« | »




वाटचाल..

पिंपळपानाच्या जाळी-जाळीतून
बाहेर उघड्या पडलेल्या शिरा
आतून आतून एकमेकांमध्ये
घनदाट होऊन बिलगलेल्या,

आधी कशा कोवळ्या-कोवळ्या
पक्व जरड्-जरड होत जाणार्‍या
पिवळ्या-पिवळ्या पानासोबत
शेवटी गळून खाली पडणार्‍या,

जाळी-जाळीच्या घट्ट विणीतून
अतूटपणाचं नातं जपणार्‍या
आरपार अंतरंगातून प्रांजळ
अस्तित्व फक्त मागे ठेवणार्‍या,

सोबतीची अशी कशी ही वाटचाल
मानवजातीच्या विरुद्ध वाटते आहे..

-बी.