Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 18, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » पौष » काव्यधारा » झुळूक » Archive through January 18, 2006 « Previous Next »

Jaaaswand
Wednesday, January 18, 2006 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझीच सावली एकदा
रूसून बसली माझ्यावर
म्हणाली.. मी होणार स्वतंत्र
कीव आली ओझ्यावर

जास्वन्द...


Vaibhav_joshi
Wednesday, January 18, 2006 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा असे माझा दुजोरा मोजक्या शब्दांमध्ये
दोस्तहो रुजणे जरूरी भावना शब्दांमध्ये
विखुरलेली मांडणीही भावते, भिडते मनाला
स्पर्शुनी जातेच जाते तीव्रतेने स्पंदनाला
लाभली जर लय तयाला वाढते आणखी खुमारी
गाठण्या ती लय परंतू थांबवू नाही भरारी
वाटते आपणांस जे , ते व्यक्त व्हावे स्पष्टरित्या
काळजाला ना भिडे तो , अर्थ आणि शब्द मिथ्या
ताण बसता ओळखावे गुदमराया लागली
जन्मण्याआधीच कविता व्याकरणाने मारली


Shyamli
Wednesday, January 18, 2006 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है वैभव!!!!!

Ninavi
Wednesday, January 18, 2006 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जियो, वैभव!!!! ... ...

Dineshvs
Wednesday, January 18, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परत एकदा कविता छंदबद्ध व्हायला लागलीय, छान आहे.
आम्हाला शाळेत मुक्तछंद म्हणजे काहितरी अघोरि प्रकार आहे, असे वाटायचे.
निनावि म्हणतेय तेहि खरेच, उत्कटतेपुढे सर्व तुच्छ आहे.


Ninavi
Wednesday, January 18, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शब्द जे जमवून घरटे बांधले
आज ते ही विसकटाया लागले
अक्षरांचे हात सोडुन कापरे
अर्थ गेला उडुन, अश्रू राहिले


Ninavi
Wednesday, January 18, 2006 - 11:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कशी लागे तृषा ही मृगजळाची या मना
कसे क्षितिजास मी कवटाळण्या जातो पुन्हा
कसे अप्राप्य ते सारे हवेसे वाटते
कसे गारूड करती जीवघेण्या यातना


Vaibhav_joshi
Wednesday, January 18, 2006 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजही हे नवल मजला वाटते
भ्रमर तेथे , फ़ूल जेथे उमलते
शेकडो बागा हजारो ताटवे
" हेच " ते भ्रमरास कैसे उमगते ?


Jaaaswand
Wednesday, January 18, 2006 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव निनावी....सही रे
जवाब नही....

तरी पण हा माझा जवाब :-)

फ़ुलाच्या ओठांवर नेहमीच
भ्रमराची छाप आहे
मकरंदाचे निमित्त त्याला
सुगंधाचा शाप आहे

जास्वन्द...


Jaaaswand
Wednesday, January 18, 2006 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो..


हे आपलं असचं....


शब्द वाक्ये व्यर्थ हो सारे
टिपायचे आहेत अर्थ-धुमारे
नभाचे जरी फ़क्त इशारे
रमायचे आहे फ़ुलवून पिसारे


जास्वन्द...


Vaibhav_joshi
Wednesday, January 18, 2006 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त रे जास्वंद ...


नित्यनेमे वाजती
परक्या ऋतूंची पावले
फ़ूल ही धास्तावलेले
झाड ही खंतावलेले


Jaaaswand
Wednesday, January 18, 2006 - 1:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा....
हे तुमच्या ऋतूंवरून सुचलेल
गोड मानून घ्याव......

वर्षेच्या मानेभोवती
ग्रीष्माचा फ़ास आहे
कुणासाठी जगायचे तर
शरदाची आस आहे

जास्वन्द...


Devdattag
Wednesday, January 18, 2006 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऋतुंचे येणे जाणे
नियतिचा ख़ेळ आहे
आयुष्याच्या ओसरिवरती
सुखदु:ख़ांचा मेळ आहे


Devdattag
Wednesday, January 18, 2006 - 1:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


जास्वंद मस्तच..
ग्रीष्माच्या जख़मेवर
वर्षेचं चंदन आहे
वसंताच्या आगमनाला
शिशिराचं वंदन आहे


Jaaaswand
Wednesday, January 18, 2006 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी बापुडा काय सांगणार
कुठले दु:ख अन कसले सुख
माझी नियती एवढेच जगते
डोळ्यांच पाणी नि पोटाची भूक

जास्वन्द...


Vaibhav_joshi
Wednesday, January 18, 2006 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा देवा , जास्वंद , छान !!!

