उकल
रात्र जागीच जराशी सोबतीला रानगंध आसुसली दोन मने सारे तुटले गं बंध दूर पानाआड कोठे रातकिड्याचा गजर करी बेहोष जीवाला उरातली थरथर शीत साजण स्पर्शाने मोहरले तनमन ओल्या दवासम त्याने मला घेतले टिपून दवातली ओल मग उतरली पापण्यांत सोड मिठी सैल जरा झाली झाली रे पहाट तृप्त असून जीवाची का होई घालमेल दवातल्या उखाण्याची मी शोधिते उकल.. - सखीप्रिया (प्रिया बंगाळ)
|