« | »




कशाला हवी?

कशाला हवी ही नवी बोलभाषा
कशाला व्यथा जीवघेणी हवी?
कशाला पुन्हा तारकांच्या झुल्याने
जीवाला नवी गीतमाला हवी?

नकोना उभा राहू त्या पायरीशी
जिथे पावले कालची थांबली
नको हात देऊस परतोनि मागे
कधीची तिथे सावली लांबली

नको रे नको हाय! शब्दांत वेधू
खुणा कालच्याही नको दाखवू
पुसोनि कशा टाक आतिल वाटा
मनाच्या तळाशी नको साठवू

- मनिषा साधू.