Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Picnic food

Hitguj » Living Abroad » US related » Picnic food « Previous Next »

Ketakimd
Thursday, October 05, 2006 - 5:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई बाबाना लॉन्ग ट्रिपला घेउन जाताना बरोबर खायला काय घेउन जाता येईल
साधारण ३ दिवसान्साठी मेनू सूचवू शकाल का?
ते ब्रेड नाही ख़ात, सम्पूर्ण शाकाहारी आहेत.


Saket
Thursday, October 05, 2006 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केतकी, तू हा प्रश्न
इथे पोस्ट करु शकते.
सोबत न्यायला तू मेथी
/ पालक / आलू पराठे करुन नेऊ शकते.जायच्या दिवशीच खायला म्हणून पुलाव किंवा दहीभात पण नेऊ शकते. स्नॅक्ससाठी एगलेस रवा केक करु शकते. रवा केकची रेसिपी इथे आहे.
अजून काही सुचले तर सांगते तुला.





Mrinmayee
Thursday, October 05, 2006 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केतकी, आमच्या एका वेजीटेरियन नातेवाईकांना मी खालीलप्रमाणे पदार्थ दिले होते. (ते लोक बाहेरचं पण खात नाहीत)
* पहिल्या दिवशी खायला नारळ-कोथिंबीरीची चटणी लावून सॅंडविचेस आणि दहीभात
* त्या दिवशी रात्रीसाठी इडल्या-चटणी
नंतरच्या ३ दिवसांसाठी:
* पुर्‍या फार तेलकट होतात म्हणून तिखट मीठाचे पराठे, लोणचं, लसणीचं तिखट
* भिजलेले पातळ पोहे: पुळीओग्रे ( MTR) चा मसाला लावून (२ दिवस टिकतात)
* भाजणीची छोटी छोटी थालीपीठ. (कांदा न घालता ३ दिवस टिकतात)
* हांडवो
* टिकतील अशी फळं
* ओल्या नारळाच्या वड्या
* चिवडा, चकल्या


Ketakimd
Thursday, October 05, 2006 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद धन्यवाद सर्वाना! खूपच उपयुक्त माहिती सान्गीतली. रवा केकची रेसिपी नाहीये तिथे.

Sherpa
Friday, October 06, 2006 - 5:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maaze aai baba aale asatana aamhi puran poli neli hoti microwave madhe 30 sec thevali ki ultimate ani var tup

Maitreyee
Friday, October 06, 2006 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही microwave असलेली room घ्यायचो, त्यामुळे अजून बरेच options मिळतात. जसे तान्दूळ तेलात परतून, त्यात तिखत मीठ मसाला वगैरे घालूनच झिपलॉक मधे घ्यायचे, नन्तर फ़क्त microwave मधे पाणी घालून शिजवायचे छान गरम खिचडी तयार! नुस्ते तान्दूळ नेले तरी पुलिओगरा, लेमन राईस वगैरे करता येतो. बरोबर योगर्ट / दही, ताजी फ़ळे वगैरे असली (जिथे जाऊ तिथे या गोष्टी विकत घेता येतात) तर व्यवस्थित जेवण होते.
दूध न घालता केलेला शिरा पण टिकतो २ दिवस. आणि गरम केल्यावर छानच लागतो



Fulpakhru
Friday, October 06, 2006 - 7:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दशम्या पण नेउ शकतेस
थोड्या दुधात गुळ घालून ठेव. गुळ दुधात विरघळला की ते दुध वापरुन कणिक भिजव. कणिक भिजवताना त्यात पाणि अजिबात घालु नकोस.
त्याच्या जाड पोळ्या करुन तुप सोडुन भाज.
नेहमीच्या पोळीपेक्शा ३ पट तरी जाड पोळी लाट.
(गुळ चवीप्रमाणे घाल)

या दशम्या पण ३ ते ४ दिवस टिकतात. सोबत लोणचे किवा लसणीची चटणी घेउन जा

आणि राइस कुकर जर घेउन गेलीस बरोबर तर तुला त्यात खिचडी करता येईल.

तसच रवा थोड्या जास्त तेलात फ़ोडणी करुन भाजुन ने. यात कान्दा घातलास तर चान्गला तळून घे. हा असा भाजलेला रवा बाहेर आठवडा भर टिकतो आणि फ़्रिज मधे तर महिनाभर पण टिकतो.

तुला राइस कुकर मधे उपमा करता येइल.



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators