|
My daughter is 3 and half year old. She started going to a montessorie when she turned 3. Until then she was going to a home day care where the provider was also speaking marathi so she was speaking marathi really well. but since last 6 months, she has completely switched talking in English. She understand all the marathi we talk to her but she can not speak marathi. Can someone give me tips on how to encourage her to continue speaking in Marathi? Do your children speak good Marathi and how did you achieve it? Has this topic been discussed here before? If yes, please send me the link. I tried to search but didn't find anything.
|
Shonoo
| |
| Friday, November 30, 2007 - 1:00 pm: |
| 
|
तुम्ही स्वत: हा प्रश्न इथे मराठीत का विचारला नाही :-)
|
Maanus
| |
| Friday, November 30, 2007 - 7:58 pm: |
| 
|
ही ही ही ही
|
Sonalisl
| |
| Saturday, December 01, 2007 - 12:14 am: |
| 
|
:-D सध्या घराबाहेर तिच्याशी कोणी मराठीतून बोलनार नसेल; पण तिला मराठी बोललेलं समजतं ना, तर मग बोलेल ती. पण ती बोलत नाही म्हणुन तुम्ही तिच्याशी मराठी बोलनं टाळू नका.
|
Saj
| |
| Friday, December 07, 2007 - 3:25 pm: |
| 
|
vaishali, mala 2 muli aahet (6 & 4 varshe vay). doghihi chan marathi boltat, ekhada navin shabd aikala ki lagech mhanje kay vichartat. aamhi doghehi gharat purna marathich bolto agdi tya lahan asalyapasun,tyamule pahili bhasha tya shikalya ti marathich. tya doghi ekmekinshi boltana boltat english madhe baryachda kheltana, pan mi tyanchyashi (other than homework)english madhe bolale ki tyana vegale vatte karan tyana mahit aahe gharat marathich bolale jate. tyamule tumhi doghehi tichyashi marathit bolat raha,prashna vicharla ki have/nako kiva ho/nahi ashi uttare expect kara. asech thodethode karun tila encourage kara.
|
Hello vaishali, This is a very common question. I too, had it when my daughter was 2-3 years old. Do not worry too much. keep talking to her in marathi. My daughter now is 12 year old and talks good marathi and even reads/writes too. I didn't force her to talk in marathi, but I continued talking to her in marathi. I think she learned a good marathi and started talking marathi when she visited her grand- parents. She wanted to talk to them and they speak only marathi with her!! She enjoyed the stay in India, when she started talking in marathi.That inspired her to sit and pratice writing and reading. ofcourse I helped and taught her, when she asked for it. So,do not get frustrated..they will come along with you..but you have to give them time and space..
|
मराठी बोलण्याची चर्चा इंग्रजीतून... हसावे की रडावे कळत नाही... May be we all should walk and Talk in Marathi. Afterall it's our Mother Tongue, and we should all use it and be proud of it... :D
|
hello Vinay.. I know it sounds funny that I am writing about marathi in English!! All Indians here in US do the samething...talk & walk in English. That is the necessity of fast paced life here. But it doesn't prove that they are not proud of their mother tounge or origin !!
|
नाही हिरवाचाफा.. सगळे भारतीय असे नाहीत.. इथे मायबोलीवर अस्खलीत मराठी बोलणारे आणि लिहिणारे आहेत तसे इतर ठिकाणीही सापडतील... इतर विषयांवर इंग्रजी बोला ते चालेल.. पण आपल्या मुलांना मराठी कसे शिकवावे ही चर्चा जर इंग्रजीत करावी लागली तर खरंच त्या मराठीचे भवितव्य धोक्यात आहे.. कारण 'आडात नाही ते पोहर्यात कुठून येणार?' या नियमाने.... मुलांच्या बाबतीत एक लक्षात ठेवा.. ती 'आज्ञापालन' नाही 'अनुकरण' करण्यात पटाईत असतात... Speak MaraThi, Speak Marathi म्हणून कितीही सांगितलेत तरी त्याने फरक पडणार नाही.. मायबोलीवर यापूर्वीही मराठी भाषेला मजबूत करण्यासाठी इंग्रजीतून परिसंवाद झाले आहेत. हे म्हणजे 'गरीबांना पोटभर अन्न कसे मिळेल यावर पंचतारांकित खाद्यगृहात चर्चा' करण्यासारखे आहे.... यातूनच 'मीठ भाकर नसेल तर शिरापुरी खा' असली उत्तरे निघतात... >>>I know it sounds funny that I am writing about marathi<< It's does not sound funny....
