होती मला ती,'दुसरी' म्हणून कालच्या सारखे आज, राहत नाही काही आणि वाटत नाही का तुम्हालाही चौकोनी कुटुम्बाची एक बाजू अधूरी?३४; --------------- 'सागरगोट्यान्चा रोजचा डाव कळेना मी हरले कशी काय बहूधा चित्तच नव्हते थार्यावर बाबा नव्हते का येणार, खूप दिवसानन्तर... टाकूनच दिला मी खेळ अर्ध्यावर बापू नेहमीसारखे ओसरीवर आजी स्वयपाकात त्यान्च तरी होत का, लक्ष त्याच्या कामात? .....गच्च भरून आले होत आभाळ' ----------------------- ३४;रडून घेतले आहे तिने घर डोक्यावर आता न्यावे म्हणतो हिला तिकडेच! तुझ्यावर तरी किती टाकावे, आई? वेलीला फुलान्चा भार कसा म्हणू पण... वाटते मलाही आता तिच्याविना चुकल्याचुकल्यासारखे सुट्टित आणिनच तिला आणि दादाला....३४; ३४;वेल कसली रे मी तर महाव्रुक़्ह सुरकुतल्या देही हीरवा डोलारा चिमण्या पाखरान्चा घडीचा विसावा.... तरी हिरवळीसारखे मन मात्र लपेटून राह्यले आहे याच घराशी, गावाशी, शेतातल्या आईशी नाहीतर......... पण पोरीला सम्भाळ हो नदीकाठ्च्या वार्यावर हेलकावणारे रोप नेत आहेस समुद्राच्या लाटावर सारेच तिथे भव्य दिव्य सुख दु:खाच्या भावना देण्या-घेण्याच्या कल्पना आणि कस सान्गू बाळा.....वखवखणर्या वासना.... एकटी नाही तरी एकटी पडेल पोर पण काय बोलू सगळच ठरल आहे तर.....?३४; --------------- 'आणि सुटले की हो माझे गाव आजी बापू, झोपाळा, दीपमाळीचा पार माझे-माझे, माझ्यासारखे पमी, गणी, आणि कोणी कोणी काळा सावळा,अन्धारातला, देव माझा गार; धाक बसवणारा गाभारा. ऊंच घंटा हाताला नाही आली माझ्या आणि अर्धाच राहिला सागरगोट्याचा डाव तरिही माझ्या भल्यासाठीच ना असे केले माझ्यासाठी तिला रडू आले हे महत्वाचे नव्हते काय? .....मग सागण्यापुरतेच उरले ना माझे घर श.म्भर वर्षापूर्वीच मातीच, लाम्ब रुन्द अन्गनाच, मुक्त पसरलेल्या झाडान्च सागवानी दरवाज्याच, चन्दनी देव्हार्याच, सारवलेल्या चुलीच आणि माझ बालपण खेळण्यासह ट्रन्केत जपणार्या माजघरासारख....... मग आता मी का सांगते आहे सगळ? एका पावसाळ्यात गेली आजी पाठोपाठ बापू एका पावसाळ्यान नेल की उरल सुरल सार आणि परवाच्या पावसान माझ गावही वाहून नेल.... दीप्ती
|
दिप्ती, फारच सुन्दर. मागे पमाच्या एका कवितेबद्दल मी म्हटल होत कि असल्या कवितान्ना कसलेच निकष लावायचे नसतात. तुझी कविता तशीच, तीला समीक्षकी फूटपट्या अजिबात नाही लावायच्या. वैसन्त, 'गर्द उभे रान, तुवा ह्रुदयी पेटवावे' , वा, क्या बात है. बापू.
|
Meghdhara
| |
| Saturday, January 21, 2006 - 11:18 am: |
| 
|
दिप्ती व्वा, सगळं जसच्या तसं डोळ्यासमोरून सरकून गेलं.. अशीही उलथापालथ कुणाच्या आत सुरू असते कधी जाणवलं नाही.. मेघा
|
Mavla
| |
| Sunday, January 22, 2006 - 2:44 am: |
| 
|
सगळ्यांच्या कविता खरच खुपच सुन्दर आहे. पण इकडे सारेच कवि आहेत. आपले सारे लेखक लोक सम्पावर गेलेत क? खाली किती तरी सुन्दर लिन्क आहेत माय्बोलिच्य पन ज्या गेली कित्तेक दिवस कोणि ओपेन पन केल्या नाहित, थोडी पोस्ट तिकडे ही करत जा दोस्तहो. त्या सुन्दर लिन्क मी वाचलेलि पुस्तके. /hitguj/messages/34/193.html?1137601014 कुथे तरि छानसं वाचलेल. /hitguj/messages/34/3251.html?1137434104 कत्रण /hitguj/messages/34/1598.html?1137913126 आनुवादीत किवता /hitguj/messages/34/3089.html?1122654357 गज़लांची लिन्क हि, live आहे पन याच काव्य धारत सर्व पोस्ट करतात तिकडे कोनि सद्या येत नाहि हा काय मामला आहे? एथे गज़लांचि लिन्क आहे जिकडे कितितरी वर्ष कोणि गेलच नाही गजल /hitguj/messages/34/2820.html?1124220585
|
Mavla
| |
| Sunday, January 22, 2006 - 2:48 am: |
| 
|
बापु मी कवि नाहि ओ. हा फ़क्त प्रयत्न होता. फ़सला बहुतेक. सहवासाचि कल्पना सांगताना जड शब्द जमले नहित ओ, म्हनुन साधेच फ़ेकले.
|
Bee
| |
| Sunday, January 22, 2006 - 3:14 am: |
| 
|
ह्या पानावरच्या सगळ्याच कविता खूप छान आहेत. वासंती रान एकदम छान! दिप्ती, अधीर संध्याकाळ खूपच छान.. हीच कविता जरा पुढे लिहा ना. फ़क्त दोन कडव्यावर तहान अर्धवट राहीली...
|
|
|