गिफ्ट .... तुला गिफ्ट म्हणून काय द्यायचं बरंच काही ठरवलं होतं तुला काय आवडेल आठवताना मन तुझ्यात हरवलं होतं शेवटी कशीबशी तयारी करून पोचलो तुझ्या दारी पार्टी संपली होती... दुनिया निजली होती सारी खिन्न होऊन मागे वळणार इतक्यात वाजली पावले दार उघडलेस अन मलूल हासून म्हणालीस "ये आत अजून मी ही नाही जेवले" आवंढा गिळत प्रवेश केला तुझ्या महालात आणखीन क्षूद्र होत गेलो त्या उंची मायाजालात तश्यात तू हात पुढे केलास "गिफ्ट दाखव उत्सुकता ताणली आहे" मी खजील होत म्हणालो "विशेष काही नाही गं एक कविता आणली आहे" क्षणात तुझ्या चेहेर्यावर चांदणं पसरलं ते झुंबर, ते लामण दिवे....सगळं सगळं विसरलं मग उरलेली रात्र आपण एकमेकांना वाचत होतो तू तुझी कविता वाचत होतीस मी माझी "कविता" वाचत होतो - वैभव जोशी.
|