Rimzim
| |
| Monday, March 24, 2008 - 3:16 pm: |
| 
|
ह्या विषयावर आधी चर्चा झालि असेल तर mods plz हा बी बी तिकडे हलवुन ईथे link द्यावी. ईंडियाला लहान बाळाला घेवुन जाण्या आधी किती shots पुर्ण होणे गरजेचे आहे? साधारण तीन महिन्याच्या बाळाला घेवुन जायचे आहे. पुण्यामधे असे comparable shots मिळतात का? अथवा ईतर काहि options आहेत का? कोणी लहान बाळाला घेवुन असा प्रवास केला आहे का? असल्यास plz ईथे आपले अनुभव पोस्ट करा. आणि जाताना काय सामन घेवुन जावे? लहान बाळाच्या (अमेरिकन पासपोर्ट) बद्दल आणि POI card बद्दल या आधी चर्चा झालि होती पण मला सापडली नाहि, त्याची link मिळु शकेल का?
|
Amruta
| |
| Monday, March 24, 2008 - 5:17 pm: |
| 
|
माझी मुलगी २ महिन्यांची असताना आम्ही देशात गेलो होतो. तिथे जाताना खास असे काहि शॉट्स घेतले नव्हते. नेहेमिचेच पुर्ण करुन गेलेलो. आपल्याकडे इथे देतात ते शॉट्स मिळतातच उलट इथेच BCG - for TB चा शॉट देत नाहित जो आपल्याकडे अगदी तान्ह्या मुलाला देतात. आम्ही देशात पोचल्यावर प्रथम Dr कडे गेलो तर त्यांनी BCG चा शॉट दिला होता. गेल्या गेल्या DR visit केलेली उत्तम PIO ची चर्चा इथे झाली आहे. /hitguj/messages/103388/79687.html?1178116094
|
Rimzim
| |
| Monday, March 24, 2008 - 6:10 pm: |
| 
|
अम्रुता धन्यवाद! पण तु दोन महिन्यामधे किती शाॅट पुर्ण केले होतेस? आणी किती महिने राहिली होतीस?
|
Amruta
| |
| Monday, March 24, 2008 - 7:05 pm: |
| 
|
आता आठवत नाही ग. (आता माझी मुलगी ६ वर्षांची आहे) पण त्या लिस्ट मधे असतात ते पुर्ण केले होते. तुझ्या बाळाच्या Dr कडुन confrim करुन घे. तेव्हा आम्ही इथला प्रोजेक्ट संपवुन गेलो होतो त्यामुळे तेव्हा परत गेल्यावर वर्षभर तिथेच होतो.
|
रिमझिम, भारतात Prevnar, IPV उपलब्ध आहेत. माझ्या बाळाला ठाण्यात डो. केतकरांकडे दिले होते. जे इथल्या schedule मध्ये असतल तेच द्यायचे असतात. पण तुमच्या राज्यात नियम वेगळे असु शकतात. Better confirm with ur pediatrician. मी Connecticut मधे आहे. परत यायच्या आधी भारतात दिलेल्या सर्व vaccines चे certificate आणायला विसरु नका.
|
जाताना थर्मामीटर, बाळाची सगळी औषधं, डॉक्टरकडून मिळालेली फाईल, फॉर्म्युला (देत असाल तर) हे आवश्यक आहे. बाळाला वेगळ्या सीटवर झोपवणार असशील तर योग्य ती कार सीट बरोबर हवी. प्रवासाआधी airline ला फोन करून बाकी काय लागेल ह्याची चौकशी करून घ्यावी. उन्हाळ्यात नेणार असाल तर इथेच पेडिऍट्रिशिअन ला घामोळं वगैरेसाठी क्रीम, लोशन विचारून घ्यावीत. जमल्यास Baby Einstein च्या lullaby classic, Travelling melodies वगैरे सारख्या गाण्याच्या CDs घून गेलं तर विमानात खूप उपयोगी पडतील. टेकॉफ, लँडिंगच्या वेळी बाळांना कानाला त्रास होतो तेव्हा पॅसीफायर किंवा (देत असाल तर) दुधाची बाटली द्यावी.
