« | »




आभास

तूच मला हवास असा
माझा तरी अट्टाहास का?
काय तुझ्यावाचूनी माझे
अडकतील हे श्वास का?

शिशिरामधल्या वृक्षांना
नवमल्लिकेची आस का?
प्रतिक्षण मृत्युयातना
तरी जगण्याचा सोस का?

मी समजावले मनाला
सत्य असो वा आभास का?
तरीसुद्धा सांग ना असे
आयुष्य माझे उदास का?

-अश्विनी.