अशा सांजवेळी आभाळ जेव्हा भरून येतं तेव्हा माझ्याही मनात आठवणींची काळोखी दाटते सैरभैर होऊन मग घरटं चुकलेल्या पक्ष्यासारखं एकेक झाड ते शोधायला लागतं कितीही समजावलं तरी त्याला उमगत नाही की घरटं आता राहिलंच नाही कालपर्यंत माझं जग होतं त्यातलं काहीसुद्धा उरलं नाही जाताना तू काहीसुद्धा नेलं नाहीस म्हणालीस आता तेवढा वेळ नाही तुझ्याशिवाय जगतांना माझ्याकडे तेवढं सोडून काही नाही म्हणून म्हणतो परत ये कधीही न जाण्यासाठी किती पुरणार आठवणी तुझ्यावाचून जगण्यासाठी - सुमोद
|