Jaaaswand
| |
| Thursday, January 12, 2006 - 11:19 am: |
| 
|
श्यामली सीमा सही बर का श्यामली.. डायरीमधले नवीन पान डायरीमध्ये शब्दच हवेत नको असा वेडा ध्यास धरायचा असेल तर धर फ़क्त मोरपिसांचा अट्टाहास जास्वन्द...
|
Seemad
| |
| Thursday, January 12, 2006 - 11:42 am: |
| 
|
मोरपिसाचा धरु म्हणतोस अट्टहास इतक्या मखमाली वाटेवर ठेवताना पाय कोडतो रे माझा श्वास अनुस्वार कसा लिहायचा?
|
Moodi
| |
| Thursday, January 12, 2006 - 11:46 am: |
| 
|
ko.nDato कोंडतो असे लिही. छान जुगलबंदी. 
|
Jaaaswand
| |
| Thursday, January 12, 2006 - 12:06 pm: |
| 
|
मित्रहो.... हा माझा छोटा " फ़टका " प्रयत्न... अनंत फ़ंदी ह्यांची क्षमा मागून श्वास कोंडला धीर खचला तरी वाट आपली सोडू नको जिंकून घेशील जग सारे शेवटची लढाई ओढू नको जास्वन्द...
|
Shyamli
| |
| Thursday, January 12, 2006 - 12:08 pm: |
| 
|
श्वास तु ध्यास तु जीवनाचि आस तु वेड तु हट्ट तु तुच मी अन मीच तु श्यामली
|
मोकळे ते तुझे केस तो कंगवा पाळतो मी तुझ्या आठवांचा थवा जात नाही मानातून मूर्ती तुझी काळजाला किती जाच आणि हवा? तुषार जोशी, नागपूर
|
जास्वंदा श्यामली छान चाललेय. वाह तुषार क्या बात है.
|
एकदा बोटे तुझी त्या कंगव्याशी भांडली. अन रात्र एक सांडली, मोकळ्या केसांमधे. रोज उडत राहिले आठवांचे थवे, आरास त्यांची मांडली मोकळ्या केसांमधे.
|
एकदा बोटे माझी, तुझ्या कन्गव्याशी भान्डली अन नजर एक साचली, तुझ्या मोकळ्या केसान्मधे हळुवार फुन्कर, बट एक सळसळली रागावला कन्गवा, हळुच टाकला खिशामधे सन्घमित्राच्या चारोळीवरुन साभार फुकट उचलेगिरी! बायदीवे, सन्घमित्रा, ते तिकडे V&C वर RSS च्या ( सन्घाच्या ) नावाने बोम्बाबुम्ब चालली हे वाचलीस का?
|
Devdattag
| |
| Friday, January 13, 2006 - 1:49 am: |
| 
|
संघमित्रा आणि लिंबुटिंबु क्षमस्व. एकदा बोटे त्याची त्या कंगव्याशी भांडली वाट कोठे सांडली मोकळ्या मैदानामध्ये बोटांत शंभरची नोट एक सळसळली जाउन मग पाही हळूच टकला आरशामध्ये
|
Devdattag
| |
| Friday, January 13, 2006 - 2:03 am: |
| 
|
एक माझाही( फ़ेर)फ़टका कुणी बोलला सोड लिहीणे तरी पोस्ट करणे सोडू नको वाचून होतील शांत सारे लिहील्या वाक्या खोडू नको
|
देवदत्त, मस्त! बहूत खूब!! बापू.
|
Jaaaswand
| |
| Friday, January 13, 2006 - 3:23 am: |
| 
|
मनापासून हरवून जाईन तुझ्या स्वप्नील केशसंभारात उजेडसुद्धा नकोसा वाटेल मला त्या ओजस्वी अंधारात जास्वन्द...
|
Shyamli
| |
| Friday, January 13, 2006 - 4:33 am: |
| 
|
धन्यवाद संघमित्रा, कोण बोलती देवा तुजला लिहु नको शब्दांची ही जुगलबदि रे ऊगाच लाऊन घेऊ नको अन दिवे घेण्या तु विसरु नको श्यामली
|
Prem869
| |
| Friday, January 13, 2006 - 4:38 am: |
| 
|
तुषार, सीमा, श्यामली वाह ख़ुपच सुंदर! लिंबुटिंबु, संघमित्रा, देवदत्ता सही है जुगलबंदी.
|
Devdattag
| |
| Friday, January 13, 2006 - 5:04 am: |
| 
|
दिवे घेण्याची नविन पद्धत इथे प्रत्येकाला भावलि होती अन काल गडावर कुणीतरी दिव्यांची स्विटडीश ठेवलि होती
|
Jaaaswand
| |
| Friday, January 13, 2006 - 5:17 am: |
| 
|
देवदत्ता..तुझ्या गडाची री पुढे ओढून.... थोडेसे... अयोध्येमधल्या परिस्थितीवर नाही गडाचे पूर्वीसारखे बुरूजांमधेही खाचा दिसतात शरयूच्या घाटांवरती आता रोज नव्या ठेचा लागतात जास्वन्द...
|
Jo_s
| |
| Friday, January 13, 2006 - 5:27 am: |
| 
|
दिवे घेतले कुणी हो, दिवे घेतले कुणी केस कुणाचे कुण्या कंगवी सारेच ईथले गुणी हो, दिवे घेतले कुणी
|
Daizy
| |
| Friday, January 13, 2006 - 6:15 am: |
| 
|
जास्वद,तुषार, सीमा, श्यामली,लिंबुटिंबु, संघमित्रा, आणि चालु द्या मजा येते......
|
Shyamli
| |
| Friday, January 13, 2006 - 7:03 am: |
| 
|
खरच, गुणवंत हो सारे ईथले साद देताच दाद मिळे आपुलेच ते सर्व भासती आपोआप हे काव्य जुळे सग्ळ्यांना धन्यवाद श्यामली
|
Jaaaswand
| |
| Friday, January 13, 2006 - 7:42 am: |
| 
|
मित्रांनो तुम्हाला मकर-संक्रमणाच्या हार्दिक शुभेच्छा... गेले नाही झुळूकेवर कोणी संक्रातीचे कोड घालून तिळ-गुळाच्या शुभेच्छा अवघड शब्दच घ्या गोड मानून जास्वन्द...
|
Prabhu
| |
| Friday, January 13, 2006 - 2:11 pm: |
| 
|
तिळाच्या छोट्या कणाना जसा गुळाचा पाक घट्ट बाधुन टेवतो तसेच आपल्यातील प्रेम सुध्दा घट्ट राहावे आणि त्यात मधुर गोडवा कायम राहावा हीच आजच्या शुभदिनी विनती, मकर सन्क्रातीच्या हार्दीक शुभेच्छा
|
सहीच मंडळी,माझा हा आवडता आणि एके काळी शांत निवांतपणे चालणारा बी बी दिवसेंदिवस अधिकच बहरतोय..दुथडी भरून वाहतोय.. नवनविन मंडळी झक्कास भर टाकत आहेत... कीप ईट अप लोक्स सन्मे,खूप दिवसांनी तुझी चारोळी वाचायला मिळाली इथे... काय हे तुझ्या सारख्या चारोळी क्वीनला शोभते का हे... बहरलेली झुळूक पाहुन दिल कसा अगदी खूष झाला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या अन गोड गोड बोला
|
Jo_s
| |
| Saturday, January 14, 2006 - 2:06 am: |
| 
|
नेहमिच करायच्या गोष्टी ज्या विसरून जातो आपण त्या आठवण देण्या आम्हा त्यांची योजना ही संक्रांतीची तिळगुळ देऊ आथवा घेऊ आपण सदा गोड बोलू सुधीर
|
Shyamli
| |
| Monday, January 16, 2006 - 3:30 am: |
| 
|
अस कुणि गेल की जीवाचा माझ्या थरकाप होतो माहित आहे मला की जाणार आहे ईथे आला तो श्यामली
|
Shyamli
| |
| Monday, January 16, 2006 - 3:36 am: |
| 
|
आम्हि मग्न आमच्यातच असतो तो म्रुत्यु स्वजनास नेतो अट्ळ अशा सत्याचा परीचय आम्हास तेंव्हा होतो श्यामली
|
वा मयूर ये हुई ना एन्ट्री. आणि तू तरी कुठे होतास? मी आल्यापासून पाहिली नाही तुझी चारोळी. हे आपल सहज गम्मत म्हणून. कशावर तरी संक्रांत आल्यावरच बरे सुचते गोड बोलणे. बाकीचे वर्षभर प्रत्येकाच्या स्वतंत्र बोल्या आणि स्वतंत्र बाणे.
|
Sarang23
| |
| Monday, January 16, 2006 - 5:25 am: |
| 
|
मित्रा ते बाणे आणि लणे काही जमल नाही. चारोळीत तोच तर खरा पंच असतो एखाद्या शेरासारखा... बरोबर ना? राग नसावा...
|
Ninavi
| |
| Monday, January 16, 2006 - 3:27 pm: |
| 
|
सारंग, अरे कधीतरी गोड बोल!!! उत्कटता हा आत्मा असतो तिनेच होते जिवंत कविता नसेल ती तर कशास नुसते शब्दांचे हे मढे सजविता? झर्यासारखी फुटून यावी उरातली ती सारी खळबळ अलंकार, यमके अन कोट्या वरवरचा देखावा केवळ!!!
|
Kshipra
| |
| Monday, January 16, 2006 - 11:39 pm: |
| 
|
निनावी, तुझ्यासाठी एक गोड चारोळी शब्द तुझे मंजुळती हलक्याने हलव्यात दूर असले तरीही जाणवेन गोडव्यात
|
Jaaaswand
| |
| Tuesday, January 17, 2006 - 5:20 am: |
| 
|
नमस्कार मित्रहो... सगळे एकदम झक्कास लिहिताहेत....मजा आली वाचून मखमली तुझ्या गालांवर आता विरहांचे पुन्हा ओघोळ नको शांतचित्त ह्या तुझ्या जगामधे स्पंदनांचा उगा गोंधळ नको जास्वन्द...
|
Jaaaswand
| |
| Tuesday, January 17, 2006 - 5:42 am: |
| 
|
भरतीच्या दर्यातही कधी मी मोती होते शिंपले काय सांगू बुडायला मला दोन डोळेही होते पुरले जास्वन्द...
|
Ninavi
| |
| Tuesday, January 17, 2006 - 9:17 am: |
| 
|
धन्यवाद, क्षिप्रा. खरंच गोड आहे चारोळी. जास्वंद, सुरेखच.(नेहेमीप्रमाणेच!)
|
Mavla
| |
| Tuesday, January 17, 2006 - 10:31 am: |
| 
|
मी mavla ज़ुलुक वर पहिल्यांदाच येतोय म्हनुन छोटासा प्रयत्न. ज़ाई.... जुई.... मोगरा.... शेवंती ही नको तीला... स्वत:च गुलाब होती ती काटे होते जिला..........!
|
आईशप्पत निनावी. मान गये दोस्त. असंच उत्तर लिहायचं होतं मला पण सुचलंच नाही. जास्वंदा मस्तच रे. क्षिप्रा हलवा फक्त निनावीलाच का म्हणे? सारंगा खरंच चांगली लय आणि बांधणी असलेल्या कविता आवडतातच मलाही. तरीही रहावत नाही म्हणून मान्य मला ही खुलून दिसते शृंगाराने जरी. पण त्याशिवायही वेधून घेते जातीची सुंदरी. ----------------- छान काही सुचलं तर लिहायचं की नाही बोल. शब्द सुचले नाहीत तरी अर्थ असेल गर्द खोल. ट ला ट, म ला म चा कशास व्यर्थ अट्टाहास. अर्थासमोर तुच्छ सारी यमके आणि अनुप्रास. इथे अपेक्षित पंच आले असावेत.
|