« | »




रान

पाऊस रानात
ओघळ पानात
पालवी हिरवी
माझिया मनात

झुळूक रानात
प्राजक्त पानात
गारवा सुगंधी
माझिया मनात

बासरी रानात
माधुरी पानात
कनात सुरांची
माझिया मनात

वणवा रानात
ठिणगी पानात
काहिली काहिली
माझियाच मनात

-मीनाक्षी.