« | »




सम

भान हरपून गेलेले , रान हरखून आलेले
असो दुपार, नसो अपार, मन भरून गेलेले

शुभ्र पहाटेच्या वेळी रास प्राजक्ताची तशी,
उमलत्या वयातली निरागस कासाविशी

तारका मनात, आभाळ कवेत, चंद्र तर हाकेवर
किंचितशाही संदेहाने परी जीव होई खालीवर

किती गाणी, किती गार्‍हाणी, मनमानी
धुंदीचा प्याला ओठांवर, ध्यानीमनी

स्वप्नांची हाती नौका अन इच्छांचा सागर
उसळते बेत मनी, लाटांगत अनावर

शैशवाची गत थोडी, थोडा वार्धक्याचा गम
वेड लावी जीवाला ऐसी तारुण्याची सम

- हेम्स.