« | »




तरी...

पूर्वेपाशी उभा दिनमणी
उंबर्‍याशी तरी,
पाय अडे

काळाकभिन्न तरी
ओळखीचा डोह
घट बुडे

सांभाळला तोल
स्वप्नांना तरी ,
जाती तडे

अगतिक तरी
श्वासांची असोशीने
कात झडे

- हेम्स.