« | »




वाट

दोन जीव थकलेले
अजून वाट पाहात होते
लवकर परत ये
जाताना म्हणाले होते

वाट पाहाता पाहाता
अचानक काळरात्र झाली
दोन वातींच्या पणतीमधली
एक ज्योत विझून गेली

बाभळीवरचा चिमणा पक्षी
करूण विरहगीत गातोय
दूर क्षितीजापल्याड आता
एकच दिवा मिणमिणतोय


-अश्विनी.