|
Rimzim
| |
| Tuesday, March 25, 2008 - 2:47 am: |
| 
|
thanls to all of u अजुन जास्त माहिती शाॅट बद्दल मिळु शकेल का? सिंड्रेला तु कोणत्या महिन्यात गेली होतिस आणि कधी परत आलिस? म्रुनमयी मी या सगळ्या गोष्टि लक्षात ठेवेन.
|
Shonoo
| |
| Tuesday, March 25, 2008 - 11:24 am: |
| 
|
जर बाळाला फॉर्म्युला देत नसाल तर पाजते वेळी पांघरायची शाल मिळते ती आठवणीने न्यावी. विमानात, एअरपोर्टवर निवांत जागा मिळत नाहीत. अशा वेळी शाल फार उपयोगी पडते. बाळाला भारतात असताना Solid food सुरु करणार असला तर तिथेच भाताची पेज वगैरे करून देता येते. पण इथल्या सारखंच चालू ठेवायचं असेल तर इथून गर्बर चे राइस सिरियल व त्याबरोबर मिसळण्यासाठी फॉर्म्युला न्यावा.
|
Rimzim
| |
| Tuesday, March 25, 2008 - 4:11 pm: |
| 
|
शोनु मी तीन महिन्याच्या बाळाला घेवुन जात आहे ईंडिया मधे आणि चार महिन्यांसाठी जाणार आहे. तर मग मी formula चे डबे घेवुन जाईन.
|
Savani
| |
| Wednesday, March 26, 2008 - 3:14 am: |
| 
|
रिमझिम, मी माझ्या मुलाला साडेचार महिन्यांचा असताना घेउन गेले होते. तेव्हा त्याचे २ शॉट्स झाले होते.मला इथल्या डॉ. नी सांगितलं की तिथे द्यायचे असतील तर द्या शॉट्स पण समजा नाहीच जमलं तरी हरकत नाही. इकडे आल्यावर देऊ. मी तरी त्याला भारतात कोणतेही शॉट्स दिले नव्हते. फ़ॉर्म्युला आणि गर्बर राईस सिरियल हे मात्र सगळं मी बरोबर नेलं होतं. अर्थात फ़ॉर्म्युला तिथे सुद्धा मिळेल.
|
Rimzim
| |
| Wednesday, March 26, 2008 - 11:22 am: |
| 
|
सावनी तु परत कधी आलिस? आणि परत आल्यावर ईथल्या डाॅ ने रहिलेला miss झालेला शाॅट दिला का मग?
|
Sayonara
| |
| Wednesday, March 26, 2008 - 2:26 pm: |
| 
|
रिमझिम, तुझ्या बाळाच्या pediatrician शी बोलून बघ ना शॉटसबद्दल. ते रेकमेंड करतीलच ना. मी आत्ता पहिल्यांदाच माझ्या सव्वा वर्षाच्या मुलाला घेऊन गेले तेव्हा त्याच्या डॉक्टरशी बोलून मगच शॉटस दिले. आणि नेहमी पिणारा फॉर्म्युला वगैरे बरोबर घेऊन जाणंच चांगलं नाहीतर पोट बिघडायची भिती. आणि डायपर, वाईप्स नेणार असशीलच. त्याचं वजन होतं खूप पण तिकडे 'हगीज'खूप महाग पडतात आणि क्वालिटी ही फार चांगली नाही.
|
मी बाळ अडिच महिन्यांचा असताना गेले होते. त्याचा IPV, Prevnar, DTaP, HIB चा एक round इथे झाला होता. तिकडे गेल्यावर चौथ्या आणि सहाव्या महिन्यात एक्-एक दिला. आणि pulse polio च्या वेळेस ओ.प.व्हि. परत एकदा दिला. पण प्रत्येक वेळेस त्याच्या इथल्या doc ला consult केले होते. Huggies आता बरेच चांगले मिळतात आणि किंमत पण साधारण सारखीच पडते पण wipes मात्र नक्क्कि घेउन जा. भारतात सगळीकडे मिळत नाहित आणि फार महाग आहेत. प्रवासात unflavored pedialyte पण बरोबर ठेवा.
