बहुधा तू अनाकलनीय गूढ, आलास की होकारानकाराची वाट न पाहता धुवाँधार कोसळणारा, श्वास घेण्याचीही उसंत न देणारा, नेमकं बोलणारा मी संयत, बरीचशी अव्यक्त, आसपास नसूनही सतत जाणवणारी, ' जसा आहेस तसा ' तुझा स्वीकार करणारी, कधीमधी कवितेतून व्यक्त झाले तर गोरीमोरी होत गुमसुम होणारी, मनमुक्त, तुझ्यासाठी प्रार्थना करणारी काहीबाही बोलतात लोक हल्ली आपल्याबद्दल असं आपापलं राहून एकमेकांचं होण्याला प्रेम म्हणत असावेत बहुधा...!! -क्षिप्रा.
|