तुला पाहता ... तुला पाहता मी मला विस्मरावे सखी सांग आता कसे सावरावे? जगावेगळी ही तर्हा लाजण्याची जणू लाजणेही निमंत्रण ठरावे ऋतू कोणताही असो भोवताली तुझा स्पर्श होताच मी मोहरावे लपेटून घ्यावे तुला मी असे की नभाने जसे चांदणे पांघरावे मला मान्य प्रत्येक श्वासांत लाटा तुझ्या वादळाने उरी वावरावे अशी रात्र येता कलश अमृताचे क्षणांनी भरावे, युगांनी झरावे -वैभव जोशी.
|