|
मी मुलुंडच्या life style मध्ये एक section बघितला होता जिथे Avent, BabyBjorn, Evenflo, Fisher-Price Baby, Graco, Playtex, Safety 1st, The First Years ह्या brands चे बरेच products मिळतात. किंमती डोउलरच्या भावात वाटल्या i mean USD * currency rate. पण तिथे baby food नाही दिसले.
|
Prajaktad
| |
| Thursday, March 27, 2008 - 3:19 pm: |
| 
|
रिमझिम! भारतात असताना पाणी बदलाचा बराच त्रास मुलांना होतो...पहिल्यावेळेला मी पुर्ण bisleri पाणी दिले होते मुलिला..दुसर्या ट्रिपला मग ब्रिटा चा जार नेला होता( सोयिचा पडतो) पाणी उकळुन घेतले तरी माति कण जातात.. फ़ॉर्मुला india त सुधा मिळतो तरिही शक्या तेव्ह्ढा घेवुन जा.. आणी लवकारात लवकर गायीचे दुध द्यायला लाग.. multiple sets of bottles अगदि मश्ट मुंबईत पुण्यात असशिल तर डायपरस मिळवण्याचा प्रश्ना नाही.. बाकी साईझ आणी क्वालिटीचा एकुणात आनंद्च आहे.. तु जातिये तेव्हा उन्हाळा असेल तर,डायपर वापरणे गैरसोयिचेही ठरेल..(गरम किति होइल!!) पेडियाक शी बोलुन एक app करुन घ्या ते बरच काही सजेश्ट करतात.. आणखी एक म्हणजे डासांचा भलताच prob असतो तेव्हा mosqutio net अगदी मस्ट.. गूड लुक , प्रवासासाठी शुभेच्छा!
|
Anupama
| |
| Friday, March 28, 2008 - 6:08 am: |
| 
|
रिमझिम, immunization ची खुप काळजी नाहि केलीस तरी चालेल. मी तुला mainstream च्या opposite suggestion देत आहे.. AAP चे जे schedule आहे त्या प्रमाणेच तुम्ही shots दिले पहिजेत असा rule नाहिये. खरतर एकाच दिवशी बाळाला ३,४ वेगवेगळे shots देणे मला चुकिचे वाटते. तु भारतात जाणार त्याआधी २ महिन्याचे shots दे पण त्या नंतर चे shots तु परत इकडे आल्यावर continue करू शकतेस. भारतत जान्याआधी polio देणार असशील तर बाकिच्या shots बद्दल खुप कालजी केली नाही तरी चालेल. माझ्या पहिल्या मुलीचे shots अगदी uptodate आहेत पण सध्या autism चा rate वाढल्यामुळे आणि त्याची imuunization शी असलेली लिन्क या बद्दल जेन्ह्वा वाचन केले तेन्वापासुन मझ्याअ दुसर्या कन्येला (८ महिने) मी one shot per month from 4 mnths onwards या schedule वर टाकले आहे. य बद्दल एक खुप चांगले पुस्तक आहे ते नक्कि वाच. What Your Doctor May Not Tell You About Children's Vaccinations (Paperback) by Stephanie Cave अनि check askdrsears.com
|
Please make a note of BCG vaccine - We prefer to give BCG vaccine in India (and we should) but TB skin test comes positive for next few years because of BCG vaccine. And as there is no way to proove if this TB test is positive because of vaccine or because of exposure to TB virus, US doctors ask to take 9 month TB treatment. Plus this positive test creates issues during school admission. So think over it if you are planning to stay in US for long term. Before giving BCG vaccine in India first do TB skin test (which will be negative) and then give vaccine and keep negative test report with you. This is my own experience.
|
Rimzim
| |
| Wednesday, April 30, 2008 - 2:44 pm: |
| 
|
तुम्हा सर्वांना मनापासुन धन्यवाद.
|
Majoshi1
| |
| Saturday, May 03, 2008 - 8:53 am: |
| 
|
hi, iam taking my two and half year old toddler to india i want some suggestion to keep them kool during travelling also iam taking her alone my husband will join us in india later i am very tense abt this when we went first time she was quiet young , so she was not knowing but now will she bother me in travell? rs is direct flight
|