|
Uday123
| |
| Tuesday, February 26, 2008 - 4:15 am: |
| 
|
मी विनय देसाईंच्या मताशी सहमत आहे. माझ्या दोन मुलींशी (५, ८) आम्ही नेहेमीच मराठीतुन बोलतो, पण शाळेत जायला लागल्यापासुन उत्तरे इंग्रजी मधुन मिळतात. आमच्या शहरात फ़क्त ४-१२ मराठी घरटी आहेत त्यामुळी एकंदरीत वापर कमी होतो. पालकांमधे आपल्या मुलांना मराठी शिकविण्याची तिव्र ईच्छाशक्ती हवी; त्यासाठी दोघांनी नियमीत थोडा वेळ द्यावा लागेल याची देखील जाणीव आहे.
|
All Indians here in US do the samething...talk & walk in English. That is the necessity of fast paced life here. >>>> अमेरिकेच्या फ़ास्ट लाईफ़चा मुलाना मराठी शिकवण्याशी काय संबंध??? एक उदाहरण देते. पूर्ण शिक्षण मराठीतून झालेलं असले तरी मी व्यवस्थित कानडी बोलते (मी मूळची कर्नाटकातली. बॉर्डरवरची नव्हे. ) आहे तरीही मला मराठी शिकताना अडचण आली नाही (मी सात वर्षाची असताना बंगलोरमधून इकडे रत्नागिरीला आले) आणि कानडीशी माझा संबंध तसाच राहिला. एक प्रमुख कारण म्हणजे चार चौघासमोर बोलताना code language म्हणून मस्तपैकी वापरता येते.
|
Chyayla
| |
| Tuesday, February 26, 2008 - 11:42 am: |
| 
|
All Indians here in US do the samething...talk & walk in English. That is the necessity of fast paced life here. >>> ठीक आहे बाहेरच्या जगात ती गरजच आहे पण घरात तर निदान पुर्णपणे मराठी वापरता येत. जीथे मराठी वापरता येत जसे की मायबोली इथे तर मराठी वापरायलाच हवे ना. मी पण अमेरिकेतच आहे पण घरात, मीत्रांशी, नातेवाईकांशी बोलताना मराठीच. वा जिथे तिथे मराठी वापरता येइल वापरतोच आणी माझ्या सारखे बरेच लोक आहेत ईथे. ईतकेच काय माझा सोबती मुंबईचा मुळचा मराठी कुटुंबातला पण त्याच्या घरी हिंदीतुन बोलतो पण माझ्या सोबत राहुन तो सुद्धा अस्खलित मराठी बोलायला लागला. जीथे मोठे असे बदलु शकतात तिथे लहान मुले तर अनुकरणामुळे मराठी बोलणारच ना. लहान मुले जरी घरात ईंग्रजीतुन उत्तरे द्यायला लागली तरी कटाक्षाने पालकान्नी मराठीतच बोलावे मुले आपोआप अनुकरण करतातच त्यात जबरदस्ती करायचीही गरज पडत नाही.