तिनेच मांडला खेळ होता
मी खेळण्या अपात्र होतो
तिच्याच हाती सदैव फ़ासे
मी केवळ .. निमित्तमात्र होतो


Vaibhav_joshi
Wednesday, January 18, 2006 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दोस्तहो दुःख आणि सुख म्हणजे एक नाणे दोन बाजू
एक सरताच दुसरयाची पावले लागतात वाजू
एवढे जाणून आम्ही अंतरी तटस्थ राहिलो
जिंदगीचे व्रत पाळण्या मरेपर्यंत व्रतस्थ राहिलो


Devdattag
Wednesday, January 18, 2006 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पडलेल्या फ़ाशांवर ठरतं
सारीपाटात जिंकत कोण
इथे ख़ेळणारा एकटाच
ख़ेळाडू मात्र असति दोन


Vaibhav_joshi
Wednesday, January 18, 2006 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोण ही नियती तिला ना भीक आम्ही घातली
भेटलो ऐसे तिला की प्रियतमा जणू भेटली
जिंदगी अवघी तिच्यावर टाकली ओवाळुनी
गाठले सर्वांस तिने , एक आम्हां टाळुनी


Bombayviking
Wednesday, January 18, 2006 - 1:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

saKo tuJyaacasaazI XabdaMcaa
ha KoL caalao ra~ Ana idna
AazvaNaIMmaQyao ik%yaok svaPnao bauDalaI
gaa~o JaalaI Aata xaINa


Ninavi
Wednesday, January 18, 2006 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही मुलांचीच शाळा चालल्ये की मी पण आलेलं चालेल?

नाव ते ह्रदयावरूनी
खोडणे मंजूर होते
वाकणे नव्हतेच ठाऊक,
मोडणे मंजूर होते...


Jaaaswand
Wednesday, January 18, 2006 - 1:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिच्या हातात असून फ़ासे
मिरवले होऊन आम्ही प्यादे
इतके जिंकलो हरून आम्ही
वरमून गेले सगळे शह्जादे

जास्वन्द...


Devdattag
Wednesday, January 18, 2006 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृत्युचे ना भय आम्हास
आम्हा अमृतकुपी आहे भेटलि
होतोही असेच शूर आम्ही
जेंव्हा थोडी असते घेतलि


Vaibhav_joshi
Wednesday, January 18, 2006 - 1:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजही चाले तिचे ते
नाव लिहीणे खोडणे
म्हणविणे छाया स्वतःला
अन देह माझा सोडणे


Devdattag
Wednesday, January 18, 2006 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिहिले होते नाव ते खोडण्यासाठिच होते लिहिले
ख़रे सांगतो लिहिणे आम्ही तेंव्हाच होते सोडले



Jaaaswand
Wednesday, January 18, 2006 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिहून पुन्हा खोडण्याची
अजब घाई तुझी आहे
हात नसेल तुझा हातात
शाई मात्र माझी आहे

जास्वन्द...


Ninavi
Wednesday, January 18, 2006 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, किती दिवसांनी उगवला आहेस!!! चारोळ्या सगळ्याच मस्त्- नेहेमीप्रमाणेच!

का असा झाकोळलेला
तू निराशेच्या तमी?
सोड त्या अंधारवाटा
पाठिशी आहेच मी..


Pama
Wednesday, January 18, 2006 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी, समी,जास्वंद, वैभव, देवदत्त... उत्तम चालू आहे. फर्मास लिहिताय सगळे.


नियतीशी माझा जेव्हा
अधून मधून होतो सामना.
तेव्हा तिला येते तिच्या
अल्पायुष्याची कल्पना.


Vaibhav_joshi
Wednesday, January 18, 2006 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे सामोरे येवून होवो
दोस्तांनो आपुली दोस्ती
पाठीला नेहेमीच असते
खंजिराची धास्ती


Ninavi
Wednesday, January 18, 2006 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय पमा!!! वा वा.. आता जमला कोरम!!
जास्वंद, देवदत्त, सहीच!!


Jaaaswand
Wednesday, January 18, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा...
जवाब नही यार..मान गये..
मानाचा मुजरा तुला :-)

देवदत्ता... निनावी...लई..लई......लई बेष्ट

सहस्त्र राती तुडवून मी
अंधारवाटा हेरल्या होत्या
अमावास्येला चकवून मी
चांदणवाटा फ़िरल्या होत्या

जास्वन्द...


Vaibhav_joshi
Wednesday, January 18, 2006 - 2:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निनावी .. कुठाय पुढची ? पमा , बाळ अभ्यास नाही का? चारोळी मस्त

नियतीशी सामना करणे
रोजचेच जाहले आहे
मला तिचे अन तिजला माझे
वेड लागले आहे


Pama
Wednesday, January 18, 2006 - 2:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय निनावे!! बरेच दिवसानी इअतके सगळे आलेत एकदम झुळकेवर..सही चाललय..


तुझ्या माझ्या दोस्तीची
इतकीच का रे किंमत?
कौतुकाच्या थापेसाठी
जुळवावी लागणर हिंम्मत!


वैभवा.. हलकेच घे रे!! आमची कौतुकाची थाप नेहमीच पडत राहणार.


Pama
Wednesday, January 18, 2006 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभ्यास आहे रे, पण ब्रेक के बाद!!:-)




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators