Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 14, 2006

Hitguj » Gulmohar-Archives » शालिवाहन शके १९२७ ( २००५ - ०६ ) » पौष » काव्यधारा » काहीच्या काही कविता » Archive through January 14, 2006 « Previous Next »

Sarang23
Tuesday, January 03, 2006 - 10:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा पहिलीच कविता माझी:-)

मुस्काटात मारल्यावर

मुस्काटात मारल्यावर दोघांचेही
हात होतात ओठ नकळतच...
ठेवलाच मार खाल्लेल्याने जर
त्याच बाजुचा हात गालावर
तर समजावा शरमिंदेपणा
विरुद्ध हात म्हणजे... निर्लज्जपणा...

आणि मारणार्‍याने चोळला हात
तर अकारण मारेल आणखी एक
जर थरारलाच हात त्याचा
समजाव... इरादा होता नेक!

सारंग


Suhasini
Wednesday, January 04, 2006 - 12:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vvA kya baat hai !! bilkul sahI pharmaaya barkhurdaar !!!

Devdattag
Wednesday, January 04, 2006 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुस्काटात मारलेल चांगलं टिपलय

Anilbhai
Wednesday, January 04, 2006 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच वेळा बर्‍याच लोकांकडुन खाल्लेल दिसतय. सही आहे. :-)

Devdattag
Thursday, January 05, 2006 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मी अन तो पक्षी

मी अन तो पक्षी
उडतोय आकाशात स्वच्छंदपणे

मी अन तो पक्षी
दोन्ही पंखांनी झेलतोय वार्‍याला

मी अन तो पक्षी
चाखतोय प्रत्येक नदीच पाणी

रात्र झाली तरीही चालतोय मी
अन
अन तो पक्षी निवांतपणे झोपलाय आपल्या घरट्यात


Chinnu
Thursday, January 05, 2006 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्ता वेगळी वाटली कविता. आवडली अगदी!

Vaibhav_joshi
Friday, January 06, 2006 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे इकडे बघितलंच नाही .... मस्त रे सारंग ... देवदत्त ..

Jo_s
Friday, January 06, 2006 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग छान निरीक्षण आहे.


Sarang23
Friday, January 06, 2006 - 11:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रांनो...      

Sarang23
Tuesday, January 10, 2006 - 12:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्र प्रदर्शन

प्रसंग पहिला: प्रदर्शनानंतर पत्रकार परिषद...

संपले कालचे जे चित्र प्रदर्शन
झाले तेथेच माझ्या कलेचे खरे दर्शन
जिंकलो जो प्रथम पुरस्काराचा मान
माझेच होते लायकीचे खरे ते स्थान
मारले असे जे कुंचल्याचे फटके
झाले अनेकांचे क्षणात तोंड विटके
बोललो खुप आता घेतो थोडी विश्रांती
सोसले मी खुप पण चिज झाले अंती

प्रसंग दुसरा: पत्रकार परिषदेनंतर मित्रांसोबत...

संपले कालचे जे चित्रकलेचे दिंडवडे
त्या तेलातच घेतले मी तळुन माझे वडे
काढताना चित्र मी झोकली होतीच जास्त
बसले ब्रशाचे फटके होऊन बेभान मस्त
शेवटी जो तोल गेला त्यानेच सगळा झोल केला
उडाले अन सप्तरंग माझाच झाला बोलबाला
काय सांगु यापुढे जे झाले चित्र साकार
त्यानेच मिळवला कालच्या प्रदर्शनात पुरस्कार.

सारंग


Milya
Tuesday, January 10, 2006 - 1:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग मस्त रे हुसेन ला डोळ्यासमोर ठेवुन लिहिलीस का?

Vaibhav_joshi
Tuesday, January 10, 2006 - 2:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच रे सारंगा !!!

Psg
Tuesday, January 10, 2006 - 4:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान आहे कविता सारंग!

Sarang23
Tuesday, January 10, 2006 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या, वैभव, psg धन्यवाद...
नाही रे
M F Husain फ़ेमस होण्याआधी ही कविता लिहीली आहे. इथे आत्तापर्यंत टाकलेल्या साहित्यात ऑगस्ट २००४ नंतरच काहीच नाहीये...
अजुन जुनच देऊन झाल नाही, नविन कुठुन देणार:-(


Vaibhav_joshi
Tuesday, January 10, 2006 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ENOUGH

इंद्राने हा काढलाय मेमो
संयम अता हा पाळायचा
तिच्यासाठी लिहीताना कविता
चंद्राचा लॅम्प नाय जाळायचा

डोळ्यांनीही धाडलिय नोटिस
चोवीस तास ना वाहणार आम्ही
दोन चार दहा वीस थेंबानंतर
नळ बंद हा ठेवणार आम्ही

मन तर थांबलय जागेवरती
गाडी रिजर्व्ह ला आली म्हणतं य
तिच्या मागे ना धावणे बाबा
पेट्रोल फ़ार महागलं म्हणतंय

शब्द लेखणी कागद सारे
घरावर घेवून आले मोर्चा
" लिखना अब बंद चाहिये बॉस ,
बहुत हुवा लडकी पे खर्चा "

थोडक्यात काय तर तुझ्यामुळे हे
जगणं माझं मुश्किल झालंय
" होय " म्हण , " नाही " म्हण काहीतरी म्हण
डार्लिंग आता ... लै बिल झालंय

वैभव !!!


Devdattag
Tuesday, January 10, 2006 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव.. लय भारी.. जियो

Psg
Tuesday, January 10, 2006 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, फ़ारच छान. प्रेमकविताच, पण अलग अंदाज मै. आवडली. अशी कविता वाचून तिला नक्कीच हसू फ़ुटेल आणि ती हो' म्हणेल :-)

Neelu_n
Tuesday, January 10, 2006 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह.. वैभव
नेहमीप्रमाणेच खुसखुशीत :-)
तु काव्यसंग्रह काढतोयस ना?


Milya
Tuesday, January 10, 2006 - 7:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव : वा उत्साद वा!!!

Paragkan
Tuesday, January 10, 2006 - 12:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भले शब्बास ...! :-)

Kandapohe
Tuesday, January 10, 2006 - 9:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंग, वैभव जबरीच!! हसण्याचा संयम कसा पाळायचा ते कळवा. :-)

Devdattag
Wednesday, January 11, 2006 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दरवेशी आला
दरवेशी आला
अस्वल माकड
घेऊन आला

दरवेशी आला
दरवेशी आला
पसाभर तांदूळ
बाजरी घाला

उलट्या उड्या
भपूर टाळ्या
माकड माकडिणीचा
तमाशा झाला

दरवेशी आला
दरवेशी आला
कशीही नोकरी
साजरी त्याला

झिजला जोडा
फाटला खिसा
उभ्या संसाराचा
तमाशा झाला

दरवेशी आला
दरवेशी आला
अस्वल माकड
होऊन आला



Mmkarpe
Thursday, January 12, 2006 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुदामा आणि कृष्ण...?

कामावरुन येउन टेकलो सुरु होती पोराची चुळ्बुळ
वाटलच नक्किच काहितरी नविन असनार खूळ
थोड्या वेळातच न राहवुन केला त्याने प्रश्न
बाबा एकाच शाळेत शिकायचे का हो सुदामा आणि कृष्न.?
म्हनालो हो; पण आताच का पडला तुला हा प्रश्न
पोरग म्हनाल जरी सुदामा गरिब ब्राह्मण आणि नंदाचा पुत्र कृष्न.
आता मत्र त्याच्या प्रश्नान डोक सुन्न झाल
उत्तर तर राहुद्या वेगळ्याच प्रश्नान घेरल
कस समजाव त्या अबोध बालकाला
हा द्वापर नाही कलियुगाचा फेरा चाललेला
इथे नाही किंमत पैसा सोडुन इतर कशाला
म्हनुन तर सुदामा सरकारी शाळेला आणि कृष्ण खाजगी काॅन्वेन्ट्ला.


Kandapohe
Thursday, January 12, 2006 - 8:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करपे सुंदर, वासतववादी कविता

Devdattag
Friday, January 13, 2006 - 1:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

करपे छान


मीच आहे माझ्याचसाठी
ऐसेही एकदा वाटून गेले
एकटेपणाचे दु:ख मोठे
माझ्या ह्रुदयी दाटून गेले

खरे सांगतो मीच जेंव्हा
त्या मलाच पाहतो
एक अनामिक विखार
आज मलाच दाहतो

पण अजुनही एक सत्य
तुमच्या समोर वाहतो
तो मी आज ना
ह्या आसमंति राहतो

लाभले कुणाचे सख्य
हे ही तुम्हास सांगतो
तोच आहे एक त्रिभुवनि
जो डाव्या गुढघ्याने रांगतो


Pkarandikar50
Friday, January 13, 2006 - 3:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त तिन्ही कविता मस्त आहेत. सारन्ग, वैभव, खरेच सुन्दर कविता.
बापू.


Jaaaswand
Friday, January 13, 2006 - 4:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवा....
अप्रतिम रे...
कविता म्हणजे एकदम
"नाहीच " होती....

Devdattag
Friday, January 13, 2006 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगच्या वळण ह्या गज़ल वरून सुचलेले.. मुळ कविता सुंदर..

वळण

वळण आले चाललो मागे पुढे
दाव रस्ता घर माझे तेवढे

अगम्य झाले बोलणे मी बोलतो
ऐकसि तू भाग्य माझे केवढे

सांभाळू शकतोस का मज तू तरी
वाढले का भास माझे एवढे

असतिल मित्र माझे विसरलेले
मन माझे राती एकटे कढे

आहेस आज तू तरी सोबतिला
रोज वाहतो मीच माझे मढे


Kmayuresh2002
Friday, January 13, 2006 - 8:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त,कविता जरी आहे सुरेख परि जागा चुकलासी.. अरे,अश्या कविता टाकायची ही जागा नव्हे रे.. योग्य ठिकाणी बदली कर बरे तिची:-)
मित्रहो,नियमानुसार वागा.. योग्य ठिकाणी योग्य ते टाका... अन्यथा त्या त्या
बीबीचे स्वतंत्र अस्तित्व कसे जाणवणार.. हा तुम्हा सर्व कवी मंडळींना
तुमच्या या मित्राचा प्रेमाचा सल्ला.. संक्रांतीनिमीत्त गोड मानुन
घ्यावा ही नम्र विनंत्ती.. :-)
मकर संक्रांतीच्या तहेदिल शुभेच्छा


Aaftaab
Friday, January 13, 2006 - 10:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मयुरेश, तुमच्या शुभेच्छांमधलं तहेदिल अगदी तिळगुळामध्ये शिरखुर्मा घातल्यासारखं वाटलं बघा :-)





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators