पुण्य फाटकाबाहेर गाईला नैवेद्य लावून आजीबाई आत गेल्या.... पॉलिथिनच्या पिशव्यांनी पोट फुगलेली गाय पुरणपोळी खाईना तेव्हा, दबकत आलेल्या कुत्र्यानं राजरोसपणे तोंड घातलं.. दहा ठिकाणी नैवेद्य खाल्लेला कुत्रा, अर्धीच टाकून गेला पुरणपोळी.. तसंच डुकरानही हुंगून घेतलं जाता जाता... आता भिंतीशी दडलेली माणसाची पिलं बाहेर आली... कुणी नसलेली बघून रिकामं भांडं चाटून गेली.. जरा वेळानं आजीबाई लंगडत आल्या पुण्यानं भरलेली ताटली घेऊन गेल्या.. - मनिषा साधू
|