|
Zakki
| |
| Tuesday, February 26, 2008 - 1:11 pm: |
| 
|
इतरांचे काय असेल ते मला माहित नाही. पण आमच्याकडे आमची मुले जे मराठी बोलतात, ते केवळ सौ. मुळे. ती मुलांशी इंग्रजीतून बोलायला जाम तयार नाही. मुलांची मावशी आली होती भारतातून, ती पण खूष. ती म्हणाली भारतातली मुले सुद्धा इतके मराठी बोलत नाहीत. अर्थात्, जेंव्हा अनेऽक वर्षांपूर्वी (म्हणजे तुम्ही सगळे जन्मण्यापूर्वी, नि तुमचे बाबा प्राथमिक (ज्याला तुम्ही मराठीत elementary म्हणता) शाळेत होते, तेंव्हा) आम्ही इथे आलो, तेंव्हा आम्ही पण इंग्रजीतूनच सतत बोलत होतो. पुढे मराठी मित्र जमले, मराठी मंडळ, वगैरे झाली तेंव्हा आपआपसात मराठी बोलू लागलो, मराठी शाळा वगैरे केले. पण आता इथे परिस्थिती सुधारत आहे. बरीच मराठी मुले मराठी बोलू शकतात. मायबोली पाहून मला प्रचंड आनंद झाला. म्हणून मी म्हणत असतो, शक्यतो इथे तरी मराठीत बोला, इंग्रजी शब्दप्रयोगांना मराठी प्रतिशब्द प्रचलित करा. म्हणजे शब्दश: अर्थ नव्हे, नाहीतर 'निमकरांच्या दुकानातून डुकराचे तळलेले मांस' असे काहीतरी व्हायचे. कुणि आहेत का भारतात मराठी मधे उच्च शिक्षण घेतलेले, खूप मराठी वाचलेले
|
Zakki
| |
| Tuesday, February 26, 2008 - 1:23 pm: |
| 
|
All Indians here in US do the samething...talk & walk in English. (ALL?) अहो, मायबोलीवर काय अमेरिकेतले लोक इंग्रजीतच लिहीतात का? अडतीस वर्षे झाली इथे येऊन. मी निदान मायबोलीवर तरी मराठीत लिहा, मराठी भाषा विकसित करा, इंग्रजी शब्द प्रयोग टाळा असे ओरडतो आहे. तुम्ही नवीन दिसता! अहो, तुम्हीच जर असे 'इतर लोक बोलतात म्हणून' असे म्हणू लागलात, तर मुले पण तसेच करतील. तुम्ही जरा जवळपास मराठी मंडळ असेल तर त्याचे सभासद व्हा. 'एकता' मासिक लावा. मराठी लोकांच्यात मिसळा, मग मुले पण शिकतील मराठी. अन् ते सगळे मुले लहान असतानाच करा.
|
Mbhure
| |
| Tuesday, February 26, 2008 - 6:55 pm: |
| 
|
घरात कटाक्षाने माराठी बोला. फक्त ते सहज असावे, मुला ती जबरदस्ती आहे असे वाटू नये. मागे UK ला असताना तेथिल एका कुटुंबातील मुले अस्खलित हिंदीत बोलताना पाहिली. म्हणजे १० वर्षाच्या मुलाने मला विचारले, " ये नया बाजा कैसा लगा? " मला काहीच कळले नाही, कारण बाजा मला कुठे दिसलाच नाही. तो म्हणाला, " ये भैयाके लिये लाया है. " ती केनवूडची Music System होती. एव्हढ्या प्युअर हिंदीबद्दल मी त्याच्या आईला विचारल्यावर तिने सांगितले; ती स्वतः M.Sc. असली तरी मुलांना मुद्दामच सांगितले होते की मला हे तुमचे इंग्रजी कळत नाही त्यामुळे हिंदीतुनच बोला. हेच मी माझ्या मुलीसाठी वापरले. लहान असताना तिला त्याची मजा वाटायची की बाबाला इग्लीश येत नाही. एक मात्र नक्की, की कधीही जबरदस्ती करु नका किंवा व्याकरण चुकले तर हसु नका मग मुले बुजतात. उदः माझी मुलगी कोणीही विचारले 'कशी आहेस' की म्हणायची " सहज " . मग कधीतरी आमच्या लक्षात आल्यावर तिला " सहज " आणि " ठीक " ह्यांचा अर्थ सांगितला. ही मुले ईंग्लीशमध्ये विचार करत असल्याने बर्याचदा भाषांतरीत मराठी बोलतात.उदाः Can I eat? चे " मी खाऊ का? " ऐवजी " मी खाऊ शकते / तो का? "
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|