« | »




न तू आज येथे

न तू आज येथे
न तो मंद वारा
न ते चांदणे, लाजरे, त्या स्मिताचे

न तो श्वास आरक्त
न तो स्पर्श ओला
न ते गंधही गोवलेल्या फुलांचे

न ती रात्रयुवती
न ती मेघवसने
न डोकावणार्‍या शशीचेहि हसणे

अबोला न तूझा
तुझे नाहि खुलणे
न ते लाजणे, साजणे, ते बहाणे

न तू आज येथे
न मी आज माझा
मला लागले वेध त्या मीलनाचे

-श्रीराम.